Wednesday 10 April 2024

INAUGURATION पसाय इंवेंटो (Pasay invento) या कंपनीच्या नवीन भव्य कार्यालयाचे उदघाटन

विश्वासहार्य सेवेमुळे अल्पावधीतच पसाय इंवेंटोच्या नावलौकिकतेत भर

पुणे- वास्तववादी कल्पकतेच्या आधारावरील अभिनव जाहिराती, बदलत्या काळाअनुरूप सोशल मिडीयाचा वापर आणि विश्वासहार्य विपणन सेवेमुळे अल्पावधीतच पसाय इंवेंटो (Pasay invento) या कंपनीच्या नावलौकिकतेत भर पडली आहे. कंपनी विविध व्यवसायांचे ब्रॅण्डिंग, मार्केटिंग, अॅडव्हर्टायझिंगचे गेल्या ९ वर्षापासून अविरतपणे कार्यरत आहे. नुकतेच रविवारी दिनांक 07 एप्रिल 2024 रोजी पसाय इंवेंटो कंपनीच्या भव्य नवीन कार्यालयाचे उदघाटन सोहळा संपन्न झाला. या उदघाटन कार्यक्रमाला बहुराष्ट्रीय कंपन्याच्या संचालकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

पुणे शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनी परिसरातील माणिकचंद गॅलेरिया मध्ये इंवेंटो कंपनीचे नवीन कार्यालयात स्थलांतर झाले असून या नूतन कार्यालयाचे उदघाटन सोहळा संपन्न झाला यावेळी इंवेंटो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रोहन बनकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

पसाय इंवेंटो (Pasay invento) या कंपनीच्या वतीने बहुराष्ट्रीय कंपन्यासह स्थानिक पातळीवरील व्यावसायिकांना विविध सेवा प्रदान केल्या जातात यामध्ये Branding & Designing, Digital Marketing & Technology, Marketing Strategies & Solutions, Content Creation & Videos, Media Planning & Buying, Product Packaging, Franchise Development, Influncers, Celebrities & PR या सेवांचा समावेश आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, माजी सनदी अधिकारी शंकरराव सातव, चंद्रकांत दळवी, सुखदेव बनकर, ज्येष्ठ वकील राहुल दिंडोरकर, अॅड. योगेश बोरावके, पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचे चंद्रकांत भुजबळ, मृणाल ढोले-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

Saturday 6 April 2024

लोकसभा/विधानसभा निवडणुक-2024 प्रचारासाठी विविध परवाने अर्जांचे नमुने format download करा

लोकसभा/विधानसभा निवडणुक-2024 प्रचारासाठी विविध परवाने अर्जांचे नमुने format download करा

प्रचारासाठी विविध परवान्यांचे अर्जांचे नमुने एकत्रित उपलब्ध
लोकसभा/विधानसभा निवडणुक- प्रचारासाठी विविध परवाने आवश्यक असतात अशा सर्व परवाने प्रकार व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात. परवाने कोठे मिळतात व त्यासाठी विविध अर्जांचे नमुने पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेने उपलब्ध करून दिलेले आहेत.
विविध अर्जांचे नमुने format download

मिरवणुक/रॅली/पदयात्रा आयोजित करण्यासाठी अर्ज (प्रपत्र-अ) (अर्जाचा नमुना)
मिरवणुक/रॅली/पदयात्रासाठी पोलीस स्टेशनचे ना हरकत पत्र (अर्जाचा नमुना)
मिरवणुक/रॅली/पदयात्रासाठी वाहतूक नियंत्रण विभागाचे ना हरकत पत्र (अर्जाचा नमुना)
तात्पुरत्या प्रचार कार्यालय /पक्ष कार्यालयाच्या बांधकामासाठी अर्ज (प्रपत्र 1) (अर्जाचा नमुना)
प्रचार कार्यालय /पक्ष कार्यालयाकरीता जागा मालकाचे संमतीपत्र (प्रपत्र 2) (अर्जाचा नमुना)
प्रचार कार्यालय /पक्ष कार्यालयाच्या तात्पुरत्या बांधकामासाठी पोलिस विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (प्रपत्र 3) (अर्जाचा नमुना)
निवडणूक प्रचारासाठी वापरावयाच्या वाहनांच्या परवाना करिता अर्ज (प्रपत्र-W) (अर्जाचा नमुना)
परिवहन वाहनांवर जाहिरात लावण्याची परवानगी मिळण्यासाठी/परवानगीच्या नुतनीकरणासाठी अर्ज (नमुना पी. डी.ए.ए.)(अर्जाचा नमुना)
सभेसाठी उंच व्यासपीठ /बॅरिकेड बांधण्याचा अर्ज (प्रपत्र - G1) (अर्जाचा नमुना)
सभा/कोपरा सभा आयोजित करण्यासाठीचा अर्ज (प्रपत्र – अ) (अर्जाचा नमुना)
सभा/कोपरा सभा आयोजित करण्यासाठी पोलिस स्टेशनचे ना हरकत पत्र (अर्जाचा नमुना)
सभा/कोपरा सभा आयोजित करण्यासाठी वाहतूक विभागाचे ना हरकत पत्र (अर्जाचा नमुना)
सभा/कोपरा सभा आयोजित करण्यासाठी जागा मालकाचे संमतीपत्र (अर्जाचा नमुना)
हेलिपॅड चे बांधकाम करण्यासाठी अर्ज (प्रपत्र A) (अर्जाचा नमुना)
हेलिपॅड / Fixed Wing Aircraft चे बांधकाम करण्यासाठी अर्ज (प्रपत्र B) (अर्जाचा नमुना)
हेलिकॉप्टर उतरविण्याच्या खाजगी ठिकाण/जागा मालकाचे संमतीपत्र (प्रपत्र C) (अर्जाचा नमुना)
हेलिकॉप्टर उतरविण्याच्या ठिकाण/शैक्षणिक संस्थेच्या मुख्य अधिकाऱ्याचे संमतीपत्र (प्रपत्र D) (अर्जाचा नमुना)
हेलिकॉप्टर/हेलिपॅड उतरविण्याच्या ठिकाण/ पोलीस स्टेशनचे संमतीपत्र (प्रपत्र E) (अर्जाचा नमुना)
हेलिकॉप्टर/हेलिपॅड करिता अग्निशमन कार्यालयाचे ना हरकत पत्र (प्रपत्र F) (अर्जाचा नमुना)
हेलिकॉप्टर/हेलिपॅड करिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे ना हरकत पत्र (प्रपत्र G) (अर्जाचा नमुना)
प्रचारासाठी विविध परवाने स्वरूप व कार्य क्षेत्र, वितरीत करणारे अधिकारी स्तर आणि ना हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग व संबंधित परवान्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची माहिती दर्शवणारा तक्ता- प्रचारासाठी विविध परवाने स्वरूप- 1. वाहन परवाना, 2. तात्पुरते पक्ष कार्यालय उभारणे 3. कोपरा सभा/प्रचार सभेसाठी मैदान परवाना, लाउडस्पीकर परवाना, 4. रॅली/मिरवणुक/रोडशो/पदयात्रा, लाउडस्पीकर, 5. स्टेज/बॅरीकेटस/रोस्टम, 6. हेलिकॉप्टर लँडीग परवाना.

निवडणूक विषयक सल्ला व मार्गदर्शन - चंद्रकांत भुजबळ - ९४२२३२३५३३ पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) Political Research and Analysis Bureau (PRAB) 

लोकसभा/विधानसभा निवडणुक-2024 प्रचारासाठी विविध परवाने अर्जांचे नमुने format download करा- https://bhujbalchandrakant.stores.instamojo.com/?ref=profile_bar

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदार संघातील प्रचारासाठी विविध परवानग्या देण्याकरिता सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र उमेदवारांना परवानगीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांच्याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याने परवानगीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. निवडणूक विषयक मार्गदर्शन व सेवेसाठी पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेतर्फे उपलब्ध आहे. आचारसंहिता नियम व कायदे याबाबत ई-बुक मार्गदर्शक पुस्तिका देखील उपलब्ध करण्यात आलेली आहे.

"पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस" असे बनावट नाव धारण करणाऱ्या फर्म चा "प्राब" संस्थेशी कोणताही संबंध नाही. "प्राब" संस्थेच्या नावात साधर्म्य नाव धारण करून बनावट नावे राजकीय पक्ष व उमेदवारांची फसगत काही तथाकथित फर्म करीत आहेत अशा गैरप्रवृत्तीला थारा देऊ नये सत्यता पडताळणी करूनच संवाद साधावा असे आवाहन प्राब संस्थेतर्फे करण्यात आले आहे. 

जाहीर सभा चौक सभा व सर्व प्रकारच्या सभा
उमेदवारांना घ्यावयाच्या जाहीर सभा, चौकसभा, तसेच सर्व प्रकारच्या सभांसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवाराचा परवानगी साठीचा अर्ज, सभेसाठी जागेची परवानगी देताना जागा स्थानिक प्राधिकरणाच्या ताब्यात असल्यास त्यांच्याकडील ना हरकत दाखला, भाडे पावती, शिक्षण संस्था किंवा अन्य खासगी संस्था यांच्या मालकीची जागा/मैदान असल्यास संबंधित संस्थेचे संमतीपत्र उपविभागीय अधिकारी यांचा ना हरकत दाखला, स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाण्याचा मार्ग असणे आवश्यक, सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस विभागाने छाननी करून अशा प्रस्तावास मान्यता द्यावी, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सदर सभेसाठी प्रपत्र संबंधितांकडून घ्यावे, तसेच सक्षम अधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.

पोस्टर्स झेंडे, कापडी बॅनर
सार्वजनिक ठिकाणी पोस्टर झेंडे कापडी बॅनर लावण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी उमेदवाराचा अर्ज, खाजगी जागा असल्यास मालकाचे संमती पत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा असल्यास ही परवाना फी जाहिरात फी ची पावती आवश्यक आहे.

खासगी जागेवर जाहिरात फलक प्रचार साहित्य लावणे
खासगी जागेवर उमेदवाराला जाहिरात फलक प्रचार साहित्य लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घ्यायची असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज खासगी जागा असल्यास जागा मालकाचे संमती पत्र,स्थानिक स्वराज्य संस्था जागा परवाना फी, व पोलिसांचा ना हरकत दाखला आवश्यक आहे.

प्रचार वाहन परवानगी
प्रचार वाहनाची परवानगी घ्यावयाची असल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असते त्यासाठी उमेदवाराचा अर्ज, वाहनाचे आरसी बुक, वाहनाचा विमा, कर भरल्याची पावती, पियूसी प्रमाणपत्र, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा ना हरकत दाखला, वाहनाचा चारही बाजूंचा फोटो, पोलिसांचा ना हरकत दाखला, व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, चालकाचा वाहन चालवणे बाबतचा परवाना आवश्यक आहे.

उमेदवाराचे तात्पुरते प्रचार कार्यालय
उमेदवाराला तात्पुरते प्रचार कार्यालय उघडायचे असल्यास संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची परवानगी गरजेची असते. त्यासाठी संबंधित उमेदवाराचा अर्ज, खाजगी जागा असल्यास मागलकाचे संमती पत्र, स्थानिक स्वराज्य संस्था जागा परवाना फी, व पोलिसांचा ना हरकत दाखला आवश्यक आहे.

हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी
संबंधित उमेदवाराला हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी घ्यायची असल्यास अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांची परवानगी आवश्यक असते त्यासाठी संबंधित उमेदवाराचा त्याबाबतचा अर्ज, पोलीस अधीक्षक यांचे ना हरकत प्रमाणपत्र, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांचे ना हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, रुग्णवाहिकेच्या उपलब्धते बाबतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

ध्वनीक्षेपकाची परवानगी
प्रचार सभा किंवा प्रचार फेरीसाठी ध्वनिक्षेपक लावायचे असल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची परवानगी लागते. त्याबाबतच्या परवानगीसाठी संबंधित उमेदवाराचा अर्ज, वाहनांसाठी आरटीओ व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे परवानगी व पोलीस ठाण्याचे प्रभावी अधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे.

शाळेच्या मैदानावरील सभा
संबंधित उमेदवाराला शाळेच्या मैदानावर प्रचार सभा आयोजित करावयाची असल्यास त्यासाठी लागणाऱ्या परवानगीसाठी उमेदवाराने उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे स्वतःचा अर्ज, व त्यासोबत शाळा व्यवस्थापन समितीचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियावर प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती
उमेदवाराला सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, किंवा प्रिंट मीडियावर (शेवटचे 48 तास) जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास त्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांची परवानगी गरजेची आहे. परवानगीसाठी संबंधित उमेदवाराने प्रसिद्ध करावयाची जाहिरात एम.सी.एम.सी कमिटी कडून प्रमाणीत करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीचा फॉर्म मीडिया सेंटर येथे उपलब्ध होईल.

फ्लेक्स, बोर्ड, झेंडे, होर्डिंग्स, बॅनर व पोस्टर
संबंधित उमेदवाराला फ्लेक्स, बोर्ड, झेंडे, होर्डिंग, बॅनर किंवा पोस्टर लावायचे असल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी इमारतीवर झेंडे, पोस्टर, बॅनर लावण्यासाठी संबंधित जागा मालकाचे संमती पत्र, ठरलेल्या भाड्याचा रकमेचा तपशील, तसेच सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटते अशी अन्य कागदपत्रे व वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा पद्धतीने पोस्टर प्रदर्शित करण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

मिरवणूक, पदयात्रा, रॅली, प्रचार फेरी, रोडशो
उमेदवाराला मिरवणूक पदयात्रा रॅली प्रचार फेरी किंवा रोड शो करावयाचा असल्यास त्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची किंवा प्रभावी अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे परवानगीसाठी उमेदवाराचा अर्ज पदयात्रा व रॅलीच्या मार्गाचा आराखडा वाहनांसाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र पदयात्रेसाठी रॅलीच्या मार्गाच्या आराखड्यास वाहतूक पोलिसांची परवानगी तसेच सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक वाटतील अशी सर्व कागदपत्रे आवश्यक राहतील.

Mr. Chandrakant Bhujbal

Wednesday 27 March 2024

loksabha Election 2024; प्रचारासाठी लागणाऱ्या परवानग्या व कागदपत्राची यादी

प्रचारासाठी लागणाऱ्या परवानग्या व कागदपत्राची यादी

डिजिटल माध्यमांनी माहिती प्रसारणाची गती अन् देवाणघेवाण प्रक्रियाही वाढवली: मनोज पाटील

डिजिटल मिडिया क्षेत्रात स्वतः ची आचरसंहिता महत्त्वाची: राजा माने

पुणे- सुरुवातीच्या काळामध्ये माहितीचे प्रसारण करण्यासाठी किमान २४ तासाचा कालावधी लागत होता परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तो वेळ कमी झाला परंतु या दोन्ही माध्यमांमध्ये असणाऱ्या मर्यादा लक्षात घेता नव्याने उदयास आलेले डिजिटल मीडिया हे कसे प्रभावी माध्यम असून यातून वेळ आणि ठिकाणाच्या मर्यादा सीमा ओलाडणारे अन खिशातच अपडेटेड बातम्या देण्यापर्यंत डिजिटल मीडिया माध्यमांनी मजल मारली आहे हे अत्यंत प्रभावी असून यातून देवाण-घेवाणही तेवढ्याच तत्परपणे काही क्षणामध्ये मिळत असल्याने आगामी काळात या डिजिटल मीडिया या नव्या माध्यमाचे भविष्य उज्वल असल्याचे मत पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार व संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर उपस्थित होते.

आजच्या काळामध्ये नव्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला आवश्यक असलेली माहिती काही सेकंदामध्ये आपल्या हातातील मोबाईल मध्ये मिळत असली तरी सुद्धा त्याची सत्यता ही निर्मित संस्थेवरती अवलंबून असते सध्या जगामध्ये अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे माहीती थेट मिळत असली तरी सुद्धा या माहितीची अचूक आणि थेट नेमकी माहिती डिजिटल प्रतिनिधींकडेच असते. या नव्या तंत्रज्ञानाचा कायद्यांच्या चौकटीत बसून कसा फायदा घ्यायचा याबाबत यावेळी मनोज पाटील यांनी मार्गदर्शन केले.

संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी डिजिटल माध्यमांचे बदलते स्वरूप अन् डिजिटल मीडिया या क्षेत्रात काम करताना तंत्रज्ञानाचा वापर या विषयावरती विश्लेषण करताना आगामी काळातील माध्यमांवरील आव्हाने आणि या आव्हानातही डिजिटल मीडियाचे अस्तित्व कसे अबाधित राखायचे याबाबत सखोल विश्लेषण केले. सध्या जगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावरती कोणतीही रचना करण्यात येत असली तरी यामध्ये कोणती काळजी घ्यायची या विषयावरती सखोल विश्लेषण करणार आहे तर नव्या आव्हानांना सामोरे जाताना संगणकाचा या डिजिटल माध्यमातून कसा फायदा होत आहे आणि यातून नक्की काय साध्य करता येईल या विषयावरती ही विश्लेषण केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राजा माने यांनी अनुभवाच्या जोरावर बदलत्या आव्हानांना कसे सामोरे जायचे अन् तंत्रज्ञानाच्या वाढत्या भडिमारामध्ये आपल्या डिजिटल माध्यमांची विशेष पकड आणि वेगळेपण हेच आगामी काळात या आव्हानांना सामोरे जाण्यास ताकद दिल्याशिवाय राहणार नाही असे सांगून विविध विषयावरती डिजिटल माध्यमांनी आपली मते व्यक्त करण्याचे आवाहन केले. तर पुणे शहर विभागाच्या वतीने ही एक अनोखी संधी निर्माण केल्यामुळे तंत्रज्ञान आणि कायदे या विषयावरती सखोल चर्चा करण्यास एक हक्काचे व्यासपीठ मिळाल्याचे कायदे आणि तंत्रज्ञान ही डिजिटल मीडिया साठी कायमच हातामध्ये हात घालून जाणारी गोष्ट आहे आणि डिजिटल मीडिया म्हटलं की वेळ आणि त्यावरची कसरत ही साध्य करताना प्रत्यक्ष काम करणाऱ्या पत्रकारांना कोणती काळजी घ्यावी याविषयीही माहिती दिली.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये नंदकुमार सुतार (संपादक) यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान डिजिटल माध्यमांसाठी कशी वरदायीनी आहे हे स्पष्ट करून सांगताना याबाबत विस्तृत माहिती दिली. या बदलत्या तंत्रज्ञानानुसार परदेशात दैनंदिन वापरले जाणारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान हे डिजिटल पन्नकारिता किती फायदेशीर आहे याची माहिती देत फक्त याबाबत कोणत्या दक्षता घेतल्या पाहिजेत याविषयीही मार्गदर्शन केले. 

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भुजबळ यांनी डिजिटल माध्यमांसाठी निवडणूक आचारसंहिता व कायदे, नियमावली यावेळी विषद करून सांगितले. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते म्हणून माध्यमांनी बचावात्मक भूमिका न घेता आदर्श पत्रकारितेच्या आचरणाने प्रशासनावरील अर्थातच निवडणूक आयोगावरील दबाव कायम ठेवावा. सदृढ लोकशाहीसाठी निवडणूक काळात माध्यमांवरील जबाबदारी महत्वपूर्ण असते. निवडणूक काळात माध्यमांनी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाने मार्गदर्शक तत्वे जारी केलेले आहेत त्यांचे अनुकरण, पालन करावे असे आवाहन चंद्रकांत भुजबळ यांनी केले. निवडणूक काळात राजकीय पक्ष व उमेदवारांचे वृत्तांकन डिजिटल मीडियाने प्रसारण करताना घ्यावयाची काळजी व उपलब्ध जाहिरात परवानगी प्रक्रियेबाबत तसेच पेड न्यूज बाबत नियमांची माहिती उपस्थितांना दिली. डिजिटल माध्यमांसाठी उपलब्ध कायदे आणि डिजिटल माध्यमांची विश्वासहार्यता याबाबत मार्गदर्शन केले तर विधीज्ञ अतुल पाटील यांनीही माध्यमांसाठी आचारसंहिता आणि कायदे या विषयावरती सखोल विश्लेषण केले.

कार्यक्रमाचे आयोजन माऊली म्हेत्रे : राज्य संघटक, महेश टेळे पाटील : अध्यक्ष पुणे शहर, हर्षद कोठावडे कार्याध्यक्ष पुणे शहर, धनराज माने, कार्याध्यक्ष पुणे शहर, केतन महामुनी : सहसचिव यांनी केले होते .सतीश सावंत उपाध्यक्ष, विकास भोसले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, महेश कुगांवकर : सचिव, राज्य संघटक : संजय कदम, शरद लोणकर, अमोल पाटील, तेजस राऊत, सातारा जिल्हा अध्यक्ष गणेश बोतालजी, पुणे जिल्हा अध्यक्ष अजिंक्य स्वामी, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष विकास शिंदे, गणेश हुंबे यांच्यासह डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================

Wednesday 20 March 2024

Maharashtra Lok Sabha Election 2024- पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच लोकसभांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात

नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या मतदारसंघांत रणधुमाळी सुरु

हाराष्ट्रातील पाच टप्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी पहिल्या टप्यात पूर्व विदर्भातील पाच लोकसभांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत असून नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या मतदारसंघांत आजपासून रणधुमाळी सुरु झालेली आहे. या पाच मतदारसंघांसाठी आजपासून अधिसूचना लागू करण्यात आली आहे. अर्ज भरण्यास सुरुवात झाली तरी काँग्रेसच्या उमेदवारांचा अद्याप पत्ता नाही. भाजपने यापूर्वीच उमेदवार जाहीर केले आहेत.

पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच लोकसभांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज

मतदारसंघ

विद्यमान खासदार

महायुती उमेदवार

आघाडी उमेदवार

नागपूर

नितीन गडकरी (भाजप)

नितीन गडकरी (भाजप)

रामटेक

कृपाल तुमाणे (शिवसेना)

चंद्रपूर

कै. धानोरकर (काँग्रेस) रिक्त

सुधीर मुनगुंटीवार (भाजप)

गडचिरोली-चिमूर

अशोक नेते (भाजप)

भंडारा-गोंदिया

सुनील मेंढे (भाजप)

पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यक्रम

तपशील

पहिला टप्पा

निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध दिनांक नामनिर्देशनपत्र भरण्यास प्रारंभ

20/03/2024

नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक

27/03/2024

नामनिर्देशन पत्राची छाननी

28/03/2024

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक

30/03/2024

मतदानाचा दिनांक

19/04/2024

मतमोजणीचा दिनांक

04/06/2024

नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघांत विद्यमान भाजप पक्षाचे 3 तर शिवसेना व कॉंग्रेस पक्षाचे प्रत्येकी 1 खासदार निवडून आले होते. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील खासदार बाळू धानोरकर (काँग्रेस) यांच्या निधनाने सदरील जागा रिक्त होती. पाच मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघात भाजपने उमेदवार जाहीर केलेले असून उर्वरित अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात  भाजपचे राज्यातील मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. मात्र भंडारा-गोंदिया तसेच गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण राहणार याचा सस्पेन्स कायम आहे. रामटेक संदर्भातही महायुतीचा निर्णय होऊ शकलेला नाही. काँग्रेसच्या उमेदवारांचा अद्याप पत्ता नाही. महायुती व महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्याने लढतीची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघासाठी अजूनही एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून या मतदारसंघांसाठी ही अधिसूचना लागू होणार आहे. आजपासूनच नामनिर्देशन पत्र स्वीकारले जात आहेत. 27 मार्चपर्यंत उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 28 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. तर 30 मार्च उमेदवारी अर्ज परत घेण्याची अखेरची मुदत असणार आहे. विशेष म्हणजे 20 मार्च ते 27 मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीमध्ये तीन दिवस प्रशासनिक सुट्टी आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना पाचच दिवस मिळणार आहेत. सन 2019 मध्ये नागपूर लोकसभेसाठी 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर रामटेक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 2019 मध्ये 16 उमेदवार निवडणुकीत होते. 

देशातील सात टप्प्यांतील मतदानापैकी महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून राज्यात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. देशात 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात पार पडणार आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे मे या पाच टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभा निवडणूक 2024 चा बिगुल वाजलय. पहिल्या टप्प्यातील 102 लोकसभा जागांसाठी अधिसूचना जारी झाली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तराखंडसह 21 राज्यातील लोकसभेच्या 102 जागांसाठी उमेदवार आजपासून अर्ज दाखल करु शकतात. ईशान्येकडच्या सहा राज्यात लोकसभेच्या 9 जागा आहेत. दक्षिण भारतात तामिळनाडूमध्ये 39 आणि लक्षद्वीपच्या एका जागेसाठी पहिल्या टप्प्यात निवडणूक होईल. पहिल्या टप्प्यात 21 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. बिहारमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 मार्च आहे. त्याशिवाय 20 राज्यात 27 मार्चपर्यंत निवडणूक अर्ज दाखल करु शकता. अर्ज मागे घेण्याची तारीख 30 मार्च आहे. बिहारमध्ये दोन एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. 19 एप्रिलला सर्व 102 लोकसभा सीटसाठी एकत्र मतदान होईल. निकाल 4 जूनला येतील. पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेशच्या 2, बिहारच्या 4, आसामच्या 4, छत्तीसगडच 1, मध्य प्रदेशची 6, महाराष्ट्राच्या 7, मणिपुरच्या 2, मेघालयच्या 2, मिजोरमची 1, नागालँडची 1, राजस्थानच्या 12, सिक्किमची एक, तमिलनाडूच्या 39, त्रिपुराची एक, उत्तर प्रदेशच्या 8, उत्तराखंडच्या 5, पश्चिम बंगालच्या 3, अंदमान एंड निकोबारची 1, जम्मू-कश्मीरची 1, लक्षद्वीप 1 आणि पुडुचेरी 1 लोकसभा जागेसाठी मतदान होणार आहे. 

महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान; महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या दरम्यान लोकसभा निवडणुका-:

पहिला टप्पा : 19 एप्रिल एप्रिल

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार असून यावेळी पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला विदर्भातील सहा मतदार संघात मतदान पार पडणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर 19 एप्रिलला

दुसरा टप्पा : 26 एप्रिल 2024
राज्यात 26 एप्रिल 8 मतदारसंघात मतदान होणार असून यावेळी वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा या मतदारसंघात मतदान होईल.

तिसरा टप्पा : 7 मे 2024
राज्यात 7 मे रोजी 11 मतदारसंघात मतदान होणार आहे. रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात 7 मेला मतदान होईल.

चौथा टप्पा : 13 मे 2024
राज्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघात 13 मेला मतदान पार पडेल.

पाचवा टप्पा : 20 मे 2024
महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मेला होईल. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात 20 मे रोजी एकूण 13 मतदारसंघात मतदान पार पडेल.