Thursday, 9 October 2025

Zilla Parishad, Panchayat samiti election:- elections in Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध; येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना नोंदविता येणार

पुणे जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठी 29 लाख 80 हजार 806 मतदार 

पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण जाहीर

मागील निवडणुकीच्या तुलनेत 2लाख 31 हजार 637 मतदारसंख्येत वाढ 

पुणे- महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रारुप मतदार याद्या  प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठी 29 लाख 80 हजार 806 इतकी प्रारुप मतदार संख्या असून काही गावांचा समावेश पालिकेत होऊनही मागील 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत 2लाख 31 हजार 637 मतदारसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार यादीनुसार एकूण मतदारसंख्या 29 लाख 80 हजार 806 इतकी असून यामध्ये पुरुष मतदार 15 लाख 26 हजार 030 आणि महिला मतदारसंख्या 14 लाख 51 हजार 681 इतकी आहे तर अन्य मतदारांची संख्या 95 आहे. पुणे जिल्हा परिषद गटांमध्ये सर्वाधिक 75हजार 650 मतदारसंख्या हिंजवडी गट व गणात असून नाणेकरवाडी गटात सर्वाधिक कमी 25 हजार 668 इतकी मतदारसंख्या आहे. हिंजवडी गट खालोखाल अनुक्रमे लोणी काळभोर, पिरंगुट, वीर,गराडे, पौड या गटांमध्ये मतदारसंख्या जास्त आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका डिसेंबरला होणार आहेत . महाराष्ट्रात तब्बल सुमारे पावणेचार वर्षांच्या खंडानंतर यंदा या निवडणुका होणार आहेत.

जिल्हा परिषद गट (अंतर्भूत गण) निहाय प्रारुप मतदारसंख्या

क्र.

गट

पुरुष

महिला

इतर

एकूण

35

हिंजवडी

43964

31682

4

75650

41

लोणी काळभोर

26631

24703

2

51336

36

पिरंगुट

24136

22788

1

49925

52

वीर

24885

24077

2

48964

50

गराडे

23892

24246

1

48139

34

पौड

24813

23013

0

47826

53

निरा शिवतक्रार

23543

23293

0

46836

17

पाबळ

23551

23067

2

46620

33

सोमटणे

23437

22335

3

45775

63

वडगाव निंबाळकर

23329

22375

4

45708

42

खेड शिवापुर

23647

22028

2

45677

60

सूपा

23302

21921

0

45223

65

निरा वागज

22848

22273

1

45122

45

गोपळवाडी

23173

21786

1

44960

51

बेलसर

22654

22196

0

44850

62

पंदारे

22628

21792

2

44422

71

लासुर्णे

22431

21577

2

44010

21

वाडा

22803

20961

0

43764

20

मांडवगण फराटा

22259

21431

0

43690

19

तळेगाव ढमढेरे

21994

21682

1

43677

15

न्हावरा

21861

21379

1

43241

23

रेटवडी

21804

21271

0

43075

14

कवठे येमाई

21924

20766

0

42690

61

गुणवडी

21567

20640

2

42209

63

भिगवण

21545

20437

8

41990

70

वालचंदनगर

21430

20544

1

41975

64

निंबूत

21399

20559

0

41958

57

भोंगवली

20739

20775

0

41514

46

खडकी

21428

19765

0

41193

67

पळसगाव

20967

20213

2

41182

16

रांजणगाव

20828

20291

2

41121

3

आळे

20536

20468

3

41007

59

उत्रोली

20586

20328

1

40915

26

पाईट

20890

19946

1

40837

40

थेऊर

21374

19387

6

40767

18

शिक्रापूर

20922

19818

7

40747

8

बारव

20819

19721

0

40540

49

यवत

20780

19725

5

40510

22

कडूस

20220

20050

0

40270

44

वरवंड

20356

19829

0

40185

47

पाटस

20752

19359

1

40112

69

निमगाव केतकी

20444

19452

2

39898

32

कुसगाव बु

19949

19660

2

39611

29

टाकवे बु

20314

19233

0

39547

31

खडकाळे

19830

19272

1

39103

1

डिंगोरी

20178

18893

0

39071

38

कोरेगाव मुळ

20284

18640

0

38924

72

काटी

19741

18801

0

38542

11

कळंब

19494

18996

1

38491

24

पिंपळगाव तर्फे खेड

19543

18890

0

38433

48

बोरीपारधी

19533

18893

0

38426

4

राजुरी

19577

18716

0

38293

39

ऊरुळीकांचन

19637

18088

0

37725

10

घोडेगाव

18683

18744

1

37428

2

ओतूर

18687

18686

0

37373

6

नारायणगाव

18766

18418

1

37185

37

पेरणे

19248

17856

0

37104

7

सावरगाव

18624

18288

1

36913

9

शिणोली

19019

17825

2

36846

56

वेळू

18531

18303

0

36834

73

बावडा

19032

17727

0

36759

30

इंदुरु

18552

17726

2

36280

68

वडापुरी

18589

17626

2

36217

5

बोरी बु

18217

17805

0

36022

12

परगाव अवसरी

18037

17709

0

35746

58

भोलावडे

18496

17051

0

35547

13

अवसरी बु

17956

17583

2

35541

43

राहू

17874

16931

0

34805

25

मेदनकरवाडी

17672

16804

1

34477

28

कुरुळी

16711

15839

5

32555

54

विंझर

14448

13287

2

27737

55

वेल्हे बु

14445

13047

1

27493

27

नाणेकरवाडी

13272

12395

1

25668

एकूण मतदारसंख्या

1526030

1451681

95

2980806


या प्रारुप मतदार याद्यांवर विविध राजकीय पक्षांना आता येत्या दि. १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.२३ सप्टेंबर) ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या प्रारुप मतदार याद्यांचाही समावेश होता.  जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी दि.१ जुलै २०२५ अखेरपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. यानुसार जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणनिहाय या प्रारुप मतदार याद्या  प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सुचनांचे येत्या दि‌.२६ ऑक्टोबरपर्यंत निराकरण केले जाणार आहे. त्यांनतर  दि. २७ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रनिहाय या मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.राज्यातील २६ जिल्हा परिषदा आणि २८६ पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल अनुक्रमे दि. २० मार्च आणि दि‌‌. १३ मार्च २०२२ रोजीच संपलेला आहे. तेव्हापासून आजतागायत या सर्व पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. त्यानंतर पुन्हा आणखी सहा जिल्हा परिषदा आणि ५० पंचायत समित्यांचा कार्यकाल संपुष्टात आलेला आहे.

पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर : इंदापूर अनुसुचित जाती व जुन्नरचे अनुसुचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव

पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील बारामती, आंबेगाव आणि हवेली या तीन पंचायत समित्यांचे सभापतीपद हे खुले (सर्वसाधारण गट) झाले असून इंदापूरचे सभापतीपद अनुसुचित जाती (एस.सी.) तर, जुन्नर पंचायत समितीचे सभापतीपद अनुसुचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील १३ पैकी ७ सभापती पदे ही विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली आहेत. यापैकी एक पद अनुसुचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी, दोन पदे ही नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी ) महिलांसाठी आणि चार पदे ही खुल्या गटातील (सर्वसाधारण) महिलांसाठी राखीव झाली आहेत. 

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत गुरुवारी पुणे दि तेरा पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या समन्वयक व उपजिल्हाधिकारी डॉ. चारूशीला मोहिते -देशमुख, पुणे जिल्हा निवडणूक शाखेचे तहसीलदार राहूल सारंग, कुळ कायदा शाखेचे तहसीलदार जगदीश निंबाळकर आदी उपस्थित होते. प्रारंभी कायद्यातील तरतुदीनुसार अनुसुचित जाती (एस.सी.) आणि अनुसूचित जमाती (एस.टी.) या दोन प्रवर्गाचे सभापती पद हे लोकसंख्येच्या निकषाच्या आधारे निश्चित करण्यात आले. यानुसार या दोन्ही प्रवर्गातील आरक्षणासाठी त्या त्या प्रवर्गातील सर्वाधिक लोकसंख्या विचारात घेण्यात आली. 

पुणे जिल्ह्यात एकूण तेरा पंचायत समित्या आहेत. या सर्व पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल हा दि. २० मार्च २०२२ रोजीच संपलेला आहे. तेव्हापासून आजतागायत सुमारे पावणेचार वर्षांपासून या संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. एवढ्या प्रदीर्घ कालखंडानतर आज (गुरुवारी) हे आरक्षण काढण्यात आले आहे .पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांमध्ये बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर, भोर, वेल्हे, मुळशी, मावळ, आंबेगाव, जुन्नर, हवेली आणि राजगुरुनगर या पंचायत समित्यांचा समावेश आहे. या आरक्षण सोडतीसाठी हवेली तालुक्यातील पीएम. श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीकंद येथील इयत्ता चौथी व पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. या विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये गायत्री लष्करे, प्रणिता बारगीर, अनुजा चव्हाण, सोहम गावंडे व  आर्य गुंजाळ यांचा समावेश होता. यावेळी या शाळेच्या मुख्याध्यापिका जानकी अनुले, सहशिक्षक अनिल नरवाडे आणि एकनाथ शिंदे आदी या विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होते. 

दरम्यान, पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि तेरा पंचायत समित्यांचे मिळून एकूण १४६ गण आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत हीच संख्या अनुक्रमे ७५ आणि १५० इतकी होती. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ३४ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्याने आणि काही ग्रामपंचायतींचे नगरपालिका व नगरपंचायतीत रुपांतर झाल्याने गटांची संख्या दोनने तर, गणांची संख्या चारने कमी झाली आहे.  पुणे महापालिकेमध्ये हवेली व मुळशीतील २३ गावे समाविष्ट झाल्याने हवेली तालुक्यातील गटांची संख्या सातने कमी झाली असून, नवीन गट रचनेत जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी एक गटाची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत आणि कटक मंडळी वगळता ग्रामीण क्षेत्रामध्ये ३३ लाख ८८ हजार ५१३ ग्रामीण क्षेत्रात लोकसंख्या आहे. जिल्हा प्रशासनाने २०११ च्या जनगनणेप्रमाणे ही आकडेवारी शासनाकडे सादर केली होती. राज्य शासनाने जिल्हा परिषद गट आणि गण यांची संख्या २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे म्हणजेच पाच वर्षांचा कार्यकाळ संपला त्यावेळचा २०२२ च्या वेळी जी संख्या होती ती गटांची संख्या कायम ठेवली आहे. नवीन नियमानुसार तालुकानिहाय ७३ गट व १४६ गणांची संख्या निश्चित केली आहे. यामध्ये लोकसंख्येची सरासरी काढून हे गट निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यात गट संख्येत वाढ झाली आहे. ग्रामीण क्षेत्रामध्ये सन २०१७ ला ३६ लाख ९२ हजार लोकसंख्या होती. त्यानंतर पुणे महापालिकेमध्ये २३ गावांचा समावेश करण्यात आला, तसेच वडगाव मावळ, देहू, मंचर आणि माळेगाव येथे नगरपंचायत झाल्याने ग्रामीण क्षेत्रातून अडीच लाख लोकसंख्या कमी झाली. यामुळे पुणे जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या नगर जिल्ह्यापेक्षा कमी झाल्याने गटाची दोन व गणांची संख्या चारने कमी झाली आहे, तर हवेली तालुक्यातील गट संख्या तब्बल सातने कमी झाली आहे. जिल्ह्यात २०१७ मध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ७५ तर पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या १५० होती. २०१७ नंतर हवेली आणि मुळशी तालुक्यातील काही गावांचा समावेश महापालिकेच्या हद्दीत करण्यात आला. उरुळी, देवाची-फुरसुंगी या दोन्ही गावांची मिळून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यात आली. हवेली तालुक्यात २०१७ मध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या १३ होती. आता या तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य संख्या ६ वर आली आहे.

पंचायत समिती सभापतींचे प्रवर्गनिहाय आरक्षण 

-  इंदापूर --- अनुसुचित जाती (एस.सी.) 
-  जुन्नर --- अनुसुचित जमाती (महिला) 
-  पुरंदर व दौंड --- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) 
-  शिरूर व मावळ --- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला).
-  खुला गट (सर्वसाधारण) --- बारामती, आंबेगाव आणि हवेली. 
-  खुला गट (महिला) --- भोर, वेल्हे, मुळशी आणि खेड.

कोणत्या  प्रवर्गासाठी किती सभापतीपदे 
- अनुसुचित जाती  (एस.सी.) --- ०१.
- अनुसुचित जमाती (एस.टी.) --- ०१ (महिला) 
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) --- ०४ पैकी दोन महिला.
- खुला गट (सर्वसाधारण) ---- ०७ पैकी ०४ महिला.

गट आणि गणांच्या आरक्षण सोडतीचा सविस्तर कार्यक्रम 

- दि. ६ ऑक्टोबर --- अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी जागा  निश्चित करुन विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविणे. 
- दि‌. ८ ऑक्टोबर --- अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीसाठी राखीव जागांचा प्रस्ताव मंजूर करणे.
- दि. १० ऑक्टोबर --- आरक्षण सोडतीची अधिसूचना प्रसिद्ध करणे.
- दि. १३ ऑक्टोबर --- गट आणि गणांची आरक्षण सोडत काढणे.
- दि. १४ ऑक्टोबर --- प्रारुप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणे. 
- दि. १४ ते १७ ऑक्टोबर --- प्रारुप आरक्षणावर हरकती व सूचना दाखल करणे. 
- दि. २७ ऑक्टोबर --- हरकती व सूचनांचा गोषवारा विभागीय आयुक्तांकडे सादर करणे. 
- दि. ३१ ऑक्टोबर --- गट आणि गणांचे आरक्षण अंतिम करणे. 
- दि. ३ नोव्हेंबर --- अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करणे.

पुणे जिल्हा परिषदेच्या आरक्षण जाहीर 

पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७३ गटांपैकी आरक्षणाची सोडत सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. या सोडतीनुसार अनुसूचित जातीसाठी ७, अनुसूचित जमातीसाठी ५, तर नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी १९ गट राखीव ठेवण्यात आले असून, त्यापैकी १० जागा महिलांसाठी आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२ गट राखीव असून, त्यापैकी २० गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. विविध प्रवर्गांनुसार सदस्यपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून, अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिलांसाठी जागा राखीव करण्यात आल्या आहेत.
अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव गट
• इंदापूर – ७१ लासुरने
• इंदापूर – ७० वालचंदनगर
• बारामती – ६१ गुणवडी
• हवेली – ४१ लोणीकाळभोर.
अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव गट
• जुन्नर – ८ बारव
• जुन्नर – १ डिंगोरे
• आंबेगाव – ९ शिनोली.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी राखीव गट
• खेड – २२ कडूस
• बारामती – ६० सुपा
• हवेली – ४० थेऊर
• शिरूर – १५ न्हावरा
• जुन्नर – ४ राजुरी
• जुन्नर – ६ नारायण
• जुन्नर – २ ओतूर
• पुरंदर – ५३ नीरा शिवतक्रार
• जुन्नर – ५ बोरी बुद्रुक
• इंदापूर – ६७ पळसदेव.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव गट
• हवेली – ३७ पेरणे
• वेल्हे – ५५ वेल्हे बुद्रुक
• खेड – २५ मेदनकरवाडी
• मुळशी – ३६ पिरंगुट
• शिरूर – २० मांडवगण फराटा
• दौंड – ४९ यवत
• आंबेगाव – १३ अवसरी बुद्रुक
• भोर – ५६ वेळू
सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव गट
• खेड – २३ रेटवडी
• दौंड – ४७ पाटस
• बारामती – ६३ वडगाव निंबाळकर
• शिरूर – १९ तळेगाव ढमढेरे
• इंदापूर – ६९ निमगाव केतकी
• मावळ – ३१ खडकाळे
• आंबेगाव – ११ कळंब
• दौंड – ४४ वरवंड
• शिरूर – १८ शिक्रापूर
• आंबेगाव – १० घोडेगाव
• मावळ – ३० इंदुरी
• हवेली – ४२ खेड शिवापूर
• खेड – २६ पाईट
• इंदापूर – ६६ भिगवण
• शिरूर – १६ रांजणगाव गणपती
• खेड – २८ कुरुळी
• मावळ – ३३ सोमाटने
• इंदापूर – ७३ बावडा
• पुरंदर – ५० गराडे
• हवेली – ३८ कोरेगाव मुळ 

अधिक माहिती व निवडणुकांच्या पूर्वतयारी साठी संपर्क -  चंद्रकांत भुजबळ 9422323533


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-