Tuesday, 7 October 2025

Maharashtra Local Body Election Nagar Parishad Reservation 2025 राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर

पुणे जिल्ह्यातील १४ पैकी चार नगरपालिका आणि तीन नगर पंचायतींवर महिलाराज


मुंबई-राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, उपसचिव प्रियांका कुलकर्णी, छापवाले, उपसचिव विद्या हम्पय्या, अनिरुद्ध जेवळीकर, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील 247 नगरपरिषदेपैकी 33 पदे अनुसूचित जातींसाठी व 11 पदे अनुसूचित जमातीसाठी आणि 67 पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. तर 136 पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. प्रवर्गनिहाय जाहीर करण्यात आलेल्या नगराध्यक्षांच्या राखीव जागांपैकी निम्म्या जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यानुसार अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी १७, अनुसुचित जमातीतील महिलांसाठी  ६, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ३४ आणि सर्वसाधारण गटातील महिलांसाठी (खुला गट) ६८ जागा आरक्षित झाल्या आहेत.  सोमवारी काढण्यात आलेल्या नगराध्यक्षांच्या आरक्षण सोडतीत पुणे जिल्ह्यातील १४ नगरपालिका व ४ नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदांच्या आरक्षण सोडतीचा समावेश आहे. या सोडतीत पुणे जिल्ह्यातील १४ पैकी विविध प्रवर्गातील महिलांसाठी मिळून चार आणि एकूण ४ नगर पंचायतींपैकी तीन नगराध्यक्षपदे ही महिलांसाठी राखीव झाली आहेत. 

नगरपरिषद आरक्षण पुढील प्रमाणे :
नगरपरिषदांमधील अनुसूचित जातीसाठी आरक्षित पदे (एकूण 33 पदे)
अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित नगरपरिषदा (17 पदे)-
देऊळगाव राजा, 2. मोहोळ, 3. तेल्हारा, 4. ओझर, 5. वाना डोंगरी (नागपूर), 6. भुसावळ, 7. घुग्घुस, 8. चिमूर, 9. शिर्डी, 10. सावदा, 11. मैंदर्गी, 12. डिगडोह(देवी), 13. दिग्रस (यवतमाळ), 14. अकलूज, 15. परतूर, 16. बीड, 17. शिरोळ


अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) आरक्षित नगरपरिषदा (16 पदे)
पाचगणी, 2. हुपरी, 3. कळमेश्वर, 4. फुरसुंगी ऊरुळी-देवाची, 5. शेगांव, 6. लोणावळा, 7. बुटीबोरी, 8. आरमोरी, 9. मलकापूर, जि.सातारा, 10. नागभिड, 11. चांदवड, 12. अंजनगांवसूर्जी, 13. आर्णी, 14. सेलू, 15. गडहिंग्लज, 16. जळगांव-जामोद,


अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित नगरपरिषदा :-
अनुसूचित जमातीसाठी एकूण 11 पदांपैकी 6 पदे महिलांसाठी आरक्षित आहेत.
अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित (6 पदे)
पिंपळनेर, 2. शेंदूरजनाघाट, 3. भडगांव, 4. यवतमाळ, 5. उमरी, 6. वणी
अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्ग (5 पदे)
पिंपळगांव-बसवंत, 2. राहुरी, 3. एरंडोल, 4. अमळनेर, 5. वरुड


 नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी नगरपरिषदा :-
एकूण 247 नगरपरिषदांमधून 67 पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्गातील (सर्वसाधारण) आरक्षित पदे (33 पदे)
तिरोडा, 2. वाशिम, 3. भद्रावती, 4. परांडा, 5. नंदुरबार, 6. खापा, 7. शहादा, 8. नवापूर, 9.त्र्यंबक, 10. कोपरगांव, 11. मंगरुळपीर, 12. कन्हान-पिंपरी, 13. पाथर्डी, 14. रामटेक, 15, नशिराबाद, 16.पालघर, 17. वरणगांव, 18. मलकापूर, जि.बुलडाणा, 19. इस्लामपूर, 20. मोहपा, 21. तुमसर, 22. महाड, 23. राहता, 24. श्रीवर्धन, 25. ब्रम्हपूरी, 26. दर्यापूर, 27. वैजापूर, 28. गोंदिया, 29. सांगोला, 30. वर्धा, 31. येवला, 32. कंधार, 33. शिरपूर-वरवाडे.
नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव पदे (34 पदे)
धामणगांव रेल्वे, 2. भोकरदन, 3. भगूर , 4. मालवण , 5. वरोरा , 6. हिंगोली , 7. मोर्शी , 8. उमरेड , 9. हिवरखेड , 10. बाळापूर , 11. शिरुर , 12. कुळगांव-बदलापूर , 13. देगलूर , 14. नेर-नबाबपूर , 15. धाराशिव , 16. इगतपूरी , 17. माजलगांव , 18. मुल , 19. बल्लारपूर , 20. जुन्नर , 21. कुर्डूवाडी , 22. औसा , 23. मुरुड-जंजिरा , 24. अकोट , 25. विटा , 26. चोपडा , 27. सटाणा , 28. काटोल , 29. दौंड , 30. रोहा , 31. देसाईगंज , 32. पुलगांव , 33. कर्जत, जि.रायगड , 34. दोंडाईचा-वरवाडे.


खुल्या प्रवर्गातील नगरपरिषदांचे आरक्षण
एकूण 247 पैकी 136 पदे ही खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असून यापैकी 68 पदे ही महिलांसाठी राखीव आहेत.
खुला प्रवर्ग (सर्वसाधारण)
1 फलटण, 2 अहमदपूर, 3 पाथरी, 4 चाळीसगांव, 5 तळोदा, 6  वाई, 7 नांदगांव, 8  जयसिंगपूर, 9निलंगा, 10 लोहा, 11  खोपोली, 12राजगुरूनगर  13 कराड, 14जेजुरी, 15 उमरगा, 16आळंदी, 17 पुसद, 18      बारामती 19 जत, 20. पारोळा, 21तळेगांव-दाभाडे, 22सासवड, 23      गडचांदुर, 24 रिसोड, 25 वेंगुर्ला, 26 पातूर, 27 किल्लेधारुर, 28 चिखली, 29 मेहकर, 30 दारव्हा, 31 सिल्लोड, 32 सिन्नर, 33  देवळी, 34 मुरूम, 35 वडगांव, 36 महाबळेश्वर, 37 आष्टा, 38       दुधणी, 39 कुंडलवाडी, 40 खुलताबाद, 41नरखेड, 42 राजूरा, 43 सिंदखेडराजा, 44 वाडी, 45 डहाणू,  46 देवळाली-प्रवरा, 47   कामठी, 48 अक्कलकोट, 49 सातारा, 50 भोर, 51 इंदापूर, 52 चिपळून, 53 माथेरान, 54 श्रीगोंदा, 55 श्रीरामपूर, 56 मनमाड, 57  नळदुर्ग, 58 भोकर, 59  बिलोली, 60 अंबेजोगाई, 61 जिंतूर, 62  सोनपेठ, 63 गंगापूर, 64  पांढरकवडा, 65 घाटंजी, 66 मुर्तीजापूर, 67   चिखलदरा, 68 तुळजापूर.


खुला प्रवर्गाताली महिलांसाठी नगरपरिषदा
परळी-वैजनाथ, 2. मुखेड, 3. अंबरनाथ, 4. अचलपूर ,5. मुदखेड 6. पवणी  7. कन्नड , 8. मलकापूर, जि.कोल्हापूर  , 9. मोवाड  , 10. पंढरपूर, 11. खामगांव  , 12. गंगाखेड , 13. धरणगांव , 14 बार्शी, 15. अंबड, 16. गेवराई, 17. म्हसवड, 18. गडचिरोली, 19.भंडारा, 20. उरण , 21. बुलडाणा , 22. पैठण , 23. कारंजा , 24. नांदुरा,  25.       सावनेर, 26. मंगळवेढा , 27. कळमनूरी , 28. आर्वी, 29. किनवट, 30. कागल  , 31.  संगमनेर, 32  मुरगुड, 33 साकोली, 34 कुरुदंवाड  , 35 पुर्णा,  36  कळंब , 37 चांदुररेल्वे , 38 चांदुरबाजार, 39           भुम , 40  रत्नागिरी , 41 रहिमतपूर, 42 खेड, 43 करमाळा  , 44 वसमत, 45 हिंगणघाट , 46 रावेर, 47 जामनेर, 48 पलुस, 49       यावल , 50 सावंतवाडी, 51 जव्हार, 52 तासगांव , 53   राजापूर  , 54    सिंधीरेल्वे , 55 जामखेड , 56   चाकण , 57  शेवगांव, 58 लोणार, 59 हदगांव, 60 पन्हाळा, 61 धर्माबाद, 62 उमरखेड, 63 मानवत, 64     पाचोरा , 65  पेण , 66  फैजपूर, 67 उदगीर, 68 अलीबाग.


नगरपंचायतीचे आरक्षण
राज्यातील 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण आज काढण्यात आले. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण 18 जागा आरक्षित असून यामध्ये महिलांसाठी 9 व सर्वसाधारण साठी 9 पदे आरक्षित आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी 13 जागा असून त्यामध्ये 7 जागा महिलांसाठी व 6 जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 40 पदे आरक्षित असून त्यामध्ये 20 जागा महिलांसाठी व 20 जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. खुल्या प्रवर्गासाठी एकूण 76 जागा असून 38 जागा महिलांसाठी व 38 जागा या सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहेत.


अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव :-
महिलांसाठी आरक्षित नगरपंचायती (9 पदे)
1 .निलडोह, 2. गोधनी(रेल्वे), 3. कोरची, 4. बहादुरा , 5. धानोरा, 6. गौंडपिंपरी, 7. ढाणकी , 8. अहेरी , 9. बेसा-पिपळा
अनुसूचित जाती प्रवर्ग (सर्वसाधारण)
येरखेडा, कांद्री (कन्हान), भिसी, कुरखेडा, देवरी, माळेगांव(ब्रु.), बिडगांव-तरोडी (खुर्द)-पांढुर्णा, भातकुली, दहीवडी.


अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव:-
महिलांसाठी आरक्षित नगर पंचायती (7 पदे)
भिवापूर, अर्जुनी-मोरगांव, सिरोंचा , हिंगणा, समुद्रपूर, पाली, देवळा.
अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) (6 पदे)
कोरपणा, कळंब, माणगांव, गोरेगांव, सेलू , सिंदेवाही


नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राखीव (40 पदे):-
सर्वसाधारण गटासाठी आरक्षित (20 पदे)
पारनेर, तळा, खानापूर, पालम, मंठा, कोंढाळी, माळशिरस , एटापल्ली, झरी-जामणी,  पोंभूर्णा , माहूर, आटपाडी, मालेगांव-जहांगिर, तिर्थपूरी, कणकवली, शिरुर-कासार, विक्रमगड, अकोले , मोखाडा, सुरगणा.
नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित (20 पदे)
घनसावंगी, भामरागड, मंचर,  पाटोदा, माढा, कळवण, सावली, मानोरा, मारेगांव, आष्टी, जि. वर्धा, तलासरी, वडवणी, पोलादपूर, खालापूर, शिरुर-अनंतपाळ, जाफ्राबाद, चाकूर, आष्टी, जि.बीड, जिवती, कर्जत, जि.अहिल्यानगर.


खुल्या प्रवर्गासाठी नगर पंचायती (एकूण 76 पदे)
खुला (सर्वसाधारण) (38 पदे)
शेंदूर्णी , साक्री,   सालेकसा, कवठे-महांकाळ, देवणी, मोताळा, अर्धापूर, बोदवड, हिमायतनगर, कसई-दोडामार्ग, मुलचेरा, धडगांव-वडफळ्या, कुडाळ, कोरेगांव, दापोली, वाभवे-वैभववाडी, निफाड, चंदगड, चार्मोर्शी, बदनापूर, कारंजा, धारणी, फुलंब्री, हातकणंगले, लोहारा (ब्रु.), मुरबाड, केज, आजरा, संग्रामपूर, खंडाळा, वडूज, देवगड-जमसंडे, नेवासा, मौदा, शिराळा (जि.सांगली), नायगाव, सेनगाव, महागाव.
खुला प्रवर्गातील महिलांसाठी :- (पदे 38)
बाभुळगांव, 2. मुक्ताईनगर, 3. कुही, 4. देहू, 5. शहापूर, 6. पारशिवनी, 7. वडगांव-मावळ, 8. तिवसा, 9. मंडणगड, 10. शिंदखेडा, 11. लांजा, 12. देवरुख, 13. वाडा, 14. लोणंद, 15. मेढा, 16. जळकोट, 17. दिंडोरी, 18. सडक-अर्जुनी, 19. म्हसळा, 20. नातेपुते, 21. रेणापूर, 22. लाखणी, 23. औंढा-नागनाथ, 24. पाटण, 25. पेठ, 26. कडेगांव, 27. अनगर, 28. महादूला, 29. सोयगांव, 30. वैराग, 31. लाखांदूर, 32. राळेगांव, 33. गुहागर, 34. नांदगांव-खडेश्वर, 35. महाळुंग-श्रीपूर, 36. वाशी, जि.धाराशिव, 37.  बार्शी-टाकळी, 38. मोहाडी.


आरक्षण सोडत पारदर्शकपणे राबविली – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
राज्यातील नगरपरिषदा व नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली, असे सांगून महिला प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या भगिनींना तसेच या निवडणुकीसाठी सर्वांना नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शुभेच्छा दिल्या.


पुणे जिल्ह्यातील नगरपालिकांचे प्रवर्गनिहाय आरक्षण 
- फुरसुंगी-ऊरळी देवाची --- अनुसुचित जाती (एस.सी.) 
- लोणावळा --- अनुसुचित जाती (एस.सी.) 
- शिरूर ---  ओबीसी (महिला) 
- जुन्नर --- ओबीसी (महिला)
- दौंड --- ओबीसी (महिला) 
- चाकण ---  सर्वसाधारण (महिला)


सर्वसाधारण गटासाठीच्या (खुला गट ) नगरपालिका 
- राजगुरुनगर 
- जेजुरी 
- आळंदी 
- बारामती 
- तळेगाव दाभाडे 
- सासवड 
- भोर 
- इंदापूर 


पुणे जिल्ह्यातील नगर पंचायतीच्या नगराध्यक्षांचे आरक्षण 
- माळेगांव बुद्रुक --- अनुसुचित जाती (एस.सी.) 
- मंचर --- ओबीसी (महिला)
- देहू --- सर्वसाधारण महिला (खुला गट)
- वडगांव मावळ --- सर्वसाधारण महिला


जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर, १७ जिल्ह्यांत महिलाराज

मुंबई- प्रदीर्घ काळानंतर राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून लवकरच होणाऱ्या या निवडणुकांसाठी ग्रामविकास विभागाने शुक्रवारी जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले. राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी जाहीर करण्यात आली. यानुसार ठाणे, रत्नागिरी, धुळे, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, लातूर, वाशीम आदी १७ जिल्हा परिषदांमध्ये महिलाराज येणार आहे. इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवरून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजीच्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया चार महिन्यांत सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगास दिले. त्यानुसार आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य सरकारनेही या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर केले असून ग्रामविकास विभागाने याबाबतची अधिसूचना शुक्रवारी निर्गमित केली. ग्रामविकास विभागाने यापूर्वी ३० सप्टेंबर २०२२ रोजी राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांचे आरक्षण जाहीर केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे अनेक जिल्हा परिषदांच्या निवडणुकाच झाल्या नाहीत. त्यामुळे ज्या जिल्हा परिषदांमध्ये निवडणुकाच झाल्या नाहीत, तेथील ३० सप्टेंबर २०२२ चे आरक्षण रद्द करण्यात आले असून आता विविध प्रवर्गांनुसार नव्याने आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यानुसार रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपद खुले असेल. मात्र यामध्ये ठाणे, सांगली, कोल्हापूर, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत सर्वसाधारण (महिला) आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे या जिल्हा परिषदांवर महिला राज पाहायला मिळणार आहे. तर अनुसूचित जातीसाठी बीड (महिला), हिंगोली, परभणी, वर्धा आणि चंद्रपूर (महिला) ही पदे आरक्षित करण्यात आली आहेत. या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर अनुसूचित जातीच्या महिलेला हे पद भूषवण्याचा मान मिळणार आहे. तर अनुसूचित जमातीसाठी पालघर, नंदुरबार, अहिल्यानगर महिलांसाठी राखीव असेल. अकोला (महिला) आणि वाशिम (महिला) या जिल्ह्यांतील अध्यक्षपदे ही राखीव ठेवली गेली आहेत. त्यामुळे या जिल्ह्या परिषदांमध्ये ही महिला राज दिसेल. 

नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच  ओबीसीसाठी रत्नागिरी (महिला), धुळे (महिला), सातारा (महिला), सोलापूर, जालना (महिला), नांदेड, धाराशिव ओबीसी महिलांसाठी राखील झाला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या महिला या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळू शकणार आहेत. तर  नागपूर आणि भंडारा या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदी ओबीसी प्रवर्गातून होईल. येथे पुरूष उमेदवारांना अध्यक्ष होण्याची संधी आहे. 

या आरक्षण घोषणेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांतील राजकीय गणिते ठरविण्यात महत्त्वाचा बदल होणार आहे. पक्षीय स्तरावर उमेदवार ठरविताना या आरक्षणाचा विचार करावा लागणार आहे. महिला आरक्षणामुळे अनेक जिल्ह्यांत नवीन नेतृत्वाला संधी मिळणार आहे. अनेक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे महिलांना मिळणार आहे. त्यामुळे महिलांचा जिल्ह्याच्या राजकारणात सहभाग वाढणार आहे. 

राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण यादी

1. ठाणे -सर्वसाधारण (महिला) 2. पालघर – अनुसुसूचित जमाती 3. रायगड- सर्वसाधारण 4. रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 5. सिंधुदुर्ग – सर्वसाधारण6. नाशिक -सर्वसाधारण 7. धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 8. नंदूरबार-अनुसूचित जमाती 9. जळगांव – सर्वसाधारण 10. अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला) 11. पुणे -सर्वसाधारण 12. सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 13. सांगली – सर्वसाधारण (महिला) 14. सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग 15. कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला) 16. छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण 17. जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 18. बीड – अनुसूचित जाती (महिला) 19. हिंगोली -अनुसूचित जाती 20. नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग 21. धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 22. लातूर – सर्वसाधारण (महिला) 23. अमरावती – सर्वसाधारण (महिला) 24. अकोला – अनुसूचित जमाती (महिला) 25. परभणी – अनुसूचित जाती 26. वाशिम अनुसूचित जमाती (महिला) 27. बुलढाणा -सर्वसाधारण 28. यवतमाळ सर्वसाधारण 29. नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग 30. वर्धा- अनुसूचित जाती 31. भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग 32. गोंदिया – सर्वसाधारण (महिला) 33. चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला) 34. गडचिरोली -सर्वसाधारण (महिला). 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 





No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.