Wednesday 20 March 2024

Maharashtra Lok Sabha Election 2024- पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच लोकसभांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात

नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या मतदारसंघांत रणधुमाळी सुरु



हाराष्ट्रातील पाच टप्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी पहिल्या टप्यात पूर्व विदर्भातील पाच लोकसभांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत असून नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या मतदारसंघांत आजपासून रणधुमाळी सुरु झालेली आहे. या पाच मतदारसंघांसाठी आजपासून अधिसूचना लागू करण्यात आली आहे. अर्ज भरण्यास सुरुवात झाली तरी काँग्रेसच्या उमेदवारांचा अद्याप पत्ता नाही. भाजपने यापूर्वीच उमेदवार जाहीर केले आहेत.

पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच लोकसभांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज

मतदारसंघ

विद्यमान खासदार

महायुती उमेदवार

आघाडी उमेदवार

नागपूर

नितीन गडकरी (भाजप)

नितीन गडकरी (भाजप)

 

रामटेक

कृपाल तुमाणे (शिवसेना)

 

 

चंद्रपूर

कै. धानोरकर (काँग्रेस) रिक्त

सुधीर मुनगुंटीवार (भाजप)

 

गडचिरोली-चिमूर

अशोक नेते (भाजप)

 

 

भंडारा-गोंदिया

सुनील मेंढे (भाजप)

 

 


पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यक्रम

तपशील

पहिला टप्पा

निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध दिनांक नामनिर्देशनपत्र भरण्यास प्रारंभ

20/03/2024

नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक

27/03/2024

नामनिर्देशन पत्राची छाननी

28/03/2024

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक

30/03/2024

मतदानाचा दिनांक

19/04/2024

मतमोजणीचा दिनांक

04/06/2024


नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघांत विद्यमान भाजप पक्षाचे 3 तर शिवसेना व कॉंग्रेस पक्षाचे प्रत्येकी 1 खासदार निवडून आले होते. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील खासदार बाळू धानोरकर (काँग्रेस) यांच्या निधनाने सदरील जागा रिक्त होती. पाच मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघात भाजपने उमेदवार जाहीर केलेले असून उर्वरित अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात  भाजपचे राज्यातील मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. मात्र भंडारा-गोंदिया तसेच गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण राहणार याचा सस्पेन्स कायम आहे. रामटेक संदर्भातही महायुतीचा निर्णय होऊ शकलेला नाही. काँग्रेसच्या उमेदवारांचा अद्याप पत्ता नाही. महायुती व महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्याने लढतीची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघासाठी अजूनही एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून या मतदारसंघांसाठी ही अधिसूचना लागू होणार आहे. आजपासूनच नामनिर्देशन पत्र स्वीकारले जात आहेत. 27 मार्चपर्यंत उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 28 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. तर 30 मार्च उमेदवारी अर्ज परत घेण्याची अखेरची मुदत असणार आहे. विशेष म्हणजे 20 मार्च ते 27 मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीमध्ये तीन दिवस प्रशासनिक सुट्टी आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना पाचच दिवस मिळणार आहेत. सन 2019 मध्ये नागपूर लोकसभेसाठी 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर रामटेक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 2019 मध्ये 16 उमेदवार निवडणुकीत होते. 

देशातील सात टप्प्यांतील मतदानापैकी महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून राज्यात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. देशात 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात पार पडणार आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे मे या पाच टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभा निवडणूक 2024 चा बिगुल वाजलय. पहिल्या टप्प्यातील 102 लोकसभा जागांसाठी अधिसूचना जारी झाली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तराखंडसह 21 राज्यातील लोकसभेच्या 102 जागांसाठी उमेदवार आजपासून अर्ज दाखल करु शकतात. ईशान्येकडच्या सहा राज्यात लोकसभेच्या 9 जागा आहेत. दक्षिण भारतात तामिळनाडूमध्ये 39 आणि लक्षद्वीपच्या एका जागेसाठी पहिल्या टप्प्यात निवडणूक होईल. पहिल्या टप्प्यात 21 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. बिहारमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 मार्च आहे. त्याशिवाय 20 राज्यात 27 मार्चपर्यंत निवडणूक अर्ज दाखल करु शकता. अर्ज मागे घेण्याची तारीख 30 मार्च आहे. बिहारमध्ये दोन एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. 19 एप्रिलला सर्व 102 लोकसभा सीटसाठी एकत्र मतदान होईल. निकाल 4 जूनला येतील. पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेशच्या 2, बिहारच्या 4, आसामच्या 4, छत्तीसगडच 1, मध्य प्रदेशची 6, महाराष्ट्राच्या 7, मणिपुरच्या 2, मेघालयच्या 2, मिजोरमची 1, नागालँडची 1, राजस्थानच्या 12, सिक्किमची एक, तमिलनाडूच्या 39, त्रिपुराची एक, उत्तर प्रदेशच्या 8, उत्तराखंडच्या 5, पश्चिम बंगालच्या 3, अंदमान एंड निकोबारची 1, जम्मू-कश्मीरची 1, लक्षद्वीप 1 आणि पुडुचेरी 1 लोकसभा जागेसाठी मतदान होणार आहे. 

महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान; महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या दरम्यान लोकसभा निवडणुका-:

पहिला टप्पा : 19 एप्रिल एप्रिल

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार असून यावेळी पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला विदर्भातील सहा मतदार संघात मतदान पार पडणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर 19 एप्रिलला

दुसरा टप्पा : 26 एप्रिल 2024
राज्यात 26 एप्रिल 8 मतदारसंघात मतदान होणार असून यावेळी वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा या मतदारसंघात मतदान होईल.

तिसरा टप्पा : 7 मे 2024
राज्यात 7 मे रोजी 11 मतदारसंघात मतदान होणार आहे. रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात 7 मेला मतदान होईल.

चौथा टप्पा : 13 मे 2024
राज्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघात 13 मेला मतदान पार पडेल.

पाचवा टप्पा : 20 मे 2024
महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मेला होईल. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात 20 मे रोजी एकूण 13 मतदारसंघात मतदान पार पडेल.



Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.