उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात शरद पवार गटाकडून उमेदवारच नाही; पवार विरुद्ध तावरे पारंपारिक लढत कायम
उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला साखर कारखान्याचे संचालक पद का पाहिजे?
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीची निवडणूक होत असून चौरंगी समजली जाणारी खरी लढत दुरंगी होणार असल्याचे सभासद मतदारांचे मत असून संचालक पदाच्या २१ जागांसाठी ९० उमेदवार रिंगणात आहेत. या कारखान्याचे १९ हजार ६०० सभासद मतदार आहेत. २२ जून रोजी मतदान आणि २४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. २१ जागांसाठी तब्बल ५९३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली होती उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ५०३ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले तर काहींचे बाद झालेले होते यामध्ये वेगवेगळे ४ पॅनेल च्या माध्यमातून ८३ तर अपक्ष, अन्य ७ उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात शरद पवार गटाकडून उमेदवारच दिलेला नाही त्यामूळे पवार विरुद्ध तावरे पारंपारिक लढत या वेळीही कायम आहे. बहुतांश प्रसारमाध्यमांमध्ये पवार विरुद्ध पवार असे लढतीचे चित्र निर्माण करुन सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा मतदारांनी केला असून खरी लढत पवार विरुद्ध तावरे गट अशीच असून निकालानंतर चौरंगी की दुरंगी हे स्पष्ट होईल.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अजित पवार यांनी निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानेही आपला बळीराजा सहकार बचाव पॅनल जाहीर केला आहे. मात्र, विशेष बाब म्हणजे शरद पवार गटाने उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात उमेदवार देणं टाळलं आहे. याची व उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला साखर कारखान्याचे संचालक पद का पाहिजे याबाबतची देखील अनेक कारणे आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ‘श्री नीळकंठेश्वर पॅनेल’(निवडणूक चिन्ह कपबशी) तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’(निवडणूक चिन्ह तुतारी) आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’(निवडणूक चिन्ह किटली) तसेच कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनेल (निवडणूक चिन्ह छत्री) आणि अपक्ष अशाप्रकारे बहूरंगी लढत होत असून प्रमुख उमेदवार यांच्या मते प्रामुख्याने काही जागी तिरंगी तर बहुतांश जागी दुरंगी लढत होईल.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम २१ मेला जाहीर झाला होता. त्यानुसार दिनांक २१ मे ते २७ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. तर २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी प्रकाश अष्टेकर आणि माळेगावचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २१ ते २७ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. तसेच २८ मे रोजी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. २९ मे ते १२ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. १३ जून रोजी अंतिम उमेदवारी यादी जाहीर केली असून दिनांक २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. दिनांक २४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
मुख्यमंत्री पद मिळवायचे सोडून यांना साखर कारखान्याचे चेअरमन व्हायचेय अशी टीका तावरे यांनी केल्यावर या निवडणुकीत उपमुख्यमंत्री पदावरील अजित दादांना साखर कारखान्याचे संचालक पद का पाहिजे? असे प्रश्न सामान्यांना पडले आहेत. खरं तर अजित पवार यांनी १९८४ ला इंदापूरच्या छत्रपती कारखान्यापासून अजित पवारांच्या कारकिर्दी सुरुवात झाली त्यानंतर कारखान्याची निवडणूक लढविण्याची घटना दुर्मिळच असून आता १९८४ नंतर पुन्हा ४१ वर्षांनी अजित पवार हे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरत आहेत. अजित दादा उपमुख्यमंत्री पदावर अनेकदा पोहोचले तरी स्थानिक राजकारणावर आपले वर्चस्व कसे राहील याची त्यांनी कायम खबरदारी घेतलेली आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुणे जिल्हा बँकेचे संचालक पद कायम राखले होते. अजित पवार गेल्या 32 वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक होते. अजित पवार 1991 पासून जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम पाहत होते. २०२३ मध्ये त्यांनी संचालक पदाचा राजीनामा देऊन त्यांच्या रिक्त जागी माळेगाव येथील रणजीत तावरे यांनी संधी दिली. वास्तविकपणे पुणे जिल्हा बँके निवडणुकीत अ वर्ग गट मधून ते निवडून आले होते. त्या गटात आपले वर्चस्व कायम राहावे म्हणून करखान्याच्या ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था या मतदारसंघातून ते स्वतः प्रतिनिधित्व करुन उमेदवारी लढत आहेत. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत बहुमताने पॅनल आले तर संचालक पदाचा राजीनामा देऊन अन्य व्यक्तीला देखील संधी देऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली त्यामध्ये मागील संचालक मंडळातील सात संचालकांना पुन्हा संधी देण्यात आले आहे. नीलकंठेश्वर पॅनल मध्ये जुन्या नव्यांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार स्वतः ब वर्गातून उमेदवार राहिले आहेत. या कारखान्याच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलने अजित पवार यांच्या पॅनलला धक्का देऊन कारखान्याची सत्ता हस्तगत केली होती. मात्र, २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत अजित पवारांनी सत्ता खेचून आणली. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत पवार यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामकाजावरून तिन्ही विरोधी पॅनेलने अजित पवार यांना लक्ष्य केले आहे. श्री नीलकंठेश्वर पॅनेलमध्ये विद्यमान संचालक बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे, योगेश जगताप, स्वप्निल जगताप, प्रताप आटोळे, नितीन सातव, संगीता कोकरे यांना उमेदवारी दिली मात्र विद्यमान अध्यक्ष केशवराव जगताप, मदन देवकाते, अनिल तावरे, सुरेश खलाटे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
नीळकंठेश्वर पॅनेल गट निहाय नावे पुढील प्रमाणे -माळेगाव गट - बाळाहेब पाटील तावरे, शिवराज प्रतापसिंह जाधवराव, राजेंद्र सखाराम बुरूंगले. पणदरे गट - तानाजी तात्यासाहेब कोकरे, स्वप्नील शिवाजीराव जगताप, योगेश धनसिंग जगताप. सांगवी गट - विजय श्रीरंगराव तावरे, विरेंद्र अरविंद तावरे, गणपत चंद्रराव खलाटे, खंडाज-शिरवली गट - प्रताप जयसिंग आटोळे, सतिश जयसिंग फाळके. निरावागज गट - जयपाल निवृत्ती देवकाते, अविनाश गुलाबराव देवकाते. बारामती गट - नितीन सदाशिव सातव, देविदास सोमनाथ गावडे. ब वर्ग संस्था मतदार संघ- अजित अनंतराव पवार. अनुसूचित जाती जमाती - रतनकुमार साहेबराव भोसले. महिला राखीव प्रतिनिधी - संगिता बाळासाहेब कोकरे, सौ. ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले. इतर मागास प्रवर्ग - नितीन वामनराव शेंडे. भटक्या विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्ग - विलास हृषिकांत देवकाते..
सहकार बचाव शेतकरी पॅनेल -माळेगाव गट - रंजनकुमार शंकरराव तावरे, संग्राम गजानन काटे, रमश शंकराव गोफणे. पणदरे गट - सत्यजित संभाजीराव जगताप, रणजित शिवाजीराव जगताप, रोहन रविंद्र कोकरे. सांगवी गट - चंद्रराव कृष्णराव तावरे, रणजित वीरसेन खलाटे, संजय बाबुराव खलाटे. खांडज-शिरवली गट - विलास नारायण सस्ते, मेघशाम विलास पोंदकुले. निरावागज गट - राजेश सोपान देवकाते, केशव तात्यासाहेब देवकाते. बारामती गट - गुलाबराव बाजीराव गावडे, वीरसिंह उर्फ नेताजी विजयसिंह गवारे. ब वर्ग मतदार संघातून भालचंद्र बापूराव देवकाते, अनुसूचित जाती-जमातीमधून बापूराव अप्पाजी गायकवाड, महिला राखीव प्रतिनिधीमधून राजश्री बापूराव कोकरे, सुमन तुळशीराम गावडे. इतर मागास प्रवर्गातून रामचंद्र कोंडीबा नाळे, भटक्या विमुक्त जाती व जमातीमधून सुर्य़ाजी तात्यासाहेब नाळे..
बळीराजा सहकार बचाव पॅनेल -माळेगाव गट - अमित चंद्रकांत तावरे, राजेंद्र दौलत काटे, श्रीहरी पांडुरंग येळे. पणदरे गट - सुशीलकुमार उत्तम जगताप, दयानंद चंद्रकांत कोकरे, भगतसिंग आबा जगताप. सांगवी गट- संजय नामदेव तावरे, राजेंद्र अशोक जाधव, सुरेश तुकाराम खलाटे. खांडज-शिरवली गट - सोपान तुकाराम आटोळे, तानाजी भागुजी आटोळे. निरावागज गट - गणपत शंकर देवकाते, शरदचंद्र शंकरराव तुपे. बारामती गट - प्रल्हाद गुलाबराव वरे, अमोल देविदास गवळी. महिला राखीव - शकुंतला शिवाजी कोकरे, पुष्पा मोहन गावडे. इतर मागासवर्गातून भारत दत्तात्रेय बनकर, ज्ञानदेव गुलाबराव बुरुंगले. अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून राजेंद्र श्रीरंग भोसले.
अजित दादांकडून १०२ मतांसाठी आटापिटा!
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदारांची संख्या जरी १९ हजार ५४९ असली तरी उपमुख्यमंत्री ज्या मतदारसंघ गटातून निवडणूक लढवित आहेत त्या गटातील मतदारांची संख्या केवळ १०२ आहे. आता निवडणूक जिंकण्यासाठी या १०२ मतदारांवर मदार असून या मतांसाठी आटापिटा करावा लागत आहे. ब वर्ग संस्था मतदार संघ या गटातील १०२ मतदार आहेत ते संबंधित संस्थेने प्राधिकृत केलेले प्रतिनिधि असतात त्यांना मतदान करण्याचा हक्क दिलेला असतो. आता त्या संस्थेचा प्राधिकृत व्यक्ति शक्यतो चेअरमनच असतात या मतदारांची मात्र चांदी आहे. रात्रीची बँक उघडली या आरोपवरुन किती भाव फुटला असेल याचा अंदाज व्यक्त करणाऱ्या चर्चाना उधाण आले आहे. १९ हजार ५४९ मतदारांसाठी विभागून वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात मतदान केंद्र सुविधा केल्या असून ब वर्ग संस्था मतदार संघ या गटातील १०२ मतदारांसाठी प्रशासकीय भवन हे एकमेव केंद्र निर्धारित केलेले आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकूण ६ गटांतून (‘अ’वर्ग) १९ हजार ५४९, तर ‘ब’वर्गातून १०२ सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
कारखाना कार्यक्षेत्रातील गट, गटामधील गावे व मतदार पुढीलप्रमाणे :
गट क्रमांक १ : माळेगाव (२९६५)
गावे : माळेगाव बुद्रुक (१७६७), माळेगाव खुर्द (५८०), येळेगाव (१९४), पाहुणेवाडी (१४०), ढाकाळे (२८४).
गट क्रमांक २ पणदरे (३७९६)
गावे पणदरे (२२८६), मानाप्पाचीवाडी (२७८), पवईमाळ (२१५), सोनकसवाडी (३५१), कुरणेवाडी (१४९), धुमाळवाडी (२८८), खामगळवाडी (२२९).
गट क्रमांक ३ : सांगवी (२४८७)
गावे: सांगवी (१३३६), कांबळेश्वर (७००), शिरने (२८२), पांढरेवाडी (११९), पिंगळेवाडी (५०).
गट क्रमांक ४ : खांडज-शिरवली (२३७९)
गावे : खांडज (१४७७), शिरवली (९०२). गट क्रमांक ५: निरावागज (३५०६) -गावे निरावागज (१८५३), मेखळी (१२७३), सोनगाव (२४१), घाडगेवाडी (१३९).
गट क्रमांक ६ : बारामती (४४१६)
गावे बारामती (७०३), मळद (६९१), मेडद (६०५), गुणवडी (४४७), डोरलेवाडी (२३३), राजाळे-सांगवी (१), वीरपुरी-दहिगाव (१), कहऱ्हावागज (५६१), नेपतवळण (२८८), बऱ्हाणपूर (१२०), उंडवडी सुपे (१८२), उंडवडी क. प. (१४७), जराडवाडी (२८६), सोनवडी (१५१). आणि
‘ब’ वर्गातून १०२ सभासद.
माळेगाव कारखाना निवडणूक 7 विद्यमान 5 माजी संचालक चौरंगी लढत तर अजित पवार विरुद्ध भालचंद्र देवकाते अशी थेट लढत होणार आहे. शरद पवार गटाने अजित दादा यांच्या विरोधात उमेदवार का नाही दिला? आणि अजितदादा या निवडणुकीत का उतरले? लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तावरे यांनी कोणाला मदत केली? स्थानिक राजकारण काय आहे? पवार घराण्यातील नवीन पिढी अजून संचालक पदाला पात्र ठरत नाही का? दोन्हीही राष्ट्रवादी पक्षांची एकत्र खेळी की अजित दादा आणि तावरे यांची मिलिभगत आहे या व अन्य असंख्य प्रश्नांची उत्तरे, विश्लेषण पहा "प्राब" च्या ब्लॉगवर..
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook
================================================
New Book
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक
================================================
"महाराष्ट्रातील राजकारण"
"महाराष्ट्रातील राजकारण"
================================================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.