‘धडपड भाग ३’ हे पुस्तक नव उद्योजकांना प्रेरणा देणारे ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार
आंतरराष्ट्रीय औद्योगिक सल्लागार अमित भालेराव यांच्यासह विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार
पुणे- ‘धडपड भाग ३’ या पुस्तकात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व्यक्तींची यशोगाथा जेष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांनी रेखाटली असून हे पुस्तक नव उद्योजकांना प्रेरणा देणारे ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर लिखित धडपड भाग-3 या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद सभागृहात आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात करण्यात आले.
या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला आमदार बापूसाहेब पठारे, आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामटे, कोथळे ग्रामपंचायतच्या आदर्श सरपंच सौ जयश्रीताई भोईटे, पुस्तकाचे प्रकाशक लोकमित्र प्रकाशन व पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)चे चंद्रकांत भुजबळ, जेष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे, धनंजय जाधव, अविनाश गोडबोले, विठ्ठल जाधव, तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी वर्ग व माजी सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यावेळी म्हणाले, धडपड भाग तीन या पुस्तकाचे लेखक श्याम दौंडकर यांची एक रिक्षा चालकापासून ते जिल्ह्यातल्या पत्रकारितेपर्यंतची वाटचाल नक्कीच खडतर होती. पत्रकार म्हणून त्यांनी अनेक वर्ष जिल्हा परिषद बीट सांभाळले असून त्यामुळे त्यांचा संपर्क वाढला, अनेक क्षेत्रातील लोकांशी त्यांचा संपर्क आला, जिल्ह्याचे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या लेखणीतून समाजासमोर मांडले, ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ग्रामीण भागाची जाण असलेले पत्रकार म्हणून श्री. दौंडकर यांच्याकडे बघितले जाते. पुस्तक लिहीत असताना त्यांनी कोणतेही बंधन स्वतःवर घातले नाही, असे ते म्हणाले.
धडपड भाग-3 या पुस्तकात दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या गाथा त्यांनी सर्वांच्या समोर ठेवण्याचा, उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अत्यंत गरिबीतून ते पुढे आले असून त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर कष्टाच्या व संघर्षाच्या जोरावर पत्रकारितेसारख्या बुद्धिवंतांच्या क्षेत्रात स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. श्री. दौंडकर यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या लेखणीचा वापर केला असून त्यातून त्यांनी लोकांचे प्रेम आदर सन्मान मिळविला आहे. पुस्तक लिखाणाबद्दल त्यांना जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने शुभेच्छा देऊन श्री. पवार यांनी पुस्तकाच्या प्रकाशकांचे सुद्धा अभिनंदन केले.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, श्याम दौंडकर यांनी अलिकडेच परदेशातही प्रवास केलेला आहे. त्यांनी दुबई, थायलंड, उजबेकिस्तानमध्ये प्रवास केला आहे. त्यामुळे आता पुढील पुस्तक हे परदेशी अनुभवांवर लिहायला हवं. दरवेळी माझ्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन केलं जातं. मी पुस्तकाचे प्रकाशन केलं की पुस्तक जास्त विकलं जाते का? असा सवाल करत मला रॉयलटी पाहिजे. असं विनोदी भाष्य अजित पवारांनी केलं. श्याम दौंडकर यांच्या पुस्तकात पुणे जिल्ह्यातील नेत्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, या पुस्तकात माझा उल्लेख देखणा-चिकणा असा करण्यात आलेला आहे. शाम दौंडकर यांचं माझ्यावर प्रेम आहे त्यामुळे त्यांनी असा माझा उल्लेख केला असेल. आता मी देखणा-चिकणा आहे तर माझ्या बायकोलाही ते सांगा, कारण तिनं कधीच माझं कौतुक केलं नाही असं अजित पवारांनी म्हटलं. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. आता मी देखणा-चिकणा आहे तर माझ्या बायकोलाही ते सांगा, कारण तिनं कधीच माझं कौतुक केलं नाही, असं अजितदादा म्हणाले.
लोकप्रतिनिधींचा संघर्ष नव्या पिढीला माहीत नसतो, तो दौंडकरांनी उलगडला आहे, असे ते म्हणाले. दौंडकरांनी अजितदादांचा उल्लेख देखणा-चिकणा, असा केला आहे, या मुद्दांवर बोलतांना अजितदादांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मॉडेलिंग विषयी माहिती उपस्थितांनी दिली. राजकारणात येण्यापूर्वी मी मॉडेलिंग करीत होतो, असे फडणवीसांनी मला सांगितले होते. त्यांचे तरुण वयातील फोटोही मॉडेलिंगसारखे आहेत, नंतर ते तरुणवयात महापौर झाले, त्यानंतर वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळाले. ते दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले, असे अजितदादा म्हणाले.
यानंतर अजित पवार यांनी श्याम दौंडकर यांच्या कारकीर्दीचा उल्लेख अजित पवार यांनी केला. श्याम दौंडकर यांनी रिक्षाचालक ते एक पत्रकार असा प्रवास केला. पत्रकार म्हणून त्यांनी अनेक वर्ष जिल्हा परिषद बीट सांभाळले असून त्यामुळे त्यांचा संपर्क वाढला, अनेक क्षेत्रातील लोकांशी त्यांचा संपर्क आला. जिल्ह्याचे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या लेखणीतून समाजासमोर मांडले, ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या शेवटी धडपड भाग-3 पुस्तक देऊन विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये आंतरराष्ट्रीय औद्योगिक सल्लागार अमित भालेराव यांच्यासह अभिनव संकल्पना राबवून यश मिळविलेले उद्योजक आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विशेष यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. राजेंद्र खांदवे पाटील यांनी आभार व्यक्त केले.
अन्य समाजमाध्यमे व प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धी संबंधित लिंक-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्याम दौंडकर लिखित ‘धडपड भाग-३’ या पुस्तकाचे प्रकाशन
--------------------------------------------------
‘पुस्तकामध्ये माझा उल्लेख देखणा-चिकणा असा, हे माझ्या बायकोलाही सांगा’, अजितदादा असं का म्हणाले? वाचा
--------------------------------------------------
मी दिसायला देखणा, चिकणा..., कुणी जाऊन माझ्या बायकोला सांगा! असं अजितदादा का म्हणाले?
--------------------------------------------------
ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांनी लिहिलेल्या ‘धडपड भाग ३’ या पुस्तक
--------------------------------------------------
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
=============================
New Book
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक
============================="महाराष्ट्रातील राजकारण"
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण"
=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.