Tuesday, 2 September 2025

Election Commission increases the honorarium of BLOs and supervisors निवडणूक आयोगाकडून बीएलओ आणि पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ

निवडणूक आयोगाकडून बीएलओ आणि पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ


मुंबई-भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसेच बीएलओ पर्यवेक्षकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांना प्रथमच मानधन देण्यात येणार आहे.

अचूक आणि पारदर्शक मतदार यादी ही लोकशाहीसाठी भक्कम आधार असून निवडणूक आयोगाने मतदार यादी तयार करण्यासाठी आणि तिच्या पुनरावलोकनासाठी मेहनत घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याकरिता हे पाऊल उचलले आहे.

मतदार नोंदणी, मतदारांची माहिती गोळा करणे, मतदानादिवशी मतदार केंद्रावर उपस्थित राहणे अशी महत्त्वाची भूमिका मतदान केंद्रीय अधिकारी पार पाडतात. मात्र त्यांना मिळणारे मानधन तुटपुंजे असल्याने मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील मतदान केंद्रीय अधिकारी व पर्यवेक्षक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत सोमवारी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांची विश्वसनीयता सुनिश्चित होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायचित्र मतदार याद्यांची विश्वसनीयता सुनिश्चित होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नेमणूक झाली आहे. प्रत्येक १० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या कामकाजाचे देखरेख व मुल्यमापन करण्यासाठी एका पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

या नवीन तरतुदीनुसार बीएलओचे २०१५ पासूनचे मानधन रु. ६,००० वरून रु. १२,००० तर मतदार यादी पुनरावलोकनासाठी बीएलओ प्रोत्साहन रक्कम रु. १,००० वरून रु. २,००० करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बीएलओ पर्यवेक्षक यांना रु. १२,००० वरून रु. १८,००० वाढ करण्यात आली. एईआरओ यांना प्रथमच रु. २५,००० आणि ईआरओ यांनाही प्रथमच रु. ३०,००० मानधन देण्यात येईल.

याशिवाय, बिहारपासून सुरू झालेल्या या विशेष तीव्र पुनरावलोकन (SIR) मोहिमेसाठी बीएलओंना रु. ६,००० चे विशेष प्रोत्साहन मानधन देण्यात येणार आहे. हा निर्णय निवडणूक प्रक्रियेची अचूकता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य मानधन देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

मतदान केंद्रीय अधिकाऱ्यांची नेमकी जबाबदारी काय?
-मतदार नोंदणी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे व यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची महत्वाची भूमिका आहे.
-मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांव्दारे मतदार यादीच्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविणे, विशिष्ट संवर्गाच्या मतदारांची नोंदणी यासाठी घरोघरी जाऊन मतदार नोंदणी करणे तसेच वेळोवेळी आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांची विशेष माहिती गोळा करणे आदी काम करण्यात येतात.
-छायाचित्र मतदार याद्यांची प्रतवारी सुधारण्यासाठी व त्या संपूर्णतः अचूक होण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी यांना सहाय्य करणे, मतदारांना मतदार चिठ्ठी वाटप करणे व मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहणे आदी काम ही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी करीत असतात.
-हे काम ते त्यांच्या मूळ कार्यालयातील काम सांभाळूनही अतिरिक्त जबाबदारी म्हणून पार पाडावी लागतात.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

=============================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.