Tuesday, 2 September 2025

Pune Cantonment Cooperative Bank पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेच्या संचालकपदी जीवन म्हेत्रे यांची बिनविरोध निवड

पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेच्या संचालकपदी जीवन म्हेत्रे यांची बिनविरोध निवड


पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँक लि. पुणेच्या सर्वसाधारण गटामधील संचालकपदी जीवन दत्तात्रय म्हेत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांना सर्वसाधारण गटामधील संचालक पदाच्या निवडीचे पत्र निवडणुक अध्यासी अधिकारी श्रीमती निलम पिंगळे तसेच बँकेचे अध्यक्ष कैलास कोद्रे यांनी दिले. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष यांनी तरूणांनी बँकेच्या विकासासाठी सक्रिय सहभागी व्हावे असे मत व्यक्त केले.

जीवन दत्तात्रय म्हेत्रे हे सहजपुर व ऊरळी कांचन परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आहे. त्यांना दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणुन कामाचा अनुभव आहे. या परिसरातील विविध सामाजिक संस्थामध्ये, सार्वजनिक मंडळामध्ये व क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत.

यावेळी बँकेचे अध्यक्ष कैलासराव सखाराम कोद्रे, उपाध्यक्ष, साहेबराव विठठलराव लोणकर, स्मिता शैलेश लडकत (वोर्ड ऑफ मॅनेजमेंट अध्यक्षा), संचालक,  कैलास रामचंद्र कोद्रे, मंगल शिवाजीराव टिळेकर, शांताराम कोंडिराम चौधरी, नंदकिशोर तुकाराम विडकर.

तसेच देवेंद्र सुरेश भाट, अॅड. अविनाश केरवा कवडे, अॅड. दिलीप महादेव जगताप,  संदीप कैलासराव कोदे, अनिल जगन्नाथ आबनावे, ज्ञानेश्वर रामभाऊ मोझे, किशोर फत्तु संघेलिया, संतोष मधुकर पेठे, अमित अजित गिरमे, जीवन दत्तात्रय म्हेत्रे तसेच सेवक प्रतिनिधी वाळु पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जवळकर, महाव्यव्यवस्थापक अस्लम तांबोळी उपस्थित होते.

याप्रसंगी उपाध्यक्ष साहेबराव लोणकर व संचालक कैलास रामचंद्र कोद्रे तसेच अविनाश कवडे यांनी मनोगत व्यक्त करून नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले. तसेच उपाध्यक्ष साहेबराव लोणकर यांनी आभार मानले.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.