मयत सभासदांना जिवंत दाखविण्याचा संचालकांचा प्रताप
ठराविक पदाधिकाऱ्यांनी मिळून बनावट अनोंदणीकृत समझोता ज्ञापनपत्र करारावर उचलले ३६ कोटी ५० लाख रु.; पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचा सचिव झाला साक्षीदार!
कर्ज परतफेडच्या नावाने अपहार, गैरव्यवहाराची चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल करा- यशवंत सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितिची मागणी
पुणे- यशवंत सहकारी साखर कारखान्याची ५१२ कोटींची ९९.२७ एकर जमीन अल्प दराने विक्री ठराव सभेला गणसंख्या पूर्ततेसाठी मयत सभासदांना जिवंत दाखविण्याचा प्रताप संचालकांनी केलेला असून बनावट कागदपत्रे बनवून मयत सभासदांच्या खोट्या उपस्थितीच्या सह्या करुन शासनाची व सभासदांची घोर फसवणूक केलेली आहे. कारखान्याच्या सभेला स्वर्गातून सभासद पृथ्वीवर अवतरले आहेत. जमीन विक्री ठरावाला सभेने मान्यता दिल्याचे खोट्या कागदपत्रांच्या आधारे भासवून गैरप्रकार केल्याचे उघड झाले आहे. ५ ते १० वर्षापूर्वी मयत झालेले सभासद त्यांचे मृत्यू दाखले व सभेला उपस्थिती दर्शविलेले बनावट कागदपत्रांसह संबंधित गैरकृत्य, अपहार, गैरव्यवहाराची चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल करा अशी मागणी करण्यात आलेली आहे.
पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचे नवनवीन कारनामे उघड होत असताना आता ठराविक पदाधिकाऱ्यांनी मिळून बनावट अनोंदणीकृत समझोता ज्ञापनपत्र करारावर ३६ कोटी ५० लाख रु. उचलले आणि वन टाईम सेटलमेंट कर्ज परतफेडच्या नावाने अपहार, गैरव्यवहाराचा प्रकार समोर आलेला आहे. बाजार समितीचा सचिव तथा उपनिबंधकच मुख्य सूत्रधार असून डॉ. राजाराम धोंडकर यांची तत्काळ हकालपट्टी करुन संबंधित अपहार, गैरव्यवहाराची चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल करा अशी मागणी यशवंत सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितिने व सभासदांनी केलेली आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन उपबाजारासाठी विकत घेण्याच्या व्यवहारात गैरप्रकार होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती ॲड. मंगेश शंकर ससाणे आणि यशवंत सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीचे अध्यक्ष व सभासद श्री विकास सदाशिव लवांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली आहे. विकास लवांडे (सभासद क्र.१८१२०) यांच्या बरोबर श्री राजेंद्र रतन चौधरी (सभासद क्र.१८७७५), श्री लोकेश विलास कानकाटे (सभासद क्र.२४३१०), श्री. सागर भगवंत गोते (सभासद क्र.२२६४१) यांच्यासह अनेक सभासदांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पोलिस स्टेशनला निरीक्षकांना भेटून तक्रार देऊन घटनेतील बोगस बनावटगिरी पुराव्यासह दर्शवून दिली.
सदरील प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन मा. साखर आयुक्त, मा. सहकार आयुक्त, व मा. पणन संचालकांना देण्यात आलेले असून मा. पोलिस आयुक्तांना देखील रीतसर तक्रार देण्यात आलेली आहे. याबाबत दिलेल्या तक्रार निवेदनात पुढे म्हटले आहे कि, यशवंत सहकारी साखर कारखाना लि. नावे सर्व सभासदांच्या सार्वजनिक मालकी हक्काची थेऊर, ता. हवेली, जि. पुणे येथील ५१२ कोटींची ९९.२७ एकर जमीन मिळकत आपापसात संगनमताने कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे यांच्या करिता विक्री व्यवहार करण्याच्या बहाण्याने दोन्ही संस्थांच्या सचिव व संचालकांनी बनाव करुन स्वतःच्या आर्थिक लाभासाठी अत्यल्प किमतीला तबदिल करण्यासाठी बनावट व खोटी कागदपत्रे बनवून ती खरी असल्याचे शासनास भासवून ३६ कोटी ५० लाख रु. परपसर बँक खात्यात वर्ग केलेल्या रक्कमेचा अपहार, गैरव्यवहार, दलाली करण्यासाठी मयत सभासदांना जिवंत असल्याचे भासविले. आणि मयत व्यक्ति जमीन विक्री ठराव सभेत उपस्थित असल्याचा बनाव करुन त्यांचे नावाचा दुरुपयोग करुन मयत व्यक्तींच्या खोट्या सह्या करुन बनावट कागदपत्राच्या आधारे सभेचे कामकाज बनावट व खोटे दिशाभूलकारक प्रोसीडिंग तयार करुन सभासदांची व शासनाची फसवणूक केलेली आहे.
सभेला गणसंख्या (कोरम) पूर्ण झाल्याचे दर्शवून सर्व कामकाज पार पडले असे नमूद केले होते. सहकार कायद्यान्वये जमीन विक्रीसाठी किमान ५१ टक्के सभासद उपस्थित असणे व सहमती आवश्यक असते.वास्तविकपणे सभासदच प्रत्यक्ष उपस्थित नव्हते त्यामुळे शंका आली आणि आम्ही संबंधित सभा ठराव प्रोसीडिंग व उपस्थित सभासदांचे कागदपत्रांची माहिती अधिकारात शासनाच्या सहकार विभागातून माहिती मागितली ती नुकतीच प्राप्त झाली सदरील माहितीची खातरजमा केली असता मयत सभासद जिवंत असल्याचे भासवून त्यांच्या उपस्थितीच्या खोट्या सह्या व कागदपत्रे बनाव उघडकीस आला, गैरअर्जदार यांची कृती बेकायदेशीर, गुन्हेगारी स्वरुपाची, विश्वासघातकी असून पदाचा दुरुपयोग करुन गैरकृत्य केल्याने त्याबाबत पुराव्यासह रीतसर फिर्याद देऊन कारवाई करण्याबाबत निवेदन देखील देण्यात आले आहे.
यशवंत सहकारी साखर कारखाना मर्या. चिंतामणीनगर, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे. या संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. सुभाष जगताप यांनी व पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक त्यांचे बंधु यांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून दोन्हीही संस्थांच्या संचालक मंडळाला आर्थिक लाभाचे आमिषाने आपापसात संगनमत करुन संस्थेच्या मालकीची ९९.२७ एकर जमिनीची कवडीमोल दराने विक्री करून त्यातून आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजन केले व बेकायदेशीर पणे कामकाज करुन खोटे प्रोसीडिंग करुन मिळकत विक्री व नामांतर आदि ठराव गोंधळ घालून आवाजी मताने मंजूर झाल्याचा खोटा बनाव करुन गैरप्रकार केलेला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ व यशवंत सहकारी साखर कारखाना मर्या. संचालक मंडळ एका कुटुंबातील व परिवारातील असून एकमेकांचे नजीकचे नातेसंबंधातून व्यावसायिक आर्थिक लाभ प्राप्त करण्याच्या दुष्ट हेतूने संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करुन गैरप्रकार करून अपराध केलेला आहे.
गणसंख्या पूर्ण झाल्याशिवाय सभेचे कामकाज कायदेशीर मानले जात नाही यामुळे गणसंख्या पूर्तता कागदोपत्री दर्शविण्यासाठी संबंधितांनी आपापसात संगनमत करुन पूर्व नियोजित गुन्हेगारी स्वरुपाच्या कट रचून बनावट दस्तएवज तयार करण्यात आले. प्रत्यक्षात सभेला अत्यल्प सभासद उपस्थित होते त्यांच्या विरोधाला न जुमानता ठराव मंजूर झाल्याचे खोटे घोषित करुन नियमाप्रमाणे कामकाज पार पाडले असे भासविण्यात आले. गणसंख्या पूर्तता झाल्याचे भासविले आणि त्यासाठी सभेला उपस्थित राहिलेल्या सभासदांची नाव व सह्या असलेले कागदपत्रे बनावट खोटी तयार करुन ती संबंधित शासकीय कार्यालयात खरी असल्याचे भासवून तमाम सभासद व सरकारची घोर फसवणूक केलेली आहे. संबंधितांनी दिनांक २६/०२/२०२५ रोजीच्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेला मयत सभासद उपस्थित असल्याचे दर्शवून त्यांची उपस्थितीबाबत खोटी सही देखील करुन बनावट कागदपत्रे तयार केलेली आहेत. यामध्ये अनेक सभासद काही वर्षांपूर्वीच मयत झालेले असूनही सभेला हजर राहिल्याचा बनाव संबंधितांनी केलेला आहे. तसेच सभासद सभेला हजर असल्याचे भासवून बहुतांश व्यक्ति बोगस व बनावट नाव धारण करुन त्यांच्या खोट्या सह्या करुन सभेला हजर राहिल्याचा बनाव संबंधितांनी केलेला आहे. उपस्थितांमध्ये सभासद नाहीत अशा बनावट व्यक्ति सभासद असल्याचे भासविलेले आहे. बहुतांश सभासद सभेला हजर असल्याचे केवळ नाव नमूद करुन खोटे दर्शविलेले आहे मात्र त्यांच्या उपस्थितीबाबत सह्या देखील नमूद नाहीत. संबंधित सभासद सभेला उपस्थित नसताना ते हजर होते असेही दर्शविण्यात आलेले आहे.
संबंधितांनी आपापसात संगनमत करुन पूर्व नियोजित गुन्हेगारी स्वरुपाच्या कट रचून सभासदांची बहुसंख्येने मान्यता असल्याचे खोटे भासवून बनावट दस्तएवज तयार शासनास व पणन संचालक आणि साखर आयुक्त, सहकार आयुक्त यांना सदरील खोटे व बनावट कागदपत्रे खरी व सत्य असल्याचे भासवून शासनाची व सभासदांची फसवणूक केलेली आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्याची २२४ एकर पैकी ९९.२७ एकर जागा शासकीय मूल्यांकन ५१२ कोटी रु. असताना केवळ २९९ कोटींना विक्री करण्याचा निर्णय करुन सभासदांचे २११ कोटींचे आर्थिक नुकसान संबंधितांनी केलेले आहे. तसेच सदरील व्यवहारास पणन मंडळाची लेखी परवानगी नसताना संबंधितांनी आपापसात संगनमत करुन ३६ कोटी ५० लाख रु. परस्पर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या बँक खात्यातून यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या खात्यात वर्ग केले व सदरील रक्कम संबंधितांनी थकीत कर्जदार बँकांना दिल्याचे भासविले तर अन्य रक्कमेचा परस्पर अपहार केलेला आहे. संबंधितांनी विक्री व्यवहाराचा कोणताही अधिकृत नोंदणी अधिनियमन्वये दस्त नोंदणी टाळून शासनाचा मुद्रांक शुल्क देखील बुडविलेलाअसून कृषि उत्पन्न बाजार समितीच्या दप्तरी समझोता ज्ञापनपत्र नामक नोटरी बनावट दस्त ऐवज तयार करुन ३६ कोटी ५० लाख रु. अपहार, फसवणूक केलेली आहे. अशाप्रकारे सभासदांचे व सरकारचे आर्थिक नुकसान करुन फसवणूक केलेली आहे.
संबंधितांनी दिनांक २६/०२/२०२५ रोजीच्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेला मयत सभासद उपस्थित असल्याचे दर्शवून त्यांची उपस्थितीबाबत खोटी व बनावट सही केलेली आहे. उपस्थिती यादी पान क्र. २८ वरील अनुक्रमांक २० वर किशोर गुलाबराव साळुंखे यांचे नाव नमूद करुन त्यांच्या नावापुढे उपस्थितीबाबत खोटी व बनावट सही केलेली आहे. वास्तविक किशोर गुलाबराव साळुंखे रा. गट ३२ वाघोली रोड, मांजरी, ता. हवेली, जि. पुणे यांचे निधन दिनांक २०/०३/२०२२ रोजी झालेले असून त्यांच्या निधनाला ३ वर्ष झालेले माहीत असतानाही ते जिवंत असल्याचे भासवून त्यांच्या नावाचा दुरुपयोग करुन सभेला उपस्थित असल्याचे मयत व्यक्तीचे नाव नमूद त्यांच्या नावापुढे उपस्थितीबाबत खोटी व बनावट सही करुन फसवणूक केलेली आहे. संबंधितांनी आपापसात संगनमताने स्वतःच्या आर्थिक लाभासाठी मयत व्यक्तीच्या नावाचा दुरुपयोग करुन बनावट कागदपत्रे तयार करुन गैरप्रकार करून अपराध केलेला आहे. कै. किशोर गुलाबराव साळुंखे यांचा सभासद क्र. २१९६१ असा असून मतदार यादी गट क्र.५ पान क्र. ५१ वरील अनुक्रमांक १५८२६ असा आहे.
संबंधितांनी दिनांक २६/०२/२०२५ रोजीच्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेला मयत सभासद उपस्थित असल्याचे दर्शवून त्यांची उपस्थितीबाबत खोटी व बनावट सही केलेली आहे. उपस्थिती यादी पान क्र. २१ वरील अनुक्रमांक ३५ वर राणू गणपत चौधरी यांचे नाव नमूद करुन त्यांच्या नावापुढे उपस्थितीबाबत खोटी व बनावट सही केलेली आहे. वास्तविक राणू गणपत चौधरी रा. नायगाव ता. हवेली, जि. पुणे यांचे निधन दिनांक १८/०६/२०१९ रोजी झालेले असून त्यांच्या निधनाला ५ वर्ष झालेले माहीत असतानाही ते जिवंत असल्याचे भासवून त्यांच्या नावाचा दुरुपयोग करुन सभेला उपस्थित असल्याचे मयत व्यक्तीचे नाव नमूद त्यांच्या नावापुढे उपस्थितीबाबत खोटी व बनावट सही करुन फसवणूक केलेली आहे. संबंधितांनी आपापसात संगनमताने स्वतःच्या आर्थिक लाभासाठी मयत व्यक्तीच्या नावाचा दुरुपयोग करुन बनावट कागदपत्रे तयार करुन गैरप्रकार करून अपराध केलेला आहे. कै. राणू गणपत चौधरी यांचा सभासद क्र. ११७३७ असा असून मतदार यादी गट क्र.२ पान क्र. २७ वरील अनुक्रमांक ४३९९असा आहे.
संबंधितांनी दिनांक २६/०२/२०२५ रोजीच्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेला मयत सभासद उपस्थित असल्याचे दर्शवून त्यांची उपस्थितीबाबत खोटी व बनावट सही केलेली आहे. उपस्थिती यादी पान क्र. २८ वरील अनुक्रमांक १५ वर पांडुरंग देवराम आव्हाळे यांचे नाव नमूद करुन त्यांच्या नावापुढे उपस्थितीबाबत खोटी व बनावट सही केलेली आहे. वास्तविक पांडुरंग देवराम आव्हाळे रा. मांजरी खुर्द ता. हवेली, जि. पुणे यांचे निधन दिनांक ३०/०५/२०१४ रोजी झालेले असून त्यांच्या निधनाला ११ वर्ष झालेले माहीत असतानाही ते जिवंत असल्याचे भासवून त्यांच्या नावाचा दुरुपयोग करुन सभेला उपस्थित असल्याचे मयत व्यक्तीचे नाव नमूद त्यांच्या नावापुढे उपस्थितीबाबत खोटी व बनावट सही करुन फसवणूक केलेली आहे. संबंधितांनी आपापसात संगनमताने स्वतःच्या आर्थिक लाभासाठी मयत व्यक्तीच्या नावाचा दुरुपयोग करुन बनावट कागदपत्रे तयार करुन गैरप्रकार करून अपराध केलेला आहे. कै. पांडुरंग देवराम आव्हाळे यांचा सभासद क्र. २२५० असा असून मतदार यादी गट क्र.५ पान क्र. ४३ वरील अनुक्रमांक १५४४७ असा आहे.
संबंधितांनी दिनांक २६/०२/२०२५ रोजीच्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेला मयत सभासद उपस्थित असल्याचे दर्शवून त्यांची उपस्थितीबाबत खोटी व बनावट सही केलेली आहे. उपस्थिती यादी पान क्र. ३४ वरील अनुक्रमांक ८७ वर तानाजी शंकर कोतवाल यांचे नाव नमूद करुन त्यांच्या नावापुढे उपस्थितीबाबत खोटी व बनावट सही केलेली आहे. वास्तविक तानाजी शंकर कोतवाल रा. हिंगणगाव, गावठाण, ता. हवेली, जि. पुणे यांचे निधन दिनांक ०३/११/२०२३ रोजी झालेले असून त्यांच्या निधनाला २ वर्ष झालेले माहीत असतानाही ते जिवंत असल्याचे भासवून त्यांच्या नावाचा दुरुपयोग करुन सभेला उपस्थित असल्याचे मयत व्यक्तीचे नाव नमूद त्यांच्या नावापुढे उपस्थितीबाबत खोटी व बनावट सही करुन फसवणूक केलेली आहे. संबंधितांनी आपापसात संगनमताने स्वतःच्या आर्थिक लाभासाठी मयत व्यक्तीच्या नावाचा दुरुपयोग करुन बनावट कागदपत्रे तयार करुन गैरप्रकार करून अपराध केलेला आहे. कै. तानाजी शंकर कोतवाल यांचा सभासद क्र. ७१५५ असा असून मतदार यादी गट क्र.६ पान क्र. ३१ वरील अनुक्रमांक १८६६३ असा आहे.
संबंधितांनी दिनांक २६/०२/२०२५ रोजीच्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेला मयत सभासद उपस्थित असल्याचे दर्शवून त्यांची उपस्थितीबाबत खोटी व बनावट सही केलेली आहे. उपस्थिती यादी पान क्र. २३ वरील अनुक्रमांक १९ वर बाळासाहेब गजानन कोतवाल यांचे नाव नमूद करुन त्यांच्या नावापुढे उपस्थितीबाबत खोटी व बनावट सही केलेली आहे. वास्तविक बाळासाहेब गजानन कोतवाल रा. अष्टापुर, माळवाडी, ता. हवेली, जि. पुणे यांचे निधन दिनांक १८/०४/२०२१ रोजी झालेले असून त्यांच्या निधनाला ४ वर्ष झालेले माहीत असतानाही ते जिवंत असल्याचे भासवून त्यांच्या नावाचा दुरुपयोग करुन सभेला उपस्थित असल्याचे मयत व्यक्तीचे नाव नमूद त्यांच्या नावापुढे उपस्थितीबाबत खोटी व बनावट सही करुन फसवणूक केलेली आहे. संबंधितांनी आपापसात संगनमताने स्वतःच्या आर्थिक लाभासाठी मयत व्यक्तीच्या नावाचा दुरुपयोग करुन बनावट कागदपत्रे तयार करुन गैरप्रकार करून अपराध केलेला आहे. कै. बाळासाहेब गजानन कोतवाल यांचा सभासद क्र. १२९५८ असा असून मतदार यादी गट क्र.६ पान क्र. ०७ वरील अनुक्रमांक १७४७२ असा आहे.
संबंधितांनी दिनांक २६/०२/२०२५ रोजीच्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेला मयत सभासद उपस्थित असल्याचे दर्शवून त्यांची उपस्थितीबाबत खोटी व बनावट सही केलेली आहे. उपस्थिती यादी पान क्र. ३४ वरील अनुक्रमांक ७५ वर अण्णासाहेब सोपान कोतवाल यांचे नाव नमूद करुन त्यांच्या नावापुढे उपस्थितीबाबत खोटी व बनावट सही केलेली आहे. वास्तविक अण्णासाहेब सोपान कोतवाल रा. अष्टापुर, माळवाडी, ता. हवेली, जि. पुणे यांचे निधन दिनांक ०२/१०/२०२२ रोजी झालेले असून त्यांच्या निधनाला ३ वर्ष झालेले माहीत असतानाही ते जिवंत असल्याचे भासवून त्यांच्या नावाचा दुरुपयोग करुन सभेला उपस्थित असल्याचे मयत व्यक्तीचे नाव नमूद त्यांच्या नावापुढे उपस्थितीबाबत खोटी व बनावट सही करुन फसवणूक केलेली आहे. संबंधितांनी आपापसात संगनमताने स्वतःच्या आर्थिक लाभासाठी मयत व्यक्तीच्या नावाचा दुरुपयोग करुन बनावट कागदपत्रे तयार करुन गैरप्रकार करून अपराध केलेला आहे. कै. अण्णासाहेब सोपान कोतवाल यांचा सभासद क्र. ६६९४ असा असून मतदार यादी गट क्र.६ पान क्र. ०६ वरील अनुक्रमांक १७४१३ असा आहे.
यशवंत सहकारी साखर कारखानाचे चेअरमन श्री. सुभाष चंद्रकांत जगताप आणि पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. प्रकाश चंद्रकांत जगताप हे दोघे सख्खे भाऊ असून अन्य पदाधिकारी देखील एकमेकांचे नातेसंबंधातील आहेत त्यामुळे आपापसात संगनमत करुन पूर्वनियोजित कट रचून सदरील गुन्हा केलेला आहे. यांच्यावर यापूर्वी देखील सहकार विभागाने चौकशीत दोषी ठरविलेले होते व आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवला आहे मात्र ठोस कारवाई झाली नसल्याने त्यांना कायद्याचा कोणताही धाक राहील नसल्यामुळे निर्ढावलेले असून बिनधास्तपणे अपहार, आर्थिक लुटीचे गुन्हे करीत आहेत. या संपूर्ण गैरव्यवहार कटात समितीचे सचिव हे प्रमुख सूत्रधार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सहमतीने सर्व बनावट कागदपत्रे तयार करुन अपराध केलेला आहे. संबंधित डॉ. धोंडकर राजाराम शिवराम हे शासकीय सहकार विभागातील सेवक असून उपनिबंधक,सहकारी संस्था तथा सचिव या पदावर पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीत अनेक वर्ष ठाण मांडून बसले आहेत. सहकार विभागात कार्यरत असल्याने ठराव, प्रोसीडिंग, मान्यता या बाबींसाठी कोणते व कितपत गणसंख्या लागते याचे ज्ञान असल्याने अन्य संबंधितांनी संगनमत करुन बनावट कागदपत्रे बनवून शासनाची व सभासदांची घोर फसवणूक व विश्वासघात केलेला आहे. सर्व बँकांचे कर्ज वन टाईम सेटलमेंट (ओटीएस) करुन फेडण्यात आले असे भासविण्यात येत असून प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्य बँकेच्या ताब्यात सर्व मालमत्ता असून त्यांनी अद्यापही जमीन विक्री व्यवहारास परवानगी अथवा ना हरकत दाखला दिलेला नाही अशी वस्तुस्थिती आहे. गैरअर्जदार यांनी संगनमत करुन बनावट अनोंदणीकृत समझोता ज्ञापनपत्र तयार करुन त्याच्या आधारे उचललेले ३६ कोटी ५० लाख रुपयांची परतफेडीच्या बाहण्याने अपहार, फसवणूक केलेली आहे.
यशवंत सहकारी साखर कारखानाचे चेअरमन श्री. सुभाष चंद्रकांत जगताप आणि पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. प्रकाश चंद्रकांत जगताप आणि पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. धोंडकर राजाराम शिवराम यांनी आपापसात संगनमत करुन एकमेकांच्या कार्यालयात जमीन विक्री बाबत प्रस्ताव सादर केल्याचे दर्शवून शासन निर्णयास अनुकूल बनावट कागदपत्रे बनवून ती खरी असल्याचे भासवून मा,. सहकार आयुक्त, मा. साखर आयुक्त आणि मा. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, यांना पाठवली व संबंधितांनी खरी व सत्य कागदपत्रे असल्याचे समजून २९/०५/२०२५ रोजी शासनास कळविले त्या आधारे शासनाने दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी शासन निर्णय क्र. ससाका-०४२५/प्र.क्र.९०/३ जारी केला त्यामध्ये सदरील जमीन विक्री करण्यास कारखान्याच्या दिनांक २६/०२/२०२५ आणि १७/०३/२०२५ रोजीच्या सभेत मान्यता देण्यात आली असे नमूद केलेले आहे. वास्तविक दिनांक २६/०२/२०२५ च्या सभा उपस्थिती व सह्या मयत संभासदांच्या नावाचा दुरुपयोग करुन बनावट प्रोसीडिंग कागदपत्रे तयार करुन ती खरी असल्याचे भासविले. शासन निर्णय अटी व शर्ती अधिन राहून निर्गमित केलेला असून त्याच्या अमलबाजवणीचे संचलन मा. मा. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे असून त्यांनी आजतागायत लेखी स्वरूपात जमीन विक्री व्यवहार पूर्तता करण्याचे परवानगी आदेश दिलेले नाहीत. अशी वस्तुस्थिती असताना शासन निर्णय झाला असे भासवून संबंधितांनी बनावट अनोंदणीकृत समझोता ज्ञापनपत्र तयार करुन त्याच्या आधारे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या खात्यातून यशवंत सहकारी साखर कारखानाचे खात्यात ३६ कोटी ५० लाख रु वर्ग करुन त्याचा अपहार केलेला आहे. डॉ. धोंडकर राजाराम शिवराम हे उपनिबंधक,सहकारी संस्था तथा सचिव या पदावर पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीत कार्यरत असून त्यांनी सदरील बनावट अनोंदणीकृत समझोता ज्ञापनपत्र मध्ये लिहून घेणार मध्ये जाणीवपूर्वक स्वतः चे नाव साक्षीदार म्हणून नमूद केलेले आहे. तर लिहून घेणार कृषि उत्पन्न बाजार समिती तर्फे पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. प्रकाश चंद्रकांत जगताप आणि समितीचे व्यापारी प्रतिनिधि संचालक सदस्य श्री.आबनावे नानासाहेब कोंडिबा तसेच श्री.घुले गणेश सोपानराव व श्री.भोसले अनिरुध्द अरुण (सदस्य) या ४ जणांचा लिहून घेणार म्हणून उल्लेख आहे. तर सदरील बनावट अनोंदणीकृत समझोता ज्ञापनपत्र मध्ये लिहून देणार मध्ये यशवंत सहकारी साखर कारखानाचे चेअरमन श्री. सुभाष चंद्रकांत जगताप आणि व्हाईस चेअरमन श्री. किशोर शंकर उंद्रे आणि प्र. कार्यकारी संचालक श्री. कैलास कारभारी जरे यांच्या नावांचा समावेश आहे. संबंधित लिहून देणार व घेणार या ७ जण आणि सचिव साक्षीदार या ८ जणांनी मिळून सदरील सामुहिक अपराध केलेला आहे. यशवंत सहकारी साखर कारखाना सद्यस्थितीत बंद अवस्थेत असून तो सभासदांच्या हितासाठी व लाभासाठी सुरु करण्यासाठी असलेले कर्ज परतफेड करणेकामी सभासदांच्या मालकी हक्कातील जमीन विक्री करण्याच्या बाहण्याने सदरील अपहार, घोटाळा, गैरव्यवहार करण्यात आलेला आहे अशी माहिती निवेदनात दिलेली आहे.
नामांकित सभासदांना लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करणार
कारखान्याचे एकूण सभासद २१ हजार १९६ इतके असून कारखाना कार्यक्षेत्र हवेली (९७ गावे), दौंड (१७ गावे), खेड (१५ गावे) आणि शिरूर (२० गावे) या तालुक्यांतील एकूण १४९ गावे असे आहे. या कारखान्याची नोंदणी १९ डिसेंबर १९६६ रोजी झालेली आहे. एकूण सभासद २१ हजार १९६ मुळ सभासदांपैकी बहुतांश मयत झालेले असून त्यांचे वारस नोंदी जाणीवपूर्वक केल्या जात नाहीत. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अनेक नामांकित व्यक्ति सभासद आहेत यामध्ये राज कपूर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील ५ सदस्य सभासद आहेत यामध्ये कृष्णा कपूर, रीमा कपूर (जैन), रणधीर व ऋषि कपूर यांचा समावेश आहे. स्वातंत्र्य सैनिक व पत्रकार प्रतापराव केशवराव जेधे, माजी खासदार व आमदार मोहोळ, मगर, तुपे, रामभाऊ मोझे, ढोलेपाटील तसेच अनेक उद्योजक कल्याणी, मेहता, शहा, जैन व अन्य कंपनी, संस्था, देवस्थान धर्मादाय संस्था देखील सभासद आहेत. पुणे विद्यार्थी गृह, संगम इस्टेट प्रा. कंपनी देखील सभासद आहेत. या सर्व नामांकित सभासद कुटुंबीयांना भ्रष्ट पदाधिकाऱ्यांच्या कारभाराच्या विरोधी लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन आम्ही करणार असून त्यांना भेटून सर्व कागदपत्रे देवून सहभागी करुन घेणार आहोत. असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
New Book
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक
================================================
"महाराष्ट्रातील राजकारण"
"महाराष्ट्रातील राजकारण"
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook
==================================================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.