Thursday, 12 April 2018

नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या सार्वत्रिक व पोट निवडणुका एप्रिल- 2018 निवडणूक निकाल; जामनेरच्या नगराध्यक्षपदी साधना महाजन;कणकवली-राणेंच्या स्वाभिमान पक्षाला बहुमत



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================


जळगावात जामनेरच्या नगराध्यक्षपदी साधना गिरीश महाजन



जळगावातील जामनेर नगरपालिकेवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी झेंडा फडकवला आहे. 25 पैकी 25 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून नगराध्यक्षपदासाठी गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन विजयी झाल्या आहेत.साधना महाजनांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंजना पवार निवडणुकीला उभ्या होत्या. मात्र साधना महाजन यांनी 8 हजार 300 मतांनी बाजी मारत अंजना यांचा दारुण पराभव केला.भाजपला यावेळी 25 जागांवर यश मिळालं असलं, तरी मागील पंचवार्षिक काळात सुरुवातीच्या पहिल्या अडीच वर्षांचा काळ हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या हाती राहिल्याने महाजन यांना मोठा संघर्ष करावा लागला होता.मागील अनुभव लक्षात घेता गिरीश महाजन यांनी आपल्या राजकीय शक्तीचा उपयोग करुन विजयश्री खेचून आणला. हा विजय गिरीश महाजन यांना जिल्ह्यातील आपली राजकीय पकड घट्ट करण्यास उपयोगी ठरणार आहे.

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

आजरामध्ये विकास आघाडी 

कोल्हापूरमधील आजरा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपप्रणित आजरा शहर विकास आघाडीने दणदणीत यश मिळविले आहे. या आघाडीने १७ पैकी ९ जागा जिंकत आजरा नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीला ५ जागांवर समाधान मानावं लागलं असून परिवर्तन आघाडी आणि अपक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. दरम्यान, आजराच्या पहिल्या नगराध्यक्षा होण्याचा मान ज्योत्सना चराटी यांना मिळण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसेंच्या मतदार संघात भाजपचा पराभव

सावदा नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार अल्लाबक्ष नजीर शेख विजयी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मतदार संघात भाजपचा पराभव झाला आहे.

====================================

कणकवली नगरपंचायत निवडणूक; नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाला बहुमत 


माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी कणकवली शहरावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने नगराध्यक्षपदासह  17 पैकी 11 जागांवर विजय मिळत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी भाजपाच्या संदेश पारकर यांना पराभवाचा धक्का दिला. भाजपा आणि शिवसेना आघाडीला केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले.   माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि शिवसेना-भाजपा युतीने सर्वस्व पणाला लावल्याने कणकवली नगरपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय जगताचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत 11 जागा जिंकत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने जोरदार मुसंडी मारली. मात्र नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची झाली. कणकवली शहरात बऱ्यापैकी वर्चस्व असलेले संदेश पारकर यांच्यासमोर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या समीर नलावडे यांनी कडवे आव्हान उभे केले होते. अखेर या निवडणुकीत नलावडे यांनी अवघ्या  37 मतांनी बाजी मारत पारकरांना पराभवाचा धक्का दिला. नारायण राणे यांच्यासाठी कणकवलीतील निवडणूक ही अस्तित्वाची लढाई होती आणि ती लढाई पुन्हा एकदा राणेंनी जिंकून त्यांच्या विरोधकांना धूळ चारली आहे. नारायण राणे हे भाजपाचे खासदार आहेत. असे असताना राणे यांनी कणकवलीत भाजपा विरोधातच दंड थोपटले होते. त्यामुळे राणे यांचा विजय होतो की भाजपाचा? हे पाहणे औत्सुक्याचे होते. कणकवली नगरपंचायत निवडणूक ही सिंधुदुर्गच्या राजकारणाची दिशा ठरविणारी होती. नारायण राणे यांना विरोध म्हणून शिवसेनेने येथे भाजपाशी युती केली होती. कणकवली नगरपंचायतीच्या १६ नगरसेवक पदांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी ६ एप्रिलला मतदान झाले. तर प्रभाग १० मध्ये बुधवार ११ एप्रिलला मतदान झाले होते. त्यानंतर गुरुवारी १२ एप्रिलला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. पहिल्या फेरीपासूनच स्वाभिमानने नगरसेवक निवडून आणण्यात मोठी आघाडी घेतली होती. यात पहिल्या फेरीत ६ पैकी ५ जागा स्वाभिमानने पटकावल्या.कणकवली नगरपंचायतीच्या १७ जांगापैकी स्वाभिमान पक्षाला सर्वाधिक १0 जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादीला १ जागा मिळाली. त्यामुळे स्वाभिमान-राष्ट्रवादीच्या आघाडीला ११ जागा मिळाल्या. त्यानंतर शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी ३ जागा मिळाल्या आहेत.

संदेश पारकर अवघ्या ३७ मतांनी पराभूत

नगराध्यक्ष पदासाठी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांचा स्वाभिमान-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार समीर नलावडे यांनी अवघ्या ३७ मतांनी पराभव केला. त्यामुळे कणकवली नगरपंचायतीची नगराध्यक्ष पदाची लढाई अपेक्षेप्रमाणे अत्यंत अटीतटीची झाली.

कणकवलीमधील प्रभागानुसार निकाल 

प्रभाग क्र. १ - कविता राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष ), 
प्रभाग क्र. २ - प्रतीक्षा सावंत (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष), 
प्रभाग क्र. ३ - अभिजित मुसळे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष), 
प्रभाग क्र. ४ - आबिद नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस),
प्रभाग क्र. ५ - मेघा गांगण (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष), 
प्रभाग क्र. ६ - सुमेधा अंधारी (भाजप) 
प्रभाग क्र. ७ - सुप्रिया समीर नलावडे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष), 
प्रभाग क्र. ८ - उर्मी योगेश जाधव (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष), 
प्रभाग क्र. ९ - मेघा सावंत (भाजप), 
प्रभाग क्र. १० -  माही परुळेकर (शिवसेना), 
प्रभाग क्र. ११ -  विराज भोसले (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष), 
प्रभाग क्र.१२ -  गणेश उर्फ बंडू हर्णे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)  
प्रभाग क्र. १३ - सुशांत नाईक (शिवसेना) 
 प्रभाग क्र. १४ -  रुपेश नार्वेकर (भाजप) 
प्रभाग क्र. १५ - मानसी मुंज (शिवसेना)
 प्रभाग क्र. १६ - संजय कामतेकर (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) 
प्रभाग क्र. १७ -  रवींद्र गायकवाड (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) 

=============================

देवरुख नगर पंचायतीत भाजपची बाजी

देवरुख नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मृणाल शेट्ये विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या स्मिता लाड, शिवसेनेच्या धनश्री बोरुकर यांचा पराभव केला. नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बोरुकर यांचा ११९ मतांनी पराभव करुन मृणाल शेटे यांचा विजय झाला. त्यांना २ हजार ४३५ मते मिळाली. शिवसेनेच्या बोरुकर यांना २ हजार ३१६ तर राष्ट्रवादीच्या स्मिता लाड यांना १ हजार ९८१ मते मिळाली.देवरूख नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजप-मनसे युतीने सर्वाधिक आठ जागांवर विजय मिळवला. यापैकी भाजपला 7 तर मनसेला 1 जागा मिळाली. यापूर्वी वैभवी पर्शराम या बिनविरोध अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. अपक्ष नगरसेवक आपल्या सोबत घेऊन बहुमताचा आकडा गाठू शकते.
रत्नागिरी - देवरुख नगरपंचायत निवडणूक. एकुण जागा 17, जाहीर निकाल -१२, भाजप ४, मनसे १, शिवसेना ३, राष्ट्रवादी ३, काँग्रेस १.

विजयी उमेदवार

भाजप : वैभव कदम, धनश्री आंबेकर, आश्विनी पाताडे, ऱेश्मा किर्वे, संतोष केदारी, सुशांत मुळ्ये, राजेंद्र गवंडी 
शिवसेना : प्रकाश मोरे, वैभव पवार, निदा कापडी, अनुष्का टिळेकर
राष्ट्रवादी : उल्हास नलावडे, प्रफुल्ल भुवड, प्रेरणा पुसाळकर 
काँगेस : प्रतिक्षा वणकुद्रे 
मनसे : सान्वी संसारे 
अपक्ष : वैभवी पर्शराम (बिनविरोध)
==============================

गुहागरमध्ये सत्तांतर; आमदार भास्करराव जाधव यांना धक्का


रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर नगरपंचायतीत शहरविकास आघाडीने १७ पैकी ०९ जागा जिंकत बहुमत मिळवले.शहरविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेश बेंडल विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे दीपक कनगुटकर, भाजपचे रविंद्र  बागाकर  यांचा पराभव केला. यामुळे आमदार भास्करराव जाधव यांना धक्का बसला आहे.गुहागर नगरपंचायतीत १७ जागांसाठी निवडणुक घेण्यात आली. यात शहर विकास आघाडीच्या ०९, भाजपच्या ०६ उमेदवारांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले.  राष्ट्रवादी ०१ आणि शिवसेनेच्या १ उमेदवारांनी विजय मिळवला.
 गुहागर नगरपंचायत निवडणुक - एकुण जागा -17, जाहीर निकाल -12, भाजप - 05, राष्ट्रवादी- 01, शहर विकास आघाडी- 05, शिवसेना - 01

गुहागर  नगरपंचायतीचे विजयी उमेदवार 

शहर विकास आघाडी : नेहा सांगळे, मनाली सांगळे, वैशाली मालप, माधव साटले, प्रणित साटले, स्नेहल देवाळे, अमोल गोयथळे, प्रसाद बोले, स्नेहा भागडे
भाजप : उमेश भोसले, समीर घाणेकर , गजानन वेल्हाळ, अरुण रहाटे, भाग्यलक्ष्मी कानडे,  मृणाल गोयथळे
राष्ट्रवादी : सुजाता बागकर
शिवसेना : नीलिमा गुरव

===============================

वैजापुरात नगराध्यक्षपदी भाजपच्या शिल्पा परदेशी

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या नगर पालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत शिवसेनेला धूळ चारली. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिल्पा दिनेश परदेशी यांनी शिवसेनेचे उमेदवार ताशफा अजहर अली यांचा २०७३ मतांनी पराभव केला. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार शिल्पा परदेशी यांना ( १३९४६) तर शिवसेनेचे पराभूत उमेदवार सय्यद ताशफा अजहर अली यांना ( ११८७३) मते मिळाले. शिवाय भाजप, राष्ट्रवादी आघाडीचे २३ पैकी ९ नगरसेवकही भाजपचेच विजयी झाले. शिवसेना १३, कॉंग्रेसला केवळ १ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी व एमआयएमला या निवडणुकीत खाता ही उघडता आले नाही. नगर पालिकेसाठी ६ एप्रिल शुक्रवारी मतदान झाले. गुरुवार (दि.१२) सकाळी पंचायत समिती कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी दिड वाजेपर्यंत सर्व निकाल हाती आले.

नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार पक्ष व मिळालेले मतदान

१) शिल्पा दिनेश परदेशी ( भाजप) - १३९४६ विजयी

नगरसेवक पदाचे विजयी उमेदवार पक्ष व मिळालेले मतदान

१) सखाहरी लक्ष्मण बर्डे ( शिवसेना ) - ११२९
२) द्वारख़ाबाई  घाटे ( शिवसेना ) - १०२८
३) नंदाबाई त्रिभुवन ( शिवसेना ) -१४८८
४)शेख रियाज अकील  ( शिवसेना ) - १६१०
५) स्वपनिल जेजुरकर  ( शिवसेना ) - ११९०
६) अनीता तांबे ( भाजप ) - ११४५
७) शोभा विलास भुजबळ ( भाजप ) - १३३७
८) निलेश भाटिया ( शिवसेना ) - १३८३
९) सुप्रिया विनायक व्यवहारे ( शिवसेना) - १८४२
१०) साबेर खान ( शिवसेना ) - १८२६
११) शेख इम्रान रशीद (शिवसेना ) - ११६४
१२) ज्योती टेके (शिवसेना) - १४२५
१३) भोपळे प्रिती ( शिवसेना ) - १७१३
१४) शैलेश चव्हाण ( भाजपा) - १४९९
१५) गणेश खेरे ( भाजपा ) - १०८०
१६)लताबाई मगर ( भाजपा ) - ८७६
१७) मुमताजबी बिलाल ( शिवसेना ) - ८१७
१८) प्रकाश चव्हाण ( शिवसेना ) - ९२७
१९) माधुरी दशरत बनकर ( भाजप) - १३९६
२०) उल्हास ठोंबरे ( कॉंग्रेस) - १२५४
२१) संगीता गायकवाड़ ( भाजपा ) - २०७८
२२) दशरत बनकर ( भाजपा ) - १९८६
२३) जयश्री राजपूत ( भाजप) -१८०१
=============================================

रत्नागिरी - नगरपरिषद पोटनिवडणूक प्रभाग क्र. 03 मध्ये शिवसेनेचे राजन शेट्ये विजयी. त्यांना 986 मते तर वसंत पाटील (भाजप) यांना 797 मते.

तासगाव: येथील नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत प्रभाग 6 मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार सादीया शेख 180 मतांनी विजयी. भाजपला जोरदार धक्का. भाजपच्या पुरस्कृत उमेदवार तायरा मुजावर पराभूत. शेख याना 930 तर मुजावर यांना 750 मते.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) pune

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.