मनपा पोटनिवडणूक: सर्व पक्षांनी गड राखले ; भाजप तिसऱ्या क्रमांकावर
राज्यातील सहा महापालिकांतील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून सर्वच पक्षांनी आपापल्या जागा राखल्या आहेत. मुंबई, नाशिकमधील गड अनुक्रमे शिवसेना, मनसेनं राखले. सोलापूर, नगरमध्ये काँग्रेसनं तर, पुणे, उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीनं विजय मिळवत आपली ताकद कायम असल्याचं दाखवून दिलं. प्रतिस्पर्धी पक्षांच्या जागा खेचून घेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या भाजपच्या हाती काहीच लागले नाही. महानगरपालिकांमधील 6 रिक्तपदासांठी 45.54 मतदान ; ‘बृहन्मुंबई’त 40 टक्के मतदान झाले होते. महानगरपालिकानिहाय पोटनिवडणुकीत झालेले मतदान (कंसात प्रभाग क्र): बृहन्मुंबई (173)- 40.09, नाशिक (13-क)- 39.71, सोलापूर (14-क)- 45.60, पुणे- (22-क) 35, अहमदनगर- (32-ब)- 74.56 आणि उल्हासनगर (17-ब)- 38.30.
बृहन्मुंबई- 173 पोटनिवडणुकीत सेनाच
शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे - 6616 मतेकॉंग्रेसकडून लढलेल्या सुनील शेट्टी - 5771 मते
भारीप बहूजन महासंघाचे गौतम झेंडे -549 मते
नोटा - 234
(शिवसेनेचे उमेदवार 845 मतांनी विजयी)
मुंबईत प्रतीक्षानगर, शीव येथील प्रभाग क्र. १७३ मध्ये शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे ८४५ मतांनी निवडून आले. प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे सुनील शेट्ये यांना ५,७७१ मते मिळाली, तर कांबळे यांना ६,६१६ मतं मिळाली. शिवसेनेचे प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. येथे भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
नाशिक- 13-क पोटनिवडणुकीत मनसे
मनसेच्या अॅड. वैशाली भोसले - 7453 मतेशिवसेनेच्या डॉ. स्नेहल चव्हाण - 5231 मते
भाजपच्या विजया लोणारी - 4810 मते
(महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अॅड. वैशाली भोसले 2322 मतांनी विजयी)
नाशिक महानगरपालिका पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवार अॅड. वैशाली भोसले विजयी झाल्या आहेत. भोसले यांना ७,४९० मते मिळाली. येथे शिवसेना दुसऱ्या तर, सत्ताधारी भाजप तिसऱ्या स्थानावर गेली.
सोलापूर- 14-क पोटनिवडणुकीत काँग्रेस
उमेदवार व त्यांना मिळालेली मतेकॉंग्रेस - तौफिक हत्तुरे - 4944
एमआयएम - पीरअहमद शेख - 3340
भाजप - रणजीतसिंह दवेवाले - 1921
शिवसेना - बापू ढगे - 853
माकप - नलिनी कलबुर्गी - 1169
हिंदुस्थान जनता पार्टी - गौस कुरेशी- 30
अपक्ष - वसीम सालार - 499
राष्ट्रवादी - सद्दाम शाब्दी - 900
अपक्ष - कय्युम सिद्दीकी- 15
नोटा - 51
(कॉंग्रेसचे तौफीक हत्तुरे ४३६१ मतांनी विजयी)
सोलापूरमध्ये काँग्रेसचे नगरसेवक रफिक हत्तुरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. ही जागा काँग्रेसनं पुन्हा पटकावली. इथं काँग्रेसचे तौफिक हत्तुरे ४,९४४ मते घेऊन निवडून आले. एमआयएमचे पीर अहमद शेख यांना ३,३४० मते मिळाली. एमआयएमने ही जागा जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, ते निष्फळ ठरले.
पुणे- 22-क पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी
राष्ट्रवादीच्या पूजा कोदे - 8991 मतेशिवसेनेच्या मोनिका तुपें - 5479 मते
भाजपच्या सुकन्या गायकवाड - 4334 मते (2017 च्या निवडणुकीत- 11,400 मते मिळाली होती)
अहमदनगर- 32-ब पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी
अहमदनगरमध्ये केडगाव वॉर्ड क्र.३२ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे विशाल कोतकर विजयी झालेत. काँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकर यांना खूनप्रकरणी जन्मठेप झाल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. त्यांच्या रिक्त जागेसाठी ही निवडणूक झाली.
उल्हासनगर- 17-ब उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी ; भाजपचा निसटता पराभव
उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन सचदेव विजयी झाल्या आहेत. त्यांना २,६९० मते मिळाली तर भाजपच्या उमेदवार साक्षी पमनानी यांना २,४८७ मते मिळाली. उल्हासनगर मनपाच्या १७ ब या पॅनलमधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका पूजा कोर लबाना यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळं त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. त्या जागेवर ही पोटनिवडणूक झाली.====================00===================
महापालिकेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा कोद्रे विजयी
माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या मुंढवा मगरपट्टा सिटी 22 क प्रभागातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा समीर कोद्रे या तब्बल 3251 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना 8991 मते पडलीत. तर 5470 मते मिळवित दुस-या क्रमांकावर शिवसेनेच्या मोनीका तुपे आहेत तर सत्ताधारी भाजपच्या सुकन्या गायकवाड या तिस-या क्रमांकावर आहेत. त्यांना एकूण 4334 मते मिळाली आहेत.
माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी काल (6 एप्रिल) मतदान झाले होते. यामध्ये 35 टक्के मतदान झाले होते. विजयी उमेदवार पूजा समीर कोद्रे या दिवंगत चंचला कोद्रे यांच्या जाऊबाई आहेत. या निवडणुकीसाठी भाजपकडून सुकन्या गायकवाड आणि शिवसेनेने मोनिका तुपे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या धोरणानुसार ही पोटनिवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मुंढवा, मगरपट्टासिटी, माळवाडी, आकाशवाणी, 15 नंबर, लक्ष्मी कॉलनी असा भाग असलेल्या या प्रभागात 29 हजार 278 पुरुष आणि 26 हजार 436 महिला, असे एकूण 55 हजार 714 मतदार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू होते परंतु ते असफल झाले होते.
=============================================================
मुंबई पालिकेत शिवसेनेचे संख्याबळ वाढले; रामदास कांबळे विजयी
मुंबई महापालिकेच्या प्रतिक्षा नगर पोटनिवडणुकीत अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे विजयी झाले आहे. सायन प्रतीक्षा नगर इथल्या या विजयाने शिवसेनेचे महापालिकेतील संख्याबळ वाढले आहे. प्रतीक्षा नगर पोटनिवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे यांना 6616 मते मिळाली तर विरूध्द कॉंग्रेसकडून लढलेल्या सुनील शेट्टी यांना 5771 मते मिळाली. भारीप बहूजन महासंघाचे गौतम झेंडे यांना 549 मते मिळाली तर 234 मते नोटाला देण्यात आली. शिवसेनेचे उमेदवार 845 मतांनी विजयी झाले आहेत. हा विभाग गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा गड राहिल्यामुळे यावेळी शिवसेनेचा एकतर्फी विजय होणार असल्याचे भाकित खरे ठरले. शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनामुळे या प्रभागात पोटनिवडणूक घेण्यात आली. मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामामध्ये शिवसेनेला 84, भाजपला 82, कॉंग्रेसला 31, राष्ट्रवादी कॉंग्रेसला 9, मनसेला 7 आणि इतरांना 14 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर मनसेच्या 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यांने शिवसेनेचे संख्याबळ 90 झाले होते. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने शिवसेना-भाजप दोन्ही पक्षात सत्तेसाठी नवा संघर्ष सुरु होता. या पोटनिवडणुकीच्या विजयाने शिवसेनेचा उत्साह चांगलाच वाढणार आहे.
=============================================================
नाशिकच्या पोटनिवडणुकीत मनसेच्या भोसले विजयी
भाजप, शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या प्रभाग प्रभाग 13-क च्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऍड. वैशाली भोसले 2322 मतांनी विजयी झाल्या. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा त्यांना पाठींबा होता. विशेष म्हणजे यामध्ये सत्ताधारी भाजपच्या उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसची खेळी यशस्वी ठरली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गटनेत्या सुरेखा भोसले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभागाच्या या निवडणुकीत मनसेच्या ऍड भोसले यांना 7453 मते मिळाली. शिवसेनेच्या डॉ. स्नेहल चव्हाण यांना 5231 मते मिळाली. भाजपच्या विजया लोणारी 4810 मते मिळवुन तिसऱ्या स्थानावर राहिल्या. त्यामुळे भाजप व शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. मात्र आमदार देवयानी फरांदे यांच्या मतदारसंघातील व महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपला हा मोठा धक्का मानला जातो. या निवडणुकीसाठी दोन्ही कॉंग्रेसने उमेदवार दिला नव्हता. यावेळी कॉंग्रसचे नगरसेवक शाहु खैरे, राष्ट्रवादी कॉंग्रसचे नगरसेवक गजानन शेलार आणि अन्य कार्यकर्त्यांनी त्यात मनसेला मनापासुन साथ दिली. या दोन्ही पक्षांचे दोन बंडखोर उमेदवार होत्या. मात्र दोन्ही कॉंग्रेसने खेळी करुन भाजपला रोखण्यात यशस्वी झाले. त्यामुळे मनसेच्या या विजयाला राजकीयदृष्ट्या महत्व आहे. या निवडणुकीत 39.71 टक्के मतदान झाले होते. एकुण आठ उमेदवार होते. सकाळी आठला दादोजी कोंडदेव सभागृहात मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत शिवसेनेच्या चव्हाण यांनी 322 मतांनी आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या फेरीला मनसेच्या भोसले तर तिसऱ्या फेरीला भाजपच्या लोणारी पुढे होत्या. मात्र त्यानंतर मनसेने आघाडी घेत ती कायम राखली.
=============================================================
अहमदनगर महापालिका पोटनिवडणूक : काँग्रेसने गड राखला, भाजपचे डिपॉझिट जप्त
अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगावमधील प्रभाग क्रमांक ३२ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमदेवार विशाल कोतकर साडेचारशे मतांनी विजयी झाले आहेत. या पोटनिवडणुकीत शिवेसना व काँग्रेसमध्ये जोरदार चुरस पहायला मिळाली. चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसने गड राखला तर भाजपाला डिपॉझिटही वाचवता आले नाही. काँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर शुक्रवारी (दि. ६) मतदान घेण्यात आले. एकूण ७ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. ५ हजार ९४४ मतदारांपैकी ४ हजार ४३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. सायंकाळपर्यंत ७५ टक्के मतदान झाले होते. मतमोजणी सुरुवातील शिवसेनेचे विजय पठारे यांनी आघाडी घेतली होती. नंतर काँग्रेसचे विशाल कोतकर यांनी पठारे यांनी निर्णायक आघाडी घेतली. विशाल कोतकर यांची ५०० मतांची आघाडी झाल्यानंतर काँग्रेसच्या गटात उत्साहाचे उधाण आले. ही आघाडी कायम राखत विशाल कोतकर यांनी ४५६ मतांनी विजय मिळविला. शिवसेनेच्या विजय पठारे यांनी घेतले १८८६ मते तर भाजपचे महेश सोले यांना अवघी १५६ मते मिळाली. भाजपाची अनामत रक्कम जमा झाली.
नगरमध्ये शिवसेनेच्या २ पदाधिकाऱ्यांची हत्या
अहमदनगर महानगरपालिका पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर झाल्यानंतर केडगावमध्ये गोळीबार आणि कोयत्यानं वार करून दोघांची हत्या करण्यात आली. दोघेही शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आहेत. संजय कोतकर आणि वसंत ठुबे अशी त्यांची नावे आहेत. शाहूनगर परिसरात त्यांच्यावर आधी गोळ्या झाडण्यात आल्या आणि नंतर कोयत्याने वारही करण्यात आले. धक्कादायक म्हणजे त्यांचे मृतदेह बराच वेळ रस्त्यावर होते. महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे विशाल कोतकर विजयी झाले. विजयनांतर केडगावमध्ये जल्लोष करण्यात आला. विशाल हे माजी महापौर आणि अशोक लांडे खून प्रकरणात शिक्षा झालेले संदीप कोतकर यांचे भाऊ आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. या निवडणूक वादातूनच संध्याकाळी दोघांची हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, काही जणांनी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांचा वाहनावरून पाठलाग केला. त्यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या आणि नंतर कोयत्याने वार करण्यात आले. यात दोघेही ठार झाले. दोघांचे मृतदेह बराच काळ रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. दहशतीमुळे कोणीही पुढे येण्यास तयार नव्हते. काही वेळाने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि शिवसेनेचे अन्य पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले.काय आहे प्रकरण?
बिहारलाही लाजवेल असा प्रकार अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान घडला. राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे शनिवारी सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले.या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी 7 एप्रिलला हे हत्याकांड झालं.
कोणत्या पक्षाचा कोण आमदार, कुणाचा कोण नातेवाईक?
संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर त्यांचे वडील अरुण जगताप राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर आमदार आहेत. संग्राम यांचे सासरे शिवाजी कर्डिले भाजपचे आमदार आहेत. कर्डिले यांची कन्या आमदार संग्राम यांची पत्नी आहे, तर कर्डिलेंची दुसरी कन्या सुवर्णा या माजी उपमहापौर असून माजी महापौर संदीप कोतकर यांची पत्नी आहेत. कोतकर यांची कन्या आमदार अरुण जगताप यांची सून आहे.राजकारण अबाधित ठेवण्यासाठी हाडवैर असलेल्या तिघांनी सोयरीक केली, मात्र राजकारणमुळे अशोक लांडे हत्येनंतर पुन्हा हे संकटात सापडले आहेत. लांडे हत्या प्रकरणी कर्डिले यांनीही तुरुंगवास भोगला आहे.
एसपी कार्यालयातील तोडफोड प्रकरणी गुन्हे
भाजप आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिजीत कळमकर, आमदार संग्राम जगताप यांचे भाऊ, झेडपी सदस्य सचिन जगताप, नगरसेवक कैलास गिरवले यांच्यासह चार नगरसेवक आणि अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर एसपी कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
=============================================================
सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने राखला गड
महापालिका प्रभाग 14 क च्या पोटनिवडणुकीत परंपरागत प्रतिस्पर्धी एमआयएमचे पीर अहंमद शेख यांचा पराभव करीत कॉंग्रेसचे तौफीक हत्तुरे यांनी विजय मिळवत काँग्रेसचा गड राखला. हत्तुरे यांना ४३६१ मते मिळाली. तर पीर अहमद शेख ३३४० मते मिळाली. काँग्रेसचे नगरसेवक रफीक हत्तुरे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. कॉंग्रेसने त्यांचे बंधू तौफीक यांनाच उमेदवारी दिली. दिवंगत हत्तुरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तौफीक यांना निवडून देणे आवश्यक आहे, असे भावनात्मक आव्हान करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांनी श्री हत्तुरे यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या होत्या. एकूणच एमआयआमचा बालेकिल्ला झालेल्या या प्रभागात आपला "गड' राखण्यात यश मिळवले. श्री. हत्तुरे यांच्या विजयामुळे कॉंग्रेसचे महापालिकेतील पक्षीय बळ 14 इतकेच राहिले आहे.=============================================================
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी सरासरी 60 टक्के मतदान
जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागात झालेले मतदान: हमदापूर (ता. सेलू, जि. वर्धा)- 65 आणि आनाळा (ता. परंडा, जि. उस्मानाबाद)- 54.पंचायत समितीच्या निर्वाचक गणात झालेले मतदान: पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग)- 53.29, नगाव (ता. जि. धुळे)- 47.56, तुर्काबाद (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद)- 44.55, संवदगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद)- 59.23, सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड)- 56.59, मारतळा (ता. लोहा, जि. नांदेड)- 74, काटी (ता, तुळजापूर, जि. उस्मानाबाद)- 56.21, सौंदड (ता. सडक-अर्जुनी, जि. गोंदिया)-58.94, आजंती (ता. हिंगणघाट, जि. वर्धा)- 65.27, घुग्घुस-2 (ता. जि. चंद्रपूर)- 37.80 आणि मानापूर (ता. आरमोरी, जि. गडचिरोली)- 67.05. एकूण- 60.
नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी सरासरी 72.21 टक्के मतदान
नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय झालेले सरासरी मतदान असे: कणकवली- 76.97, आजरा- 82.11, जामनेर- 70.92 आणि वैजापूर- 68.79. एकूणनगरपरिषद/ नगरपंचायतींच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी झालेले सरासरी मतदान (कंसात प्रभाग क्र): रत्नागिरी (3ब)- 57.21, आळंदी (1अ)- 65.53, तासगाव (6अ)- 59.70, दुधनी (4ब)- 70.61, सावदा (3ब)- 65.17, कुंडलवाडी (5ब)- 73.69 व कळंब (4)- 80.54. एकूण- 64.57.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.