Thursday, 24 May 2018

चार विधानपरिषदेच्या जागांसाठी येत्या 25 जून रोजी मतदान तर 28 ला निकाल

नाशिक विभाग शिक्षक, मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघांत 25 जूनला निवडणूक 


मुंबई, कोकण विभाग पदवीधर आणि मुंबई, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम भारत निर्वाचन आयोगाने गुरूवारी (24 मे) जाहीर केला. त्यानुसार या चार विधानपरिषदेच्या जागांसाठी येत्या 25 जून रोजी मतदान होईल तर 28 जून मतमोजणी होईल.या निवडणुकीसाठी आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली असून, 7 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येतील. तर 11 जूनपर्यंत आपले अर्ज मागे घेता येतील.नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून अपक्ष प्रा. डॉ. अपूर्व प्रशांत हिरे हे विधान परिषदेत प्रतिनिधित्व करत आहेत. तर मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघातून लोकभारती पक्षाचे व आता जेडीयूमध्ये गेलेले कपिल पाटील प्रतिनिधित्व करत आहेत.कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीतून आजच भाजपमध्ये गेलेले निरंजन डावखरे प्रतिनिधित्त्व करत आहेत तर मुंबई विभाग पदवीधर मतदारसंघातून राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक रामचंद्र सावंत हे प्रतिनिधित्त्व करत आहेत. या चारही आमदारांची 7 जुलै 2018 रोजी मुदत आहे.

उन्हाळी सुट्टीमुळे पुढे ढकलली होती निवडणूक

राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची 8 जून रोजी निवडणूक होणार होती मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती. मे महिन्याची उन्हाळी सुट्टी लक्षात घेत निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. मे महिन्याच्या सुट्टीनिमित्त मुंबई बाहेर गेलेले शिक्षक, पदवीधर मतदानापासून वंचित राहतील अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार भारत निर्वाचन आयोगाने या निवडणूका पुढे ढकलल्या होत्या.

खालील आमदारांच्या सदस्यत्वाची मुदत संपुष्टात येत आहे.

1. प्रा. डॉ. अपूर्व हिरे (नाशिक विभाग शिक्षकअपक्ष
2. डॉ. दीपक सावंत (मुंबई पदवीधरशिवसेना
3. निरंजन डावखरे (कोकण पदवीधरराष्ट्रवादी
4. कपिल पाटील (मुंबई शिक्षकलोकभारती


उस्मानाबाद- बीड-लातूर विधानपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर, 6 जूनला पुढील सुनावणी


21 मे रोजी विधान परिषदेच्या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक झाली होती. त्यापैकी पाच मतदार संघातील निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. पाच मतदारसंघात प्रत्येकी शिवसेना व भाजपने प्रत्येकी दोन-दोन जागा जिंकल्या तर नाशकात राष्ट्रवादीला धक्का बसला. परंतु कोकणात राष्‍ट्रवादीला यश मिळाले आहे. दुसरीकडे, उस्मानाबाद- बीड-लातूर विधानपरिषद निवडणूक निकाल आणखी लांबणीवर पडले आहेत. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवरील पुढील सुनावणी 6 जून रोजी होणार आहे. परिणाम उस्मानाबाद-बीड- लातूर विधान परिषद निवडणुकीचे निकाल लांबणीवर पडणार आहेत.बीडमधील अपात्र 11 नगरसेवकांना मतदानाची मुभा देताना त्यांची मते निकालावर परिणामकारक ठरत असतील तर या निवडणुकीचा निकाल जाहीर करू नये. हा निकाल संबंधित याचिकेच्या अंतिम निकालास अधीन राहील, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्याविरोधात संबंधित नगरसेवकांनी पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कोर्टाला निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. त्यावर आज (गुरुवार) सुनावणी झाली. याचिकेवरील पुढील सुनावणी 6 जूनला होणार आहे. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील मतमोजणी स्थगित ठेवण्यात आली आहे.दरम्यान, या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत अशोक जगदाळे यांच्यात चुरशीची लढत झाली होती.

कोकण पदवीधरसाठी पक्ष आणि उमेदवार
भाजप : निरंजन डावखरे
राष्ट्रवादी काँग्रेस : नजीब मुल्ला
शिवसेना : संजय मोरे

एकूण मतदार : एक लाख चार हजार
ठाणे : 45 हजार
पालघर : 16 हजार
सिंधुदुर्ग : 5308
रत्नागिरी : 16 हजार
रायगड : 19 हजार




मुंबई पदवीधर मतदार संघ - पक्ष आणि उमेदवार
भाजप : अॅड. अमितकुमार मेहता
शिवसेना : विलास पोतनीस
लोकभारती : जालिंदर सरोदे
अपक्ष ( मनसे स्वाभिमानी पुरस्कृत) : राजू बंडगर
अपक्ष : डॉ. दीपक पवार

एकूण मतदार 70 हजार
मुंबई उपनगर : 52 हजार मतदार
शहर : 18 हजार मतदार




मुंबई शिक्षक मतदारसंघ पक्ष आणि उमेदवार
शिवसेना : शिवाजी शेंडगे
लोकभारती : कपिल पाटील
अपक्ष (भाजप पुरस्कृत) : अनिल देशमुख

एकूण मतदार 10 हजार 169
मुंबई उपनगर : 8273
मुंबई शहर : 1896


पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार

नाशिक शिक्षक मतदारसंघ : डॉ. अपूर्व हिरे
मुंबई शिक्षक मतदारसंघ : कपिल पाटील
मुंबई पदवीधर मतदारसंघ : डॉ. दीपक सावंत
कोकण पदवीधर मतदारसंघ : निरंजन डावखरे

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.