Tuesday, 15 May 2018

देशातील फक्त २ टक्के लोकांवर काँग्रेसचे राज्य; भाजपा सर्वांत मोठा पक्ष पण बहुमतापासून दूर

कर्नाटकमधील सर्वात श्रीमंत आमदार

कर्नाटक विधानसभेतील २२१ पैकी २१५, म्हणजेच ९७ टक्के आमदार कोट्यधीश


कर्नाटक विधानसभेतील २२१ पैकी २१५, म्हणजेच ९७ टक्के आमदार कोट्यधीश आहेत. १५ आमदारांकडे १०० कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यात एक भाजपाचा, ३ जेडीएसचे आणि ११ काँग्रेसचे आमदार आहेत. सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत पहिले तीनही क्रमांक काँग्रेस आमदारांनी पटकावलेत. एम नागराजू यांच्याकडे तब्बल १०१५ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्या खालोखाल ८४० कोटींचे धनी असलेल्या डी के शिवकुमार यांचा नंबर लागतो. तिसऱ्या स्थानावर सुरेश बी. एस. असून त्यांच्याकडे ४१६ कोटींची संपत्ती आहे.२०१३ मध्ये कर्नाटक विधानसभेतील ९३ टक्के आमदार करोडपती होते. २१८ आमदारांकडे सरासरी २३.५४ कोटी इतकी मालमत्ता होती, तर २०१८ मध्ये एकूण २२१ आमदारांकडे सरासरी ३४.५४ कोटी इतकी संपत्ती असल्याचं एडीआरने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. त्यांनी उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे. कर्नाटक विधानसभेतील सर्वात 'गरीब' आमदार भाजपाचा आहे. मैसूरमधील एस ए रामदास यांची संपत्ती ४० लाखांच्या आसपास आहे, तर जेडीएसचे ए एस रवींद्र यांच्याकडे ६८ लाखांची मालमत्ता आहे. बहुजन समाज पार्टीचे एकमेव आमदार एन महेश यांची संपत्ती ७५ लाखाहून थोडी अधिक आहे. 


===============================

७१ वर्षांत ‘या’ २२ मुख्यमंत्र्यांनी केलं कर्नाटकवर राज्य


बहुमतचा आकडा गाठण्यास भाजप अशस्वी ठरली तरी कर्नाटकात सत्तेच ‘कमळ’ फुलवण्यास भाजपला यश आलं. भाजप नेते येडियुरप्पा यांनी अखेर आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात आज सकाळी राज्यपाल वजूभाई वाला यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. येडियुरप्पांनी तिसऱ्यांदामुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गेल्या ७१ वर्षांत  २२ मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकवर राज्य केलं आहे. हे मुख्यमंत्री  कोणते ते --------

१. के चेंगलाराय रेड्डी. ते कर्नाटकचे पहिले मुख्यमंत्री होते.
कार्यकाळ : २५ ऑक्टोबर १९४७ ते  ३० मार्च १९५२
पक्ष : काँग्रेस 

२. के. हनुमंत्याह
कार्यकाळ :   ३० मार्च १९५२ ते १९ ऑगस्ट  १९५६
पक्ष : काँग्रेस

३. के मंजप्पा
कार्यकाळ :   १९ ऑगस्ट  १९५६ ते ३१ ऑक्टोबर १९५६
पक्ष : काँग्रेस

४. एस निजलिंगप्पा (एकूण चारवेळा मुख्यमंत्री पद भूषवले)
कार्यकाळ :   १ नोव्हेंबर १९५६ ते १० एप्रिल १९५७
१० एप्रिल १९५७ ते १६ मे १९५८
२१ जून १९६२ ते ३ मार्च १९६७
३ मार्च १९६७ ते  २९ मे १९६७
पक्ष : काँग्रेस

५. बी डी जट्टी
कार्यकाळ : १६ मे १९५८ ते ९ मार्च १९६३
पक्ष : काँग्रेस

६. एस आर कान्थी
कार्यकाळ : २४ मार्च १९६२ ते  २० जून १९६२
पक्ष : काँग्रेस

७. विरेंद्र पाटील
कार्यकाळ : २९ मे १९६८ ते १८ मार्च १९७१
३० नोव्हेंबर १९८९ ते १० ऑक्टोबर १९९०
पक्ष : काँग्रेस

८. डी देवराज उर्स ( एकूण २ वेळा मुख्यमंत्री झाले)
कार्यकाळ : २० मार्च १९७२ ते ३१ डिसेंबर १९७७
२८ फेब्रुवारी १९७८ ते  ७ जनवरी १९८०
पक्ष : काँग्रेस

९. आर गुंडू राव
कार्यकाळ : १२ जानेवारी १९८० ते  ६ जानेवारी १९८३
पक्ष : काँग्रेस

१०. रामकृष्ण हेगडे
कार्यकाळ : १० जानेवारी १९८३ ते २९ डिसेंबर १९८४
८ मार्च १९८५ ते १३ फेब्रुवारी १९८६
१६ फेब्रुवारी १९८६ ते १० ऑगस्ट १९८८
पक्ष : जनता दल (सेक्युलर )

११. एस आर बोम्मई
कार्यकाळ : १३ ऑगस्ट १९८८ ते २१ एप्रिल १९८९
पक्ष : जनता दल (सेक्युलर )

१२. एस बंगरप्पा
कार्यकाळ : १७ ऑक्टोबर १९९० ते १९ नोव्हेंबर १९९२
पक्ष : काँग्रेस

१३. वीरप्पा मोइली
कार्यकाळ : १९ नोव्हेंबर १९९२ ते ११ डिसेंबर १९९४
पक्ष : काँग्रेस

१४. एच डी देवगौड़ा
कार्यकाळ : ११ डिसेंबर १९९४ ते ३१ मे १९९६
पक्ष : जनता दल (सेक्युलर )

१५. जे एच पटेल
कार्यकाळ : ३१ मे १९९६ ते ७ ऑक्टोबर १९९९
पक्ष : जनता दल (सेक्युलर )

१६. एस एम कृष्णा
कार्यकाळ : ११ ऑक्टोबर १९९९ ते २८ मे २००४
पक्ष : काँग्रेस

१७. एन धरम सिंह
कार्यकाळ : २८ मे २००४ ते २७ जानेवारी २००६
पक्ष : काँग्रेस+जनता दल (सेक्युलर ) काँग्रेस

१८. एच डी कुमारस्वामी
कार्यकाळ : ३ फेब्रुवारी २००६ ते ८ फेब्रुवारी २००७
पक्ष : जनता दल (सेक्युलर ) +काँग्रेस युती

१९. येडियुरप्पा
कार्यकाळ : १२ नोव्हेंबर २००७ ते  १९ नोव्हेंबर २००७
३० मे २००८ ते ३१ जुलै २०११
पक्ष : भाजप

२० : डी. वी. सदानंद गौंडा
कार्यकाळ : ४ ऑगस्ट २०११ ते ११ जुलै २०१२
पक्ष : भाजप

२१ : जगदीश शेट्टार
कार्यकाळ : १२ जुलै २०१२ ते  ८ मे  २०१३
पक्ष : भाजप

२२ . सिद्दारमैया
कार्यकाळ : १३ मे २०१३ ते १५ मे २०१८
पक्ष : काँग्रेस

येडियुरप्पा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी

सुप्रीम कोर्टात मध्यरात्री 2 ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपिनियतेची शपथ दिली.आज केवळ येडियुरप्पा यांनीच शपथ घेतली. त्यांना आता येत्या 10 दिवसात बहुमत सिद्ध करायचं आहे.  जर बहुमत सिद्ध केलं, तर अन्य मंत्र्यांचा शपथविधी होईल.येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी येडियुरप्पा ऑक्टोबर 2007 मध्ये केवळ 7 दिवसांसाठी मुख्यमंत्री होते. त्यावेळी जेडीएस आणि भाजपची युती होती. मात्र ती बिनसल्याने येडियुरप्पांना अवघ्या 7 दिवसात मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.यानंतर 2008 मध्ये येडियुरप्पांच्या नेतृत्त्वात कर्नाटकात भाजपची सत्ता आली त्यावेळी ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.
कोण आहेत बी एस येडियुरप्पा?
बूकानाकेरे सिद्दलिंगाप्पा येडियुरप्पा म्हणजेच बी एस येडियुरप्पा यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1943 रोजी कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यात झाला. 75 वर्षीय येडियुरप्पा यांना भाजपने निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केलं होतं.राईस मिलमध्ये क्लार्क ते मुख्यमंत्री अशी येडियुरप्पांची कारकीर्द आहे.

उद्‍या मुख्‍यमंत्रीपदाचा शपथविधी, येडियुरप्‍पांचा सत्ता स्‍थापनेचा दावा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. निकालानंतर कर्नाटकात नाट्‍यमय घडामोडी घडल्‍या. दरम्‍यान, निकालानंतर दुसर्‍या दिवशी राज्‍यात सत्ता स्‍थापन करण्‍यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे १३ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे म्‍हणत भाजपनेही सत्‍ता स्‍थापनेचा दावा केला आहे. शिवाय, एक अपक्ष उमेदवार आमच्‍यासोबत असल्‍याचा दावाही भाजपने केला आहे. तर आज येडीयुरप्‍पा यांनी सत्ता स्‍थापनेचा दावा राज्‍यपालांकडे केला. त्यानंतर उद्या गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं येड्डियुरप्पा यांनी सांगितलं. यासाठी काही वेळापूर्वी येडीयुरप्‍पा राज्‍यपालांच्‍या भेटीसाठी रवाना झाले होते. भेटीनंतर  राज्‍यपाल सकारात्मक निर्णय घेतील, असे येडियुरप्‍पा यांनी म्‍हटले आहे. 

भाजपा सर्वांत मोठा पक्ष पण बहुमतापासून दूर




कर्नाटकची विधानसभा त्रिशंकू स्थितीत असल्यानं आमदारांच्या फोडाफोडीला वेग आल्याचं चित्र दिसतं आहे. कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 112 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे 78 जागांवर विजयी झालेल्या काँग्रेसनं काल 37 उमेदवार निवडून आलेल्या जेडीएसला पाठिंबा दिला. त्यामुळे जेडीएसनं राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र भाजपाच्या नेतृत्वानं एका रात्रीत जेडीएस आणि काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या स्वप्नांना सुरुंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपानं कर्नाटकात 'गोवा पॅटर्न' राबवला आहे. त्यामुळे आज काँग्रेसच्या 12 नवनिर्वाचित आमदारांनी पक्षाच्या बैठकीला दांडी मारली आहे. तर जेडीएसचे दोन आमदार पक्षाच्या संपर्कात नसल्याचं वृत्त आहे. भाजपाला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आठ आमदारांची आवश्यकता आहे आणि काँग्रेस-जेडीएसच्या 'गायब' झालेल्या आमदारांची एकूण संख्या 14 इतकी आहे. त्यामुळे भाजपा सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता आहे. 

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018

भाजप 104

काँग्रेस 78

जनता दल (सेक्युलर) 37

बहुजन समाज पार्टी 1

कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1

अपक्ष 1

एकूण 222


Karnataka Result Status

Status Known For 222 out of 224 Constituencies
PartyWonLeadingTotal
Bahujan Samaj Party101
Bharatiya Janata Party1040104
Indian National Congress78078
Janata Dal (Secular)37037
Karnataka Pragnyavantha Janatha Party101
Independent101
Total2220222

काय काय शक्यता आहेत, ज्यामुळे कर्नाटकचा तिढा सुटेल!


* सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्ता स्थापनेच आमंत्रण देण्यात येईल. भाजपा जनता दलाच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करेल.जनता दलानं मुख्यमंत्री आमचा हवा अशी मागणी केली व भाजपानं ती मान्य केली तर भाजपा सत्तेत राहील पण ही शक्यता कमी आहे.* भाजपाचा मुख्यमंत्री असेल तर जनता दल पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे.* भाजपा बहुमत सिद्ध करू शकत नसेल तर दुसऱ्या पक्षांना म्हणजे काँग्रेस व जनता दलाला संधी देण्यात येईल.दोन्ही पक्षांनी युती केली तर जनता दलाचा मुख्यमंत्री होण्यास काँग्रेसना होकार दर्शवला असल्यामुळे या युतीचं सरकार सत्ता स्थापन करेल.* काहीही झालं तरी सत्ता स्थापन करायचीच व काँग्रेसला सत्तेत येऊ द्यायचं नाही असा चंग भाजपानं बांधला व विरोधक फोडायचे ठरवले तर पक्षांतर बंदी कायदा असल्यामुळे किमान एक तृतीयांश आमदारांनी पक्षांतर करावं लागतं, जे इतक्या मोठ्या संख्येनं होणं शक्य दिसत नाही. * राजीनामा द्यायला सांगू शकतात. समजा 8 ते 10 जणांनी आमदारकीचा राजीनामा दिला तर भाजपा बहुमताचा आकडा विद्यमान आमदारांच्या संख्येत गाठू शकतं. आणि फेरनिवडणुकीमध्ये या राजीनामा दिलेल्या आमदारांना सामावून घेऊ शकतं.


आगामी निवडणुकांसाठी सकारात्मक वातावरण


2019 च्या निवडणुकांपूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरम या 4 राज्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्वास या विजयामुळे भाजपचे नेते आणि देशभरातील कार्यकर्त्यांना मिळणार आहे. कर्नाटकात भाजपविरोधी वातावरण असल्याची चर्चा होती. नेत्यांना प्रचारात भाषेचा मोठा अडसर होता. मात्र तरीही भाजपला मोठे यश मिळाले. 


बेळगाव जिल्ह्यात दहा विद्यमान आमदारांचा पराभव 

2013 च्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला 8, केजेपी व बीएसआर कॉंग्रेसला प्रत्येकी एक , काँग्रेसला 6 तर महाराष्ट्र एकिकरण समितीला 2 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी विरोधात लढलेले केजेपी आणि बीएसआर कॉंग्रेस 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये सामील होते. त्यामुळे, भाजपचे जिल्ह्यातील संख्याबळ 10 झाले होते.या निवडणुकीतही भाजपला जिल्ह्यात दहाच जागा मिळाल्या आहेत. मात्र, भाजपचे माजी मंत्री लक्ष्मण सवदी यांना कॉंग्रेसच्या महेश कुमठळ्ळी यांनी पराभवाची धूळ चारली. कागवाडमध्ये कॉंग्रेसच्या श्रीमंत पाटील यांनी राजू कागे यांना पराभवाचा धक्‍का दिला. तर बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अॅड. अनिल बेनके यांनी कॉंग्रेसच्या फिरोज सेठ यांची सत्ता खालसा केली. कित्तूर मतदारसंघातील कॉंग्रेसच्या डी. बी. इनामदार यांना भाजपच्या महांतेश दोड्डगौड्डर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. 2013 च्या निवडणुकीत निपाणी मतदारसंघातून शशिकला जोल्ले या एकमेव महिला विजयी झाल्या होत्या. यावेळी सौ. जोल्लेंसह लक्ष्मी हेब्बाळकर आणि डॉ. अंजली निंबाळकर या तीन महिला जिल्ह्यातून विधानसभेत गेल्या आहेत. त्यामुळे यंदा महिला मतदारांचा टक्‍का वाढण्याबरोबरच महिला आमदारांचीही संख्या वाढली आहे. 

संख्याबळ दृष्टीक्षेपात 
पक्ष..........2013.............2018 
भाजप........06................10 
कॉंग्रेस.......06.................08 
म. ए. समिती...02...........00 
केजेपी........01................00 

बीएसआर कॉंग्रेस..01........00 


भाजपाला हवी आठ दिवसांची मुदत, काँग्रेस-जेडीएसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा


कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपानं मोठं यश मिळवलं आहे. विजयी आणि आघाडीवर असलेल्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता भाजपा कर्नाटकमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र त्यांना बहुमतासाठी 8 ते 10 जागा कमी पडताना दिसत आहेत. काँग्रेसनं नेमका या स्थितीचा फायदा घेत जेडीएसला पाठिंबा दिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसनं तिसऱ्या क्रमांकावरील जेडीएसला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं हे पाऊल उचललं आहे. काँग्रेसच्या या हालचाली पाहून भाजपानंही सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेस-जेडीएसचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावाही भाजपाने केला आहे. त्यामुळं सत्ता स्थापनेसाठाच्या हालचालीला वेग आला आहे.  भाजपा सगळ्यात मोठा पक्ष असल्यानं सत्ता स्थापनेसाठी पहिलं निमंत्रण मिळावं, यासाठी भाजपानं प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये राज्यपाल वजुभाई वाला यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपानं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी 8 दिवसांची मुदत मागितली आहे.

देशातील फक्त २ टक्के लोकांवर काँग्रेसचे राज्य


कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसची नाचक्की झाली आहे. देशात आता पंजाब आणि मिझोराम या दोन राज्यांमध्येच काँग्रेसची सत्ता असून देशातील फक्त २.२७ टक्के लोकांवरच काँग्रेसचे राज्य आहे. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी सुरु आहे भाजपाने मॅजिक फिगरचा आकडा गाठण्याची शक्यता दिसते. तर सत्ताधारी काँग्रेसला फक्त ६४ जागांवरच समाधान मानावे लागेल, असे दिसते. कर्नाटकमधील सत्ता गमावल्याने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला कर्नाटकमधील सत्ता टिकवणे महत्त्वाचे होते. खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकात प्रचाराचा धडाका लावला. पण कर्नाटकमधील गड राखण्यात त्यांना अपयश आले. कर्नाटकमधील सत्ता गमावल्यानंतर काँग्रेसकडे आता फक्त पंजाब, मिझोराम हे राज्य आणि पुद्दूचेरी या केंद्रशासित प्रदेश आहे. यात पंजाबची लोकसंख्या २. ७७ कोटी, मिझोरामची १० लाख ९७ हजार आणि पुद्दूचेरीची लोकसंख्या १२ लाख ४८ लाख आहे. यानुसार देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त २. २७ टक्के लोकांवर काँग्रेसचे राज्य आहे. २०१४मध्ये काँग्रेस १३ राज्यांमध्ये सत्तेत होती. मागील चार वर्षांमध्ये १३ पैकी १० राज्यामधील निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता. आता काँग्रेससाठी कर्नाटकमध्येही पराभवाची मालिका अखंड राहिल्याचे दिसत आहे. आता देशातील सुमारे 75 टक्के जनता भाजपा सत्तेत असणाऱ्या राज्यांमध्ये राहते असं म्हणता येईल. २०११ च्या जनगणनेनुसार भाजपाच्या नेतृत्वाखाली असलेल्या राज्यांमध्ये देशातील ७० टक्के जनता राहते. यामध्येही सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या दहा राज्यांपैकी उत्तर प्रदेश (१९.९ कोटी), महाराष्ट्र (११.२ कोटी), बिहार (१०.४ कोटी), आंध्रप्रदेश (८.४ कोटी), मध्यप्रदेश (७.२ कोटी), राजस्थान (६.८ कोटी) आणि गुजरात (६ कोटी) या राज्यांमध्ये भाजपप्रणीत सरकार आहे.


कर्नाटकातील मुस्लिम समाजाचे भाजपाला भरभरुन मतदान, भाजपाने एकाही मुस्लिमाला तिकिट दिले नाही


कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकाही मुस्लिम व्यक्तिला उमेदवारी दिली नव्हती. पण कर्नाटकातील मुस्लिम समाजाने भाजपाच्या पारडयात भरभरुन मते टाकल्याचे सध्याच्या निकालावरुन दिसत आहे. सध्याचा निकालाचा कल पाहता मुस्लिम बहुल मतदारसंघातून भाजपाच्या बाजूने मतदान झाल्याचे दिसत आहे. मुस्लिम बहुल मतदारसंघात भाजपाची मतांची टक्केवारी १४ वरुन ३६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. मुस्लिम बहुल मतदारसंघात १० जागांवर भाजपा तर काँग्रेस ८ आणि जेडीएस ७ जागांवर आघाडीवर आहे. कर्नाटकात मुस्लिम मतदारांची संख्या ७५ लाख आहे. काँग्रेसने १७ आणि जेडीएसने १९ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. मुस्लिम मतांसाठी या दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा होती. पण भाजपाने बाजी मारल्याचे दिसत आहे. २२४ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेत मुस्लिम मतदारांमध्ये ६५ जागांवर प्रभाव पाडण्याची क्षमता असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.मागच्या तीस वर्षात कर्नाटक विधानसभेत मुस्लिम समाजाचे प्रतिनिधीत्व कमी झाले आहे. सध्याच्या विधानसभेत फक्त नऊ मुस्लिम आमदार आहेत. १९७८ साली सर्वाधिक १६ मुस्लिम आमदार कर्नाटक विधानसभेमध्ये होते. १९८३ साली रामकृष्ण हेगडे यांच्या कार्यकाळात फक्त दोन मुस्लिम आमदार कर्नाटक विधासभेमध्ये होते.


दोन नेत्यांमुळे कर्नाटकात भाजपा ठरला सर्वात मोठा पक्ष


कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपाला मिळालेल्या या घवघवीत यशामध्ये बी.एस.येडियुरप्पा आणि बी. श्रीरामलु या दोन नेत्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. २०१३ सालच्या विधानसभा निवडणुकीत याच दोन नेत्यांनी भाजपाची सर्व समीकरण बिघडवून टाकली होती. लिंगायत समाजाचे मोठे नेते असलेले येडियुरप्पा आणि आदिवासी समाजाचे नेते बी. श्रीरामलु यांनी २०१३ ची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. त्यावेळी हे दोन्ही नेते भाजपामध्ये नव्हते. भाजपाला त्या निवडणुकीत या दोन नेत्यांमुळे मोठा फटका बसला होता असे धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठातील पॉलिटिकल सायन्स विषयाचे प्राध्यापक हरीश रामास्वामी यांनी सांगितले. २०१४ मध्ये या दोन्ही नेत्यांनी पुन्हा भाजपामध्ये प्रवेश केला व कर्नाटकातून खासदार झाले. २०१३ मध्ये येडियुरप्पा यांनी स्थापन केलेल्या कर्नाटक जनता पक्षाने ९.८ टक्के मते घेत सहा जागा जिंकल्या होत्या. श्रीरामलु यांच्या बादावारा श्रमिकारा रायतारा काँग्रेसने २.७ टक्के मते मिळवित चार जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपाला फक्त २० टक्के मते मिळवत ४० जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजपा त्या निवडणुकीत ६८ जागा जिंकू शकली असती. पण येडियुरप्पा, श्रीरामलु सोबत नसल्याने त्यावेळी २८ जागांचा फटका बसला होता.केजेपीच्या सहा जागा आणि बीएसआर काँग्रेसच्या चार जागा मिळून भाजपाला ७८ जागापर्यंत पोहोचता आले असता. येडियुरप्पा आणि श्रीरामलु यांची पकड असलेल्या उत्तर कर्नाटकात भाजपाने चांगली कामगिरी केली आहे. उत्तर कर्नाटकात लिंगायत मतदारांचा मोठा प्रभाव आहे. 


कर्नाटक निवडणूक निकाल 2018 : लिंगायतांनी काँग्रेसला नाकारलं!

निवडणुकीच्या आधी अल्पसंख्यक समाजाचा दर्जा देऊन लिंगायत मतांची बेगमी करू पाहणाऱ्या काँग्रेसला कर्नाटकच्या निकालांनी मोठा धक्का दिला आहे. कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाने त्यांचा कौल काँग्रेसऐवजी भाजपला दिला असून मुस्लिम समाजानेही भाजपला साथ दिली असल्याचं स्पष्ट झालं आहे. कर्नाटकात सर्वात मोठी व्होटबँक असलेल्या लिंगायत समाजाची मतं वळविण्यासाठी काँग्रेसने लिंगायत समाजाला अल्पसंख्यक समाजाचा दर्जा दिला होता. त्यामुळे लिंगायत समाजाची मते काँग्रेसला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मठांना भेटी देऊन लिंगायत समाजाची मते काँग्रेसकडे वळविण्याचा प्रयत्न केला होता. पण काँग्रेसचे हे प्रयत्न अपयशी ठरल्याचं कर्नाटकच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. लिंगायतांचा प्रभाव असलेल्या ३७ जागांवर भाजप आघाडीवर असून लिंगायतांचा प्रभाव असलेल्या १८ जागांवर काँग्रेस आणि ८ जागांवर जेडीएस आघाडीवर असल्याचं चित्रं आहे.विशेष म्हणजे काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेल्या मुस्लिमांनीही भाजपला साथ दिल्याचं निकालावरून स्पष्ट होत आहे. मुस्लिमबहुल १० जागांवर भाजपनं आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने ८ आणि जेडीएसने ७ जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, कर्नाटकातील अत्यंत महत्त्वाचा मतदार असलेल्या वोक्कालिगा समाजाने पुन्हा जेडीएस नेते एच.डी.देवगौडा यांच्या पारड्यात आपली मतं टाकली आहेत. वोक्कालिगा समाजाचा प्रभाव असलेल्या २० मतदारसंघात जेडीएस आघाडीवर असून काँग्रेसला ९ ठिकाणी आघाडी मिळाली आहे. तर भाजपला ७ मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. त्याचप्रमाणे दलितांचा जोर असलेल्या १९ मतदारसंघात भाजप, १६ मतदारसंघात काँग्रेस आणि १२ मतदारसंघात जेडीएसला आघाडी मिळाली आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालली असली तरी या विजयाचं सर्व श्रेय भाजप नेते बी. एस. येडीयुरप्पा यांनाच जात असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. एकीकडे मोदी त्यांच्या भाषणातून कर्नाटकच्या जनतेचं मन वळवितानाच काँग्रेसवर हल्लाबोल करत होते. तर दुसरीकडे येडीयुरप्पा दलित वस्त्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधत होते. त्यामुळे दलितांनी भाजपला त्यांचा कौल दिल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेसकडे मल्लिकार्जुन खरगे यांच्या सारखे मोठे दलित नेते असतानाही दलितांनी भाजपला कौल दिल्यानं काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. 
कर्नाटकात दलितांनंतर लिंगायत सर्वात मोठा समाज आहे. वोक्कालीगा समाजाचे ५५ विद्यमान आमदार असून मतदारांचे प्रमाण ११% आहे तर लिंगायत समाजाचे ५२ विद्यमान आमदार असून मतदारांचे प्रमाण १७% आहे. लिंगायत समाजाची लोकसंख्या २१% आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीआधी येथे मंदिर व मठांमध्ये नेत्यांची रीघ लागते. राज्यात ३० जिल्ह्यांत ६०० हून जास्त मठ आहेत. राज्यात लिंगायत समाजाचे ४०० मठ, वोकालिगा समाजाचे १५० मठ व कुरबा समाजाचे ८० हून जास्त मठ आहेत. या तीन समाजांचे राज्यात सुमारे ८०% मतदार असून ते कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळेच निवडणुकीआधी भाजप व काँग्रेस त्यांचे मन सांभाळण्यात गुंतले आहेत. राहुल आतापर्यंत १५ वेळेस व अमित शहा ५ पेक्षा जास्त वेळा मंदिर व मठात गेले आहेत. कर्नाटकच्या राजकारणात मठांचे वर्चस्व १९८३ पासून वाढले आहे.

लिंगायत - १८%
कर्नाटकात १७ ते १८ % लोकसंख्या लिंगायतांची आहे. त्यांचा १०० मतदारसंघांवर प्रभाव आहे. ५२ आमदार याच समाजाचे आहेत. ती भाजपची मतपेढी आहे. मात्र, या वेळी सिद्धरमय्यांनी लिंगायतांना अल्पसंख्याक धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मंजूर करून भाजपसाठी आव्हान दिले आहे.

वोकालिगा- १२%
राज्यात वोकालिगांची लोकसंख्या १२% असून ८० मतदारसंघांवर प्रभाव आहे. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा याच समाजाचे आहेत. त्यांचा पक्ष जेडीएसचा यांच्यावर बराच प्रभाव आहे. या समाजाचे ९ मुख्यमंत्री झाले. अमित शहा, अनंत कुमार, सदानंद गौडा वोकालिगाच्या चुनचुनगिरी मठात गेले होते.

कुरबा- ८%
तिसरा प्रमुख मठ कुरबा समाजाशी संबंधित आहे. राज्यात कुरबा लोकसंख्या ८% आहे. त्यांचा मुख्य मठ श्रीगेरे, दावणगेरेत आहे. सिद्धरमय्या याच समाजाचे आहेत. त्यांची मतपेढी अल्पसंख्याक, मागास, दलित फोडण्याच्या प्रयत्नात अमित शहा चित्रदुर्गमध्ये दलित मठ शरना मधरा गुरू पीठात गेले होते.

कर्नाटकात ८५% हिंदू व १३% मुस्लिम मतदार

कर्नाटकात १३% मुस्लिम व ८५% हिंदू मतदार आहेत. २२४ पैकी २०० जागी हिंदू निर्णायक ठरतात. राहुल गांधी १५ वेळा मंदिर, तीन वेळा दर्ग्यात व एक वेळा चर्चमध्ये गेले. अमित शहाही तुमकुरूच्या लिंगायतांच्या सिद्धगंगा मठात गेले होते.

ईव्हीएमचा विजय असो; राज यांचं खोचक ट्विट

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालांचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. सत्ताधारी काँग्रेसला धक्का देत भाजपनं आघाडी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला आहे. मतदान यंत्राचा विजय असो, असं खोटक ट्विट त्यांनी केलं आहे. 


कर्नाटक: माजी मुख्यंमत्र्यांची ९ मुलं रिंगणात

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य सभेचे दि. १ मे रोजी  चिकोडीत आयोजन करण्यात आले आहे. तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी २६ व २७ तारखेला निवडणूक प्रचारासाठी कर्नाटकात येणार असून ते कारवार, मंगळूर, कोडगू व म्हैसूर जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रचारसभामध्ये भाग घेणार आहेत.या निवडणूकीतील विशेष म्हणजे राज्यातील माजी मुख्यमंत्र्याची ९ मुलं निवडणूक लढवत आहेत. देशातील राजकारणात घराणेशाही विषयी कितीही आरोप होत असले तरी वेगवेगळ्या पक्षांच्याकडून घराणेशाहीला खतपाणी घातल्याचेच यातून दिसत आहे.


माजी मुख्यमंत्री आणि त्यांची निवडणूक रिंगणात असलेली मुले


डॉ. यतींद्र सिद्धरामय्या (काँग्रेस) : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांचे हे सुपुत्र म्हैसूर जिल्ह्यातील वरुणमधून निवडणूक लढवत आहेत.

बी.व्हाय विजयेंद्र (भाजप) : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा मुलगा म्हैसूर जिल्ह्यातील वरुणमधून यतींद्र सिद्धरामय्या यांच्या विरूद्ध लढणार आहे.

एच.डी रेवन्ना (जनता दल-सेक्युलर) : माजी मुख्यमंत्री एच.डी. देवेगौडा यांचा मोठा मुलगा हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरामधून पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहे.

एच.डी कुमारस्वामी (जनता दल-सेक्युलर) :  माजी मुख्यमंत्री एच.डी. देवेगौडा यांचाच दुसरा मुलगा जो रमननगर आणि चेन्नापट्टणा या दोन ठिकाणाहून निवडणूक लढवत आहे.

कुमार बंगारप्पा (भाजप) : कुमार हा अभिनेता असून कर्नाटकचे १२ वे मुख्यमंत्री सरेकोपा बंगारप्पा यांचा तो मुलगा आहे. शिवमोग्गा जिल्ह्यातील सोरबा येथून तो लढत आहे.

महिमा पटेल (जनता दल-युनायटेड) : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जे.एच. पटेल यांचे ते चिरंजीव असून दावणागेरे जिल्ह्यातील छनागिरीमधून ते निवडणूक लढवत आहेत.

अजय सिंह (काँग्रेस) : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री असलेल्या धर्मा सिंह यांचे ते सुपुत्र असून कलाबुर्गी जिल्ह्यातील जेवर्गी येथून निवडणूक लढवत आहेत.

बसवराज बोम्मई (भाजप) : बसवराज हे माजी पाणी पुरवठा मंत्री आणि माजी मुख्यमंत्री एस.आर बोम्मई यांचे चिरंजीव आहेत. ते हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव येथून निवडणूक लढवत आहेत.   

District NODistrict Name
1BELGAUM ಬೆಳಗಾವಿ
2BAGALKOT ಬಾಗಲಕೋಟೆ
3BIJAPUR ವಿಜಾಪೂರ
4GULBARGA ಗುಲಬರ್ಗಾ
5BIDAR ಬೀದರ್‌
6RAICHUR ರಾಯಚೂರು
7KOPPAL ಕೊಪ್ಪಳ
8GADAG ಗದಗ
9DHARWAD ಧಾರವಾಡ
10UTTARA KANNADA ಉತ್ತರ ಕನ್ನಡ
11HAVERI ಹಾವೇರಿ
12BELLARY ಬಳ್ಳಾರಿ
13CHITRADURGA ಚಿತ್ರದುರ್ಗ
14DAVANGERE ದಾವಣಗೆರೆ
15SHIMOGA ಶಿವಮೊಗ್ಗ
16UDUPI ಉಡುಪಿ
17CHIKMAGALUR ಚಿಕ್ಕಮಗಳೂರು
18TUMKUR ತುಮಕೂರು
19CHIKKABALLAPUR ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರ
20KOLAR ಕೋಲಾರ
22BANGALORE RURAL ಬೆಂಗಳೂರು ಗ್ರಾಮಾಂತರ
23RAMANAGARAM ರಾಮನಗರಂ
24MANDYA ಮಂಡ್ಯ
25HASSAN ಹಾಸನ
26DAKSHINA KANNADA ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ
27KODAGU ಕೊಡಗು
28MYSORE ಮೈಸೂರು
29CHAMARAJNAGAR ಚಾಮರಾಜನಗರ
30ಬೆಂಗಳೂರು / BANGALORE
35YADGIR ಯಾದಗಿರಿ

चंद्रकांत भुजबळ

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे









No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.