2020 मध्ये यंत्रमानव लढविणार निवडणूक
न्यूझीलंडच्या वैज्ञानिकांकडून अनोख्या रोबोटची निर्मिती
ऑकलंड:मानवी जगात यंत्रमानवांचा वावर वाढत चालला आहे. आतापर्यंत प्रयोगशाळेत रोबोट एखादे काम करत असल्याच्या बातम्या वाचनात आल्या असतील, परंतु न्यूझीलंडच्या वैज्ञानिकांनी आता नेत्याची जागा घेणारा यंत्रमानव निर्मिला आहे. या यंत्रमानवात नेत्याची सर्व वैशिष्टय़े अंतर्भूत असतील, अशाप्रकारचा हा जगातील पहिलाच यंत्रमानव असणार आहे.
वैज्ञानिकांनी कृत्रिम बुद्धिमता असणारा राजकीय यंत्रमानव विकसित केला. स्थलांतर, शिक्षण यासारख्या धोरणांसमवेत स्थानिक मुद्यांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांना हा यंत्रमावन उत्तरे देऊ शकतो. एवढेच नाही तर 2020 साली न्यूझीलंडमध्ये होणाऱया सार्वत्रिक निवडणुकीत त्याला उमेदवारी देण्याची तयारी सध्या सुरू आहे.या आभासी राजकीय नेत्याचे नाव ‘सॅम’ ठेवण्यात आले. यंत्रमानवाची निर्मिती न्यूझीलंडचे 49 वर्षीय उद्योजक निक गेरिट्सन यांनी केली. राजकारणात सध्या अनेक पूर्वग्रह असल्याचे जाणवते. जगातील अनेक देश हवामान बदल तसेच समानता यासारख्या गुंतागुतीच्या मुद्यांवर तोडगा काढू शकत नसल्याचे दिसून येते. अशा समस्यांना यंत्रमानव रुपातील नेता उत्तर ठरू शकतो. कृत्रिम बुद्धीचा नेता फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून लोकांना प्रतिक्रिया देणे शिकत असल्याची माहिती निक यांनी दिली.अल्गोरिदममध्ये मानवी पूर्वग्रह प्रभाव टाकू शकतात, परंतु त्याच्या विचारातील पूर्वग्रह तंत्रज्ञान विषयक तोडग्यांना आव्हान देऊ शकत नाहीत. प्रणाली भले पूर्णपणे अचूक नसली तरीही ती अनेक देशांमध्ये वाढणारे राजकीय तसेच सांस्कृतिक अंतर भरून काढण्यास मदतीची ठरेल असे गेरिट्सन यांचे मानणे आहे.न्यूझीलंडमध्ये 2020 च्या अखेरीस सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तोपर्यंत सॅम एक उमेदवार म्हणून राजकीय मैदानात उतरण्यास तयार होईल असे गॅरिट्सन यांनी म्हटले.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
राजकीय उलथापालथीमुळे रोबोट नेत्यांची गरज
अलीकडेच राजकीय उलथापालथीत तीन पक्षांच्या आघाडीतून जेसिंडा अर्देर्न पंतप्रधान झाल्या होत्या. जेसिंडा देशाच्या १५० वर्षांच्या इतिहासात तिसऱ्या महिला आणि सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. त्या फेरनवीनीकरण ऊर्जा आणि किमान वेतन वाढवण्याच्या मुद्द्यावर सत्तेत आल्या आहेत. त्यांच्या पुढाकारानेच ‘सॅम’ला नेता म्हणून तयार केले जात आहे. पंतप्रधान जेसिंडा ‘सॅम’सोबत विचारविनिमयही करत असतात.
फेसबुक मेसेंजरवर उत्तरे देणे शिकत आहे सॅम
सॅम चॅटबोट आहे. सध्या त्याला कायदेशीर वैधता मिळाली नाही. तो फेसबुक मेसेंजरद्वारे लोकांना प्रतिक्रिया देणे शिकत आहे. प्रयोग म्हणून या रोबोटवर न्यूझीलंडशी संबंधित योजना, धोरणे आणि तथ्यांशी संबंधित प्रश्न विचारण्यासाठी लोकांना यादीतून दिलेल्या प्रश्नांच्या पर्यायाची निवड करावी लागते. सॅम त्या प्रश्नांची निश्चित संकल्पना आणि लोकांच्या मतांच्या आधारे उत्तर देत आहे.
सौदीत रोबोटला मिळाले आहे नागरिकत्व
सौदी अरेबियात एक महिन्यापूर्वीच सोफिया या महिला रोबोटला नागरिकत्व मिळाले आहे. ती लोकांशी चर्चाही करू शकते. या रोबोटला अरब देशांतील कोणत्याही सामान्य महिलेपेक्षा जास्त अधिकार आहेत.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.