Monday, 6 November 2017

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुक -महिला गटातून नीलिमा पवारांची अखेर माघार ; सुनेत्रा पवार बिनविरोधच

महिला गटातून नीलिमा पवारांची अखेर माघार ;
सुनेत्रा पवार  बिनविरोधच

 व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघातील सहा जागा आणि नोंदणीकृत पदवीधर मतदारसघांतील दहा जागांसाठी 19 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होत आहे. महिला गटातून नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवारांचा अर्ज अखेर वैध ठरविला असल्याने सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीला खीळ बसली होती मात्र त्यांनी माघार घेतली.
व्यवस्थापन महिला गटाताल एका जागेसाठी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांचा अर्ज अवैध ठरविला होता त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सिनेटवर निवडून जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र महिला गटातून नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवारांचा अर्ज अखेर वैध ठरविला असल्याने सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीला खीळ बसली बसली होती मात्र त्यांनी माघार घेतली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेतील सोळा जागांसाठी एकूण 44 उमेदवार रिंगणात उरले आहेत. व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघातील सहा जागा आणि नोंदणीकृत पदवीधर मतदारसघांतील दहा जागांसाठी 19 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होत आहे. निवडणुकीतील अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस होता. व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघातून तिघांनी माघार घेतल्याने सात उमेदवार राहिले आहेत. या मतदारसंघातून अनुसूचित जाती गटातून एकच उमेदवारी अर्ज होता; परंतु तो बाद ठरल्याने ही जागा रिक्त राहणार आहे. पदवीधरमधून सतरा जणांनी माघार घेतल्याने 37 जण रिंगणात राहिले आहेत. निवडणुकीत सुनेत्रा पवार या बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, "पदवीधर'मधून मुख्यमंत्र्यांचे चुलतबंधू प्रसेनजीत फडणवीस रिंगणात आहेत. दोन पॅनेलमध्ये सरळ लढत होणार असल्याने फडणवीस यांची लढत लक्ष्यवेधी ठरेल.

निवडणूक रिंगणातील उमेदवार 
व्यवस्थापन प्रतिनिधी : सात उमेदवार (खुला गट) : 1. श्‍यामकांत देशमुख, 2. राजीव जगताप, 3. संदीप कदम, 4. सोमनाथ पाटील, 5. अशोक सावंत, 6. दीपक शाह, 7. राजेंद्र विखे-पाटील. 

नोंदणीकृत पदवीधर : 37 उमेदवार 
* खुला गट : 1. बाकेराव बस्ते, 2. अभिषेक बोके, 3. संतोष ढोरे, 4. प्रसेनजित फडणवीस, 5. बापूसाहेब गायके, 6. क्षितिज घुले, 7. प्रमोद जगताप, 8. भरत कर्डक, 9. शिरीष खताळ, 10. नयन कुशारे, 11. योगेश लांडे, 12. सुदाम मांगडे, 13. राजू पाण्मंद, 14. प्रकाश पाटील, 15. रोहन शेट्टी, 16. संदीप शिंदे, 17. महावीर वजाळे, 18. अनिल विखे, 19. तानाजी वाघ. 
* अनुसूचित जाती (एससी) : 1. सुभाष चिंधे, 2. भाग्यश्री कानडे, 3. संजय पवार, 4. योगेश पवार, 5. मनोज तेलोरे, 6. शशिकांत तिकोटे. 
* अनुसूचित जमाती (एसटी) : 1. प्रल्हाद बराडे, 2. विश्‍वनाथ पाडवी. 
* डीटी/एनटी : 1. संजय चकोर, 2. हेमंत दिघोळे, 3. संदीप गाधे, 4. अमोल खाडे, 5. विजय सोनावणे. 
* इतर मागासवर्ग (ओबीसी) : 1. युवराज नरवडे, 2. दादाभाऊ शिनलकर. 
* महिला : 1. तबस्सुम इनामदार, 2. मनीषा कमानकर, 3. बागेश्री मंठाळकर. 

एकता पॅनेल : 
व्यवस्थापन प्रतिनिधी : श्‍यामकांत देशमुख, सोमनाथ पाटील आणि दीपक शहा. 
नोंदणीकृत पदवीधर : प्रसेनजित फडणवीस, विजय सोनवणे, तानाजी वाघ, बागेश्री मंठाळकर, विश्‍वनाथ पाडवी, राजू पाण्मंद, संतोष ढोरे, दादाभाऊ शिनलकर, शशिकांत तिकोटे. 

प्रगती पॅनेल : 
व्यवस्थापन प्रतिनिधी : राजेंद्र विखे-पाटील, संदीप कदम आणि अशोक सावंत. 

नोंदणीकृत पदवीधर : अभिषेक बोके, युवराज नरवडे, प्रकाश पाटील, क्षितिज खुले, अनिकेत विखे, संदीप शिंदे. 











=============================================================

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी पदवीधर गटातून 7 अर्ज अपिलामध्ये वैध




=============================================================

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुक - 2017

जाहीर प्रकटने/आदेश/परिपत्रकामध्ये कुल सचिवाकडून घोडचुका

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुक उमेदवार अर्जांची छाननी 3 नोव्हेंबर २०१७ रोजी झाली आहे मात्र अर्जांची छाननी 3 आक्टोबर २०१७ रोजी झाल्याचे जाहीर प्रकटनात म्हंटले आहे.
सिनेट निवडणुक कार्यक्रम देखील संभाव्य म्हणून दुसऱ्यांदा जाहीर केला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६ व परिनियम-२०१७ प्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी/कुल सचिवाकडून नियमाचे उलंघन केले जात आहे.




     Political Research and Analysis Bureau (PRAB)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.