पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर सर्वपक्षीय नेत्यांचा गोतावळा
सिनेट निवडणुकीत प्रगती पॅनेल आणि एकता पॅनेलमध्ये लढत होती. मात्र, राजकीय नेत्यांच्या गोतावळ्यामुळे सिनेट निवडणुकीकडे लक्ष लागले होते. पदवीधर गटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस विजयी झाले. ते या निवडणुकीत सहज विजयी होतील असे चित्र निर्माण करण्यात आले असताना प्रत्यक्षात विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. खुल्या गटातील शेवटच्या पाचव्या जागेसाठी १२ व्या फेरीनंतर ते विजयी झाले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या व्यवस्थापन प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे दोन चुलत बंधू अनिल विखे- पाटील (पदवीधर गट) आणि राजेंद्र विखे- पाटील (व्यवस्थापन प्रतिनिधी) विजयी झाले आहेत.
सिनेट निवडणुकीत पदवीधर गटात संतोष ढोरे (खुला गट) , अनिल विखे (खुला गट) , तानाजी वाघ (खुला गट) , अभिषेक बोके (खुला गट) , प्रसेनजीत फडणवीस (खुला गट) हे विजयी झालेत. राखीव गटांमध्ये दादासाहेब शिनलकर (ओबीसी), बागेश्री मंठाळकर (महिला राखीव), विश्वनाथ पाडवी (एसटी राखीव), शशिकांत तिकोटे (एससी राखीव), विजय सोनावणे (एनटी राखीव) विजयी झाले आहेत. व्यवस्थापन प्रतिनिधी गटातून सुनेत्रा पवार (बिनविरोध), सोमनाथ पाटील, श्यामकांत देशमुख, संदीप कदम, राजेंद्र विखे-पाटील विजयी झालेत.
विद्यापीठ विकास मंचला धक्का
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू प्रसेनजीत फडणवीस यांना विजयासाठी बाराव्या फेरी पर्यन्त घाम गाळावा लागल्याने राहिल्याने विद्यापीठ विकास मंचला मोठा धक्का बसला.
फडणवीस पहिल्या फेरीत निवडून येतील त्यामुळे जास्तीची पहिल्या पसंतीची मते दुसऱ्या उमेदवारांना देण्याचे नियोजन मंचाकडून करण्यात आले होते. मात्र पहिल्या फेरीत प्रसेनजीत चौथ्या क्रमांकावर राहिले.
अधिसभा निवडणुक अंतिम निकाल
पदवीधर
1. संतोष ढोरे - खुला गट
2. अनिल विखे- खुला गट
3. तानाजी वाघ - खुला गट
4. अभिषेक बोके - खुला गट
5. प्रसेनजीत फडणवीस - खुला गट
राखीव गट :
6. दादासाहेब शिनलकर - ओबीसी
7. बागेश्री मंठाळकर - महिला राखीव
8. विश्वनाथ पाडवी - ST राखीव
9. शशिकांत तिकोटे - SC राखीव
10. विजय सोनावणे - NT राखीव
व्यवस्थापन प्रतिनिधी
विजयी उमेदवार
1. सुनेत्रा पवार - बिनविरोध
2 सोमनाथ पाटील
3. श्यामकांत देशमुख
4. संदीप कदम
5. राजेंद्र विखे-पाटील
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.