"राज्य मतदार दिवस" म्हणून साजरा करण्याचा निर्णय अखेर रद्द
दरवर्षी १ जुलै हा दिवस राज्यभर "राज्य मतदार दिवस" म्हणून साजरा करण्याचा निर्णय 20 मे, २०१७ रोजी घेण्यात आला होता. दरवर्षी १ जुलै हा दिवस राज्यभर "राज्य मतदार दिवस" म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता.
सदर परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग , शासन निर्णय क्र. ईएलआर-२०१७/प्र.क्र. 347 /का.३३ दिनांक : 20 मे, २०१७ म्हणून आदेश जारी केले होते.भारत निवडणूक आयोगाने भारतीय लोकशाही बळकट व्हावी या हेतूने मतदारांना जागृत करुन त्यांचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा या हेतूने "स्वीप" (SVEEP - Systematic Voters' Education and Electoral Participation) हा महतवाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध माध्यमातून मतदारांबरोबर संपर्क साधून त्याना लोकशाहीचे महत्व पटवून देण्यासाठी आणि मतदान प्रक्रियेपासून कोणताही मतदार वंचित राहू नये यासाठी सतत प्रयतनशील राहावयाचे आहे.या उद्देशाने दरवर्षी १ जुलै हा दिवस राज्यभर "राज्य मतदार दिवस" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता मात्र विरोधामुळे सदरील आदेश रद्द करण्यात आला आहे.
भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी दिनांक २५ जानेवारी रोजी "राष्ट्रीय मतदार दिवस" साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाच्या निमीत्ताने देशभर मतदार जागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तथापी,"स्वीप" कार्यक्रमाची अंमलबजावणी केवळ "राष्ट्रीय मतदार दिनी" या पुरती मर्यादित राहू नये तर मतदार जागृतीचे काम निरंतरपणे वर्षभर सुरु राहावे या हेतूने दरवर्षी राज्यस्तरावर "राज्य मतदार दिवस" व प्रत्येक जिल्हास्तरावर "जिल्हा मतदार दिवस" साजरा करण्यात यावा असे आदेश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये "राज्य मतदार दिवस" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता
'राज्य मतदार जागृती दिवस' साजरा करण्यास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आक्षेप घेतला होता
१ जुलै हा मतदार दिवस म्हणून जाहीर केल्याचा मुद्दा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. "१ जुलै हा वसंतराव नाईक यांचा जन्मदिन असून तो कृषी दिन म्हणून साजरा होतो. अशा वेळी मतदार दिवस जाहीर करुन सरकारने वसंतराव नाईक यांचा अवमान केला आहे असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला होता.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.