अलिबागचा बंगला जप्त होणार
नीरव मोदी यांचा अलिबाग तालुक्यातील किहीम येथे आलिशान बंगला असून तो लवकरच सील केला जाणार आहे. अलिबाग तालुक्यातील किहीम परिसरात अनेक सेलिब्रेटींचे आलिशान बंगले आहेत. काहींनी सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. या उभारलेल्या अनधिकृत इमल्यांमध्ये मोदींचा बंगला किहीम किनाऱ्यालगत उभा आहे. सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने त्यांना नोटीसदेखील बजावल्या आहेत. किहीम ग्रामपंचायत हद्दीत हा बंगला असल्याने या बंगल्याला ग्रामपंचायतीची घरपट्टी आहे. नीरव दीपक मोदी या नावाने या बंगल्याची ग्रामपंचायतीत नोंद झाली आहे.
नीरव मोदी न्यूयॉर्कच्या आलिशान हॉटेलमध्ये ?
पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार कोटींचा चुना लावणारा नीरव मोदी आमच्या कोणत्याही अधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार नीरव मोदी न्यूयॉर्क येथील जे डब्ल्यु मॅरियटच्या अॅसेस हाऊसमधे असलेल्या ३६ व्या मजल्यावरील स्वीटमध्ये आरामात राहतो आहे. नीरव मोदीने पीएनबी बँकेला ११ हजार कोटींचा चुना लावल्याचे उघड होताच केंद्र सरकारने कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. नीरव मोदी आणि त्याचा नातेवाईक मेहुल चोक्सी या दोघांचे पासपोर्ट चार आठवड्यांसाठी निलंबित करण्यात आले. तसेच त्याच्या मालमत्तांवरही धाडी सुरु आहेत. अशातच नीरव मोदी एका आलीशान हॉटेलमध्ये राहात असल्याची माहिती समोर आली आहे.
पंजाब नॅशनल बँक प्रकरणातील आरोपी मनोज खरात कर्जतचा
पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यामध्ये ज्या सात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये कर्जत शहरातील यासीननगर येथील मनोज हनुमंत खरात याचे नाव आल्याने चर्चेला उधाण आले आहे. यासीननगरमध्ये पंचशील नावाचा त्याचा बंगला असून त्याचे आई-वडील येथे राहतात. त्याला एक भाऊ एक बहीण असून सर्व उच्चशिक्षित आहेत. वडील पाटबंधारे खात्यात वरिष्ठ पदावर कार्यरत असले तरी त्यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. मनोजचे बालपण यासीननगरमध्ये गेले असून तो अत्यंत मनमिळाऊ व शांत व्यक्तिमत्त्वाचा असून त्याने असे काही केले असेल यावर येथे कोणाचाच विश्वास बसत नाही.आमच्या शेजारी राहणारा मनोज असे काही करूच शकत नाही तर त्याला फसवून या घोटाळ्यात अडकवले असल्याची शक्यता आहे असे ओंकार तोटे यांनी सांगितले,कर्जत येथील त्याच्या राहत्या घरी कोणाची भेट होऊ शकली नाही. मनोज याने कर्जत व पिंपरी चिंचवड येथे शिक्षण घेतले असून तो पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत कार्यरत असताना त्याने या घोटाळ्यात संबंधित कंपनीला आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यात प्रमुख भूमिका पार पाडल्याची माहिती समोर येत आहे.
Company/LLP Master Data
Directors/Signatory Details
पंजाब नॅशनल बॅंकेत 11 हजार 400 कोटींचा घोटाळा ; ईडीचे छापे
पंजाब नॅशनल बँकेत देशाच्या बँकिंग क्षेत्रातील दुसरा सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. मुंबईतील ब्रेडी हाऊस शाखेतील ही फसवणूक १७७.१७ कोटी डॉलर म्हणजे तब्बल ११,३५६ कोटी रुपयांची आहे. या प्रकरणात हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याविरुद्ध सीबीआयकडे दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. बँकेच्या तक्रारीवरून ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. पीएनबीने बुधवारी स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले अाहे की, बँकेच्या या शाखेतील काही खात्यांत चुकीचे व्यवहार समोर आले. त्याच्या आधारे इतर बँकांनी खातेदारांना परदेशात कर्जे दिली अाहेत. दरम्यान, तक्रारी दाखल होताच नीरव मोदी परदेशात पळून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर मोदींच्या देशभरातील विविध कार्यालवर ईडीने छापे टाकले आहेत. हा गैरव्यवहार २०११ पासून सुरू होता. त्यात डीएजीएम स्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. बँकेने १० कर्मचारी निलंबित केले आहे. मंत्रालयाने प्रकरणातील सर्व बँकांकडून ३ दिवसांत अहवाल मागवला आहे. याआधी २०१५ मध्ये बँक ऑफ बडोदाच्या दिल्लीतील एका शाखेत ६ हजार कोटींचा घोटाळा समोर आला होता. नीरव मोदी व संबंधित कंपन्यांसाठी ५ लेटर ऑफ अंडरस्टँडिंग अलाहाबाद बँक आणि ३ एलओयू अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँग शाखेच्या नावाने जारी झाले होते. अशा प्रकरणांत अंतिम देणी एलओयू देणाऱ्या बँकेची असते. वार्षिक नफ्याच्या ८ पट मोठा घोटाळा- घोटाळ्याची रक्कम २०१६-१७ मध्ये बँकेच्या १,३२५ कोटी नफ्याच्या तुलनेत ८ पट जास्त आहे.ती बँकेच्या ३५,३६५ कोटींच्या मार्केट कॅपची एक तृतीयांश आणि ४.५ लाख कोटींच्या एकूण कर्जाची २.५% भरते. पीएनबी बँकेला ११ हजार कोटींचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीने आणखी १७ बँकांना ३ हजार कोटींना गंडवल्याचे समोर आले आहे. हा घोटाळा करण्यासाठीही नीरव मोदीने ‘लेटर ऑफ अंडरस्टँडिंग’चाच वापर केला आहे असेही समोर आले आहे. नीरव मोदीने केलेल्या फसवणुकीमुळे १७ बँकांचे सुमारे ३ हजार कोटी बुडाल्यात जमा आहे.सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून १९४ कोटी, देना बँकेकडून १५३.२५ कोटी, विजया बँकेकडून १५०.१५ कोटी, बँक ऑफ इंडियाकडून १२७ कोटी, सिंडिकेट बँकेकडून १२५ कोटी, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्सकडून १२० कोटी, युनियन बँकेकडून ११० कोटी आणि आयडीबीआय बँकेकडून १०० कोटींचे कर्ज घेतल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. नीरव मोदीच्या फायरस्टार इंटरनॅशनलसह विविध कंपन्यांनी १७ बँकांना चुना लावला आहे.नीरव मोदीने जो ११ हजार कोटींचा चुना पीएनबी बँकेला लावला त्याशिवाय आणखी ३ हजार कोटींना इतर बँकांना गंडवल्याचे समजते आहे. ११ हजार कोटीमधील एक मोठा हिस्सा राऊंड ट्रिपिंग मनी शी जोडण्यात आला असावा अंदाज ईडी आणि सीबीआयने व्यक्त केला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मिळालेल्या माहितीनुसार जून २०१५ मध्ये १७ बँकांनी ‘फायरस्टार इंटरनॅशनल’ आणि इतर कंपन्यांसाठी १९८० कोटींचे कर्ज दिले होते. त्यानंतर ‘लेटर ऑफ अंडरस्टँडिंग’ मिळाल्याने हे कर्ज आणखी ५०० कोटींनी वाढवले. या संपूर्ण कर्जापैकी ९० कोटी रुपये फायरस्टार कंपनीने परत केले होते अशीही माहिती समोर आली आहे.
काय आहे घोटाळा?
काही निवडक खातेदारांच्या फायद्यासाठी बँकेच्या दक्षिण मुंबईतील एका शाखेतून काही फसवे आणि अनधिकृत व्यवहार झाले होते. दोन कर्मचाऱ्यांनी बँकेच्या परदेशातील शाखांमधून फसवणुकीद्वारे नीरव मोदी व त्याच्या कंपन्यांना कर्जउभारणीसाठी बनावट हमीपत्रे जारी करवून घेतली. याच कागदपत्रांच्या आधारे अन्य बँकांनी त्या विदेशातील खातेदाराला मोठी रक्कम कर्ज म्हणून दिली. अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या कंपनीविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
PNB घोटाळा : लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय?
डायमंड किंग नीरव मोदी आणि गीतांजली जेम्स या दोन ग्रुप्सच्या नावाने पंजाब नॅशनल बँकेने लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) दिल्याचा आरोप आहे. बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक मानल्या जात असलेल्या घोटाळ्यात पंजाब नॅशनल बँक अडकली आहे.एक हजार 771 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 11 हजार 360 कोटींचा हा घोटाळा असल्याचं समोर आलं आहे. एलओयू म्हणजेच लेटर ऑफ अंडरटेकिंगचा गैरवापर करुन हा घोटाळा केल्याची प्राथमिक माहिती आहे. पीएनबी ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची पब्लिक सेक्टर बँक आहे. या बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत उघडकीस आलेल्या या घोटाळ्याची पाळंमुळं सात वर्ष जुनी असल्याचा अंदाज आहे. अॅक्सिस आणि अलाहाबाद बँकेच्या परदेशी शाखांचीही या घोटाळ्यात फसगत झाल्याचं समोर आलं आहे. डायमंड किंग नीरव मोदी आणि गीतांजली जेम्स या दोन ग्रुप्सच्या नावाने पंजाब नॅशनल बँकेने लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) दिल्याचा आरोप आहे. गीतांजली जेम्स - जिली इंडिया आणि नक्षत्र, तसंच नीरव मोदी ग्रुप फर्म्स यांच्या वतीने एलओयू (LoU) किंवा एफएलसी (FLC- फॉरेन लेटर ऑफ क्रेडिट) च्या आधारे अॅक्सिस आणि अलाहाबाद बँकेकडून कर्ज देण्यात आलं.हाँग काँग, दुबई, न्यू यॉर्कमध्ये नीरव मोदीची परदेशी केंद्रं आहेत. एलओयू दाखवून 2010 पासून नीरव मोदी क्रेडिटवर खरेदी करत असल्याचा संशय आहे.
एलओयू म्हणजे काय?
एलओयू म्हणजे 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'. हे एकप्रकारे हमीपत्र असतं. हे पत्र एक बँक दुसऱ्या बँकेच्या शाखांना जारी करते. हमीपत्राच्या आधारे बँकेच्या परदेशी शाखा कर्जदारांना कर्ज किंवा क्रेडिट दिलं जातं.या प्रकरणात, संबंधित बँकांच्या परदेशी शाखांचे नीरव मोदींच्या ज्वेलरी कंपनीच्या आऊटलेटसोबतच दृढ संबंध होते. त्यामुळे फ्रॉड एलओयू किंवा एफएलसीच्या आधारे त्यांनी क्रेडिट (कर्ज) दिलं.लेटर ऑफ अंडरटेकिंग ही स्विफ्ट टेक्नॉलॉजीने देण्यात आली होती. एकही व्यवहार हा कोअर बँकिंग सोल्युशन (सीबीएस)च्या माध्यमातून झाला नाही. स्विफ्ट म्हणजे फॅक्स प्रमाणे असतो. सीबीएसशी त्याचं इंटिग्रेशन नसतं. पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे शक्य झाल्याची माहिती आहे.12 फेब्रुवारीला पंजाब नॅशनल बँकेकडून 30 बँकांना पत्र पाठवण्यात आलं आणि या घोटाळ्याबाबत सतर्क करण्यात आल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. आरबीआयनुसार एलओयूची मुदत केवळ 90 दिवसांची असते. मात्र भारतीय बँकांच्या परदेशी शाखांनी याकडे कानाडोळा केल्याचं पत्रात म्हटलं आहे.
नीरव मोदी परदेशात
पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिऱ्याचे व्यापारी नीरव मोदी सध्या देशात नाही तर परदेशात असल्याची माहिती समोर आली आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी आपल्या मित्रांच्या सहाय्यानं पंजाब नॅशनल बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर शेअर बाजारात बँकेचे शेअर जोरदार कोसळले.280 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची तक्रार अगोदरच देण्यात आली आहे. नीरव मोदी यांची आई आणि भावाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय पीएनबीने सीबीआयला लूकआऊट नोटीस जारी करण्यास सांगितलं आहे.पंजाब नॅशनल बँकेच्या काही अकांऊट्सद्वारे गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं होतं. काही खातेदारांच्या संगनमतानं हे व्यवहार झाल्याचं बँकेच्या निदर्शनास आलं. इतर बॅंकांकडूनही परदेशात या ठराविक व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसा पाठवण्यात आला होता. बॅंकेनी हा प्रकार उघड होताच रितसर तक्रार केली.
नीरव मोदी कोण आहेत?
नीरव मोदी भारतातील मोठे हिरे व्यापारी आहेत. त्यांना भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. 48 वर्षीय नीरव मोदी फोर्ब्जया जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.नीरव मोदी यांची फाईव्ह स्टार डायमंड नावाची कंपनी आहे. त्यांनी 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत.नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा 'नीरव मोदी डायमंड ब्रँड'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. नीरव मोदींचे वडीलही हिरे व्यापारी आहेत. नीरव मोदींनी सुरुवातीचं शिक्षण अमेरिकेत घेतलं. अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर व्यवसाय सुरु केला.
बेल्जियम रिटर्न नीरव मोदी
नीरव मोदी हा ४७ वर्षांचा असून त्याचे वडील हे देखील हिरेव्यापारीच होते. व्यवसायानिमित्त ते बेल्जियममध्ये गेले. नीरव मोदी वॉर्टन महाविद्यालयात शिकत असतानाच वडिलांचा व्यवसाय थंडावला. यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून बेल्जियममध्ये परतावे लागले. यानंतर नीरव मोदी भारतात आला.
मामाकडून शिकला व्यवसाय
मुंबईत आल्यावर नीरव मोदीने त्याचा मामा मेहूल चोकसी यांच्याकडून हिरे व्यापाराचे धडे गिरवले. कमी वयातच नीरव मोदी कला आणि डिझाईन क्षेत्राकडे आकर्षित झाला होता. युरोपमधील वेगवेगळ्या संग्रहालयांना तो भेट द्यायचा. १८ वर्षांपूर्वी त्याने भारतात हिरे व्यापारात प्रवेश केला.
मित्राच्या सल्ल्यानंतर डिझायनिंगमध्ये
२००८ मध्ये नीरव मोदीला त्याच्या एका मित्राने हिऱ्याचे इयरिंग तयार करण्याचा सल्ला दिला. हा सल्ला मनावर घेत नीरव मोदी कामाला लागला. नीरव मोदीची फायरस्टार डायमंड ही कंपनी आहे. २०१६ मध्ये फोर्ब्सच्या श्रीमंत तरुणांच्या यादीत त्याचा समाशेव होता. नीरव मोदीच्या कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. तर दिल्ली, लंडन, न्यूयॉर्क, लास व्हेगास, सिंगापूर, मकाव, बिजिंग या देशांमध्ये त्याच्या कंपनीच्या शाखा आहेत. लिसा हेडन आणि प्रियांका चोप्रा या नीरव मोदीच्या कंपनीच्या ब्रँड अँबेसिडर राहिल्या आहेत.
१. ७३ अब्ज डॉलरची संपत्ती
२०१७ मध्ये फोर्ब्सच्या १०० श्रीमंत भारतीयांच्या यादीत नीरव मोदीचा समावेश आहे. नीरव मोदीची संपत्ती १.७३ अब्ज डॉलर इतकी आहे.
घोटाळा कसा झाला?
नीरव मोदी आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे हे षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. तीन कंपन्यांच्या नावावर हाँगकाँगमधून सामान येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सामान मागवण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली.लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे मागवण्यात आलेल्या सामानाचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत असल्याचं पत्र. हेच पत्र अलाहाबाद बँक आणि अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधल्या शाखांच्या नावावर काढण्याची मागणी केली. याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचं सामान मागवण्यात आलं.पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला 5 आणि अॅक्सिस बँकेला 3 लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केली आणि जवळपास 280 कोटी रुपयांचं सामान आणण्यात आलं. 18 जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले आणि त्यांनी सामानाचे पैसे भरण्यास सांगितलं.कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचं लेटर दाखवलं आणि पेमेंटची मागणी केली. जितके पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तितकी कॅश भरायला बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र बँकेने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांची झोपच उडाली. कारण बँकेत एक रुपयाही न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचं उघड झालं.बँकेने तक्रार दाखल केली असून हे प्रकरण आता सीबीआयपर्यंत पोहोचलं आहे. नीरव मोदी यांना जारी केलेले आठही लेटर ऑफ अंडरटेकिंग बनावट असल्याचं उघड झालं. पीएनबीचे डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टी यांनी एका कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन हे लेटर जारी केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता 280 कोटी रुपये पीएनबीला चुकते करावे लागणार आहेत.
पीएनबी देशातली पहिली स्वदेशी बँक
122 वर्ष जुनी पीएनबी देशातली सर्वात मोठी दुसरी बँक आहे. पीएनबीचे एकूण 10 कोटी खातेधारक आहेत. तर देशात बँकेच्या एकूण 6941 शाखा, 9753 एटीएम सेंटर आहेत. पीएनबीचा 2017 या वर्षातील निव्वळ नफा 904 कोटी रुपयांचा आहे आणि एकूण एनपीए 57 हजार 630 कोटी रुपये आहे. देशातून फरार असलेल्या उद्योगपती विजय मल्ल्याकडे पीएनबीचं 815 कोटींचं कर्ज आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानंतर पीएनबी देशातली सर्वात मोठी दुसरी बँक आहे.
नीरव मोदीचे अंबानी कनेक्शन?
धीरुभाई अंबानींच्या नातीचे नीरव मोदीच्या लहान भावाशी डिसेंबर २०१६ लग्न
बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या नीरव मोदीचे अंबानी कुटुंबीयांशीही संबंध असल्याचे समोर आले आहे. धीरुभाई अंबानींच्या नातीचे नीरव मोदीच्या लहान भावाशी लग्न झाले असून डिसेंबर २०१६ मध्ये गोव्यामध्ये थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला.पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अब्जाधीश हिरेव्यापारी नीरव मोदी मुख्य सूत्रधार आहे. नीरव मोदीची नामांकित कंपनी असून बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री त्याच्या कंपनीच्या ब्रँड अँबेसिडर होत्या. नीरव मोदीची राजकारणातील बडा नेत्यांशीही ओळख होती. आता नीरव मोदीचे देशातील सर्वात मोठे उद्योजक अर्थात अंबानी कुटुंबीयांशीही संबंध असल्याचे समोर आले आहे.मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांची भाची इशिता साळगावकरचे लग्न नीरव मोदीचा लहान भाऊ नीशाल मोदीशी झाले आहे. इशिता ही दिप्ती साळगावकर यांची कन्या आहे. दिप्ती या धीरुभाई अंबानी यांच्या कन्या आहेत. साळगावकर कुटुंबही गोव्यातील मोठे उद्योजक आहेत. एप्रिल २०१६ मध्ये इशिता आणि नीशालचा साखरपुडा मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला होता. या सोहळ्याला ८० ते १०० जणच उपस्थित होते. नीशाल मोदी हा नीरव मोदीच्या व्यवसायातही सक्रीय असल्याचे समजते. नीरव मोदी हा ४७ वर्षांचा असून त्याचे वडील हे देखील हिरेव्यापारीच होते. व्यवसायानिमित्त ते बेल्जियममध्ये स्थायिक झाले होते. नीरव आणि नीशाल हे दोघे हिरे व्यापार आणि ज्वेलरीशी संबंधित क्षेत्रातच कार्यरत आहेत. काही निवडक खातेदारांच्या फायद्यासाठी बँकेच्या दक्षिण मुंबईतील एका शाखेतून काही फसवे आणि अनधिकृत व्यवहार झाले होते. दोन कर्मचाऱ्यांनी बँकेच्या परदेशातील शाखांमधून फसवणुकीद्वारे नीरव मोदी व त्याच्या कंपन्यांना कर्जउभारणीसाठी बनावट हमीपत्रे जारी करवून घेतल्याचा आरोप आहे.
काही कर्मचारी आहेत घोटाळ्यात सहभागी: पंजाब नॅशनल बँकेची कबुली
नीरव मोदी व त्याच्याशी संबंधित कंपन्यांनी ११,४०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती देणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी बँकेचे काही कर्मचारी या घोटाळ्यात अडकले असल्याची कबुली दिली आहे. मेहता यांनी शेट्टी व अन्य एका कर्मचाऱ्याला निलंबित केल्याची व अन्य काही जणांची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. कनिष्ठ असो किंवा वरिष्ठ दोषींवर कारवाई होणारच, असे त्यांनी सांगितले.असा घोटाळा २०११ पासून सुरू असून पंजाब नॅशनल बँकेने नेहमीच घोटाळे थोपवण्यासाठी प्रयत्न केले असून हा घोटाळाही समोर आणणारे आपणच प्रथम असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भारतातल्या बँकांच्या विदेशातील शाखांच्या माध्यमातून हा एकूण घोटाळा झाला असल्याचे ते म्हणाले. नीरव मोदी व त्याच्या कंपन्यांनी बँक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक गैरव्यवहार केले आणि बँकेच्या यंत्रणेचा गैरवापर करत पैसे ट्रान्सफर केल्याचा व त्याची व्याप्ती ११,४०० कोटी रुपये इतकी असल्याचा मुख्य आरोप आहे.हा घोटाळा नक्की कसा झाला, यात कोण कोण सहभागी आहेत, घोटाळ्याची व्याप्ती किती आहे आदी बाबींचा शोध तपास यंत्रणा घेत असल्याचे व पंजाब नॅशनल बँक पूर्ण सहकार्य करत असल्याचे मेहता म्हणाले. ज्या ज्या बँकांचा या घोटाळ्याशी संबंध आहे त्या सगळ्यांची मिळून एक समिती स्थापन करण्यात येत असल्याची व तपास यंत्रणांना सहकार्य करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोअर बँकिंग सिस्टिम किंवा सीबीएसला डावलून काही व्यवहार झाल्याचे किंवा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आल्याचे मेहता म्हणाले. ते आल्यावर २९ जानेवारी रोजी लगेचच तपास यंत्रणा व सेबीला कळवण्यात आल्याचे व कारवाई सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंजाब नॅशनल बँक अत्यंत सक्षम बँक असून कुठल्याही परिस्थितीला सामोरी जाण्यास सज्ज असून बँकेच्या ग्राहकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मल्ल्यापेक्षाही मोठा घोळ
याबाबत सीबीआयच्या सूत्रांनी स्पष्ट माहिती देण्यास नकार दिला. मात्र आधी २८० कोटी रुपये व आता ११,५०० कोटी रुपये, या दोन्ही घोटाळ्यांची कार्यपद्धती सारखीच आहे. त्यामुळे आता सीबीआयने या संपूर्ण घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे. हा विजय मल्ल्यापेक्षाही मोठा बँक घोटाळा आहे, असे सांगण्यात आले.
तीन बँका संकटात
या घोटाळ्यात संबंधितांनी विदेशात राहून अन्य बँकांकडून कर्जे घेतल्याचे पंजाब नॅशनल बँकेने पत्रात नमूद केले आहे. अन्य बँकांमध्ये अलाहाबाद बँक, युनियन बँक आॅफ इंडिया व खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेचा समावेश असल्याचे बोलले जाते.
सर्वसामान्यांची रक्कम धोक्यात
पीएनबीमध्ये रिझर्व्ह बँक व सर्वसामान्य ठेवीदार यांच्यामार्फत पैसा येतो. समभागधारकांचाही पैसा बँकेत आहे. घोटाळ्याची तक्रार करताना बँकेने ‘संशयास्पद व्यवहार’ असा उल्लेख केला आहे. ही खाती सर्वसामान्य ठेवीदारांची असून घोटाळा केलेल्यांची नावेही बँकेला माहीत नाहीत.
अधिक माहिती
http://www.niravmodi.com
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.