हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विरुद्ध कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत लोकसभा निवडणूक लढवणार
माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला लाभ तर खासदार राजू शेट्टी यांना या मतदारसंघात जखडून ठेवल्याने इतर ठिकाणी प्रमुख राजकीय पक्षांना लाभ
हातकणंगलेमधील जनतेला आता बहुजन चेहरा हवा आहे. बहुजन समाजातीलच व्यक्तीला हातकणंगले मतदारसंघातील जनतेला खासदार करायचं आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे. खर तर त्यांनी हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं यापूर्वी देखील वारंवार स्पष्ट केले आहे. पुन्हा-पुन्हा वक्तव्य त्यांना करावे लागत आहे कारण राज्यातील विविध भागात सदाभाऊ खोत यांना विरोधाचा सामना करावा लागत आहे. नुकतेच कुर्डुवाडी येथील कार्यक्रमाला जात असताना काही शेतकरी आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर दगडफेक केली होती तसेच त्यांना काळे झेंडे दाखवले होते. त्यापूर्वीही जालना जिल्ह्यातील दौऱ्या वेळी देखील सदाभाऊंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रोषाचा सामना करावा लागला होता. जालना दौऱ्यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंना काळे झेंडे दाखवत तीव्र विरोध दर्शवला होता, त्यामुळे सदाभाऊंना आपला दौरा अर्धवट सोडावा लागला होता. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर ते सडकून टीका करीत आहेत. खासदार राजू शेट्टी यांच्यापासून व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून वेगळे करण्यात सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीला यश आले आहे. सातत्याने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजितदादा पवार यांच्यावर टीका करून विरोधी वातावरण निर्माण करण्यात राजू शेट्टी यांना यश आले होते म्हणून खासदार राजू शेट्टी यांच्यापासून व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून वेगळे करण्यात राष्ट्रवादीला देखील रस होता. खासदार राजू शेट्टी यांना या मतदारसंघात जखडून ठेऊन इतर ठिकाणी राजकीय लाभ घेण्याची भूमिका असावी, कर्तृत्व, कार्याच्या जोरावर निवडणुकीत यश मिळवणाऱ्या राजू शेट्टी यांना आता जातीयवादी राजकारणाला सामोरे जावे लागणार आहे. कारण ज्या जातीय वादी संघटनांच्या आधारावर हातकणंगलेमधील जनतेला आता बहुजन चेहरा हवा आहे, असे वक्तव्य कृषीराज्यमंत्री करीत आहेत त्यांची हि भूमिका निवडणुकीत निश्चितच त्यांनाच अडचणीत आणणारी आहे. हातकणंगले मतदारसंघात ठराविकच जातीय संघटनेची मक्तेदारी नसून हा मतदारसंघ जातीवर आधारित लोकप्रतिनिधींची निवड करीत नाही हे मागील सर्व निवडणुकांमधून सिद्ध झाले आहे. रयत क्रांती संघटना ही राजकीय संघटना नाही. शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही संघटना आहे. आगामी लोकसभा अथवा विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस सांगतील तेथून माझ्यासह कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर लढतील, अशी भूमिका कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यापूर्वीच जाहीर केलेली आहे.शेट्टी यांचा सध्याचा हातकणंगले मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेस विचारांचा आहे. काँग्रेसच्या बाळासाहेब माने यांनी १९७७ ते १९९१ या काळात येथून पाच वेळा बाजी मारली. त्यानंतर काँग्रेसकडून कल्लाप्पा आवाडे यांनी दोनदा विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर माने घराण्यातल्या निवेदिता माने हातकणंगल्यातून दोनदा खासदार झाल्या. सन २००९ मध्ये राजू शेट्टी यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून येथून दणदणीत विजय मिळवला. पुढे २०१४ च्या निवडणूक जागावाटपात ‘राष्ट्रवादी’ने हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला बहाल केला. त्याही वेळी शेट्टी यांनी विजयी घोडदौड कायम राखली.मराठा, जैन आणि लिंगायत या तीन समूहांचे हातकणंगल्यात वर्चस्व आहे. जैन समाजाचे सुमारे दीड लाख मतदान या मतदारसंघात आहे. स्वतः जैन असलेल्या शेट्टींनी या मतपेढीसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मते मोठ्या प्रमाणावर मिळवत आपले बस्तान बसवले आहे. प्रामाणिक प्रतिमा असलेल्या शेट्टींना सामान्य शेतकरी वर्गातून मिळणारे पाठबळ कायम आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार शिवसेनेकडे आहेत. एक भाजपकडे आणि दुसरा राष्ट्रवादीकडे आहे. शेट्टींच्या पराभवासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी कंबर कसली आहे. इस्लामपूरचे आमदार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनाही शेट्टी नको आहेत.
कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवली तर काय होऊ शकते?
कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत (रयत क्रांती संघटना) - गावापासून २०० किमी अंतरावर जाऊन माढा लोकसभा मतदारसंघात गतवेळची लोकसभा निवडणूक लढविली होती. तेव्हा मला पाच लाख मतदारांनी मते देत माझ्यावर मोठा विश्वास दाखविला होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत माझी हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी असणार आहे. त्यामुळे हातकणंगले हा तर माझा घरचा मतदारसंघ आहे. माझ्यासह कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर लढतील, अशी भूमिका आहे. ज्या जातीय वादी संघटनांच्या आधारावर हातकणंगलेमधील जनतेला आता बहुजन चेहरा हवा आहे, असे वक्तव्य करीत आहे ते त्यांनाच अडचणीचे असेल. बहुजन चेहरा हि भूमिका + भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर उमेदवारी यामुळे सत्ता विरोधी मते आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांची फुट याचा विपरीत परिणाम शक्य.
खासदार राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना) - भारतीय जनता पक्ष विरहित इतर राजकीय पक्षांशी आघाडी केली तर यशाचा आशावाद कायम.
भारतीय जनता पक्ष- या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली नसल्याने अंतर्गत सर्व विधानसभा मतदारसंघात प्रभाव नाही. संघटनात्मक अभाव, इचलकरंजी व शिराळा विधानसभा असल्या तरीही यापेक्षा इतर विरोधीपक्ष संघटनांची ताकद जास्त आहे. खासदार राजू शेट्टी यांना या मतदारसंघात जखडून ठेऊन इतर ठिकाणी राजकीय लाभ घेण्याची भूमिका, म्हणून मित्रपक्ष सहकारी यांना मदत करण्याची तयारी.
शिवसेना - या मतदारसंघातील अंतर्गत ३ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार असले तरी स्वतंत्रपणे उमेदवार देऊन यश मिळेल अशी राजकीय सद्यस्थिती नाही त्यामुळे भाजप विरोधी भूमिका घेऊन विद्यमान खासदार राजू शेट्टी यांना पाठींबा देऊन इतर ठिकाणी राजकीय लाभ घेण्याची भूमिका असेल.
राष्ट्रवादी - सातत्याने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजितदादा पवार यांच्यावर टीका करून विरोधी वातावरण निर्माण करण्यात राजू शेट्टी यांना यश आले होते म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना रोखण्यात राष्ट्रवादीला देखील रस होता. कारण माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार लोकप्रतिनिधीत्व करीत असताना या मतदारसंघात अनेक वेळा आंदोलन करून जनविरोधी वातावरण निर्माण केले याचा परिणाम राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी निवडणूक न लढविण्याचा घेतलेला निर्णय होय, गेल्या २०१४ सार्वत्रिक निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांना सदाभाऊ खोत(महायुती) 4,89,989 मते मिळाली होती तर विजयसिंह मोहिते पाटील(राष्ट्रवादी, आघाडी) 4,64,645 मते मिळवून केवळ २५ हजारांच्या फरकाने यश मिळाले होते. हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या सदाभाऊ खोत यांच्या निर्णयाचा माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला निश्चितच लाभ मिळणार आहे. या निर्णयाने विरोधक राजू शेट्टी यांना रोखण्याची संधी राष्ट्रवादीला मिळेल. खासदार राजू शेट्टी यांना या मतदारसंघात जखडून ठेऊन इतर ठिकाणी राजकीय लाभ घेण्याची भूमिका असेल.
कॉंग्रेस - हातकणंगले मतदारसंघातून काँग्रेसला अनेकदा यश मिळाले आहे, जागावाटपात एक वेळ राष्ट्रवादीला देखील संधी या ठिकाणी दिली होती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उमेदवारीचा परिणाम मतांमधील विभाजनात होऊ शकतो आणि त्याचा लाभ कॉंग्रेसला मिळेल, भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर सदाभाऊ खोत लढतील यामुळे आघाडी केली तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देखील हि जागा सोडण्याची तयारी कॉंग्रेसची असू शकते.
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
(Written by Partha Sarathi Biswas| Pune | Published: February 27, 2018 5:25:38 pm)
Political analyst Chandrakant Bhujbal said that Khot standing from Hathkhanagale might restrict Shetti to his area only. “That will help the BJP in other constituencies as he will not be free to campaign across the state,” he said.
Hours after his convoy was attacked allegedly by members of the Swabhimani Shetkari Sanghatana in Solapur, Minister of State for Agriculture Sadashiv Khot indicated he was more than ready to take on his erstwhile leader and Swabhimani Shetkari Sanghatna founder, MP Raju Shetti. Speaking to The Indian Express, Khot said he will be ready to take on Shetti from the latter’s constituency of Hatkhanagale in Kolhapur.
“If the chief minister commands, I will be ready to fight the upcoming general elections from there,” the minister said. Khot said he would be fighting to represent the Bahujan Samaj in the area. When asked about his definition of Bahujan Samaj, Khot obliquely said it would include every section of the society and not just the dominant Maratha voters. Rayat Kranti Manch, the farmer outfit launched by Khot, would be facing elections in collaboration with the BJP. “The fine details will be worked out later,” he said.
Once considered the right hand man of Shetti, Khot was expelled from the Sanghatna last year for his alleged anti-party activities. The minister’s fortunes in the party has been on the wane since 2016 after he was inducted as a minister in the state cabinet. He was accused of cosying up with the BJP and turning a blind eye to the agrarian crisis in the state. During the farmers’ strike last year the minister was accused of trying to sabotage the strike. Khot had stood for elections from the Madha constituency in Soalpur in 2014 and had polled more than 5 lakh votes.
Spread across the districts of Sangli and Kolhapur, Hathkhanagale has seen high voltage battle of ballot over the two general elections. Shetti, a Jain, had trounced Nivedita Mane, a senior NCP leader from the Maratha community, in 2009 while he had made another senior NCP leader Kallappa Awade bite the dust in 2014. Awade was incidentally a Jain. Hathkhanagale has a healthy mixture of both Jains and Marathas.
Shetti’s victory in an otherwise strong Maratha belt is attributed to his strong grassroot level presence and his hold among the cane cultivators. Asked for his reaction to Khot’ statement, Shetti brushed it aside saying democratic principles allow people to stand for elections from anywhere. To Khot’s reference to the Bahujan Samaj, Shetti said such polarization was tried in the last two elections but to no avail. Post severing ties with BJP, Shetti has become a strong critic of both the state and central governments.
Political analyst Chandrakant Bhujbal said that Khot standing from Hathkhanagale might restrict Shetti to his area only. “That will help the BJP in other constituencies as he will not be free to campaign across the state,” he said.
======
साभार संदर्भ- शरद जोशी यांनी स्थापन केलेल्या पक्षाची भूमिका भाजपधार्जणिी असल्याच्या कारणावरून शेट्टी-खोत या दोघांनी स्वाभिमानीची वेगळी चूल मांडली. मात्र, साखर कारखानदारीवर असलेला काँग्रेस-राष्ट्रवादीचा पगडा मोडण्यासाठी भाजपचे गोपीनाथ मुंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाआघाडी एकत्र आली. यामध्ये स्वाभिमानीही सहभागी झाली. लोकसभा निवडणुकीवेळी हातकणंगले आणि माढा हे दोन मतदारसंघ स्वाभिमानीने घेतले. ही शेट्टी आणि खोत यांच्यासाठी राजकीय सोय होती. मात्र, कोणताही राजकीय वारसा नसताना खोत यांनी माढय़ात चांगली लढत दिली. आíथक बाजू कमकुवत असताना खोत यांनी चांगली धडक दिली असली तरी याच वेळी शेट्टी म्हणावे तसे लक्ष देत नाहीत असा खोत यांचा तक्रारीचा सूर होता. राजकीय तडजोडीतून विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेतील वाटा म्हणून खोत यांना विधान परिषदेवर आणि रविकांत तुपकर यांना महामंडळ अशी वाटणी मिळाली. मात्र, सत्तेत एकेक पद मिळाले की, त्यावरील खुर्ची खुणावत राहते. यातच खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करून भाजपच्या कोटय़ातील मंत्री पद पटकावले. एकजण शेतकऱ्यांसाठी बांधावर लढाई लढत असताना साथीदार मात्र सत्तेच्या सावलीत विराजमान झाल्याने कार्यकर्तेही अस्वस्थ होत गेले. यातच शेतकरी कर्जमाफीसाठी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांचा अभूतपूर्व संप सगळेच राजकीय संदर्भ बदलणारा ठरला. हा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राज्यमंत्री खोत यांच्यावर होऊ लागला. ही भूमिका चळवळीला मारक असल्याचे लक्षात येताच खासदार शेट्टी यांनी विरोधी भूमिका घेत आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी सरकारविरोधी भूमिका घेतली. यातच जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये खोत यांनी मुलगा सागर खोत याला राजकीय वारसदार म्हणून पुढे आणण्याचा केलेला प्रयत्न चळवळीला मारक ठरू शकतो हे लक्षात येताच खोत यांना सावधतेचा इशारा देत भाजपशी फारकत घेण्याचे सल्ले देण्यात आले. मात्र, खोत यांना मुख्यमंत्री फडणवीस यांचा सक्रिय पािठबा असल्याने खोत हे ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने हा संघर्ष तीव्र होत गेला. तो आता रस्त्यावर आला आहे. मने तर वर्षांपूर्वीच दुभंगली होती, आता प्रत्यक्ष हा संघर्ष दिसू लागला आहे. लहान संघटनांना सोबत घेऊन मतांची बेरीज वाढवायची आणि संघटना, राजकीय पक्ष गिळंकृत करायचे अशी काही राजकीय पक्षांची भूमिका राहिली आहे. असाच प्रकार स्वाभिमानीबाबत होण्याची लक्षणे दिसताच शेट्टी यांनी स्वतचे अस्तित्व राखण्यासाठी पावले उचलली. यासाठी सातत्याने टीकेचे लक्ष्य केला जाणाऱ्या राष्ट्रवादीशी सोयरीकही त्यांच्या दृष्टीने अस्पृश्य राहिलेली नाही. राज्यमंत्री खोत हे भाजपमध्ये जाण्यास तयारच होते. मात्र, त्यांना भाजपमध्ये घेतले तर त्याचा फारसा लाभ पक्षाला मिळाला नसता. यापेक्षा कृष्णा वारणा खोऱ्यात असलेला ऊस उत्पादक शेतकरी भाजपला हवा आहे. दोन जातींत ही संघटना विभागली झाली असली तर त्याचा राजकीय लाभ पक्षाला मिळू शकतो हे ओळखून खोत यांना स्वतंत्र संघटना काढण्याचा सल्ला देण्यात आला. यामुळेच स्वाभिमानीतून बाहेर पडून खोत यांनी रयत क्रांती ही संघटना जन्माला घातली. मात्र, कोणतीही संघटना ही संघर्षांतूनच उदयाला येते हा इतिहास आहे. मात्र, खोतांची संघटना सत्तेच्या सावलीत जन्माला आली असल्याने अपेक्षेने कार्यकत्रे जवळ आले आहेत. सर्वाच्या सर्व अपेक्षा एकाच वेळी पूर्ण करणे कोणालाही शक्य नाही. यामुळेच ही संघटना अद्याप बाळसे धरू शकली नाही. रयत क्रांती कोणत्याही निवडणुकीला सामोरे गेलेली नसल्याने संघटनेची ताकदही कळलेली नाही. मात्र, ज्या वेळी एखाद्या संघटनेचे उपद्रवमूल्य जितके असते त्याच वेळी त्या संघटनेच्या पदरात जास्त पडते हा साधा व्यवहार आहे.आज कोणत्याही निवडणुका नसल्या तरी सर्जा-राजाच्या वैयक्तिक संघर्षांत रस्त्यावरचा कार्यकर्ता मात्र, एकमेकांच्या विरोधात उभा ठाकला आहे. हा रस्त्यावरचा संघर्ष दोघांनाही नवीन नसला तरी एकाला सत्तेची ऊब तर, दुसऱ्याला आगामी राजकीय वाटचालीची गरज आहेच. यातूनच दोघांनाही करावा लागणारा संघर्ष हा स्वअस्तित्वासाठी आवश्यक असल्याने हा संघर्ष नजीकच्या काळात तीव्र झालेला पाहावयास मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र, अस्तित्वाची लढाई काठावर बसून पाहण्याची मौज मात्र भाजप घेणार आहे. दुसऱ्या बाजूला खोत विधान परिषदेचे सदस्य असल्याने त्यांनाही फारशी राजकीय तडजोडीची सध्या गरज नाहीच, भाजपने सांगितले तर निवडणुकीचा फड रंगवायला जायचे अन्यथा, बरं चाललंय की, अशी भूमिका आहेच. मात्र, या राजकीय संघर्षांत शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटणार? ऊस दराचे काय? हेच खरे प्रश्न आहेत.हातकणंगले मतदारसंघात शेट्टी यांना पर्याय शोधण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. याला प्रत्युत्तर देण्यासाठीची रणनीती शेट्टी यांच्याकडून आखली जात आहे. जिल्ह्यातील वाळवा, शिराळा हे दोन विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. सध्या वाळव्यात राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि शिराळ्यात भाजपचे शिवाजीराव नाईक हे विधानसभेत प्रतिनिधीत्व करीत आहेत. मात्र, दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहेच, याचबरोबर स्वाभिमानीचीही ताकद आहे. हीच ताकद विभागण्याचा प्रयत्न सुरु आहे.
राजू शेट्टींची 'हात' मिळवणी! (19 march 2018)
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेससोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी राजू शेट्टी यांनी २९ मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या शेतकरी मेळाव्याचे निमंत्रणही राहुल गांधी यांना दिले. केंद्र सरकारवर टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस या दोन पक्षांनी ‘अविश्वास’ ठराव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ठरावाला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे. सर्व राजकीय पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) विरोधात एकवटले असताना स्वाभिमानीनेही यूपीएसोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आमचा पक्ष सध्या इतका मोठा नाही की आमदारांना निवडून आणू शकतो. राजकीय कारकिर्दीत काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात, असे खासदार राजू शेट्टी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. दिल्लीत झालेल्या या भेटीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश उपस्थित होते. एनडीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. शेतकऱ्याविषयीच्या योजनांमुळे स्वाभिमानी सरकारवर नाराज आहे. असे असताना राजू शेट्टी यूपीएमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.
हातकणंगले मतदारसंघात ज्ञानेश्वर मुळे विरुद्ध राजू शेट्टींची लढत?
देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिवपदाची धुरा सांभाळणारे ज्ञानेश्वर मुळे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील लाट या गावचे आहेत.प्रसिद्ध प्रशासकीय अधिकारी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे येत्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे.सध्या देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिवपदाची धुरा सांभाळणारे ज्ञानेश्वर मुळे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील लाट या गावचे आहेत.त्यामुळे आपल्याच मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत. जर त्यांनी निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं, तर हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासमोर ज्ञानेश्वर मुळे यांचं कडवं आव्हान असेल.मात्र याबाबत ज्ञानेश्वर मुळे यांनी अधिकृत होकार किंवा नकार दिलेला नाही.ज्ञानेश्वर मुळे यांच्या 'माती, पंख नि आकाश', 'पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया', 'शांती की अफवांए', 'होतच नाही सकाळ', ज्ञानेश्वर मुळे की कविताएः प्रातिनिधीक संकलन या पुस्तकांचं प्रकाशन, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं. पुण्यात झालेल्या या कार्यक्रमानंतर मुळे यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या.मोहन भागवत यांच्या हस्ते पुस्तकांचं प्रकाशन झाल्यामुळे, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावलेही यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.ज्ञानेश्वर मुळे हे येत्या डिसेंबरमध्ये निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय प्रवेशाबाबत विचारण्यात आलं.त्यावेळी मुळे म्हणाले, “मला वाटतं चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे. मी भाजपच्या जवळचा आहे, हा आरोप पूर्णत: चुकीचा आहे. मी सर्वपक्षांच्या नेत्यांना भेटत असतो. मी 2019 ची निवडणूक लढवण्याबाबतच्या चर्चेबद्दल बोलायचं झालंच, तर सध्य स्थितीला ना माझा होकार आहे ना नकार”
कोण आहेत ज्ञानेश्वर मुळे?
सध्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यरत
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेला अधिकारी म्हणून परिचीत
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील लाट या गावी जन्म
* 1983 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू
* जपान, रशिया, मॉरीशस, सीरिया इत्यादी देशात महत्वाच्या हुद्द्यांवर काम.
* 2009 ते 2013 पर्यंत मालदीवमध्ये भारताचे उच्चायुक्त होते
* 2013 ते 2016 दरम्यान भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून काम
* मुळे यांचं 'माती,पंख आणि आकाश' हे आत्मचरित्र तरुणांसाठी प्रेरणादायी
* जवळपास 15 पेक्षा जास्त पुस्तकांचं लेखन
* मुळे यांच्या पुस्तकांचं हिंदी, उर्दू, कन्नड, अरेबीत भाषांतर
* नागरिकांना जलद आणि सहज पासपोर्ट उपलब्ध करुन देण्याची संकल्पना मुळे यांचीच
* पासपोर्टची प्रक्रिया सुलभ करण्याचा काम मुळे यांनी केलं.
अधिक तपशीलवार माहितीसाठी- राज्यातील 48 लोकसभा व 288 विधानसभा मतदारसंघांतील अंतर्गत सर्वेक्षण पूर्ण: संबंधित सर्वेक्षणाचा अहवाल "प्राब" कडे उपलब्ध आहे.
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
---0----0----0----0----0---0----0----0----0----0---0----0----0----0----0---0----0----0---
---0----0----0----0----0---0----0----0----0----0---0----0----0----0----0---0----0----0---
चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित
"महाराष्ट्रातील राजकारण" पुस्तक आगामी निवडणुकांसाठी उपयुक्त
HTTP://PRABINDIA.BLOGSPOT.IN/2018/02/BLOG-POST_19.HTML
अनुक्रमणिका
अ.क्र. तपशिल पान क्र.
1 महाराष्ट्र मतदार संघ पुर्नरचना 25
2 आजची संसद रचना व स्वरूप 27
3 निवडणूक संबंधीचे गुन्हे व त्यांची माहिती 31
4 लोकप्रतिनिधी कायद्यात महत्वपूर्ण सुधारणा 34
5 भारतातील निवडणूक कायदे 36
6 नकारात्मक मतदान अधिकार 39
7 निवडणूक लढविण्याची पुर्वतयारी व प्रभावी प्रचारतंत्र 40
8 हंगामी सरकार 1947 ते 1952 42
9 पहिली लोकसभा 1952 ते 1957 43
10 दूसरी लोकसभा 1957 ते 1962 46
11 तिसरी लोकसभा 1962 ते 1967 49
12 चवथी लोकसभा 1967 ते 1971 53
13 पाचवी लोकसभा 1971 ते 1977 56
14 सहावी लोकसभा 1977 ते 1980 58
15 सातवी लोकसभा 1980 ते 1984 61
16 आठवी लोकसभा 1984 ते 1988 63
17 नववी लोकसभा 1989 ते 1991 65
18 दहावी लोकसभा 1991 ते 1996 67
19 अकरावी लोकसभा 1996 ते 1998 69
20 बारावी लोकसभा 1998 ते 1999 72
21 तेरावी लोकसभा 1999 ते 2004 74
22 चौदावी लोकसभा 2004 ते 2009 77
23 पंधरावी लोकसभा 2009 ते 2014 80
24 सोळावी लोकसभा 2014 ते 2019 82
25 संयुक्त महाराष्ट्राची वाटचाल 85
26 पहिली विधानसभा 1960 विधानसभा अस्तित्वात 87
27 दूसरी विधानसभा 1962 ते 1967 नवनिर्मिती राज्याच्या राजकारणास प्रारंभ 88
28 तिसरी विधानसभा 1967 ते 1972 काँग्रेसला बहूमत 90
29 चौथी विधानसभा 1972 ते 1978 पुन्हा काँग्रेसला कौल 92
30 पाचवी विधानसभा 1978 ते 1980 काँग्रेसमध्ये फुट : पुलोदचे सरकार 95
31 सहावी विधानसभा 1980 ते 1985 इंदिरा काँग्रेसला बहुमत 97
32 सातवी विधानसभा 1985 ते 1990 काँग्रेसच्या मताधिक्यात घट 99
33 आठवी विधानसभा 1990 ते 1995 काँग्रेसला काठावरचे बहुमत 101
34 नववी विधानसभा 1995 ते 1999 भाजप-शिवसेना युतीचे सरकार 104
35 दहावी विधानसभा 1999 ते 2004 राष्ट्रवादीचा उदय 107
36 अकरावी विधानसभा 2004 ते 2009 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार 109
37 बारावी विधानसभा 2009 ते 2014 मनसेचा उदय व आघाडीचे राजकारण 113
38 तेरावी विधानसभा 2014 ते 2019 भाजपला सर्वाधिक जागा 117
39 महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष 120
40 महाराष्ट्र विधानपरिषद सदस्यांची यादी 125
41 वृत्तपत्रांसाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शिका 128
42 सोशल मिडियाचा प्रचारातील वापर व सूचना 130
43 पेड न्युज म्हणजे काय? व नियंत्रण 131
44 निवडणूक काळात होणारी फसवणूक 134
45 महाराष्ट्रातील जातवास्तव 144
46 महाराष्ट्रातील राखीव मतदारसंघ 147
47 गडचिरोली जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 148
48 भंडारा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 151
49 गोंदिया जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 154
50 सिंधदुर्ग जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 157
51 नांदेड जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 160
52 चंद्रपूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 163
53 रत्नागिरी जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 166
54 लातूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 169
55 उस्मानाबाद जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 172
56 बीड जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 175
57 परभणी जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 178
58 नंदूरबार जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 181
59 अमरावती जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 184
60 यवतमाळ जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 187
61 सातारा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 190
62 वर्धा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 193
63 हिंगोली जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 196
64 बुलढाणा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 199
65 रायगड जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 202
66 जालना जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 206
67 नागपूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 209
68 अकोला जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 212
69 धुळे जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 215
70 नाशिक जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 217
71 जळगाव जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 220
72 सोलापूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 223
73 वाशिम जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 226
74 औरंगाबाद जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 229
75 अहमदनगर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 232
76 पुणे जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 235
77 ठाणे जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 238
78 सांगली जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 241
79 मुंबई उपनगर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 244
80 कोल्हापूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 245
81 मुंबई जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 248
82 मतदान पद्धत-मतदानात झालेले तीन बदल.. 249
83 लोकसभा निवडणुक 2014; महाराष्ट्रातील दृष्टीक्षेप 250
84 राज्यातील लोकसंख्येनुसार प्रमाण व सद्यस्थिती 251
85 राज्यातील लोकसभा व विधानसभा 2014 मधील पक्षनिहाय स्थिती व प्रमाण 252
86 महाराष्ट्र राज्यातील वयोगटाप्रमाणे मतदार संख्या व प्रमाण 253
87 विधानसभेच्या 234 मतदारसंघात महायुतीला आघाडी (निवडणूक-2014) 254
88 लोकसभा निवडणूक 2014; उमेदवारांची सामाजिक स्थिती 255
89 लोकसभा व विधानसभा मतदारसंघ दर्शविणारा महाराष्ट्र राज्याचा नकाशा 256
90 लोकसभा मतदार संघातील रचना, निवडणूक विश्लेषण, जातीय प्रमाण व प्रभाव, राजकीय सद्यस्थिती, विधानसभा स्थिती, मतदारांची वर्गवारी (अनुक्रमे 1 ते 48 मतदारसंघ)
91 1. नंदूरबार लोकसभा मतदारसंघ 259
92 2. धुळे लोकसभा मतदारसंघ 264
93 3. जळगाव लोकसभा मतदारसंघ 269
94 4. रावेर लोकसभा मतदारसंघ 274
95 5. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ 279
96 6. अकोला लोकसभा मतदारसंघ 284
97 7. अमरावती लोकसभा मतदारसंघ 289
98 8. वर्धा लोकसभा मतदारसंघ 294
99 9. रामटेक लोकसभा मतदारसंघ 299
100 10. नागपूर लोकसभा मतदारसंघ 304
101 11. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ 309
102 12. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ 314
103 13. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ 319
104 14. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ 324
105 15. हिंगोली लोकसभा मतदारसंघ 329
106 16. नांदेड लोकसभा मतदारसंघ 334
107 17. परभणी लोकसभा मतदारसंघ 339
108 18. जालना लोकसभा मतदारसंघ 344
109 19. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ 349
110 20. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ 354
111 21. नाशिक लोकसभा मतदारसंघ 359
112 22. पालघर लोकसभा मतदारसंघ 364
113 23. भिवंडी लोकसभा मतदारसंघ 369
114 24. कल्याण लोकसभा मतदारसंघ 374
115 25. ठाणे लोकसभा मतदारसंघ 379
116 26. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ 384
117 27. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ 389
118 28. मुंबई उत्तर पुर्व लोकसभा मतदारसंघ 394
119 29. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ 399
120 30. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ 404
121 31. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ 409
122 32. रायगड लोकसभा मतदारसंघ 414
123 33. मावळ लोकसभा मतदारसंघ 419
124 34. पुणे लोकसभा मतदारसंघ 424
125 35. बारामती लोकसभा मतदारसंघ 429
126 36. शिरूर लोकसभा मतदारसंघ 434
127 37. अहमदनगर लोकसभा मतदारसंघ 439
128 38. शिर्डी लोकसभा मतदारसंघ 444
129 39. बीड लोकसभा मतदारसंघ 449
130 40. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ 454
131 41. लातूर लोकसभा मतदारसंघ 459
132 42. सोलापूर लोकसभा मतदारसंघ 464
133 43. माढा लोकसभा मतदारसंघ 469
134 44. सांगली लोकसभा मतदारसंघ 474
135 45. सातारा लोकसभा मतदारसंघ 479
136 46. रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघ 484
137 47. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ 489
138 48. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ 494
139 थोडक्यात महत्वाचे
लोकसभेत राज्यातील केवळ 5 महिला उमेदवार विजयी,लोकसभेत महिला खासदारांच्या प्रमाणात वाढ,लोकसभा निवडणुकीत 1,652 पक्षांना अपयश,आता मतदान यंत्रावर उमेदवारांचा फोटो,मतदानाची मिळणार पोचपावती,राजकीय पक्षाप्रमाणेच आता नोटाचं स्वतंत्र चिन्ह!, 16व्या लोकसभेत केवळ तीनच अपक्ष उमेदवारांना संधी
140 महाराष्ट्र राज्यातील राज्यसभेतील खासदार 499
141 लोकसभा, विधानसभेचा कार्यकाल व आगामी निवडणूका 502
142 देशभरातील सर्व विधानसभांचा कार्यकाल व आगामी निवडणूका 503
143 राज्यातील आगामी काळातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका 505
144 महाराष्ट्रातील विभागानुसार स्थानिक स्वराज्य संस्था दृष्टीक्षेप/आरक्षण स्थिती 507
145 राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 508
146 राज्यातील नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 510
147 नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2016 नगराध्यांची पक्षनिहाय संख्या 520
148 राज्यातील जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 521
149 राज्यातील पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 523
150 निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी निर्धारित केलेली निवडणूक खर्च मर्यादा 525
151 नोंदणीकृत राजकीय पक्ष व निवडणूक चिन्ह, संक्षिप्त नावे 526
152 संदर्भ, तळ टिपा 529
153 पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेची माहिती व कार्य 531
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री.चंद्रकांत भुजबळ
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
823/24, सदाशिव पेठ, गाडगीळ स्ट्रीट, पुणे 411030
फोन नं- 020-24481671 ई.मेल.- prab.election@gmail.com
वेबसाईट- prabindia.com / prabindia.org
================================================
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.