Tuesday, 6 February 2018

ऑंनलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेचा बोजवारा! ग्रामपंचायत निवडणूक २०१८ ; २ दिवसात एकही अर्ज दाखल नाही

निवडणूक कार्यक्रम निवड होत नसल्याने उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित


ऑंनलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेचा बोजवारा उडाला आहे. गेली २ दिवसात एकही अर्ज दाखल नाही. ग्रामपंचायत निवडणूक २०१८ करिता ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०१८ अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या ऑंनलाईन लिंकवर. .https://panchayatelection.maharashtra.gov.in/GrampanchayatForms/Registration.aspx
निवडणूक कार्यक्रम निवड होत नसल्याने उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहत आहेत. उमेदवाराचे रजिस्ट्रेशनच होत नसून रजिस्ट्रेशनकरिता निवडणूक कार्यक्रम निवड होत नाही हि समस्या निर्माण झाली आहे. निवडणूक विभागातील कर्मचारी/अधिकारी एकमेकांकडे भेटण्यासाठीचा सल्ला देऊन टोलवाटोलवी करीत आहेत.


पुणे जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका

पुणे जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. याव्यतिरिक्त रिक्त पदे असलेल्या २७४ ग्रामपंचायतीमधील ५७६ सदस्यांच्या निवडणुकीसाठी २५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. नामनिर्देशन अर्ज दिनांक ५ फेब्रुवारी २०१८ ते १० फेब्रुवारी २०१८ पर्यंत दाखल करता येणार आहेत तर 12 फेब्रुवारी- उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. 15 फेब्रुवारी- उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून २५ फेब्रुवारी २०१८ रोजी मतदान घेण्यात येणार असून २६ फेब्रुवारी २०१८ रोजी मतमोजणी होणार आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे-1, मावळ-६, भोर-९, जुन्नर-1 मुळशी-७ खेड-६ आंबेगाव- ७ या ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.




POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

9422323533

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.