Saturday, 24 February 2018

राज्यसभेच्या 58 जागांसाठी 23 मार्चला निवडणूक; कोणत्या राज्यातून कोणाला किती जागा मिळणार!

इतिहासात पहिल्यांदाच भाजप राज्यसभेत मोठा पक्ष

निवडणुकीआधीची स्थिती 

भाजप- 58

काँग्रेस- 54

निवडणुकीनंतरची स्थिती

भाजप - 69

काँग्रेस - 50

* 245 सदस्यांच्या राज्यसभेत 126 हा बहुमताचा आकडा आहे. या बहुमतापासून मात्र अजून बरेच दूर

* एनडीएच्या मित्रपक्षांची (टीडीपीला धरुन संख्या 17 होती) टीडीपी-6, शिवसेना-3, अकाली दल-3 पीडीपी-2 आणि काही छोटे पक्ष

* एकाचवेळी ज्या 59 जागांसाठी निवडणूक झाली त्यात भाजपने सर्वाधिक 28 जागा जिंकल्या, काँग्रेसच्या वाट्याला 10

१७ राज्यांमध्ये राज्यसभेच्या ५९ जागांची निवडणूक शुक्रवारी पूर्ण झाली. भाजपने २८ जागा जिंकल्या. १० राज्यांतील ३३ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. ७ राज्यांतील २६ जागांवर शुक्रवारी मतदान झाले. यामध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड, केरळ व तेलंगणाचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक १० जागा होत्या. भाजपने गोरखपूर-फुलपूर पोटनिवडणुकीतील पराभवाचा सूड घेत आपल्या सर्व ९ उमेदवारांना निवडून आणले. सपा-बसप आघाडीला अापले उमेदवार भीमराव आंबेडकर यांना विजय मिळवून देता आला नाही. क्रॉस व्होटिंगमुळे सुरुवातीस निवडणूक आयोगाने मतगणना रोखली होती. यानंतर दुसऱ्या पसंतीच्या मतांनी १० व्या जागेच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. यामध्ये भाजपचे नववे उमेदवार अनिल अग्रवाल विजयी झाले. त्यांनी बसपच्या भीमराव आंबेडकरांना पराभूत केले.


राज्यसभा निवडणूक: भाजपच्या विजया रहाटकरांचा अर्ज मागे, महाराष्ट्रातील सहाही खासदार बिनविरोध


राज्यसभेसाठी भाजपच्या चौथ्या उमेदवार असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दुपारी माघारी घेतला. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणारे सहाही खासदार बिनविरोध निवडून गेले आहेत. भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे व व्ही. मुरलीधरन यांच्यासह शिवसेनेचे अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण आणि काँग्रेस उमेदवार कुमार केतकर हे यंदा राज्यसभेवर गेले आहेत.राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत रंगत निर्माण होणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, भाजपच्या चौथ्या उमेदवार असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.राज्यसभेच्या निवडणुकीसाठी विधानसभेचे सदस्य मतदान करतात. यंदा सहा जागांसाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 42 मतांची गरज होती. मात्र, प्रत्येक पक्षाने आपापल्या विधानसभेतील संख्याबळानुसार उमेदवार दिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. हे खासदार पुढील महिन्यात राज्यसभेत प्रवेश करतील.

रेखा-सचिनसह राज्यसभेतील 52 सदस्य निवृत्त 

राज्यसभेच्या 58 जागांसाठी 23 मार्चला निवडणूक
केरळच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकही होणार

राणे अखेर भाजपचे उमेदवार म्हणून बिनविरोध

काँग्रेसला रामराम ठोकल्यावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार होते. पण शिवसेनेचा विरोध लक्षात घेता भाजपने त्यांना स्वतंत्र पक्ष काढण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राणे यांनी वेगळ्या पक्षाची स्थापना केली होती. राज्यसभेसाठी राणे यांनी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या संस्थापकानेच पक्षाचा राजीनामा देण्याची ही बहुधा पहिली वेळ असेल.







केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, कॉंग्रेस नेते प्रमोद तिवारी, राजीव शुक्‍ला, रेणुका चौधरी यांच्यासह अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत.एप्रिल-मे 2018 मध्ये राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. यामध्ये 16 राज्यांतील राज्यसभेच्या 58 जागा असून महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे.अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 12 मार्च आहे. 23 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार


वंदना हेमंत चव्हाण  - राष्ट्रवादी
डी. पी. त्रिपाठी  - राष्ट्रवादी
रजनी पाटील  - काँग्रेस
अनिल देसाई  - शिवसेना
राजीव शुक्ला - काँग्रेस
अजयकुमार संचेती - भाजप

केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांचा कार्यकाळ संपणार आहे. कॉंग्रेस नेते प्रमोद तिवारी, राजीव शुक्‍ला, रेणुका चौधरी यांच्यासह अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत.

कोणत्या पक्षाचे किती खासदार?

भाजप -17
कॉंग्रेस - 12
समाजवादी पक्ष - 6
जदयू - 3
तृणमूल कॉंग्रेस - 3
तेलुगू देसम पक्ष - 2
राष्ट्रवादी कॉंग्रेस - 2
बीजद - 2
बसप - 1
शिवसेना - 1
माकप - 1
अपक्ष  - 1
राष्ट्रपती नियुक्‍त - 3

संख्याबळानुसार आता महाराष्ट्रात राज्यसभेवर सहापैकी भाजपचे 3 उमेदवार, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

कोणत्या राज्यातील किती जागा?

आंध्र प्रदेश - 3
बिहार - 6
छत्तीसगड - 1
गुजरात - 4
हरियाणा - 1
हिमाचल प्रदेश - 1
कर्नाटक - 4
मध्य प्रदेश - 5
महाराष्ट्र - 6
तेलंगणा - 3
उत्तर प्रदेश - 10
उत्तराखंड - 1
पश्चिम बंगाल - 5
ओदिशा - 3
राजस्थान - 3
झारखंड - 2

याशिवाय केरळातील खासदार वीरेश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे त्या जागेसाठीही पोटनिवडणूक होईल. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचं राज्यसभेत सर्वाधिक संख्याबळ आहे.

निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी


.क्रसदस्यांचे नाव,            पक्ष,       सदस्यत्वाची मुदतसंपण्याचा दिनांक

(1) श्रीमती वंदना हेमंत चव्हाण      नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी    एप्रिल, 2018
(2) श्री.डी.पी.त्रिपाठी               नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी    2 एप्रिल, 2018
(3) श्रीमती रजनी अशोकराव पाटील   इंडियन नॅशनल काँग्रेस    2 एप्रिल, 2018
(4) श्रीअनिल यशवंत देसाई        शिवसेना                2 एप्रिल, 2018
(5) श्री.राजीव रामकुमार शुक्ला       इंडियन नॅशनल काँग्रेस    2 एप्रिल, 2018
(6) श्री.अजयकुमार शक्तीकुमार संचेती  भारतीय जनता पार्टी      2 एप्रिल, 2018

सन 2018 मध्ये निवृत्त होणार्या महाराष्ट्रातील सदस्यांची पक्षनिहाय संख्या


क्रमांक            पक्षाचे नाव           सदस्य संख्या
1.             नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी :       2
2.             इंडियन नॅशनल काँग्रेस :        2
3.             भारतीय जनता पार्टी :         1
4.             शिवसेना :                   1

               एकूण :                     6
===================================================== 
राज्यसभेचे वंदना चव्हाण आणि डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी), रजनी पाटील आणि राजीव शुक्ला (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना), अजयकुमार संचेती (भाजप) हे सहा सदस्य निवृत्त होत आहेत. राज्यसभेवर निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. सदस्यसंख्येनुसार भाजपचे तीन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य निवडून येऊ शकतो. शिवसेनेकडे २१ मते अतिरिक्त असली तरी शिवसेना दुसरा उमेदवार उभा करण्याचे धाडस करेल का, यावर बरेच अवलंबून असेल.
===================================================== 

मतदान कशा प्रकारे होते ?

मतदान हे खुल्या पद्धतीने होते. यानुसार राजकीय पक्षांच्या आमदारांना पक्षाने नियुक्त केलेल्या प्रतिनिधींना आपली मतपत्रिका दाखवावी लागते. अपक्षांना मतपत्रिका दाखविण्याचे बंधन नसते. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींऐवजी अन्य कोणाला मतपत्रिका दाखविल्यास मत बाद होते. अलीकडेच गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत दोन आमदारांनी मतपत्रिका अधिकृत प्रतिनिधींेऐवजी अन्य प्रतिनिधींना दाखविल्याने त्या दोन मतपत्रिका निवडणूक आयोगाने बाद ठरविल्या होत्या. खुल्या पद्धतीने मतदान होत असल्याने मते फुटण्यास वाव नसतो. कारण राजकीय पक्षांनी जारी केलेल्या पक्षादेशाच्या विरोधात मतदान केल्यास संबंधित आमदाराचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.

मतांचा कोटा कसा ठरतो?

विधानसभेच्या सर्व २८८ सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. नामनियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. मतांचा कोटा खालीलप्रमाणे निश्चित केला जातो.
* एकूण मतदार : २८८
* एकूण जागा : ६
* २८८ भागिले एकूण जागा सहा अधिक एक = २८८ भागिले सात = ४१.१४
*  यानुसार पहिल्या फेरीतील विजयाकरिता ४११४ मते आवश्यक ठरतात.

===================================================== 

शिवसेनेचे अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने अनिल देसाई तर राष्ट्रवादीने अ‍ॅड. वंदना चव्हाण या विद्यमान खासदारांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्ही पक्षांकडे पहिल्या पसंतीची पुरेशी मते असल्याने दोघांचाही विजय निश्चित मानला जातो.विद्यमान खासदार वंदना चव्हाण यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. शिवसेनेने अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्याबद्दल खासदार देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. वंदना चव्हाण आणि डी. पी. त्रिपाठी या राष्ट्रवादीच्या दोन खासदारांची मुदत संपुष्टात येत आहे. पक्षाचे ४१ आमदार असल्याने एकच उमेदवार निवडून येणार आहे. पक्षाने पुण्याच्या माजी महापौर व गेले सहा वर्षे राज्यसभेत चांगली कामगिरी केलेल्या वंदना चव्हाण यांनाच पुन्हा संधी दिली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला. अनिल देसाई हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. केंद्रात राज्यमंत्रिपदासाठीही त्यांचे नाव निश्चित झाले होते. शपथविधीसाठी ते दिल्लीत पोहचलेही होते, पण पक्षाने त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत संख्याबळानुसार भाजपचे तीन, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. भाजपचे १२२ आमदार असून, तिसरा उमेदवार निवडून येण्यात दहा मतांची आवश्यकता आहे. छोटे पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा असल्याने भाजपचे तीन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. शिवसेनेकडे २१ मते अतिरिक्तअसली तरी आणखी २१ मते मिळविणे शिवसेनेला शक्य नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जेमतेम मते असल्याने या दोन्ही पक्षांकडे दुसऱ्या पसंतीची मते देण्यासाठी वाव नाही. परिणामी शिवसेनेकडे अतिरिक्त मते असली तरी या मतांचा फायदा होणार नाही.
काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक-राज्यातून ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि विचारवंत कुमार केतकर यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.काँग्रेसने सात राज्यातील दहा उमेदवारांची यादी जाहीर केली. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. 



भाजप- भाजपने राज्यसभेसाठी 18 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसनेही एकूण 10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यसभेसाठी भाजपने एकूण 18 उमेदवारांची यादी जाहीर केली. यापैकी महाराष्ट्रातून तीन नावं आहेत. नारायण राणे आणि केरळमधील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कोट्यातून यावेळी प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन राज्यसभेवर जातील.





नारायण राणे यांचा भाजपला काय उपयोग?

नारायण राणे आक्रमक चेहरा व मराठा नेतृत्व म्हणून ओळख असल्याने निर्माण होणार्या राजकीय सद्यस्थितीत त्यांचा उपयोग करता येईल.
* काँग्रेस व शिवसेना बंडखोराना त्यांच्या पक्षाची उमेदवारी देऊन मतविभाजनाचा लाभ भाजपला कसा मिळेल याचा विचार व नियोजन 
*  विरोधकांना प्रत्युत्तरादाखल राणे यांचा उपयोग भाजपला लाभकारक ठरेल.
* आरक्षण मुद्यावरून सामाजिक संघटनांशी असलेली जवळकीचा लाभ मिळेल असा आशावाद
* कोकणात भाजपला अपेक्षितपणे राजकीय फायदा शक्य.

नारायण राणे यांनी ऑफर का स्वीकारली ? 

* नारायण राणे यांना या राजकीय सद्यस्थितीत राज्यसभेवर जाण्याची ऑफर स्वीकारण्याचा शिवाय दुसरा पर्याय नव्हता.
*  राज्यसभेवर जाऊन आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यावर भर 
* आगामी निवडणुका पुढील वर्षी एकत्रितपणे होणार असल्याने मंत्रिपद मिळाले तरी थोड्या कालावधीत काही उपयोग होणार नाही 
* राज्यसभेवर जाण्याची ऑफर दिल्यानंतर नितेश राणे यांच्या ट्विटने (साहेबांनी राज्यसभा नव्हे तर विधानसभेत जावे, अशी आमची इच्छा आहे. राणेसाहेब आमची ही मागणी लक्षात घेतील, अशी आशा 

करतो. आम्ही त्यांच्या निर्णयाची प्रतिक्षा करत आहोत), असे म्हटले होते. या कृतीवर भाजप श्रेष्ठींची नाराजी होती. ती पुढील राजकीयदृष्ट्या लाभासाठी दूर करणे गरजेचे होते.


मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या नारायण राणे यांना पुन्हा मंत्रिपद का मिळत नाही- 

* शिवसेनेतील बंडखोरी आणि सातत्याने शिवेनेवरील टोकावरील टीका यामुळे शिवसेनेचा मंत्रीमंडळ प्रवेशास विरोध
* नारायण राणे यांना मंत्रीमंडळात घेतल्यास शिवसेना मंत्रीमंडळातून बाहेर पडेल पाठींबा काढून घेतला जाईल अशी भाजपला भीती 
* भाजप मध्ये प्रवेशास स्थानिकांसह संघ पदाधिकारी यांचा विरोध; स्वतंत्र पक्ष स्थापन करून सलगीने राजकारण करण्याचा सल्ला.
* नारायण राणे याची भूमिका व त्यांच्या मुलांच्या भूमिकेत तफावत; वेगवेगळ्या प्रतिक्रियेमुळे संभ्रम; भाजप व संघ धोरण विरोधात मतप्रदर्शन त्यामुळे होणारा विरोध
* नारायण राणे यांचे राजकीय मूल्य हे वारंवार तडजोडीने कमी करण्यात भाजपला यश; राज्यसभेच्या प्रस्तावाने राज्य मंत्रीमंडळ प्रवेशाचे मार्ग बंद करण्यात भाजपला यश

==========================================
भाजपकडून राज्यसभेसाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर नारायण राणे यांनी भाजपकडून राज्यसभेसाठी अर्ज भरला असून राज्यसभेत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

भाजपकडून राज्यसभेसाठी चौथा उमेदवार: विजया रहाटकरही मैदानात; निवडणुकीत रंगत

महाराष्ट्रातून पुढील महिन्यात रिक्त होत असलेल्या राज्यसभेसाठी सहा जागांसाठी भाजपने आपला चौथा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या रूपाने भाजपने सातवा उमेदवार दिला आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. जर त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तर राज्यसभेची बिनविरोध निवडणूक ढळणार आहे. दरम्यान, आपल्या पक्षाच्या एखाद्या उमेदवाराचा अर्ज रद्दबादल ठरू नये म्हणून खबरदारीचा उपाय रहाटकर यांचा अर्ज दाखल केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, पुढील तीन तासात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. भाजपने यापूर्वीच नारायण राणे, प्रकाश जावडेकर, केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभेतील सदस्य संख्याबळानुसार भाजपचे तीनच उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, भाजपने आता चौथा उमेदवार दिला आहे. तर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी 1-1 उमेदवार निवडून येऊ शकतो. यासाठी काँग्रेसने ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत कुमार केतकर यांना संधी दिली आहे तर, शिवसेना व राष्ट्रवादीने आपापले विद्यमान खासदार अनिल देसाई आणि वंदना चव्हाण यांना रिंगणात उतरवले आहे.

भाजपने संचेती यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारली

नागपुरातील भाजपचे ज्येष्ठ नेते व विद्यमान राज्यसभा सदस्य अजय संचेती यांना पक्षाने पुन्हा राज्यसभेवर न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने आज महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात संचेती यांच्या नावाचा समावेश नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न संचेती यांना महागात पडला आहे. गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर संचेती यांचे पक्षात महत्त्व वाढले होते. गडकरी यांच्या प्रयत्नामुळेच संचेती यांना २०१२ मध्ये राज्यसभेची उमेदवारी मिळाली होती. राज्यात सत्ताबदल होऊन मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर संचेती यांचा कल फडणवीस यांच्याकडे दिसून आला. ते फडणवीस यांच्या प्रत्येक कार्यक्रमांत दिसू लागले होते. त्यामुळे गडकरी गटात नाराजी होती. त्याचा फटका संचेती यांना बसला आणि त्यांचे दुसऱ्यांदा राज्यभेत जाण्याचे स्वप्न भंगले आहे. महाराष्ट्रातून भाजपने चक्क केरळचे व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळ आपटे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अजय संचेती यांना २०१२ मध्ये उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्रातून भाजनपे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्यभेची उमेदवारी दिली आहे.




 16 राज्यातील राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान झाल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 10, तर महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. विधानसभेचे संख्याबळ पाहता, राज्यातील तीन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जातो.प्रकाश जावडेकर हे विद्यमान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असून ते सध्या मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेले आहेत. त्यामुळे आता ते होम ग्राऊंडवरुन म्हणजे महाराष्ट्रातून राज्यसभेत जातील. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करुन एनडीएत सहभाग घेतला. मात्र राज्यातील मंत्रिपदाच्या आशेवर असणारे राणे आता राज्यसभेच्या दिशेने कूच करत आहेत. एकनाथ खडसे आरोपांच्या जंजाळात अडकल्यापासून मंत्रिमंडळापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांना दिल्लीत नेण्याच्या पक्षाच्या हालचाली होत्या, मात्र खडसे त्यासाठी अनुत्सुक होते.सचिन तेंडुलकर, रेखा, अनु आगा या तिघांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती नियुक्त तीन नवे खासदार कोण असणार याचीही उत्सुकता आहे.

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) PUNE

===================================================== 
सचिन तेंडुलकर--27 एप्रिल 2012 रोजी खासदार म्हणून नियुक्त. संसदेत काहीही बोलू शकला नाही. गेल्या हिवाळी अधिवेशनात बोलण्यासाठी 7 मिनिटे उभा राहिला पण गोंधळामुळे बोलू शकला नाही.22 लेखी प्रश्न विचारले. त्यापैकी 8 प्रश्न रेल्वेशी संबंधित होते. सरकारने सचिनला दोनच आश्वासने दिली.
रेखा --27 एप्रिल 2012 ला राज्यसभेत पाऊल ठेवले. एखही प्रश्न विचारला नाही. काहीही स्पेशल मेन्शन नाही. एकही प्रायव्हेट बिल सादर केले नाही. उपस्थितीत्या 78 टक्के राष्ट्रीय सरासरीशी तुलना करता त्या फक्त 5% काळ उपस्थित राहिल्या.
जया बच्चन--सपा खासदार म्हणून राज्यसभेवर 3 एप्रिल 2012 ला निवड. चर्चांमध्ये सहभाग, प्रश्न विचारल्यावर आणि स्पेशल मेन्शनअंतर्गत मुद्दे उचलण्याचा चांगला रेकॉर्ड. त्यांची संसदेमध्ये 77% टक्के उपस्थिती राहिली. 143 चर्चांमध्ये सहभाग घेतला, 143 प्रश्न विचाराले.
===================================================== 

कोणत्या पक्षाचे किती जण होणार निवृत्त

भाजप17
काँग्रेस11
सपा06
राष्ट्रपतींद्वारे नियुक्ती03
तृणमूल काँग्रेस03
बीजेडी02
जदयू02
राष्ट्रवादी काँग्रेस02
माकप01
बसप01
अपक्ष01
शिवसेना01
टीडीपी02


कोणत्या राज्यातून कोणाला किती जागा मिळणार

* महाराष्ट्र- राज्यातील राज्यसभेचे सहा सदस्य एप्रिलमध्ये निवृत्त होणार आहेत. रिक्त जागेपैकी दोन भाजपला तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळू शकते. सहाव्या जागेसाठी मोठी चुरस होण्याची शक्यता आहे. 
* उत्तर प्रदेश- सध्याच्या विधानसभेच्या स्थितीनुसार या राज्यातील राज्यसभेच्या 9 पैकी 7 जागा भाजपला तर काँग्रेसला चार जागा मिळतील. तर सपाला दोन जागा मिळतील.  
* मध्य प्रदेश- येथील राज्यसभेच्या पाच पैकी चार जागा भाजपला तर काँग्रेसला एक जागा मिळू शकते. 
* आंध्र प्रदेश- तीन पैकी दोन जागा तेलगु देशम पक्षाला तर एक जागा अन्य पक्षाला मिळू शकते. 
* कर्नाटक- येथील चार पैकी तीन जागा काँग्रेसला तर एक जागा भाजपला मिळू शकते. 
* पश्चिम बंगाल- राज्यातील चार पैकी तीन जागा तृणमूल काँग्रेसला तर एक जागा माकपला मिळण्याची शक्यता आहे. 
* गुजरात- राजसभेच्या चार पैकी दोन जागा भाजपला तर दोन काँग्रेसला मिळतील.  
* बिहार- येथील पाच पैकी 3 जागा जदयू-भाजपला तर 2 जागा राजद-काँग्रेस यांना मिळू शकते
* तेलंगणा- दोन पैकी एक टीआरएसला तर एक काँग्रेसला मिळू शकते.  
* राजस्थान- येथील तिन्ही जागा भाजपलाच मिळतील.
* ओडिसा- 3 पैकी दोन जागा बिजू जनता दल आणि एक जागा अन्य पक्षाकडे जाऊ शकते. 
* हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एक जागा रिक्त होणार आहे. या सर्व भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. 

उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा...

पुढील महिन्यात राज्यसभेच्या ज्या जागांसाठी निवडूक होणार आहे, त्यात उत्तर प्रदेशच्या सर्वाधिक 10 जागांचा समावेश आहे.अरुण जेटली हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. टीम मोदीमधील ते महत्त्वाचे सदस्य आणि केंद्रीय अर्थमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार हे नक्की आहे.राज्यसभेच्या जागांचा विचार केला तर सर्वाधिक जागा या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी 10 जणांची निवड होणार आहे. उत्तर प्रदेशात भाजप पूर्ण बहुमतात आहे. विधानसभेच्या 403 जागांपैकी 312 जागा भाजपकडे आहेत. त्यामुळे येथून जेटली सहज विजयी होऊ शकतात. यानंतर महाराष्ट्र आणि बिहारमधील 6-6 जागी आणि पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात 5-5 जागी, गुजरात आणि कर्नाटकात 4-4 जागांसाठी, तर आंध्रप्रदेश, तेलंगाना, ओडिसा, राजस्थानच्या 3-3 जागी निवडणूक होणार आहे. त्याचप्रमाणे झारखंडमध्ये 2 जागी तर छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या प्रत्येकी 1 जागेवर राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे.उत्तर प्रदेशातील 10 पैकी 9 जागांवरील खासदार 2 एप्रिलला निवृत्त होणार आहे. यात जया बच्चन (सपा) आणि प्रमोद तिवारी (काँग्रेस) यांचा देखील समावेश आहे. एक जागा मायावती यांनी राजीनामा दिल्यामुळे रिकामी झाली आहे.गुजरातमध्ये राज्यसभेसाठी ऑगस्ट 2017 मध्ये निवडणूक झाल्यानंतर 58 जागांसह भाजप राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष बनला होता. सध्या राज्यसभेत काँग्रेसच्या 57 जागा आहेत.


जया बच्चन यांच्याकडे १ हजार कोटींची संपत्ती

बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन या राज्यसभेतील सर्वात श्रीमंत सदस्या ठरू शकतात. त्यांनी राज्यसभेसाठी नामांकन अर्ज दाखल केला असून त्यात त्यांची संपत्ती १ हजार कोटी इतकी दाखवली आहे. त्यामुळे राज्यसभेवर निवडून आल्यास त्या सर्वात श्रीमंत राज्यसभा सदस्य ठरणार आहेत. जया बच्चन यांनी आज चौथ्यांदा राज्यसभेसाठी नामांकन अर्ज दाखल केला आहे. भाजचे राज्यसभा सदस्य रवींद्र किशोर सिन्हा यांनी २०१४ मध्ये त्यांची संपत्ती ८०० कोटी दाखविली होती. तर जया बच्चन यांनी आज सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एकूण १ हजार कोटींची मालमत्ता दाखविली आहे. त्यामुळे राज्यसभेवर निवडून आल्या तर त्या सिन्हा यांना मागे टाकून सर्वात श्रीमंत खासदार बनणार आहेत. २०१२ मध्ये समाजवादी पार्टीकडून राज्यसभेसाठी नामांकन अर्ज भरताना जया बच्चन यांनी त्यांची एकूण संपत्ती ४९३ कोटी रुपये दाखविली होती. २०१२ मध्ये त्यांच्याकडे केवळ १५२ कोटी रुपये स्थावर आणि २४३ कोटी रुपये जंगम मालमत्ता होती. आज सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची आणि पती अमिताभ बच्चन यांची एकूण स्थावर मालमत्ता ४६० कोटी रुपये दाखविली आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे ५४० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. प्रतिज्ञापत्रानुसार बच्चन दाम्पत्यांकडे एकूण ६२ कोटींचं सोनं आणि इतर दागिने आहेत. त्यात अमिताभ यांच्याकडे ३६ कोटींचे तर जया बच्चन यांच्याकडे २६ कोटींचे दागिने आहेत. या दोघांकडे १२ कार असून त्यांची किंमत १३ कोटी रुपये एवढी आहे. त्यात रोल्स रॉयस, तीन मर्सिडीज, एक पोर्श आणि एका रेंज रोव्हरचा समावेश आहे. अमिताभ यांच्याकडे एक टाटा नॅनो कार आणि एक ट्रॅक्टर सुद्धा आहे. शिवाय अमिताभ यांच्याकडे ३.४ कोटींच्या घड्याळ असून जया बच्चन यांच्याकडे असलेल्या घड्याळांची किंमत ५१ लाख रुपये एवढी आहे.

नऊ लाखाचा पेन 

अमिताभ यांच्याकडील एका पेनची किंमत ९ लाख रुपये इतकी आहे. बच्चन दाम्पत्यांकडे फ्रान्सच्या ब्रिगनॉगन प्लेज येथे ३,१७५ स्क्वेअर मीटर एवढे आलिशान घर आहे. त्याचप्रमाणे नोएडा, भोपाळ, पुणे, अहमदाबाद आणि गांधीनगरमध्येही त्यांची प्रॉपर्टी आहे. जया बच्चन यांच्या नावे लखनऊ येथील काकोरीमध्ये १.२२ हेक्टरची शेती आहे. त्याची किंमत २.२ कोटी इतकी आहे. तर अमिताभ यांच्या नावे बाराबंकी जिल्ह्यातील दौलतपूर येथे ३ एकरचा प्लॉट असून त्याची किंमत ५.७ कोटी इतकी आहे. 

दरम्यान, भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरणारे नारायण राणे हे ८४ कोटी रुपयांचे धनी आहेत. विशेष म्हणजे राणेंपेक्षा त्यांची पत्नी जास्त श्रीमंत आहेत. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची संपत्ती अडीच कोटींच्या घरात आहेत. भाजपाचे केरळचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार व्ही. मुरलीधरन यांची मालमत्ता सर्वात कमी आहे. त्यांच्या ३३ हजार रुपयांची जंगम मालमत्ता असून पत्नीकडे एका गाडीसह सात लाखांची मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीकडे २० लाखांची जमीन देखील आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पुण्यात दीड कोटींच्या राहत्या घरासह २६ लाखांचे दागिने व पत्नीकडे अडीच कोटींची जंगम मालमत्ता आहे.

केरळच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक...

केरळच्या एका राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. येथील खासदार विरेंद्र कुमार यांनी डिसेंबरमध्ये राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजिनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ एप्रिल 2022 पर्यंत होता


7 राज्यातील 26 जागांसाठी मतदान

राज्यसभेच्या 59 जागांसाठी शुक्रवारी सात राज्यांत मतदान होत आहे. आज सायंकाळी निकालही जाहीर होईल. 17 राज्यांत या जागा आहेत. परंतू अगोदरच 33 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारी 7 राज्यांतील 26 जागांचे निकाल पाहणे आैत्सुक्याचे ठरेल. 7 राज्यांपैकी केरळमध्ये पोटनिवडणूक आहे. या निवडणुकीनंतर राज्यसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल. त्यांना 12 ते 15 जागांचा फायदा होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या 38 वर्षांच्या इतिहासात त्यांना प्रथमच 70 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपची स्थापना 1980 मध्ये झाली होती.


8 पैकी 7 मंत्र्यांची पुन्हा निवड

मध्य प्रदेश : धर्मेंद्र प्रधान, थावरचंद गेहलोत, अजय प्रताप सिंह, कैलाश सोनी (भाजप), राजमणी पटेल (काँग्रेस).
बिहार : रविशंकर प्रसाद (भाजप), वशिष्ठ नारायण सिंह, महेंद्र प्रसाद (जदयू), मनोज झा, अशफाक करीम (राजद), अखिलेश सिंह (काँग्रेस).
गुजरात : पुरुषोत्तम रुपाला, मनसुख मांडविया (भाजप), नारायण राठवा, अमी याज्ञिक (काँग्रेस).
राजस्थान : किरोडी मीणा, भूपेंद्र यादव, मदन लाल (सर्व भाजप ).
आंध्र प्रदेश: सी. एम. रमेश, के. रवींद्र कुमार (टीडीपी), वेमीरेड्डी प्रभाकर रेड्डी (वायएसआर काँग्रेस).
आेडिशा : प्रशांत नंदा, सौम्य रंजन, अच्युत सामंत (बीजेडी).
उत्तराखंड: अनिल बलुनी (भाजप).
हरियाणा: सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल डी. पी. वत्स.
हिमाचल : जे. पी. नड्डा.


या राज्यात सुरु आहे निवडणूक

उत्तर प्रदेश : 10 जागांवर मतदान. त्यात केंद्रीय मंत्री अरुण जेटलीही. सपाचे तिकीट जया बच्चन यांना. 
झारखंड : येथे 2 जागा. एका जागेसाठी 28 मते हवीत. भाजपच्या 43 आणि सहकारी आजसूची 4 मते. भाजपला दुसरी जागा जिंकण्यासाठी आणखी 9 मतांची गरज. 
कर्नाटक : राज्यात 4 जागांवर मतदान. काँग्रेसचे 3 उमेदवार मैदानात. भाजप आणि जेडीएसचा एक-एक उमेदवार मैदानात. काँग्रेसला तिन्ही जागांवर विजय निश्चित. 
छत्तीसगड: एका जागेवर भाजप-काँग्रेस समोरासमोर. जिंकण्यासाठी 46 मतांची गरज. भाजपचे 49 तर काँग्रेसचे 39 आमदार आहेत. 
बंगाल : येथे 5 जागांवर मतदान. तृणमूलचे 4, काँग्रेस, माकपचा प्रत्येकी 1 उमेदवार. 
तेलंगण : राज्यात 3 जागांसाठी मतदान. टीआरएसचे 3, काँग्रेसचा एक उमेदवार मैदानात. 

केरळ : एका जागेसाठी यूडीएफ आणि एलडीएफ उमेदवार मैदानात.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.