त्रिपुरा विधानसभा निवडणूक-१०१८ ; 51 उमेदवार निवडणूक रिंगणात
25 वर्षांनंतर भाजप खाते उघडणार का?
पूर्वाउत्तरकडील त्रिपुरात १८ फेब्रुवारीला मतदान होत आहे. भाजपने त्रिपुरात डाव्या पक्षांच्या लाल किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यात दोन निवडणूक प्रचारसभा घेतल्या. यासह भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, वरिष्ठ नेते व १००हून अधिक खासदार, आमदार राज्यात सातत्याने जनसंपर्क ठेवून प्रचारसभा घेत आहेत. त्रिपुरात बंगाली हिंदू लोकसंख्येत सुमारे ७० % नाथ योग संप्रदायाचे मतदार आहेत. आगरतळात नाथ मंदिरदेखील आहे. त्रिपुरात भाजप प्रादेशिक पक्ष इंडिजिनियस पीपल्स फ्रंट आॅफ त्रिपुरा (आयपीएफटी)सोबत निवडणूक लढवत आहे. भाजपने ६० पैकी ५१, तर आयपीएफटी पक्षाने ९ जागी आपले उमेदवार दिले आहेत. स्वतंत्र आदिवासीबहुल त्रिपुरालॅण्डची मागणी आयपीएफटी सातत्याने करत आहे. भाजपच्या निवडणूक प्रचाराची कमान आसामचे मंत्री तथा नाॅर्थ-ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स (नेडा)चे संयोजक डाॅ.हिंमत विश्व शर्मा यांच्या हातात आहे. राज्यात गत २५ वर्षांपासून माकपची सत्ता आहे; परंतु या वेळी माकपला आपला गड वाचवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. ते गेल्या २० वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी अद्याप कुणाच्याही नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. मागील पाच विधानसभा निवडणुकांत माकपला आव्हान देणाऱ्या कॉंग्रेस व तृणमूल कॉंग्रेस या पक्षांची काहीशी पीछेहाट झाली असून, भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.
Event | Date | Day |
Date for nominations | 24 Jan 2018 | Wednesday |
Last date for filing nominations | 31 Jan 2018 | Wednesday |
Date for scrutiny of nominations | 1 Feb 2018 | Thursday |
Last date for withdrawal of candidatures | 3 Feb 2018 | Saturday |
Date of poll | 18 Feb 2018 | Sunday |
Date of counting | 3 Mar 2018 | Saturday |
Date before which the election shall be completed | 5 Mar 2018 | Monday |
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.