निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव प्रकरण : महादेव जानकर दोषमुक्त
दबाव टाकल्याच्या प्रकरणाची चित्रफीतही व्हायरल; आरोप सिद्ध करण्यात अपयश
राज्यात गाजलेल्या देसाईगंज नगर परिषद निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याच्या प्रकरणात पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना मंगळवारी देसाईगंज न्यायालयाने दिलासा दिला. न्यायालयाने सबळपुराव्या अभावी जानकर यांना दोषमुक्त केले आहे. डिसेंबर २०१६ रोजी देसाईगंज नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होती. तत्पूर्वी ५ डिसेंबर २०१६ रोजी मंत्री महादेव जानकर देसाईगंज येथे आले होते. त्यांनी प्रभाग क्रमांक ९ ब मधील काँग्रेसचे उमेदवार जेसा मोटवानी यांच्या पक्षातर्फे सादर केलेले नामनिर्देशनपत्र मागे घेऊ द्यावे व त्यांना कपबशी हे निवडणूक चिन्ह द्यावे, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव आणला. याबाबतची चित्रफीतही व्हायरल झाली होती. या प्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मंत्री महादेव जानकर व उमेदवार जेसा मोटवानी यांच्या विरुध्द लोकसेवकाला कायदेशीर कृत्य करताना दबाव आणल्याप्रकरणी देसाईगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. १९ जानेवारीला झालेल्या सुनावणीत न्यायालयात चार जणांची साक्ष तपासण्यात आली होती. मंगळवारी न्यायालयाने दिलेल्या निकालात जानकर यांना दोषमुक्त केले. सबळ पुराव्या अभावी त्यांची सुटका करण्यात आली.प्रकरणाचा तपशील
: फौजदारी किरकोळ अर्ज: 553/2016;: 13-12-2016
: MHGA05-000609-2016
प्रकरणाची सद्यःस्थिती
याचिकाकर्ता आणि वकील /विधीज्ञ
1) महाराष्र्ट सरकार द्वारा पो.स्टे. देसाईगंजवकील /विधीज्ञ- सरकारी वकील
प्रत्युत्तरार्थी आणि वकील /विधीज्ञ
1) महादेव जगन्नाथ जानकर2) जेसामल अर्जुनदास मोटवाणी
अधिनियम
या अधिनियमां (मे) अंतर्गत | कलम (मे) अंतर्गत |
---|---|
भारतीय दंड संहिता | 166,186 |
महाराष्ट्र नगर परिषद्, नगर पंचायत व औद्योगिक वसाहत अधिनियम १९६५ | 22(6) |
प्रथम माहिती अहवाल तपशील |
पोलीस ठाणे
प्रथम माहिती अहवाल क्रमांक
वर्ष
प्रथम माहिती अहवाल क्रमांक
वर्ष
|
नोंदणी क्रमांक | न्यायाधीश | तारखेवरील कामकाज | सुनावणीची तारीख | सुनावणीचा उद्देश |
---|---|---|---|---|
75/2016 | दिवाणी न्यायाधिश क.स्तर, तथा न्यायदंडाधिकारी | 13-12-2016 | विल्हेवाट |
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.