Monday, 15 January 2018

रेखा-सचिनसह राज्यसभेतील 52 सदस्य निवृत्त होणार ; कोणत्या राज्यातून कोणाला किती जागा मिळणार

रेखा-सचिनसह राज्यसभेतील 52 सदस्य होणार निवृत्त
अरुण जेटली, जेपी नड्‌डा आणि रविशंकर प्रसाद अशा केंद्रीय मंत्र्यांनाही पुन्हा निवडून यावे लागणार


राज्यसभेतील कॉंग्रेसच्या तीन सदस्यांचा 27 जानेवारी रोजी कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सत्तारूढ भाजप सर्वाधिक सदस्य असणारा पक्ष बनणार आहे. मात्र, या वरिष्ठ सदनातील खरे चित्र एप्रिल महिन्यात बदलणार आहे. या महिन्यात तब्बल 55 सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. यात केंद्रीय मंत्री अरूण जेटली, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, कॉंग्रेस नेता प्रमोद तिवारी, राजीव शुक्‍ला, रेणुका चौधरी यांच्यासह रेखा आणि सचिन तेंडुलकर यांचाही समावेश आहे.एप्रिल महिन्यात राज्यसभेतील भाजपचे 17, कॉंग्रेसचे 12, सपाचे सहा, जदयू आणि तृणमूल कॉंग्रेसची प्रत्येकी 3, तेदेपा, राष्ट्रवादी कॉंग्रे, बीजद यांचे प्रत्येकी दोन, बसपा, शिवसेना, माकप यांचे प्रत्येकी एक, तर अपक्ष व राष्ट्रपती नियुक्‍त तीन सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधून भाजपचे सर्वाधिक सदस्य राज्यसभेत वाढणार आहे, तर कॉंग्रेसला गुजरात आणि महाराष्ट्रातून काही जागा मिळणार आहेत. गुजरातमधून निवृत्त होणार चार पैकी दोन जागा कॉंग्रेसला मिळण्याची शक्‍यता आहे, तर महाराष्ट्रातून निवृत्त होणाऱ्या दोन पैकी एक जागा कॉंग्रेसला पुन्हा मिळू शकते.दरम्यान, जानेवारी महिन्यात वरिष्ठ सदनातील कॉंग्रेसचे जनार्दन द्विवेदी, परवेझ हाशमी आणि डॉ. कर्ण सिंह हे सेवानिवृत्त होणार आहे. हे तिन्ही सदस्य दिल्लीचे प्रतिनिधित्व करत असून त्यांच्या जागेवर आप पक्षाच्या तीन सदस्यांची निवड होणार आहे. या तिघांच्या निवृत्तीनंतर कॉंग्रेसची सदस्या संख्या कमी होऊन 54 होणार आहे. सिक्‍कीम डेमोक्रेटिक फ्रंटचे हिशे लाचुंगपा यांचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी रोजी पूर्ण होणार आहे. तसेच एप्रिलमध्ये वरिष्ठ सदनातील 55 सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या सदस्यांमध्ये सपाचे नरेश अग्रवाल, जया बच्चन, किरणमय नंदा, बसपाचे मुनकाद अली, कॉंग्रेसचे शादीलाल बत्रा, सत्यव्रत चतुर्वेदी, डॉ. के. चिरंजीवी, रेणुका चौधरी, रहमान खान, रजनी पाटील, राजीव शुक्‍ला, प्रमोद तिवारी, नरेंद्र बुढानिया व अभिषेक मनु सिंघवी आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राज्यसभेतील चेहरे बदलणार आहेत. सभागृहाचे ग्लॅमर समजले जाणारे अनेक चेहरे संसदेमध्ये दिसणार नाहीत. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्यामध्ये रेखा आणि जया बच्चन, तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि हॉकीच्या मैदानातून बीजू जनता दलाचे खासदार बनलेले दिलीप टिर्की यांचा समावेश आहे. भाजपकडून विरोधकांना जशास तसे उत्तर देणारे पुरुषोत्तम रुपाला आणि विनय कटियार यांचा कार्यकाळही एप्रिलमध्येच समाप्त होत आहे.त्याशिवाय अरुण जेटली, जेपी नड्‌डा आणि रविशंकर प्रसाद अशा केंद्रीय मंत्र्यांनाही पुन्हा निवडून यावे लागणार आहे. व्यंकय्या नायडू कर्नाटकातून राज्यसभेवर जाऊ शकतात. विजय मल्ल्याच्या राजीनाम्यामुळे तिथे एक जागा रिकामी झाली आहे. किंवा गृहराज्य आंध्रप्रदेशातूनही राज्यसभेवर येऊ शकतात. जयराम रमेश आंध्रप्रदेशातून राज्यसभेवर आले आहेत. पण आता त्यांना कर्नाटकमधून राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. कारण कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. महाराष्ट्रातून एकमेव जागेसाठी सुशीलकुमार शिंदे, गुरुदास कामत आणि मुकूल वासनिक यांची नावे चर्चेत आहेत.राज्यसभेतून निवृत्त होणा-या खासदारांचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसणार आहे. काँग्रेसचे ६५ खासदार असून, त्यातील १६ सदस्य निवृत्त होत आहेत. काँग्रेसच्या निवृत्त होणा-या सदस्यांमधून फारच कमी खासदार पुन्हा राज्यसभेवर येण्याची शक्यता आहे.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी


.क्रसदस्यांचे नाव,            पक्ष,       सदस्यत्वाची मुदतसंपण्याचा दिनांक

(1) श्रीमती वंदना हेमंत चव्हाण      नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी    एप्रिल, 2018
(2) श्री.डी.पी.त्रिपाठी               नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी    2 एप्रिल, 2018
(3) श्रीमती रजनी अशोकराव पाटील   इंडियन नॅशनल काँग्रेस    2 एप्रिल, 2018
(4) श्रीअनिल यशवंत देसाई        शिवसेना                2 एप्रिल, 2018
(5) श्री.राजीव रामकुमार शुक्ला       इंडियन नॅशनल काँग्रेस    2 एप्रिल, 2018
(6) श्री.अजयकुमार शक्तीकुमार संचेती  भारतीय जनता पार्टी      2 एप्रिल, 2018

सन 2018 मध्ये निवृत्त होणार्या महाराष्ट्रातील सदस्यांची पक्षनिहाय संख्या


क्रमांक            पक्षाचे नाव           सदस्य संख्या
1.             नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी :       2
2.             इंडियन नॅशनल काँग्रेस :        2
3.             भारतीय जनता पार्टी :         1
4.             शिवसेना :                   1

               एकूण :                     6
===================================================== 
राज्यसभेचे वंदना चव्हाण आणि डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी), रजनी पाटील आणि राजीव शुक्ला (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना), अजयकुमार संचेती (भाजप) हे सहा सदस्य निवृत्त होत आहेत. राज्यसभेवर निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. सदस्यसंख्येनुसार भाजपचे तीन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य निवडून येऊ शकतो. शिवसेनेकडे २१ मते अतिरिक्त असली तरी शिवसेना दुसरा उमेदवार उभा करण्याचे धाडस करेल का, यावर बरेच अवलंबून असेल.
===================================================== 


सचिन तेंडुलकर--27 एप्रिल 2012 रोजी खासदार म्हणून नियुक्त. संसदेत काहीही बोलू शकला नाही. गेल्या हिवाळी अधिवेशनात बोलण्यासाठी 7 मिनिटे उभा राहिला पण गोंधळामुळे बोलू शकला नाही.22 लेखी प्रश्न विचारले. त्यापैकी 8 प्रश्न रेल्वेशी संबंधित होते. सरकारने सचिनला दोनच आश्वासने दिली.
रेखा --27 एप्रिल 2012 ला राज्यसभेत पाऊल ठेवले. एखही प्रश्न विचारला नाही. काहीही स्पेशल मेन्शन नाही. एकही प्रायव्हेट बिल सादर केले नाही. उपस्थितीत्या 78 टक्के राष्ट्रीय सरासरीशी तुलना करता त्या फक्त 5% काळ उपस्थित राहिल्या.
जया बच्चन--सपा खासदार म्हणून राज्यसभेवर 3 एप्रिल 2012 ला निवड. चर्चांमध्ये सहभाग, प्रश्न विचारल्यावर आणि स्पेशल मेन्शनअंतर्गत मुद्दे उचलण्याचा चांगला रेकॉर्ड. त्यांची संसदेमध्ये 77% टक्के उपस्थिती राहिली. 143 चर्चांमध्ये सहभाग घेतला, 143 प्रश्न विचाराले.

कोणत्या पक्षाचे किती जण होणार निवृत्त

भाजप17
काँग्रेस11
सपा06
राष्ट्रपतींद्वारे नियुक्ती03
तृणमूल काँग्रेस03
बीजेडी02
जदयू02
राष्ट्रवादी काँग्रेस02
माकप01
बसप01
अपक्ष01
शिवसेना01
टीडीपी02


कोणत्या राज्यातून कोणाला किती जागा मिळणार

* महाराष्ट्र- राज्यातील राज्यसभेचे सहा सदस्य एप्रिलमध्ये निवृत्त होणार आहेत. रिक्त जागेपैकी दोन भाजपला तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळू शकते. सहाव्या जागेसाठी मोठी चुरस होण्याची शक्यता आहे. 
* उत्तर प्रदेश- सध्याच्या विधानसभेच्या स्थितीनुसार या राज्यातील राज्यसभेच्या 9 पैकी 7 जागा भाजपला तर काँग्रेसला चार जागा मिळतील. तर सपाला दोन जागा मिळतील.  
* मध्य प्रदेश- येथील राज्यसभेच्या पाच पैकी चार जागा भाजपला तर काँग्रेसला एक जागा मिळू शकते. 
* आंध्र प्रदेश- तीन पैकी दोन जागा तेलगु देशम पक्षाला तर एक जागा अन्य पक्षाला मिळू शकते. 
* कर्नाटक- येथील चार पैकी तीन जागा काँग्रेसला तर एक जागा भाजपला मिळू शकते. 
* पश्चिम बंगाल- राज्यातील चार पैकी तीन जागा तृणमूल काँग्रेसला तर एक जागा माकपला मिळण्याची शक्यता आहे. 
* गुजरात- राजसभेच्या चार पैकी दोन जागा भाजपला तर दोन काँग्रेसला मिळतील.  
* बिहार- येथील पाच पैकी 3 जागा जदयू-भाजपला तर 2 जागा राजद-काँग्रेस यांना मिळू शकते
* तेलंगणा- दोन पैकी एक टीआरएसला तर एक काँग्रेसला मिळू शकते.  
* राजस्थान- येथील तिन्ही जागा भाजपलाच मिळतील.
* ओडिसा- 3 पैकी दोन जागा बिजू जनता दल आणि एक जागा अन्य पक्षाकडे जाऊ शकते. 
* हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एक जागा रिक्त होणार आहे. या सर्व भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.