Tuesday, 23 January 2018

2019 च्या लोकसभा- विधानसभा निवडणूका शिवसेना स्वतंत्र लढविणार- कार्यकारिणीत ठराव मंजूर

लोकसभा व विधानसभा निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार


2019 मधील लोकसभा निवडणूक व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर (भाजप) न करण्याची घोषणा शिवसेनेकडून आज (मंगळवार) करण्यात आली. सेनेचे खासदार संजय राउत यांनी मुंबईमध्ये शिवसेनेच्या अधिवेशनात यासंदर्भातील ठराव मांडला आणि तो एकमताने संमत करण्यात आला. याबरोबरच लोकभेच्या महाराष्ट्रातील 48 पैकी 25 जागा; आणि विधानसभेच्या 288 पैकी 150 जागा जिंकण्याचा निर्धारही शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला. उद्धव यांचे तरुण पुत्र व युवा सेनेचे नेते आदित्य यांनाही राजकीय बढती देत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. सध्याचे राज्यातील मंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत खैरे, अनंत गीते आणि आनंदराव अडसूळ या खासदारांना सेना नेते म्हणून मान्यता देण्यात आली. यावेळी  संमत करण्यात आलेल्या इतर ठरावांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली.मागील वर्षी झालेली मुंबई महानगरपालिका निवडणुकही शिवसेनेने स्वबळावरच लढवली होती. यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर शेलक्या शब्दांत टीका केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपच्या विरोधात रान उठवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१४ साली केंद्रात सत्तेत आल्यापासून शिवसेना आणि भाजपामध्ये अगदी सुरुवातीपासूनच कुरबुरी सुरु झाल्या होत्या. केंद्रात मंत्रीपद मिळण्यावरुन दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला पोहोचला होता. त्यानंतर राज्यात मोठा भाऊ आणि लहान भाऊ कोण? यावरून दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निवडणुकीत भाजपाने १२२ जागांवर विजय मिळवत शिवसेनेचा पराभव केला होता. त्यावेळी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा द्यायची तयारी दर्शवली होती. त्यामुळे शिवसेनेने नाईलाजाने फडणवीस सरकारला पाठिंबा देऊ केला होता. मात्र, नंतरच्या काळातही दोन्ही पक्षातील दरी सातत्याने वाढत गेली.मागील वर्षी झालेली मुंबई महानगरपालिका निवडणुकही शिवसेनेने स्वबळावरच लढवली होती. यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर शेलक्या शब्दांत टीका केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यामुळे शिवसेना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार, हे जवळपास स्पष्ट होते. अखेर आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. शेतकऱ्यांच्या पिकाला मातीमोल भाव मिळत आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे, हे वाक्य केवळ शालेय पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित राहिले आहे. शिवसेनेने मध्यंतरी राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोठे आंदोलन उभारले. शिवसेनेच्या रेट्यामुळे सरकारनेही कर्जमाफीही केली. मात्र, कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील गोंधळामुळे ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या मागणीचा ठराव मांडत असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.


एकनाथ शिदे, आदित्य ठाकरेंची सेनेच्या नेतेपदी वर्णी, मनोहर जोशी, सुधीर जोशीही पदावर कायम


अपेक्षेप्रमाणे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेनेच्या नेतेपदी बढती मिळाली. शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांचे नेतेपदही कायम ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर एकनाथ शिदे यांचीही नेतेपदी निवड करण्यात आली.राजकीय पक्षांना संघटनात्मक निवडणुकांची औपचारिकता पार पाडावी लागते. त्यानुसार पंचवार्षिक निवडणुकांची प्रक्रिया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वरळीच्या वल्लभभाई पटेल सभागृहात पार पडली. प्रभावशाली नेते आमदार अनिल परब यांच्याकडेही नेतेपदाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता होती. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅड. बाळकृष्ण जोशी यांनी निवडणुकीचे काम पाहिले.राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाची शिवसेना नेतेपदासाठी निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर सभागृहात जल्लोष झाला. तसेच फटाके फोडण्यात आले. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आनंदराव अडसूळ, अनंत गीते, चंद्रकांत खैरे यांचीही नेतेपदी निवड करण्यात आली. खासदार अरविंद सावंत, आमदार नीलम गोऱ्हे, अनिल परब, डॉ. अमोल कोल्हे, मनिषा कायंदे यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. मिलिंद नार्वेकर यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

शिवसेनेचे एकूण १३ नेते असतील

मनोहर जोशी
सुधीर जोशी
लीलाधर ढाके
दिवाकर रावते
संजय राऊत
रामदास कदम
गजानन कीर्तीकर
सुभाष देसाई

नविन नियुक्ती

आदित्य ठाकरे
एकनाथ शिंदे
चंद्रकांत खैरे
आनंदराव अडसूळ
अनंत गीते

शिवसेना सचिव- मिलींद नार्वेकर, सूरज चव्हाण.

प्रवक्ते- अरविंद सावंत, निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, अमोल कोल्हे, अनिल परब

=================================
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)



शिवसेना राज्यात स्वबळावर निवडणूक लढविल्यास होणारा परिणाम - 

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे शिवसेनेचे नुकसान होईल अशा प्रतिक्रिया भाजप पदाधिकारी देत असले तरी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नुकसान होईल असे नाही. कारण लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रितपणे घेतल्यास वेगळे परिणाम असतील तसेच शिवसेनेने आगामी निवडणुकीपूर्वी राज्य सरकारमधून फारकत घेऊन वेगळेपण दर्शवून जनतेमध्ये विश्वासाहार्य वातावरण निर्माण केल्यास वेगळे परिणाम असतील. जर शिवसेना राज्य सरकारमधून बाहेर पडले नाहीत, कार्यकाल पूर्ण होईपर्यंत सरकारमध्ये राहून वेगळेपण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे नुकसान होईल यामध्ये कोणतीही शंका नाही. शिवसेना स्वबळावर लढल्यास लोकसभेच्या सध्या असलेल्या जागांपैकी ५ जागांवर नुकसान होईल. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रितपणे घेतल्यास आणि शिवसेना स्वबळावर लढल्यास सध्या असलेल्या जागांपैकी लोकसभेतील ९ जागांवर नुकसान होईल तर विधानसभेतील सध्या असलेल्या जागांपैकी १३ जागांवर नुकसान होईल. सेनेने राज्य सरकारमधून बाहेर पडून वेगळेपण दर्शवून जनतेमध्ये विश्वासाहार्य वातावरण निर्माण केल्यास विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळेल असे वाटते- चंद्रकांत भुजबळ 
- पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) 
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.