Wednesday, 17 January 2018

त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारीला तर मेघालय आणि नागालंडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान;3 मार्चला मतमोजणी

मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा राज्याच्या निवडणूक तारखा जाहीर
तिन्ही राज्यांमध्ये ६० विधानसभा जागांसाठी निवडणूक


त्रिपुरा आणि नागालंडमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. तिन्ही राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार असून आजपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या तिन्ही राज्यांत विधानसभेच्या 60 जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. या तिन्ही राज्यातील मतदानाचे निकाल 3 मार्च रोजी जाहीर केले जाणार आहेत. आजपासून या तिन्ही राज्यांत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकांच्या मतदानासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्सचा वापर केला जाणार आहे. मेघालयसह त्रिपुरा आणि नागालंडमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागांसाठी मतदान होत आहे. तिन्ही राज्यात EVM आणि VVPAT चा पहिल्यांदा वापर करण्यात येईल. सर्व उमेदवारांना याबाबत माहिती देण्यात येणार आहे. उमेदवार अथवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी EVM आणि VVPAT तपासून शहानिशा करु शकतात. VVPAT मधून निघालेली  स्लिप्स देखील तपासता येईल. मतमोजणीत याचा वापर करता येईल.आदर्श आचारसंहिता ( मॉडल कोड ऑफ कंडक्ट) तत्काळ लागू करण्‍यात आली आहे. या दरम्यान राज्यात कोणतेही विकास कामे जाहीर करण्‍यात येणार नाही. केंद्र सरकारलाही आचारसंहितेचे बंधन असेल.

मेघालयमध्ये महिला मतदार जास्त

मेघालयमध्ये सर्वात जास्त मतदार आहेत. याबाबतीत इथे महिलांनी पुरुषांना मागे सोडलं आहे. राज्यात ५०.४ टक्के महिला मतदार आहेत. एकूण मतदारांची संख्या १८,३०,१०४ आहे. त्यात ९,२३,८४८ महिला मतदार आहेत.या तीन राज्यातील सरकारचा कालावधी क्रमश: ६ मार्च, १३ मार्च आणि १४ मार्चला संपुष्टात येत आहे.

दरम्यान, त्रिपुरा, मेघालय आणि नागालंडमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी राजकीय पक्षाच्या हलचालींना वेग आला आहे. पूर्वोत्तर राज्यात कमळ फुलवण्यासाठी भाजप सर्वाधिक जोर लावताना दिसत आहे. कारण निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मेघालयमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. सत्ताधारी एनपीपीच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्रिपुरामध्ये सध्या डाव्यांची सत्ता आहे. मेघालयमध्ये कॉंग्रेसची तर नागालॅंडमध्ये पिपल्स फ्रन्ट-लीड डेमोक्रॅटीक युतीची सत्ता आहे. डेमोक्रॅटीक युती ही भाजप द्वारे समर्थित आहे.

सध्या या ३ राज्यांत कोणाचे सरकार?

* त्रिपुरा
- डाव्याचे सरकार आहे. माणिक सरकार हे मुख्यमंत्री आहेत. 2013 मध्ये डाव्या पक्षाने पाचव्यांदा सरकार स्थापन केले होते.
* मेघालय:
- मेघालयमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मुकुल संगमा हे 2010 पासून मुख्यमंत्री आहे.
* नागालंड:
- भाजपच्या पाठिंब्यावर नागा पीपुल्स फ्रंट-लीड डेमोक्रेटिक आघाडीचे सरकार आहे. टीआर जेलियांग यांनी जुलै 2017 मध्ये मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्विकारली होती.

2013 मध्ये कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा?

त्रिपुरा- एकूण जागा - 60

- सीपीएम:49
- काॅंग्रेस:10
- अपक्ष : 01

मेघालय: एकूण जागा- 60

- काँग्रेस:29
- यूडीपी: 8
- राष्ट्रवादी: 2
- अपक्ष: 21

नागालंड- एकूण जागा - 60

- एनपीएफ: 38
- काॅंग्रेस: 8
- राष्ट्रवादी: 4
- भाजप: 1
- अपक्ष: 9


CHANDRAKANT BHUJBAL

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.