Friday, 12 January 2018

२०१८ या वर्षी ८ राज्यामध्ये निवडणुका !

कर्नाटक, मेघालय, त्रिपुरा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, नागालँड, मिझोराम या ८ राज्यामध्ये निवडणुका


गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीनंतर नव्या वर्षात राजकीय पक्ष २०१९ ची लोकसभा निवडणूक आणि २०१८ मध्ये होणाऱ्या ८ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या वर्षी कर्नाटक, मेघालय, त्रिपुरा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, नागालँड, मिझोराम निवडणूक आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिणेत ध्रुवीकरण व प्रतिमा बदलाचे राजकारण केले जात आहेकाँग्रेस १४८ राम मंदिरांत पूजा किट देणार आहे. काँग्रेस राहुलची मंदिर रणनीती कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या निवडणुकीत पुढे नेऊ इच्छिते. कारण ही हिंदूबहुल राज्ये आहेत.प. बंगाल: भाजपचे ३०% मुस्लिमांवर लक्ष आहे.  भाजपला तीन तलाकच्या मुद्द्यामुळे उ.प्र. निवडणुकीत मुस्लिम जागांवर फायदा झाला. भाजप हा फॉर्म्युला बंगालमध्ये अल्पसंख्याक संमेलनाद्वारे पुढे नेत आहे. भाजपने राज्यात २०१९ ची आणि यंदाच्या पंचायत निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. जागा वाढाव्यात हा हेतू असून सध्या भाजपचे २ खासदार आहेत. प.बंगालमध्ये ३०% मुस्लिम मतदार आहेत. त्यांची २९४ पैकी १०० जागांवर आणि लोकसभेच्या ४२ पैकी १०-१२ जागांवर महत्त्वाची भूमिका आहे.
कर्नाटक मध्ये भाजप-काँग्रेसची नजर ८५% मतदारांवर आहे. काही दिवसांपासून सिद्धरामय्या स्वत:ला सतत हिंदू नेता म्हणत आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी स्वत:ला १००% हिंदू म्हटले होते. मोदींनी नोव्हेंबरमध्ये शिव मंदिरात दर्शन घेऊन प्रचार सुरू केला होता. मार्चमध्ये विधानसभा निवडणूक आहे ८५% मतदार हिंदू आहेत. त्यामध्ये २०% लिंगायत, ब्राह्मण असून ते भगवान शिवाला मानतात.तृणमूल बंगालमध्ये ब्राह्मणांना गीता वाटत आहे. मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप होणाऱ्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही आता राहुल गांधींप्रमाणे हिंदुत्वाचा फॉर्म्युला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच ममतांचे जवळचे सहकारी अणुव्रत मंडल यांनी पक्षातर्फे बीरभूमी जिल्ह्यात ब्राह्मण संमेलनात आठ हजार पुरोहितांना गीता भेट दिली होती. मीही हिंदू आहे, असे स्वत: ममताही म्हणाल्या आहेत. राज्यातील सांप्रदायिक वादात भाजप ममतांवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप करत आहे. हिंदू मतदार ममतांपासून दूर जाऊ शकतात. त्यामुळे ममता हिंदुत्वावर लक्ष केंद्रित करत आहेत.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.