शांतिगिरी महाराजांची लोकसभा उमेदवारीची घोषणा
औरंगाबाद लोकसभेसाठी औरंगाबादच्या शांतिगिरी महाराजांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप - सेना युती होणार नसल्याचे मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी, निवडणूक भाजप कडून लढणार असल्याचे शांतिगिरी महाराज म्हणाले. काही दिवसांपूर्वी भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली होती. त्यामुळं शांतिगिरी भाजपचे लोकसभेचे उमेदवार असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यात आता शांतिगिरी महाराजांनी घोषणा केल्याने, ते निवडणूक लढवणार हे निश्चितच झाले आहे. औरंगाबाद लोकसभेसाठी औरंगाबादच्या शांतिगिरी महाराजांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, यावर भाजपने भूमिका स्पष्ट केली नाही. शांतिगिरी महाराजांचे सध्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या समोर मोठं आव्हान असू शकत, 2009 च्या निवडणुकीत हि शांतिगिरी महाराज अपक्ष म्हणून लढले होते आणि लाखभर मत मिळवत खैरे ला चांगलेच झुंजवले होते, त्यात महाराजांनी आताच घोषणा करणे म्हणजे सेना खासदार चंद्रकांत खैरे ना सुद्धा आता पासूनच कामाला लागवे लागणार आहे. शांतिगिरी महाराज यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे भाजपमधील इतर इच्छुकांचे धाबे दणाणले आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, डॉ.भागवत कराड, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, शहर-जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह भाजपचे बाराजण लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार आहेत.
2009 मध्ये धार्मिक कार्य सोडून शांतीगिरींनी राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली होती. त्यावेळी राजकीय महत्त्वाकांक्षा वाढलेल्या शांतीगिरींना काँग्रेसने महाकुंभमेळ्याच्या आखाड्यातून थेट राजकीय आखाड्यात आणले होते. मात्र शांतीगिरी महाराज चंद्रकांत खैरें यांचा पराभव करू शकले नव्हते, परंतु खैरे-शांतीगिरी वाद मात्र वाढत गेला. मात्र पराभवानंतर पुन्हा राजकारण नाही, असे शांतीगिरी म्हणाले होते. त्यामुळे राजकीय शांतता होती, तरीही २०१४च्या मधल्या काळात त्यांना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश त्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे ते काँग्रेससोबत जाणार अशी अटकळ बांधण्यात येत होती. २०१४ ची लोकसभेची निवडणूक जाहीर झाली अन् शांत वाटणार्या शांतीगिरींनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती . त्यामुळे ते मनसेच्या रेल्वे इंजिनात बसणार असे वाटले होते. मात्र तसे घडले नाही. राजकीय पाठिंबा जाहीर करताना त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही, परंतु कल खैरे यांच्या बाजूने दिला होता. त्यानंतर काँग्रेसच्या गटाने त्यांच्या अनुयायांनी नितीन पाटील यांच्या बाजूने जाणार असल्याचे स्वत:च जाहीर करून टाकले होते त्यामुळे मतदारांत संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम स्वत: शांतीगिरी दूर करतील, असे अपेक्षित होते. परंतु त्यावेळी शांतीगिरी काही बोलण्यापूर्वीच खैरे त्यांच्या दरबारात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांची राजकीय भूमिका गुलदस्त्यातच राहिली होती. शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज यांनी २००९ ची लोकसभा निवडणूक डोली हे चिन्हावर अपक्ष म्हणून लढवली होती. २००९ मध्ये १९ जण २००९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ पैकी १९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. तेव्हा एकूण ७ लाख १२ हजार मतदान झाले होते. डिपॉझिट वाचविण्यासाठी किमान ९० हजार मते मिळविणे आवश्यक होते. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे उत्तमसिंह पवार आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज वगळता इतरांना तेवढी मते मिळविता आली नव्हती. चंद्रकांत भाऊराव खैरे (शिवसेना - धनुष्य-बाण), यांना २ लाख ५५ हजार, उत्तमसिंह पवार (काँग्रेस - पंजा) यांना २ लाख २२ हजार आणि शांतीगिरीजी महाराजांना १ लाख ४८ हजार मते मिळाली होती.
शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज यांची माहिती
नाव- शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराजमूळ नाव- (प्रसिद्ध नाही)
शिक्षण- १० वी (मार्च १९७६ उतीर्ण)
प्राथमिक शिक्षण- माधवराव बोरसे हायस्कूल जुनिअर आर्टस लाखलगाव जि. नाशिक
राजकीय- लोकसभेची निवडणूक -२००९ मध्ये अपक्ष उमेदवारी; तिसऱ्या क्रमांकाची १ लाख ४८ हजार मते प्राप्त.
धार्मिक कार्य- संत जनार्दन स्वामी यांना त्यांच्या धार्मिक कार्यांना समर्पित
श्री संत सदागुरु जनार्दन स्वामी मौंगीगिरी महाराजांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनाखाली ते गुरुकुलहून वेरूळ आश्रमात शिक्षण
स्वामी शांतीगिरि महाराज संत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या अपूर्ण कार्याची स्थापना करण्याचे काम करत आहेत
संत सद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या आशीर्वादाने त्यांची जबाबदारी वाढविण्यात आली आहे
श्रीमहमंदळेश्वर स्वामी शांतीगिरि महाराज संत जनार्दन स्वामींचे वारस आहेत
औरंगाबाद आणि नाशिक येथील अनेक भाविकांच्या मनात त्यांच्याविषयी आदर आहे.
स्थावर मालमत्ता - स्थावर मालमत्ता नाशिक,औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात आहेत.
अधिक माहिती- www.santjanardanswami.com
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.