Saturday 17 August 2019

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील सर्वेक्षणात रोहित पवार यांना मतदारांचा अल्प प्रतिसाद

प्रसिद्धीचा राजकीय पोर 'खेळ'


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि बारामती जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार हे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून आपले नशीब आजमावणार आहेत. या मतदारसंघात केलेल्या जनमत चाचणी सर्वेक्षणात रोहित पवार यांना मतदारांचा अल्प प्रतिसाद दिला आहे. सर्वाधिक पसंती विद्यमान आमदार व मंत्री प्रा. राम शिंदे यांनाच दिली आहे. प्रमुख इच्छुकांची वैयक्तीक पसंती देखील जाणून घेण्यात आली. रोहित पवार यांना 22 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे तर मंत्री प्रा. राम शिंदे यांना 37 टक्के पसंती दिलेली आहे. राजकीय पक्षांना मतदारांनी भाजप व शिवसेनेला प्राधान्यक्रम दिला असून त्यानंतर राष्ट्रवादी व कॉंग्रेसला दिला आहे. सद्यस्थितीत केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष मध्ये मंत्री प्रा. राम शिंदे यांनाच पुन्हा यश निवडणुकीत मिळेल असे असून रोहित पवार यांना यश मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. ठोस उपाययोजना करून नेतृत्वाचे आभासी वास्तव जाणून सोशल मीडियातील आभासी नेतृत्व ही प्रतिमा सुधारण्याची गरज आहे. सामाजिकदृष्ट्या या मतदारसंघात थेट धनगर समाजातील नेतृत्वाला आव्हान देण्याची भूमिका येथील मतदारांना रुचलेली नसल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू महाराष्ट्रातील इतर मतदारसंघ सोडून ओबीसींच्या विशेषतः धनगर समाजातील नेतृत्वाला आणि तेही अहिल्याबाई होळकर यांच्या माहेरचे शिंदे घराण्याच्या वंशज मानले जाणारे मंत्री प्रा. राम शिंदे यांनाच आव्हान देण्याचा मनसुबा समाजघटकांवर परिणामकारक ठरत आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन धनगर समाजात सरकारवर रोष असलातरी इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादी पक्षावर देखील रोष आहे. अशा परिस्थितीत धनगर समाजातील नेतृत्वाचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणण्याचे रोहित पवार यांचे धोरण विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादीसाठी घातक व नुकसानकारक ठरू शकते अशास्वरुपाच्या मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत. धनगर समाजाचा रोषांचा परिणाम राज्यातील अन्य प्रभावित मतदारसंघावर होऊ शकेल. या मतदारसंघात अनुसूचित जाती समाजाचे 12.91 टक्के मतदार असून अनुसूचित जमातीचे 1.23 टक्के मतदार आहेत. खुला व इतर मागासप्रवर्ग 85.86 टक्के आहे. यामध्ये ओबीसी मतदारांचे या मतदारसंघात प्राबल्य आहे. ओबीसी मतदारांच्या भूमिकेवरच येथील राजकीय भवितव्य अवलंबून असते. तसेच या मतदारसंघातील सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या प्रमुख आडनावांमध्ये प्रामुख्याने शिंदे, काळे, पवार, शेख, जाधव या आडनावाचे सर्वाधिक मतदार दिसून येतात. 2009 मध्ये पुनर्रचना झाल्याने या समाविष्ट भागात बदल होऊन कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ रचना करण्यात आली. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीत कॉंग्रेसला जागावाटपात मतदारसंघ देण्यात आला होता. या निवडणुकीत मंत्री प्रा. राम शिंदे यांनी कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला होता त्यानंतरच्या २०१४ च्या निवडणुकीत देखील पुन्हा प्रा. राम शिंदे यांनी यश मिळवले होते. 2014 च्या निवडणुकीत सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणूक लढवली मात्र कॉंग्रेस उमेदवाराला खूप कमी मतदान झाले होते. पहिल्या क्रमांकावर भाजप तर दुसर्या क्रमांकावर शिवसेनेने मते घेतली होती. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अतिशय याभागात कमी मतदारांकडून प्रतिसाद मिळाला होता. विधानसभेसाठी तीव्र इच्छूक असलेले रोहित पवार यांनी सर्व शक्कल लढवूनही राष्ट्रवादीला मताधिक्य येथून मिळाले नव्हते ही वस्तूस्थिती नाकारता येऊ शकत नाही. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात धुळे येथील बेरोजगार युवकांकडून माहिती जमा केला आहे तर मुंबईतील इव्हेंट्स कंपनीला प्रसिद्धीचा ठेका दिलेला असल्याचे येथील नागरिक सांगतात. तर सोशल मिडीयाचे संचालन करणाऱ्या ठेकेदारच्या अतिउत्साही पोस्ट टाकण्याच्या निर्णयामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरणा ऐवजी नकारात्मकता रोहित पवार यांच्या विषयी मतदारसंघात वाढीस लागली आहे. दरम्यान शिरूर, हडपसर, खडकवासला आणि कर्जत-जामखेड या सर्व विधानसभा मतदारसंघात चाचपणी करून ऐनवेळी मतदारसंघ ठरवून निवडणूक लढविण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. शिरूर, हडपसर, खडकवासला आणि कर्जत-जामखेड या सर्व विधानसभा मतदारसंघातील सर्वेक्षणात त्यांच्या विषयी निगेटिव्ह रिपोर्ट आलेले दुर्लक्षित करून चालणार नाही. पक्षांतर्गत विरोध व कुरघोडी तसेच विरोधकांना गाफील ठेऊन यश मिळविण्यासाठी ऐनवेळी मतदारसंघ निवडणार असल्याचे समर्थकांचे मत आहे.  

लोकसभा निवडणूकीत कर्जत मतदारसंघात प्रमुख भागाप्रमाणे झालेले मतदान 

मतदानकेंद्र प्रमुख भाग
भाजप
राष्ट्रवादी
वंचित
इतर
नोटा
एकूण
फरक
 जामखेड
7394
5466
599
434
34
13927
-1928
 राशिन
2411
2716
637
198
20
5982
305
 मिरजगांव
3626
1798
175
152
20
5771
-1828
 कर्जत
2544
1939
369
131
12
4995
-605
 खर्डा
2271
1636
132
148
11
4198
-635
 कोरेगांव / सटवाई/गलांडेवाडी
1344
1418
88
110
3
2963
74
 जवळा
1661
1051
144
103
2
2961
-610
 बारडगांव सु./द.
1220
1543
48
78
4
2893
323
 नान्नज
1667
681
113
143
8
2612
-986
 भांबोरा
1275
1033
100
127
7
2542
-242
 चापडगांव
832
1000
143
43
6
2024
168
 साकत
905
823
138
85
5
1956
-82
 खेड
799
937
126
59
6
1927
138
 चिलवडी
1024
780
40
81
2
1927
-244
 कुळधरण
788
749
296
75
1
1909
-39
 दुरगांव
808
931
62
92
5
1898
123
 आळसुंदे
989
684
104
77
3
1857
-305
 पिंपळवाडी
726
1049
4
69
5
1853
323
 खांडवी
519
1126
122
48
4
1819
607
 पाटोदा
947
664
88
88
2
1789
-283
 हळगांव
1064
627
9
57
3
1760
-437
 भांडेवाडी
1052
564
44
73
2
1735
-488
 अरणगांव
795
776
84
64
3
1722
-19
 चिचोंली काळदात/रमजान
731
863
63
60
4
1721
132
 बाबुळगांव खा./दु.
775
790
59
65
7
1696
15
 पिंपरखेड
987
640
3
60
0
1690
-347
 राक्षसवाडी बु/खु
969
492
49
99
2
1611
-477
 निमगांव गांगर्डा
1023
458
55
68
2
1606
-565
 थेरगांव
827
541
31
84
8
1491
-286
 पाटेगांव
777
573
39
78
7
1474
-204
 मोहा
1048
212
125
79
3
1467
-836
 टाकळी खंडेश्वरी
594
706
86
43
3
1432
112
 शिंदे
616
581
148
79
6
1430
-35
 निमगांव डाकु
814
516
47
47
2
1426
-298
 आंबीजळगांव
657
651
43
39
6
1396
-6
 जलालपुर
709
539
63
72
3
1386
-170
 बेनवडी
762
537
14
55
2
1370
-225
 दिघोळ
980
281
23
61
2
1347
-699
 गणेशवाडी
684
617
4
38
2
1345
-67
 चांदे ब्रु/ख्रु
714
445
119
53
2
1333
-269
 तरडगांव
808
380
35
71
5
1299
-428
 पिंपळगांव उंडा/आळवा
625
588
26
45
2
1286
-37
 परीटवाडी
402
833
2
44
2
1283
431
 शिऊर
875
317
17
60
5
1274
-558
 कोंभळी
622
490
70
63
8
1253
-132
 फक्राबाद
636
550
35
24
3
1248
-86
 गुरवपिंप्री
535
495
158
39
3
1230
-40
 नायगांव
732
429
8
41
1
1211
-303
 पाटेवाडी
674
481
20
32
2
1209
-193
 थेरवडी
483
616
67
27
2
1195
133
 वंजारवाडी
957
174
0
51
3
1185
-783
 कापरेवाडी
592
529
9
50
0
1180
-63
 कोपर्डी
478
413
126
122
4
1143
-65
 रवळगांव
712
340
62
26
1
1141
-372
 काळेवाडी
488
548
43
46
3
1128
60
 देशमुखवाडी
371
715
1
34
1
1122
344
 करपडी
468
536
25
50
4
1083
68
 नागलवाडी
589
382
45
37
5
1058
-207
 जळगांव
713
284
32
18
2
1049
-429
 घुमरी
566
440
2
33
7
1048
-126
 शिंपोरा
406
568
38
23
3
1038
162
 भोसे
517
323
139
43
0
1022
-194
 तेलंगशी
640
242
56
82
1
1021
-398
 कोकणगांव
536
439
6
33
0
1014
-97
 रत्नापुर
458
510
12
30
1
1011
52
 बेलगांव
462
480
39
13
1
995
18
 डोणगांव
356
457
123
33
2
971
101
 जातेगांव
649
259
15
43
1
967
-390
 माही
461
471
4
30
0
966
10
 घोडेगांव
514
338
59
35
1
947
-176
 धामणगांव
618
256
7
64
2
947
-362
 रेहकूरी
463
393
35
48
4
943
-70
 जवळके
384
474
29
35
0
922
90
 मलठण
445
391
35
45
2
918
-54
 कुसडगांव
444
426
4
38
1
913
-18
 सोनाळवाडी
204
651
3
42
3
903
447
 चोंडी
507
257
81
46
1
892
-250
 वडगांव तनपुरा
416
277
130
59
4
886
-139
 सोनेगांव
282
535
4
39
4
864
253
 आनंदवाडी
515
293
19
34
2
863
-222
 ताजू
328
452
14
61
1
856
124
 कौडाणे
520
178
108
37
6
849
-342
 रुईगव्हाण
428
340
49
30
0
847
-88
 नांदगांव
452
297
65
24
2
840
-155
 जोंगेश्वरवाडी
436
367
2
34
0
839
-69
 सुपेकरवाडी
359
417
1
29
2
808
58
 कानगुडवाडी
118
664
16
7
0
805
546
 देवदैठण
513
180
42
58
1
794
-333
 आखोणी
382
354
23
29
3
791
-28
 सावरगांव
421
329
2
35
4
791
-92
 सिद्धटेक
380
341
33
36
1
791
-39
 करमनवाडी
418
328
1
41
2
790
-90
 बहिरोबावाडी
339
425
1
18
5
788
86
 पाडळी
262
457
5
52
5
781
195
 मुळेवाडी
448
296
4
27
2
777
-152
 सारोळा
574
148
8
41
2
773
-426
 राजुरी
326
339
71
27
6
769
13
 माळेवाडी
516
180
15
39
1
751
-336
 नवसरवाडी
384
317
1
44
2
748
-67
 बिटकेवाडी
544
128
3
53
0
728
-416
 मांदळी
473
178
23
32
4
710
-295
 डिकसळ
398
168
103
34
1
704
-230
 मुंजेवाडी
463
187
2
38
2
692
-276
 दिघी
301
341
9
31
1
683
40
 वाकी
425
162
60
34
1
682
-263
 धालवडी
288
318
42
27
4
679
30
 कवडगांव
246
389
11
26
2
674
143
 जायभायवाडी
596
54
0
17
3
670
-542
 वायसेवाडी
322
295
13
37
2
669
-27
 धनेगांव
359
272
13
23
0
667
-87
 दुधोडी
245
392
1
24
0
662
147
 वालवड
417
194
28
23
0
662
-223
 मोहरी
338
228
67
27
1
661
-110
 शितपुर
482
159
1
16
2
660
-323
 धानोरा
268
306
62
9
2
647
38
 धांडेवाडी
240
390
0
13
0
643
150
 भुतवडा
387
199
33
20
1
640
-188
 खुरदैठण
338
259
12
30
0
639
-79
 चोभेवाडी
367
244
1
13
0
625
-123
 धोंडपारगांव
226
354
10
32
1
623
128
 लोणी
369
186
20
43
2
620
-183
 खातगांव
386
171
37
16
2
612
-215
 बेर्डी
136
398
54
19
2
609
262
 माळंगी
204
376
7
14
1
602
172
 जळकेवाडी
384
195
2
14
2
597
-189
 लोणी मसदपूर
256
236
84
11
3
590
-20
 सातेफळ
359
155
33
36
1
584
-204
 गायकरवाडी
435
124
1
16
3
579
-311
 नेटकेवाडी
253
306
0
19
0
578
53
 बावी
242
287
22
21
0
572
45
 नाहुली
295
222
3
28
3
551
-73
 निंबे
415
123
3
8
1
550
-292
 पठारवाडी [कर्जत]
217
309
1
13
6
546
92
 निंबोडी
288
201
30
13
3
535
-87
 नागापुर
315
196
5
17
0
533
-119
 धोत्री
352
160
1
17
0
530
-192
 राजेवाडी
254
250
1
21
1
527
-4
 नागोबाचीवाडी
407
90
4
21
1
523
-317
 ढेरेमळा (कर्जत)
304
90
110
18
0
522
-214
 डोळेवाडी
373
98
23
25
1
520
-275
 रातंजन
347
159
1
11
1
519
-188
 बांधखडक
321
152
11
32
2
518
-169
 राऊकाळेवाडी
183
293
19
20
1
516
110
 औटेवाडी
179
304
7
13
2
505
125
 फाळकेवाडी
373
93
3
33
0
502
-280
 मतेवाडी
239
231
3
26
2
501
-8
 पांढरेवाडी
361
105
3
28
3
500
-256
 बोर्ले
163
308
0
10
0
481
145
 होलेवाडी
351
114
1
12
1
479
-237
 येसवडी
240
159
60
15
1
475
-81
 चखालेवाडी
324
104
1
42
0
471
-220
 बर्गेवाडी
331
127
0
13
0
471
-204
 जामवाडी
369
78
5
16
1
469
-291
 तळवडी
193
225
13
33
0
464
32
 सरदवाडी
236
205
4
19
0
464
-31
 चुंभळी
346
100
4
11
0
461
-246
 झिक्री
195
244
7
15
0
461
49
 बाळगव्हाण
254
155
26
20
2
457
-99
 कोल्हेवाडी
269
171
0
14
2
456
-98
 जमादारवाडी
300
131
1
22
2
456
-169
 वाघा
210
215
20
11
0
456
5
 तिखी
252
175
1
21
2
451
-77
 खुरंगेवाडी
348
66
4
25
3
446
-282
 आघी
164
254
8
17
0
443
90
 बजरंगवाडी
215
166
2
56
1
440
-49
 डिसलेवाडी
217
184
2
35
1
439
-33
 सांगवी
211
203
18
4
0
436
-8
 लेहनेवाडी
187
213
8
22
1
431
26
 आपटी
341
76
0
8
1
426
-265
 पोतेवाडी
180
215
1
23
0
419
35
 देऊळवाडी
316
82
2
14
0
414
-234
 थिटेवाडी
305
74
3
25
4
411
-231
 सौताडेवस्ती
187
216
0
7
0
410
29
 बटेवाडी
340
35
5
27
1
408
-305
 सुपे
213
175
2
14
1
405
-38
 कुभेफळ
130
264
2
7
1
404
134
 बेलवंडी
177
177
30
13
0
397
0
 डोंबाळवाडी
180
193
2
14
0
389
13
 शेगुड
207
156
2
16
1
382
-51
 गुरेवाडी
156
214
1
3
0
374
58
 काटेवाडी
238
113
2
10
1
364
-125
 महारुळी
133
190
0
23
2
348
57
 हंडाळवाडी
219
117
4
8
0
348
-102
 खंडाळा
250
60
2
27
0
339
-190
 दरडवाडी
257
27
0
7
1
292
-230
 गिरवली
123
153
3
3
0
282
30
 पारेवाडी
142
112
0
10
0
264
-30
 गोंदर्डी
97
152
0
2
1
252
55
 गोयकरवाडी
165
16
0
0
0
181
-149

सोशल मीडियातील आभासी नेतृत्व 

सोशल मीडियाचा अतिरेकी वापर निवडणुकीच्या दृष्टीकोनातून केलेल्या कार्याचा उहापोह या कृत्यांमुळे सोशल मीडियातील आभासी नेतृत्व म्हणून बारामती जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांची ओळख निर्माण केली जात आहे. त्यांनी वेळीच नेतृत्वाचे आभासी वास्तव जाणले नाही तर त्यांना राजकीयदृष्ट्या मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साबणाच्या वडीची जाहिरात करावी त्या पद्धतीने आजकाल राजकीय नेत्यांची प्रसिद्धी केली जाते. त्यासाठी जनसंज्ञापनाची उपलब्धता यासाठी सर्व नवी-जुनी साधने वापरली जातात. नेत्यांच्या प्रत्यक्षाहून उत्तुंग अशा प्रतिमा बनविल्या जातात. अशा ब्रॅण्डेड नेत्यांनाच मग करिश्माई वगैरे म्हटले जाते. यात लोकांची फसगत होते, तशीच नेत्यांचीही फसगत होते आणि ते अधिक भयंकर आहे. जाहिरातबाजीचा हा सापळा सावजाइतकाच शिकाऱ्यासाठीही महाघातक आहे. प्रतिमा सुधारण्यासाठी हाती घेतलेले उपाय पाहता, ते अशाच प्रकारच्या सापळ्यात अडकत चालले आहेत की काय अशी शंका निर्माण होते. समाजमाध्यमांसह वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांत येणाऱ्या बातम्या, घटनावर नजर ठेवणे, पक्षीय मतांची माध्यमांतून पेरणी करणे, घटना-घडामोडींवर प्रतिक्रिया देणे अशी विविध कामे करणारी योग्य ठेकेदारी कंपनी नसेल तर नकारात्मक आभासी वास्तव तयार होते हे यांच्यासाठी अयोग्य ठरते. ज्या व्यक्ती प्रसार आणि समाजमाध्यमांवरच अवलंबून असतात अशा व्यक्तीचे लक्षण आभासी नेतृत्व म्हणून गणले जाते. विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार नशीब अजमावणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या बैठका, भेटी-गाठी सध्या या मतदारसंघात सुरु आहेत. एक वर्षभरापासून मतदारसंघातील त्यांचा वावर वाढलेला आहे. प्रसिद्धीसाठी त्यांनी जामखेडच्या एका छोट्या सलून दुकानात जाऊन दाढी करुन घेतली. आणि मिशा छाटण्याचे फोटो देखील व्हायरल केले. सलूनचालक संदीप राऊत यांचा मजेदार किस्सा सोशल मिडीयावर फिरत आहे. प्रसिद्धी मिळवून देणारे ठेकेदार सांगतात सुप्रसिद्धी आणि कुप्रसिद्धी आमच्या दृष्टीकोनातून ती प्रसिद्धीच असते.मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पोर'खेळ' देखील सुचवले जातात. प्रसिद्धीचा ठेका घेणार्यांना केवळ प्रसिद्धी दिसते त्यातून निवडणुकीत काय परिणाम होईल याचे भान नसते. असेच कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातील इच्छूक उमेदवार रोहित पवार यांच्या डोक्यात खेळण्यांमध्ये बसण्याचे खूळ घातले.  कर्जतच्या श्री. सद्द्गुरु गोदड महाराज यांच्या यात्रेत या खेळांचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या भावी मतदारांशी संवाद साधला म्हणे. यावेळी त्यांना 'दिल तो बच्चा है जी' असे कोणाचे तरी बोल आठवले. त्यामुळे मग मी ही या खेळण्यांमध्ये बसण्याचा मोह आवरू शकलो नाही असेही स्पष्टीकरण दिले. जत्रेत गेल्यानंतर तेथे काय-काय केले, यासंदर्भातील एक पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. नातू...नातू अशा शब्दाचा सातत्याने प्रत्येक पोस्टमध्ये मारा केला जात आहे. कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातील नागरीकांमध्ये या शब्द प्रयोगामुळे नकारात्मकता वाढीस लागली आहे. नातू...नातू असे शब्द त्यांच्या कानावर पडल्याने ते आता तू..ना..तू..ना असे मतदार बोलू लागले आहेत. सोशल मीडियातून प्रसिद्धीसाठी सातत्याने वेगवेगळ्या विषयांना अनुसरून पोस्ट केल्या जातात त्यामध्ये जाणीवपूर्वक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू अशा शब्दाच्या अतिरेकामुळे येथील नागरिकांमध्ये काही प्रमाणात त्यांच्या विषयी नकारात्मकता निर्माण होत आहे. 

व्यवसायातील सहभागाने कर्जबाजारीपणाच-

रोहित पवार यांच्या व्यवसायातील सहभागाने कर्जबाजारीपणाच वाढलेला कंपनीच्या रिपोर्ट वरून दिसून येत आहे. यशस्वी व्यवसाय केल्याचा त्यांचा दावा फोल ठरतो आहे. बारामती अॅग्रो लि. या कंपनीची त्यांनी 01/04/2009 मध्ये जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी कंपनीवर अल्प कर्ज/बोजा होता. रोहित पवार यांच्या व्यवसायातील सहभागाने कर्जबाजारीपणाच वाढलेला असून २०१९ मध्ये 116 कोटी 93 लाख बारामती अॅग्रो लि. या कंपनीवर कर्ज/बोजा नोंद केल्याचे दिसून येते तर एकूण या कंपनीवर तब्बल 1145 कोटी 82 लाख 1 हजार रुपयांचा कर्ज/बोजा नोंद कंपनी रजिस्टार यांच्या दप्तरी आहे.

रोहीत पवार यांच्यावर मर्जी 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि बारामती जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांच्यावर इतरांपेक्षा आजोबांची मर्जी असल्याचे दिसून येते. देश व विदेश दौरयामध्ये रोहित पवार यांना अनेकदा सहभागी करून घेतले आहे. तसेच काही संस्थामध्ये निवडीस त्यांना प्राधान्य दिलेले आहे. इंडियन शुगर मिल असोसिएशन अर्थात इस्मा या देशातील खासगी साखर उद्योगाच्या संघटनेच्या अध्यक्षपदी बारामती अॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले रोहित पवार यांनी इस्मा या संघटनेचे मागील वर्षी उपाध्यक्षपद स्विकारले होते. सध्या ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचेही संचालक देखील आहेत. दरम्यान सात कंपन्यांमध्ये संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. या सात कंपन्यांमध्ये BARAMATI AGRO LIMITED,  RAJAS AGRO PRIVATE LIMITED, SUHIT TRADING PRIVATE LIMITED, INDIAN SUGAR EXIM CORPORATION LTD., RAVISH GREENFIELDS PRIVATE LIMITED., ANSHUMAN GREENFIELDS PRIVATE LIMITED., DINKAR GREENFIELDS PRIVATE LIMITED यांचा समावेश आहे. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================





No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.