Wednesday 28 August 2019

सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदेंचा राजकारणात प्रवेश; मोहोळ किंवा माळशिरस मतदारसंघातून विधानसभा लढवणार

महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी स्वीकारली आहे. सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ व सोलापूर शहर मध्य हे मतदारसंघ राखीव आहेत. त्यामुळे आनंद शिंदे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का अशा चर्चांना उधाण आले आहे. आनंद शिंदेंचा मंगळवारी इंदापूरजवळ अपघात झाला होता. ते आता सुखरुप आहेत. आनंद शिंदे आणि त्यांचा मुलगा डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न केले होते. उद्धव ठाकरे यांनी शिंदे पिता-पुत्राला विधानसभेची ऑफर दिली असून आठवड्याभरापूर्वी मातोश्रीवर याबाबत बैठक झाल्याची माहिती होती. मात्र या बैठकीत आनंद शिंदे यांनी आपल्याला निवडणूक लढवण्यात रस नसल्याचे स्पष्ट केले होते. शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी, आरपीआय आणि एमआयएम पक्ष ही शिंदे पिता-पुत्राला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत होते. २०१२ साली महाराष्ट्र स्वामिमान रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. या पक्षाचे संस्थापक मनोज संसारे आहेत. याआधी पक्षाच्या प्रदेशाध्याची जबाबदारी प्राध्यापक सुषमा अंधारे यांच्यावर होती. पक्षप्रवेशाविषयी आनंद शिंदे म्हणाले, ”भाजप-शिवसेना युतीला रोखणे ही आमची भूमिका आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सध्या ठराविक मतदारसंघाचा विचार केला नाही. पण पक्षबांधणीसाठी राज्यभरात आम्ही फिरू. त्याचप्रमाणे समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचाही विचार करू.” आनंद शिंदे हे मूळचे मंगळवेढ्याचे आहेत. त्यातच आता राजकीय प्रवेश केल्यानंतर मोहोळ किंवा माळशिरस यापैकी एका मतदारसंघातून विधानसभा लढवणार आहे. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.