Thursday 22 August 2019

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे अंबादास दानवे विजयी

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची 207 मते फुटली


विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे विजयी झाले. दानवे यांनी काँग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांचा ४१८ मतांनी पराभव केला. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीसाठी युतीकडून शिवसेनेचे अंबादास दानवे, तर आघाडीकडून बाबुराव कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीसाठी १९ ऑगस्ट रोजी मतदान पार पडले होत. ६५७ मतदारांपैकी ५४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. होता. १० मतदार गैरहजर राहिले होते. मतदारसंघात नगरसेवक आणि जि. प. सदस्य मतदान करतात. या दोन्ही जिल्ह्यात ६५७ पात्र मतदार असल्याची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकाशित करण्यात आली होती. एका नगरसेवकास मतदार यादीत ठेवायचे की नाही यावरून संभ्रम होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जि. प. सदस्य भागवत उफाड यांचाही मतदार यादीत समावेश करण्यात आला होता. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे ३३० आणि महाआघाडीकडे २५०, तर एमआयएम आणि अपक्ष यांची ७७ मते होती. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या अब्दुल सत्तार यांनीही दानवे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे युतीच्या विजयाची घोषणाच शिल्लक राहिली होती.दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतमोजणीला गुरूवारी सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. त्यात युतीचे उमेदवार अंबादास यांना ५२४ मते मिळाली. तर आघाडीचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांना १०६ मते मिळाली. दानवे यांनी तब्बल ४१८ मतांनी कुलकर्णी यांचा पराभव केला. दानवे यांच्या विजयाला एमआयएमनेही हातभार लावला असल्याच्या चर्चा निवडणूक निकालानंतर सुरू झाली आहे.औरंगाबाद-जालना विधान परिषद जागेसाठीच्या निवडणुकीत काँग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांचा पराभव झाला. गेल्यावेळी काँग्रेसकडे असलेली ही जागा शिवसेनेने परत आपल्याकडे खेचून आणली. वास्तविक पाहता औरंगाबाद आणि जालना जिल्हा परिषदेत शिवसेनेची काँग्रेस युती होती. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रोष होता. अशा स्थितीत दानवे यांच्यासोबत दगाफटका होण्याची शक्यता होती. भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून व्हीप जारी केल्यामुळे भाजपची मते दानवे यांनाच मिळाली. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. औरंगाबाद जिल्ह्यात खैरे यांचा एकहाती अंमल होता. त्यामुळे दुसऱ्या फळीतील नेत्यांना राज्य पातळीवर चमकण्यासाठी फारशी संधी मिळाली नाही. मात्र खैरे यांच्याविषयी असलेली नाराजी आणि त्यांचा झालेला पराभव यामुळे शिवसेना नेतृत्वाने औरंगाबादमधून नव्या चेहऱ्याला संधी दिली. केवळ संधी न देता दानवे यांच्या विजयासाठी युतीची ताकद उभी केली. तर शिवसेनेचा कायम विरोध करणाऱ्या एमआयएमने देखील दानवे यांना मदत केली. यावरून दानवे यांचे सर्वच पक्षांसोबत असलेले संबंध मैत्रीपूर्ण असल्याचे स्पष्ट होते.

राष्ट्रवादी काँग्रेसची 207 मते फुटली 

दानवेंना एकूण 524 मते मिळाली असून 418 मते अधिक घेत त्यांनी विरोधी उमेदवाराचा पराभव केला. काँग्रेस आघाडीचे उमेदवार भवानीदास कुलकर्णी यांना 106 च मते मिळाली आहेत. विधान परिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची 207 मते फुटली आहेत. तर 14 मते बाद झाली. भवानीदास कुलकर्णी यांना 106 मते मिळाली. पहिल्याच फेरीतच आघाडी गारद झाल्याचं पाहायला मिळाले. तर, अपक्ष शाहनवाज खान यांना केवळ 3 मते मिळाली. विशेष म्हणजे एमआयएमनेही अनपेक्षितरीत्या महायुतीच्या उमेदवाराला साथ दिली. त्यामुळे दानवे यांचा विजय सहज आणि सोपा झाला होता. पक्ष योग्य वेळ पाहून संधी देत असतो, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी मला संधी दिली. त्यामुळे मी आमदार झाल्याचे अंबादास दानवेंनी म्हटले आहे. गुप्त मतदान हेच विक्रमी मतांचं गणित असून शिवसेना आणि भाजपाचे मिळून 292 मतदान होतं. मात्र, काँग्रेसचेही काही अदृश्य मते मिळाली, असेही दानवेंनी विजयानंतर म्हटले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================





No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.