Tuesday 27 August 2019

खासदार गिरीश बापट यांचे रणनीतीकार राजकारणात; शिवाजीनगर अथवा पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघातून निवडणूक लढवणार

सुनील माने यांचा आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश



खासदार गिरीश बापट यांचे रणनीतीकार राजकारणात जाहीररीत्या प्रवेश करीत असून आगामी शिवाजीनगर विधानसभा अथवा पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. सकाळ माध्यम समूहात काही काळ विधिमंडळ व संसदीय वृत्तांकनाचे कार्य केल्यानंतर राजकीय नेत्यांना स्ट्रॅटेजिस्ट नियोजन करून देण्याच्या प्रोफेशनल्स कुशलतेमुळे अल्पावधीतच राजकीय रणनीतीकार म्हणून लौकिकता प्राप्त करणारे सुनील माने भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. जंगली महाराज रस्त्यावरील पक्ष कार्यालयात संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष व खासदार गिरीश बापट आणि शहराध्यक्षा आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. आपल्या सर्वांच्या पाठबळावर मी सक्रीय सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम सुरू करीत असल्याचे सुनील माने यांनी म्हंटले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये त्यांचे सलोख्याचे संबंध असून माध्यम व जनसंपर्क कंपनीच्या कार्यातून त्यांनी अनेक राजकीय नेत्यांना सेवा पुरवली आहे. व्यूहरचनाकार (स्ट्रॅटेजिस्ट) म्हणून अल्पावधीत त्यांनी राजकीय नेत्यांच्या आपल्या कार्याची चुणूक दाखवलेली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित खासदार आणि पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीश बापट हे तब्बल ३ लाख २६ हजार मताधिक्यांनी निवडून आले. पण त्यांच्या जिंकून येण्याच्या मागे मोठी स्ट्रॅटेजी व नियोजित पूर्वतयारी होती. २०१४ साली खासदार गिरीश बापट यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नव्हती मात्र तेव्हापासूनच २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरु होती. त्यांच्या विजयामागे व्यूहरचनाकार (स्ट्रॅटेजिस्ट) सुनील माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा देखील मोठा वाटा असल्याचे कोणीही नाकारत नाही. लोकसभेसारखी मोठी निवडणूक जिंकण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात, मात्र उमेदवाराची राजकीय व्यूहरचना,  प्रचारयंत्रणा, पक्षांतर्गत आणि घटकपक्षाशी नाळ घट्ट करून सर्वांना प्रचारयंत्रणेत सक्रिय करणे अत्यंत महत्त्वाचे असते. सोशल मीडियाचा प्रभाव वाढत असताना सर्व बाबींचा समन्वय साधणे आवश्‍यक असते, नेमका हाच समन्वय योग्य पद्धतीने साधण्यात ते यशस्वी ठरले. यामागे खासदार गिरीश बापट यांचे व्यूहरचनाकार (स्ट्रॅटेजिस्ट) सुनील माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले नियोजन आणि त्यानुसार केलेल्या अंमलबजावणीमुळे खासदार गिरीश बापट यांना विक्रमी मताधिक्‍य मिळाले होते. राज्यातील दलित नेते व कार्यकर्त्यांशी समन्वय साधून महत्वाच्या शहरातील दलित संघटना भाजपच्या पाठीशी उभ्या करून त्यांना सत्तेत सहभाग मिळावा यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतून संधी मिळाल्यास व्यापक समाजकारण व राजकारण करण्याचा त्यांचा मनोदय आहे. शिवाजीनगर व पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघातून अनेक जण इच्छूक आहेत. प्रबळ इच्छुकांच्या रांगेतून उमेदवारी प्राप्त करण्याच्या त्यांच्या प्रयत्नातून त्यांची राजकारणातील रणनीती स्पष्ट होणार आहे. 
========================================

सुनील माने यांचा भाजप प्रवेश प्रसिद्ध झालेले वृत्त


पत्रकारितेतून यश शिखरावर पोहोचल्यानंतर जनसंपर्क व्यवसायात पदार्पण करून राजकीय रणनीतीकार म्हणून ख्याती प्राप्त केलेले सुनील माने आजपासून नवी इनिंग सुरु करत आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाने बहुआयामी व्यक्तिमत्वाची राजकारणात आज ‘एण्ट्री’ झाली आहे.असे मत संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांनी येथे व्यक्त केले .यावेळी बापट यांच्या सह भाजप शहराध्यक्षा माधुरी मिसाळ, शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, सरचिटणीस उज्वल केसकर, मुरली मोहोळ आणि गणेश घोष यांच्या उपस्थितीत माने यांनी  आज जंगली महाराज रस्त्यावरील भाजप शहर कार्यालयात पक्षप्रवेश केला.याप्रसंगी खासदार बापट म्हणाले की, सुनील माने यांच्यासोबत अनेक वर्षांपासून काम करतोय. सुनील दैनिकात काम करत असल्यापासून आमचा परिचय असून पत्रकार नावाला शोभेल असं त्यांचं कर्तृत्व आहे. त्यांच्या अनेक वर्षांच्या पत्रकारितेत त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी वृत्त प्रसिद्ध केले. या माध्यमातून त्यांनी समाजाला पुढे नेण्याचे काम केले. आज सुनील माने यांच्या रूपाने झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता पक्षाला मिळाला असून त्याच्या व्यूहरचनेचा पक्षाला फायदा होईल, अशी खात्री वाटते.मिसाळ म्हणाल्या की, खासदार बापट यांच्या समवेत अनेक निर्णायक प्रसंगांमध्ये सुनील माने यांना काम करताना मी जवळून पाहिले. ज्या एकनिष्ठेने आणि एकरुपतेने त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी काम केले त्यावरून आम्ही तेव्हाच त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले होते. आजची केवळ औपचारिकता आपण पार पाडत आहोत, असे मला वाटते. माने म्हणाले की, वीस वर्ष पत्रकारिता व यासंबंधी क्षेत्रात कामे केली. या दरम्यान विधानसभा ते संसद अशा वेगवेगळ्या पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. केंद्रात नरेंद्र मोदीजी, अमितभाई शहा यांचे व्हिजन आणि राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यपद्धतीने मला प्रभावित केले. खासदार बापट यांच्या समवेत काम करत असताना सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते देशाला पुढे घेऊन जाण्याच्या ध्येयाने काम करत असल्याचे जाणवले. या विकास प्रक्रियेत आपल्यालाही अल्प वाटा देता यावा, या उद्देशाने मी आज भारतीय जनता पक्ष प्रवेश केला.यावेळी शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर, नगरसेवक विजय शेवाळे, आदित्य माळवे, किरण दगडे पाटील, उमेश गायकवाड, प्रकाश ढोरे, सुशील मेंगडे, महेश लडकत, अजय खेडेकर, सम्राट थोरात, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे, प्रतीक देसर्डा, सुनील शुक्ला,जतिन पांडे, चंद्रकांत पोटे,पुनीत जोशी,संजय मयेकर,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, डॉ अंबरीश दरक,ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, विनोद सातव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
======================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.