राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमात बदल
114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबर ऐवजी २६ सप्टेंबरला मतदान
पुणे जिल्ह्यातील एकमेव बावधन बु ग्रामपंचायतीसाठी निवडणूक 3 दिवसांनी पुढे ढकलली असुन 23 सप्टेंबर ऐवजी २६ सप्टेंबरला मतदान घेण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आले असून ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 13 जिल्ह्यांतील 114 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार होते मात्र आता सुधारित निवडणूक कार्यक्रमामुळे 2६ सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे
सुधारित निवडणूक कार्यक्रम प्रमाणे या निवडणुकांसाठी 4 ते ११ सप्टेंबर 2017 या कालावधीत सुट्टीचा दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 1४ सप्टेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. 2६ सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली जिल्ह्यात मात्र दुपारी 3.00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. सर्व ठिकाणी 2७ सप्टेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: पालघर- 8, नाशिक- 22, नंदुरबार- 1, अहमदनगर- 8, पुणे- 1, औरंगाबाद- 4, नांदेड- 4, उस्मानाबाद- 1, जालना- 40, हिंगोली- 13, यवतमाळ- 7, चंद्रपूर- 4 आणि गडचिरोली- 1. एकूण- 114. अशी आहे.
१४ ऑक्टोबर मतदानाच्या तारखेत बदल करण्याची देखील मागणी
राज्यात नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 7 हजार 576 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन टप्प्यांत 7 आणि 14 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे. यात सदस्यांसह थेट सरपंचपदांच्या निवडणुकांचाही समावेश आहे. या टप्प्यातील होणाऱ्या निवडणूक कार्यक्रमातील १४ ऑक्टोबर मतदानाच्या तारखेत बदल करण्याची देखील मागणी राजकीय पक्षांनी केली आहे. १४ ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्याने नागपूरला धम्मभूमीवर अनेक समाजबांधव येत असतात यामुळे गावपातळीवरील निवडणुकीपासून वंचित राहतील असा युक्तिवाद करण्यात येत आहे.Political Research and Analysis Bureau (PRAB)
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.