पुणे जिल्ह्यातील 11 तालुक्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान ; प्रथमच थेट पद्धतीने सरपंच निवड होणार
ग्रामपंचायत निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 14 ऐवजी 16 ऑक्टोबरला मतदान ; 14 ऑक्टोबर 2017 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्यामुळे मतदानाच्या तारखेत बदल
जनतेतून थेटपणे निवड होणारे पुणे जिल्ह्यातील बावधनचे पहिले सरपंच ठरणार
====================================================================
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook
=====================================================================
जनतेतून थेटपणे निवड होणारे जिल्ह्यातील बावधनचे पहिले सरपंच ठरणार आहेत.
बावधन ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला मतदान होणार असून आज ४ सप्टेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला. पुणे विभाग व पुणे जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला मतदान होणार आहे. जनतेतून थेटपणे निवड होणारे जिल्ह्यातील पहिले सरपंच बावधनचे ठरणार आहेत. या निवडणुकांसाठी 4 ते 8 सप्टेंबर 2017 या कालावधीत सुट्टीचा दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 13 सप्टेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. 23 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.
सरपंच पदासाठी अर्जप्रक्रिया ऑफलाईनच!;
सरपंच पदासाठी अर्जप्रक्रिया संगणकीकृत ऑनलाईन पद्धतीने सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध केली नसून संगणकीय प्रणालीत यशस्वीपणे बदल झाले नसल्याने हस्तलिखित स्वरुपात नामनिर्देशनपत्र दाखल करावे लागणार आहे. तर सदस्य पदासाठी अर्जप्रक्रिया संगणकीकृत ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील 11 तालुक्यातील २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक
पुणे जिल्ह्यातील 11 तालुक्यातील २२१ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्या ग्रामपंचायतींची निवडणूका होणार आहेत. 14 सप्टेंबर ते 17 ऑक्टोंबर या कालावधीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ - 9, आंबेगाव - 22, जुन्नर - 15, शिरूर - 4, इंदापूर - 26, बारामती - 13, दौंड - 8, वेल्हा - 28, खेड - 23, मुळशी - 11 आणि भोरमधील - 54 ग्रामपंचायतीचा समावेश आहे़ ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्या ग्रामपंचायतींची प्रभाग रचना, आरक्षणाची कार्यवाही पूर्ण झाली असून प्रभागनिहाय मतदार याद्या विभाजनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या निवडणुकीमध्ये प्रथमच थेट पद्धतीने सरपंच निवड होईल.
फुरसुंगीचा पालिकेत समावेश तरीही निवडणूक
पुणे महापालिकेत प्राधान्याने समावेश होणार्या गावामध्ये फुरसुंगीचा समवेश आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्राधान्याने समावेश करण्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. फुरसुंगी ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्याने निवडणूक लढविण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. त्यामध्ये शेवटचा सरपंच होण्यासाठी देखील चुरस निर्माण झाली आहे.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
पुणे जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती-
हवेली तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे-
पिंपरी सांडस, नांदोशी, फुरसुंगी, कदम वाकवस्ती, बुर्केगाव, पेरणे, अहिरे,आव्हाळवाडी, गोगलवाडी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
मावळ तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे-
तालुक्यातील कुणे नामा, वरसोली, गोडुंब्रे, इंदुरी, सावळे, देवळे, भोयरे निगडे, शिरगाव.
आंबेगाव तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे-
फलोदे, डिंभे खु,चिखली, गोहे खु.,पारसगाव तर्फे खेड, चांडोली बु.तळेघर, रांजणी, निघोटवाडी, आंबेदरा, आहुपे, नागापुर, चिंचोडी, कळंब, मेंगडेवाडी, घेडेगाव, धामणी, आमोंडी, नारोेडी, भावडी व साल.
जुन्नर तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे-
काळवाडी, भिवाडे खु, हातवीज, सुलतानपुर, सोमतवाडी, सावरगाव, हिवरे तर्फे मिन्हेर, शिंदे, आणे, आंबे, काले, बोतार्डे, वानेवाडी,पारगाव तर्फे आळे व साकोरी तर्फे बेल्हे.
शिरूर तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे-
काठापूर खुर्द, सोनसांगवी, करंजावणे व मांडरगाव फराटा.
इंदापूर तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे-
मदनवाडी, बोरी, पिंपरी खु.शिरसोडी, न्हावी, गंगावळण, बेलवडी, लाखेवाडी, आजोती-सुगाव, झगडेवाडी, सराटी, थेरातवाडी, रेडणी, पडस्थळ, कुरवली, डाळज नं.1, डाळज नं.2, बिजवडी, डिकसळ, म्हसोबाचीवाडी, माळवाडी, जांब, हिंगणगाव, रणमोडवाडी, मानकरवाडी, डाळज नं.3, कळाशी.
बारामती तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे-
मुरूम, वाघळवाडी, लोणीभापकर, मासाळवाडी, वाणेवाडी,कार्हाटी, मोरगाव, पळशी, सोरटेवाडी, पणदरे, सोनकसवाडी, गडदरवाडी व कुरणेवाडी. दौंड : डाळीब, बोरीभडक, दहिटणे, पाटेठाण, दापोडी, नांदुर, देवकरवाडी व लोणारनाडी.
वेल्हे तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे-
शिरकोली, हारपूड, वेल्हे खु, दापोडे, बालवड, टेकपोळे, शेनवड, गिवशी, कोशीमघर, आंबेगाव खु. कोंडगांव, बोरावळे, चिरमोडी, लव्ही बु, वाजेघर बु, कोळंबी, गोडेखल, वडघर, गुंजवणे, सोंडे हिरोजी, मोसे बु, सोंडेसरपाले, सोंडे मथाना, जाधववाडी, धानेप, पाल बु, पाल बु, केळद व सोंडे कार्ला.
खेड तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे-
येेलवडी, आनावळ, साकुर्डी, शिरोली, मिरजेेवाडी, वाडा, देवोशी, पापळवाडी, कोरेगांव खु, चास, सिद्धेगव्हाण, येणीये खु, सुरकुंडी, बहिरवाडी,शेलगांव, आंभु, गारगोटवाडी, दौंडकरवाडी, आव्हाट, मांजरेवाडी, भांबोली, बहूळ व साबळेवाडी.
मुळशी तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे-
आडमाळ, पाथरशेत,मोसे खु, आसदे, तव, लवार्डे, कोंढूर, वाजंळे, माळेगाव, भोडे वेडे व दासवे.
भोर तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत गावांची नावे-
कुरंगवाडी, डेहेण, हर्णस, तेलवडी, भिताडे,पसुरे, कासूर्डी गु.मा., म्हसकर बु., सांगवी हिमा, वाठार हिंगे, अगसुळ, भावेखल, म्हसर खु, सांगवी तर्फे भोर, आपटी, बसरापूर, करंजगाव, निगुडघर, विरवाडी, भबवडे, वेळवड, म्हकोशी, राजघर, येवली, कोळवडी, सोनवडी, दुगार्डी, कार्ले, कर्नावड, शिरवली तर्फे बोर, कंरदी खु, साळूगण, ब्राम्हणघर, कडकी, सांगवी बु, हरिश्चंद्र, कंरदी खे. बा., पारवडी, रावडी, मळे, सांगवी खु, गुहीणी, गुढे, कंरदी बु, बारे खु, कारी, बाघजवाडी, आंबेघर, कांब्रे खे. बा, वाढाणे, पांगारी, कुंबळे, वाटारा हिमा व हातनोशी या ग्रामपंचायतींसाठी निवडणुक होणार आहे.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
दुसरा टप्पा
दुसऱ्या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्रे 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2017 या कालावधीत दाखल करता येतील. ते 05 ऑक्टोबर 2017 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 14 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. या सर्व ठिकाणी 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.