हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी 9 नोव्हेंबर रोजी होणार मतदान
पहिल्यांदाच संपूर्ण निवडणुकीत होणार VVPAT चा वापर
गुजरात विधानसभा निवडणुकांची घोषणा लांबणीवर
केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ९ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशात मतदान होणार आहे तर १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात लगेचच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदानाची पावती मिळणार असून मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल, असा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला नाही. मात्र गुजरातमध्ये १८ डिसेंबरच्या आधी विधानसभा निवडणुका होतील, असे सांगण्यात आले.
मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार ज्योती यांनी पत्रकार परिषदेत हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचा विस्तृत कार्यक्रम जाहीर केला. निवडणुका निष्पक्षपणे पार पाडाव्यात म्हणून सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. या निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रायल (VVPAT) यंत्रणा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मतदान केल्यानंतर मतदाराला त्याची पावती मिळणार आहे. त्याद्वारे आपण कोणाला मतदान केले हे मतदाराला कळू शकणार आहे.हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 9 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर मतमोजणी 18 डिसेंबर रोजी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल, असे वृत्त होते. मात्र आज केवळ हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्याच तारखा जाहीर झाल्या.
हिमाचल प्रदेशमध्ये आजपासूनच आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेचे 68 सदस्य असून, तेथे सत्तास्थापनेसाठी सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपा या प्रमुख पक्षांमध्ये चुरस असेल. हिमाचल प्रदेशमध्ये 7 हजार 251 मतदान केंद्रे असतील. राज्यातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण होईल. मतदान, नामांकन आणि प्रचार फेऱ्यांचे चित्रिकरण होईल.
हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशात प्रथमच संपूर्ण निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार आहे. मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येईल. त्यासाठी निवडणूक आयोगाने योग्य व्यवस्था केली आहे, एका मतदार संघातील मतपत्रिकांची संपूर्ण मोजणी होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. तसेच इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर दाखवण्यात आले आहे. व्हीव्हीपॅट मशीनवर कुणाला मत दिले आहे. त्याची माहिती मतदाराला मिळेल.
आयोगाने गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. गुजरात विधानसभा निवडणुकीचीही आज घोषणा होण्याची शक्यता होती मात्र आयोगाने अद्याप या तारखा जाहीर केलेल्या नाही. त्यांची घोषणा लवकरच होणार आहे. आयोगाने म्हटले आहे, की हिमाचलच्या निकालाचा परिणाम गुजरात निवडणुकीवर व्हावा अशी आमची इच्छा नाही. हिमाचलमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे तर गुजरातमध्ये भाजप सत्तेत आहे.2002 चा अपवाद वगळला तर गेली 20 वर्षे हिमाचल प्रदेश आणि गुजरातची निवडणूक ही एकत्रच जाहीर होते. काल मात्र निवडणूक आयोगाने केवळ हिमाचलची निवडणूक जाहीर केली. 9 नोव्हेंबरला मतदान आणि 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्याचवेळी गुजरातबद्दल विचारलं असता 18 डिसेंबरआधीच गुजरातचीही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल, इतकंच आयोगाने सांगितलं. हिमाचल आणि गुजरात विधानसभेच्या कालखंडात केवळ 2 आठवड्यांचा फरक आहे.
ठळक मुद्दे...
* मतदानासाठी ७५२१ मतदान केंद्रांची व्यवस्था
* उमेदवारांना खर्च मर्यादा २८ लाख रुपयांपर्यंत असेल.
* १६ ते २३ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
* २४ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार
* २६ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेता येणार
* ९ नोव्हेंबर रोजी होणार मतदान
* १८ डिसेंबर रोजी होणार मतमोजणी
हिमाचल प्रदेश विधानसभा सद्यस्थिती
पार्टी 2012 विधानसभा निवडणूक वोट शेयर 2014 लोकसभा निवडणूक
काँग्रेस 36 42.8% 04
भाजप 26 38.5% 00
एचएलपी 1 1.9% 00
अपक्ष 5 12.1% 00
* विधानसभेच्या 68 जागा, लोकसभेच्या 4 जागा आहे.
राज्यांमध्ये यांची राहाणार महत्त्वाची भूमिका हिमाचल प्रदेश: नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, वीरभद्र सिंह, जेपी नड्डा
(1) Assembly Constituencies
The total number of Assembly Constituencies in the State of Himachal Pradesh and seats
reserved for the Scheduled Castes and the Scheduled Tribes, as determined by the Delimitation
of Parliamentary and Assembly Constituencies Order, 2008, are as under: -
State Total No. of ACs Reserved for SCs Reserved for STs
Himachal Pradesh 68 17 3
(2) Electoral Rolls
The electoral rolls of all the existing Assembly Constituencies in the State of
Himachal Pradesh are being revised, with reference to 01.01.2017 as the qualifying date. The dates
of publication of the Final Rolls are indicated in the Table below and the details of the final
publication will be made available on the ECI website. As per the draft rolls, the numbers of
electors in the states are as follows:
State
Total No. of Electors in Draft
Rolls-2017 on 01/07/2017
w.r.t. 01/01/2017 as
qualifying date
Total no of Electors as per Final
Roll on 15/09/2017
Himachal Pradesh 4827644 (48.27 Lac) 4905677 (49.05 Lac)
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.