मुंबई महानगरपालिकेत राजकीय भूकंप; शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक फोडले
भाजपाच्या महापौरपदाच्या दाव्याला सुरुंग
अवघे सात नगरसेवक निवडून आलेल्या मनसेला मोठा धक्का
महापालिकेत नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या भांडुप पोटनिवडणुकीत भाजपाने शिवसेनेना धूळ चारून विजय मिळवल्यानंतर भाजपाच्या महापौरपदाच्या दाव्याला बळ मिळालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मनसेच्या 6 नगरसेवकांना फोडल्याचा दावा भाजपाकडून केला जातोय. मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक कोकण विभागीय आयुक्तांसमोर गटनोंदणी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या परवानगीशिवाय मनसेच्या नगरसेवकांनी गटस्थापना करण्याचा प्रयत्न चालवल्यानं महापालिकेतील सत्ता समीकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. भाजपासाठी हा मोठा धक्का समजला जातोय. शिवसेनेच्या या मास्टर स्ट्रोकमुळे भाजपासोबत मनसेलाही काहीसा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेत नगरसेवक विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. शिवसेनेचे सध्या महापालिकेत 84 नगरसेवक आहेत, तर भाजपाजवळ 83 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. भांडुप पोटनिवडणुकीमुळे भाजपा नगरसेवकांच्या संख्येत एका अंकानं वाढ झाली आहे. त्यामुळेच मनसेच्या नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न सेनेनं चालवला असून, उद्धव ठाकरेंचा सत्ता टिकवण्याचा आटापिटा सुरू असल्याचं दिसतंय. भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेना नगरसेवक फोडत असल्याचं सांगत निवडणूक आयोगाला पत्रसुद्धा लिहिलं आहे. मनसेचे 5 ते 6 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, शिवसेना मनसेच्या नगरसेवकांना कोकण विभागीय आयुक्तांकडे घेऊन जाण्याच्या तयारीत आहे, मनसेनेही आमचे केवळ एकाच नगरसेवकाशी संपर्क झाल्याचे म्हटले आहे. भाजपापाठोपाठ मनसे कोकण विभागीय आयुक्तांना पत्र पाठवणार आहे. 2017च्या महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना व भाजपात दोन संख्याबळाचा फरक असल्याने शिवसेनेचे टेन्शन वाढले होते. त्यात भांडुप पोटनिवडणुकीत भाजपाच्या विजयामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली. मनसेचे काही नगरसेवक निवडणुकीपूर्वीच भाजपात गेले होते. तर काही शिवसेनेच्या संपर्कात होते. बुधवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे महापालिकेत आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले होते. तेव्हापासून मनसेचे गटनेते दिलीप लांडे आणि आणखी एक नगरसेवक वगळता पाच जण गैरहजर होते. मनसेच्या हर्षिला मोरे, अश्विनी माटेकर, अर्चना भालेराव, दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, संजय तुर्डे या नगरसेवकांनी मनसेला सोडचिठ्ठी देत वेगळा गट स्थापन केला आहे. पक्षाच्या आदेशाविना नगरसेवकांनी निर्णय घेतला असून, एक दिवस मनसे सोडून गेलेल्या नगरसेवकांना नक्कीच पश्चात्ताप होईल, असंही मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. गटनोंदणी करण्याआधी पक्षाशी चर्चा करा, असा आदेश मनसेनं वेगळा गट स्थापन करण्यासाठी निघालेल्या नगरसेवकांना दिला आहे. परंतु मनसेच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणीसाठी संमती पत्र दिल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे. भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवनंतर भाजप चांगली आक्रमक झाली होती. मुंबईत आमचा महापौर बसवू असा दावा भाजपकडून करण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेत घडामोडींना प्रचंड वेग आला. दुसरीकडे, शिवसेनेने मनसेच्या 6 नगरसेवकांना फोडल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक कोकण विभागीय आयुक्तांसमोर गटनोंदणी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवक:
अर्चना भालेराव – वॉर्ड १२६परमेश्वर कदम – वॉर्ड १३३
अश्विनी मतेकर- वॉर्ड १५६
दिलीप लांडे – वॉर्ड १६३
संजय तुर्डे – वॉर्ड १६६
हर्षल मोरे – वॉर्ड १८९
दत्ताराम नरवणकर- वॉर्ड १९७
वॉर्ड क्र. १६६ चे संजय तुर्डे सोडता सहाही नगरसेवक हे शिवसेनेसोबत गेले आहेत.
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल = 227
शिवसेना अपक्षांसह – 84 + 4 अपक्ष = 88भाजप अभासे आणि एक अपक्षासह – 83+अपक्ष 2= 85
कॉंग्रेस – 30
राष्ट्रवादी कॉंग्रेस – 9
मनसे – 7
सपा – 6
एमआयएम – 2
राज यांच्या परवानगीविना
विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या परवानगीशिवाय मनसेच्या नगरसेवकांनी गटस्थापना करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे महापालिकेतील सत्ता समीकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शिवसेनेच्या खेळीमुळे भाजपसह मनसेला जोरदार धक्का बसला आहे.किरीट सोमय्यांनी केला गंभीर आरोप
मुंबई महापालिकेतील मोठा पक्ष नगरसेवक विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत त्यांनी राज्य निवडणूक आयोग आणि पोलिसांना पत्र लिहिले आहे.मुंबई महानगरपालिकेत राजकीय भूकंप; शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक फोडले
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.