काँग्रेस प्रथमच फक्त 250 जागा लढवणार !
काँग्रेसकडून स्वातंत्र्यानंतर प्रथमच लोकसभेच्या सर्वात कमी जागा (250) लढवल्या जाण्याची शक्यता आहे. महाआघाडीच्या माध्यमातून मोदींना रोखण्यासाठी असे केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेसने ब्लू प्रिंट तयार केली आहे. त्यावर स्थानिक पातळीवरील रिपोर्ट आल्यानंतर अँटनी कमिटी आणि काँग्रेस अध्यक्षांच्या सल्ल्यानुसार अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कांग्रेसच्या रणनितीनुसार गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या 44 जागा ते कोणालाही देणार नाहीत. इतर जागांवर ते आघाडी करतील. पण ज्या 224 जागांवर काँग्रेस उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते, त्या जागा लढवण्यासाठी जोर लावतील. त्यात मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात सारख्या राज्यांचा समावेश आहे. याठिकाणी भाजपविरोधात काँग्रेसच मोठा पक्ष आहे. जर आघाडीत अडचणी आल्या तर प्रादेशिक पक्षांना विधानसभेत मोठा वाटा देऊन लोकसभा 2019 साठीचा करार ठरू शकतो. काँग्रेस याच महिन्यात राज्यांमध्ये समित्या स्थापन करून प्रादेशिक पक्षांबरोबर आघाडीच्या चर्चा करणार आहे. 11 अशी राज्ये आहेत, ज्याठिकाणी काँग्रेस लहान मोठ्या 21 प्रादेशिक पक्षांबरोबर आघाडी करण्यास तयार आहे.ज्याठिकाणी प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत आणि राज्यात प्रमुख आहेत, त्याठिकाणी त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. काँग्रेसमध्ये आघाडीचा निर्णय घेण्यासाठी एके अँटनी कमिटी आहे. राज्यातील स्थितीनुसार मजबूत पर्याय कसा तयार होईल याचा विचार करून निर्णय घेतला जाईल.विविध राज्यांमधील युती/आघाडीची स्थिती-
* पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस चौथ्या स्थानी आहे. तृणमूल तर साथ देइलच. पण 27.59% मते असणाऱ्या डाव्यांनीही साथ दिली तर अडचण होईल.
* कर्नाटकात सध्या काँग्रेस-जेडीएस बरोबर आहेत. बसपही त्यांच्यासोबत आहे.
* आंध्र-तेलंगणामध्ये टीडीपी सध्या भाजपतून बाहेर आहे. टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसची मते महाआघाडीत समाविष्ट केली आहेत.
* आसममध्ये काँग्रेसने एआईयूडीएफशी आघाडी केली तरच टिकाव लागू शकेल.
* महाराष्ट्रात भाजप-शिवसेना वेगळे झाले तरच महाआघाडीची शक्यता निर्माण होऊ शकते.
* तमिळनाडूमध्ये भाजप-अण्णा द्रमुकबरोबर असल्याचे दिसते पण अण्णा द्रमुक मध्येच फूट पडलेली आहे. त्यामुळे डीएमके आणि इतर पक्षांना फायदा होऊ शकतो.
* जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस, एनसी, बीएसपीची आघाडीही भाजप-पीडीपीला आव्हान देऊ शकेल असे वाटत नाही.
* ओडिशात सत्ताधारी बीजू जनता दल कोणाच्याही बाजुने नाही. भाजप त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू शकत नाही. त्यामुळे त्यांना इथे फायदा होऊ शकतो. सध्या चित्र स्पष्ट नाही.
11 प्रमुख राज्यांतील 374 जागांचे ‘गणित’
राज्य | जागा | एनडीए | महाआघाडी | आघाडी कोणाला |
उत्तर प्रदेश | 80 | 42.65% | 50.51% | महाआघाडी |
प. बंगाल | 42 | 17.02% | 49.37% | महाआघाडी |
कर्नाटक | 28 | 43.37% | 53.08% | महाआघाडी |
आंध्र-तेलंगणा | 42 | 8.52% | 56.57%* | महाआघाडी |
अासाम | 14 | 42.94% | 44.88% | महाआघाडी |
बिहार | 40 | 51.52% | 32.41% | एनडीए |
झारखंड | 14 | 44.48% | 37.91% | एनडीए |
महाराष्ट्र | 48 | 48.38% | 38.65% | एनडीए |
तमिळनाडू | 39 | 50.48% | 33.47% | एनडीए |
जम्मू-कश्मीर | 6 | 53.37% | 42.14% | एनडीए |
ओडिशा | 21 | 21.88% | 27.41% | स्पष्ट नाही |
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.