कर्नाटक विधानसभा निवडणुक कार्यक्रम जाहीर
कर्नाटकात दलितांनंतर लिंगायत सर्वात मोठा समाज आहे. वोक्कालीगा समाजाचे ५५ विद्यमान आमदार असून मतदारांचे प्रमाण ११% आहे तर लिंगायत समाजाचे ५२ विद्यमान आमदार असून मतदारांचे प्रमाण १७% आहे. लिंगायत समाजाची लोकसंख्या २१% आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीआधी येथे मंदिर व मठांमध्ये नेत्यांची रीघ लागते. राज्यात ३० जिल्ह्यांत ६०० हून जास्त मठ आहेत. राज्यात लिंगायत समाजाचे ४०० मठ, वोकालिगा समाजाचे १५० मठ व कुरबा समाजाचे ८० हून जास्त मठ आहेत. या तीन समाजांचे राज्यात सुमारे ८०% मतदार असून ते कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळेच निवडणुकीआधी भाजप व काँग्रेस त्यांचे मन सांभाळण्यात गुंतले आहेत. राहुल आतापर्यंत १५ वेळेस व अमित शहा ५ पेक्षा जास्त वेळा मंदिर व मठात गेले आहेत. कर्नाटकच्या राजकारणात मठांचे वर्चस्व १९८३ पासून वाढले आहे.
लिंगायत - १८%
कर्नाटकात १७ ते १८ % लोकसंख्या लिंगायतांची आहे. त्यांचा १०० मतदारसंघांवर प्रभाव आहे. ५२ आमदार याच समाजाचे आहेत. ती भाजपची मतपेढी आहे. मात्र, या वेळी सिद्धरमय्यांनी लिंगायतांना अल्पसंख्याक धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मंजूर करून भाजपसाठी आव्हान दिले आहे.
वोकालिगा- १२%
राज्यात वोकालिगांची लोकसंख्या १२% असून ८० मतदारसंघांवर प्रभाव आहे. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा याच समाजाचे आहेत. त्यांचा पक्ष जेडीएसचा यांच्यावर बराच प्रभाव आहे. या समाजाचे ९ मुख्यमंत्री झाले. अमित शहा, अनंत कुमार, सदानंद गौडा वोकालिगाच्या चुनचुनगिरी मठात गेले होते.
कुरबा- ८%
तिसरा प्रमुख मठ कुरबा समाजाशी संबंधित आहे. राज्यात कुरबा लोकसंख्या ८% आहे. त्यांचा मुख्य मठ श्रीगेरे, दावणगेरेत आहे. सिद्धरमय्या याच समाजाचे आहेत. त्यांची मतपेढी अल्पसंख्याक, मागास, दलित फोडण्याच्या प्रयत्नात अमित शहा चित्रदुर्गमध्ये दलित मठ शरना मधरा गुरू पीठात गेले होते.
कर्नाटकात ८५% हिंदू व १३% मुस्लिम मतदार
कर्नाटकात १३% मुस्लिम व ८५% हिंदू मतदार आहेत. २२४ पैकी २०० जागी हिंदू निर्णायक ठरतात. राहुल गांधी १५ वेळा मंदिर, तीन वेळा दर्ग्यात व एक वेळा चर्चमध्ये गेले. अमित शहाही तुमकुरूच्या लिंगायतांच्या सिद्धगंगा मठात गेले होते.

असा असेल निवडणूक कार्यक्रम
17 एप्रिल - अधिसूचना जारी
24 एप्रिल - उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
25 एप्रिल - उमेदवारी अर्जांची छाननी
27 एप्रिल - उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
12 मे - मतदान
15 मे - मतमोजणी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे, तर 15 मे रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. कर्नाटकमध्ये 224 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून आजपासूनच आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही आयोगाने केली आहे. कर्नाटकात सध्या 122 आमदारांसह काँग्रेस सत्तेत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे, तर 15 मे रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. एकाच टप्प्यात 56 हजार मतदान केंद्रांवर हे मतदान होईल. या निवडणुकीत 4.96 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 224 सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 28 मे रोजी पूर्ण होत आहे. कर्नाटकात सध्या 122 आमदारांसह काँग्रेस सत्तेत आहे. निवडणूक आयोगाने तारीख जाहीर करण्यापूर्वीपासूनच सर्व राजकीय पक्षांचा जोरात प्रचार सुरु आहे. मतदान ईव्हीएम मशिनद्वारेच होणार असून व्हीहीपॅट प्रणालीचाही वापर करण्यात येईल, असं मुख्य निवडणूक आयुक्त ओपी रावत यांनी स्पष्ट केलं. 56 हजार पोलींग बूथवर मतदान होणार असून मतदानादरम्यान दिव्यांगांसाठी आणि महिलांसाठी विशेष सोय करण्यात येणार आहे. 24 एप्रिल अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून 27 एप्रिल अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह सध्या दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विविध टप्प्यांमध्ये प्रचार करत आहेत. काँग्रेसकडून मुख्यमंत्री सिद्धरामैय्या, तर भाजपकडून बीएस येडियुरप्पा मैदानात आहेत.
कर्नाटक विधानसभेतील सद्यस्थिती
काँग्रेस – 122भाजप – 43
जेडीएस – 34
बीएसआरसी – 3
केजेपी – 2
केएमपी – 1
अपक्ष - 8
भाजपने कर्नाटकातील 28 लोकसभेच्या जागांपैकी 17 जागांवर विजय मिळवला होता. राज्यातील सत्ताधारी काँग्रेसला केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं होते. तर जेडीएसने 2 जागा जिंकल्या होत्या. भाजपला 43 टक्के, काँग्रेसला 41.2 टक्के आणि जेडीएसला 11.1 टक्के मतं मिळाली होती. कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. सिद्धरामय्या यांच्या हाती सत्तेची सूत्रे असून काँग्रेसनं पुन्हा एकदा त्यांनाच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढं केलं आहे. तर, भाजपची मदार पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री व लिंगायत समाजातील वजनदार नेते बी. एस. येड्डियुरप्पा यांच्यावर असणार आहे.यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाचा मुद्दा चर्चेत आहे. कर्नाटकात दलितांनंतर लिंगायत सर्वात मोठा समाज आहे. इथे जवळपास 21 टक्के लिंगायत आहेत. कर्नाटकात दलितांनंतर लिंगायत सर्वात मोठा समाज आहे. वोक्कालीगा समाजाचे ५५ विद्यमान आमदार असून मतदारांचे प्रमाण ११% आहे तर लिंगायत समाजाचे ५२ विद्यमान आमदार असून मतदारांचे प्रमाण १७% आहे. लिंगायत समाजाची लोकसंख्या २१% आहे. काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच लिंगायत कार्ड खेळत लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला, ज्यावर अंतिम निर्णय केंद्र सरकारला घ्यायचा आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा ही जुनी मागणी आहे. याशिवाय कर्नाटकात मुस्लीम आणि वोक्कालिगा समाजाचीही निर्णायक भूमिका असेल.लोकसभा निवडणुकीपूर्वी या निवडणुकीला अत्यंत महत्त्व आहे. कारण, काँग्रेस आणि भाजप या दोन्हीही पक्षांना लोकसभा निवडणुकीअगोदर या निवडणुकीत स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे.काँग्रेससाठी ही निवडणूक अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. 2014 मध्ये केंद्रात सत्तेत आल्यानंतर भाजपने काँग्रेसकडून आसाम, हरयाना, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमधील सत्ता हिरावून घेतली आहे. कर्नाटक व पंजाब या दोन मुख्य राज्यांमध्येच काँग्रेस सत्तेत आहे. राज्यात भाजपला सत्ता मिळवण्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यांनी 16 केंद्रीय मंत्री, 24 खासदार यांच्यासह 55 जणांची टीम तयार केली आहे. ते मार्चच्या अखेरीपर्यंत रिपोर्ट देणार आहेत. 16 केंद्रीय मंत्र्यांना चार-चार विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे. तर गुजरात निवडणुकांनंतर स्वतःची प्रतिमा बदलण्यात त्यांना यश आलेले आहे. पक्षाचे अध्यक्ष बनल्यानंतर त्यांची ही चौथी विधानसभा निवडणूक आहे. याआधी त्यांनी त्रिपुरा, नगालँड आणि मेघालयमध्ये प्रचार केला होता. पण काँग्रेसला मेघालयमध्ये सत्ता वाचवता आली नाही.
========
निवडणूक आयोगाच्या आधीच तारीख जाहीर प्रकरणी होणार चौकशी
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू असतानाच, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा सोशल मीडियावरून केल्यानं भाजप संशयाच्या फेऱ्यात सापडला आहे. निवडणूक आयोगानं घोषणा करण्याआधी निवडणुकांची तारीख फुटलीच कशी, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर निवडणूक आयोगानं याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयोगानं दिला आहे.काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची तारीख आज घोषित होणार होती. त्यासाठी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदही घेतली. ही परिषद सुरू असतानाच भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवर निवडणूक तारखांची घोषणा केली. १२ मे रोजी मतदान आणि १८ मे रोजी मतमोजणी होईल, असं ट्विट त्यांनी केलं. मात्र, निवडणूक आयोगाच्या घोषणेपूर्वीच भाजपच्या आयटी विभागानं निवडणुकीची तारीख घोषित कशी केली, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. त्यानंतर ते ट्विट मालवीय यांनी काही मिनिटांतच हटवले. त्याचवेळी पत्रकार परिषदेतच काही पत्रकारांनी भाजपच्या आयटी विभागानं जाहीर केलेल्या तारखांबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावर हे प्रकरण गंभीर असून, चौकशीनंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.
कर्नाटक: माजी मुख्यंमत्र्यांची ९ मुलं रिंगणात
भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य सभेचे दि. १ मे रोजी चिकोडीत आयोजन करण्यात आले आहे. तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी २६ व २७ तारखेला निवडणूक प्रचारासाठी कर्नाटकात येणार असून ते कारवार, मंगळूर, कोडगू व म्हैसूर जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रचारसभामध्ये भाग घेणार आहेत.या निवडणूकीतील विशेष म्हणजे राज्यातील माजी मुख्यमंत्र्याची ९ मुलं निवडणूक लढवत आहेत. देशातील राजकारणात घराणेशाही विषयी कितीही आरोप होत असले तरी वेगवेगळ्या पक्षांच्याकडून घराणेशाहीला खतपाणी घातल्याचेच यातून दिसत आहे.
माजी मुख्यमंत्री आणि त्यांची निवडणूक रिंगणात असलेली मुले
बी.व्हाय विजयेंद्र (भाजप) : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा मुलगा म्हैसूर जिल्ह्यातील वरुणमधून यतींद्र सिद्धरामय्या यांच्या विरूद्ध लढणार आहे.
एच.डी रेवन्ना (जनता दल-सेक्युलर) : माजी मुख्यमंत्री एच.डी. देवेगौडा यांचा मोठा मुलगा हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरामधून पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहे.
एच.डी कुमारस्वामी (जनता दल-सेक्युलर) : माजी मुख्यमंत्री एच.डी. देवेगौडा यांचाच दुसरा मुलगा जो रमननगर आणि चेन्नापट्टणा या दोन ठिकाणाहून निवडणूक लढवत आहे.
कुमार बंगारप्पा (भाजप) : कुमार हा अभिनेता असून कर्नाटकचे १२ वे मुख्यमंत्री सरेकोपा बंगारप्पा यांचा तो मुलगा आहे. शिवमोग्गा जिल्ह्यातील सोरबा येथून तो लढत आहे.
महिमा पटेल (जनता दल-युनायटेड) : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जे.एच. पटेल यांचे ते चिरंजीव असून दावणागेरे जिल्ह्यातील छनागिरीमधून ते निवडणूक लढवत आहेत.
अजय सिंह (काँग्रेस) : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री असलेल्या धर्मा सिंह यांचे ते सुपुत्र असून कलाबुर्गी जिल्ह्यातील जेवर्गी येथून निवडणूक लढवत आहेत.
बसवराज बोम्मई (भाजप) : बसवराज हे माजी पाणी पुरवठा मंत्री आणि माजी मुख्यमंत्री एस.आर बोम्मई यांचे चिरंजीव आहेत. ते हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव येथून निवडणूक लढवत आहेत.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.