Tuesday, 6 March 2018

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा पुरस्कृत सहकार पॅनलचा पराभव

राज्य सहकारी संघावर परिवर्तन पॅनेलचे वर्चस्व, सहकार पॅनेलचा पराभव

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसप्रणीत सहकार पॅनलचे २१ पैकी २० जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व


महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. परिवर्तन पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मतदारांनी भरघोस मतांनी निवडून देत सहकार पॅनेलचा धुव्वा उडवला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसप्रणीत सहकार पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकून पुन्हा एकदा सहकारावरील निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.  निवडणुकीसाठी २१ जागांसाठी ११० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते़ संघाची ६ मार्च रोजी २१ जागांपैकी १० जागांसाठी मतमोजणी झाली. यामध्ये परिवर्तन पॅनलचे १० उमेदवार निवडून आले, तर परिवर्तन पॅनलचे उमेदवार माधवराव सोनवणे हे राज्यस्तरीय मतदारसंघातून याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत, तर इतर ४ उमेदवार विभागीय मतदारसंघातून निवडून आल्यानंतर, त्यांनी परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिला आहे.या निवडणुकीत एकूण २२०० मतदारांपैकी १ हजार ८०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सहकार क्षेत्रात मोठे फेरबदल घडवणाऱया या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. संजीव कुसाळकर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेल आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेल अशी ही लढत होती. या निवडणुकीत एकूण २२०० मतदारांपैकी १८०० मतदारांनी मतदान केले होते. आज मतमोजणीनंतर परिवर्तन पॅनेलचे संजीव कुसाळकर, चंद्रकांत जाधव, सुनील ताटे, मुकुल पोवार, विलास महाजन, रामदास मोरे, अर्जुन बोरुडे, विद्याताई पाटील, सुनीता माळी, सिद्धार्थ पथाडे हे उमेदवार मोठय़ा मताधिक्याने निवडून आले. परिवर्तन पॅनेलचे माधवराव सोनवणे हे राज्यस्तरीय मतदारसंघातून याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत तर चार उमेदवारांनी विभागीय मतदारसंघातून निवडून आल्यानंतर परिवर्तन पॅनेलला पाठिंबा दिला.विभागीय सहकारी संघ मतदारसंघातून हिरामण सातकर (पुणे), प्रतापराव पाटील (कोल्हापूर), भिकाजी पारले (मुंबई), रामकृष्ण बांगर (लातूर), सुहासराव तिडके (अमरावती), सुभाष आकरे (नागपूर), पांडुरंग सोले-पाटील (नाशिक), गुलाबराव मगर (संभाजीनगर), निंगोडा हल्याळकर हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. कोकण विभाग सहकार संघातील जागेसाठी दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांमध्ये बरोबरी झाल्याने चिठ्ठय़ा टाकून ड्रॉ काढला गेला. त्यात भाऊसाहेब कुऱहाडे हे विजयी झाले.
राज्य सहकारी संघ ही सहकाराचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. या प्रशिक्षणासाठी राज्य सहकारी बँक, राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक, राज्य सहकारी हौसिंग फायनान्स, राज्य सहकारी साखर संघ, राज्य सहकारी कापूस उत्पादकांचे मार्केटिंग फेडरेशन, राज्य सहकारी दूध उत्पादक सोसायटय़ांचे फेडरेशन, राज्य सहकारी गिरणी सोसायटी संघ, राज्य सहकारी सूतगिरणी फेडरेशन, राज्य सहकारी यंत्रमाग कापड खरेदी-विक्री संघ, हातमाग सोसायटय़ांचा संघ, राज्य सहकारी कृषी उत्पन्न बाजार समिती, राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, सहकारी औद्योगिक वसाहती संस्थांचा महासंघ, मजूर सहकारी संस्था फेडरेशन, राज्य सहकारी बँक्स असोसिएशन, तेलबिया प्रक्रिया करणाऱ्या संस्थांचे महामंडळ, साखर कारखाने विकास संस्था, राज्य सहकारी इंजिनिअरिंग सहकारी संस्था, नागरी सहकारी बँका, घाऊक सहकारी भांडारे, सहकारी शेती संस्था, सहकारी डिस्टिलरी संस्था अशा सुमारे ५८ संस्थांकडून शिक्षण निधी देण्यात येतो.

नाशिक विभाग सहकारी संघ

१) पांडुरंगकाका सोले-पाटील (नाशिक विभाग सहकारी संघ)

ड्रॉ मधील विजयी उमेदवार
कोकण विभाग सहकारी संघातील एका जागेसाठी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांमध्ये बरोबरी झाली. त्यामुळे चिठ्ठीद्वारे ड्रॉ काढण्यात आला. त्यात भाऊसाहेब कुºहाडे विजयी ठरले.
हल्याळकर निंगोडा मल्लप्पा (विभागीय सहकारी संघ)
मगर गुलाबराव आप्पाराव (औरंगाबाद विभागीय सहकारी संघ)

परिवर्तन पँनल (इतर संस्था प्रतिनिधी मतदारसंघ)

विजयी उमेदवाराचे नाव मिळालेली मते
१) संजीव राजाराम कुसाळकर १११५
२) चंद्रकांत गणपतराव जाधव १०७५
३) सुनील श्यामराव ताटे १०४४
४) मुकुल श्यामराव पोवार १०४३
५) विलास सुधाकर महाजन ९८९

सहकार पॅनल (इतर संस्था प्रतिनिधी मतदारसंघ)

पराभूत उमेदवार मिळालेली मते
१) बनकर नितीन धोंडिराम ८३३
२) म्हस्के गोपाळ रामचंद्र ५३५
३) लायगुडे अनंत खंडू ५१६
४) लोणारे प्रकाश मारोतराव ४९१
५) सावंत यशवंत राजाराम ५०५

परिवर्तन पॅनल (विमुक्त जाती-भटक्या जमाती-विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ)

उमेदवाराचे नाव मिळालेली मते
मोरे रामदास शंकर ११६८(विजयी)

सहकार पॅनल ( विमुक्त जाती-भटक्या जमाती-विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ)

१) वाघ सुनील सुरेश ७८९ (पराभूत)

परिवर्तन पॅनल (इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ)

उमेदवाराचे नाव मिळालेली मते
१) बोरूडे अर्जुन मल्हारी ११४५ (विजयी)

सहकार पॅनल (इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ)

उमेदवाराचे नाव मिळालेली मते
सोले-पाटील पांडुरंगकाका गोपाळराव ३३२ (पराभूत)

परिवर्तन पॅनल ( महिला-मतदारसंघ)

उमेदवाराचे नाव मिळालेली मते
पाटील विद्याताई शशिकांत ११३४ (विजयी)
माळी सुनीता विलासराव १०७३ (विजयी)

सहकार पॅनल (महिला-मतदारसंघ)

उमेदवाराचे नाव मिळालेली मते
मोराळा सुशीला गणपतराव ७४८ (पराभूत)
वाहेगावकर मंगलबाई अनंतराव ६९८ (पराभूत)

परिवर्तन पॅनल (अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ)

उमेदवाराचे नाव मिळालेली मते
पथाडे सिद्धार्थ आस्तिक ११३५ (विजयी)

सहकार पॅनल (अनुसूचित जाती - जमाती मतदारसंघ)

भांडे बाळासाहेब सीताराम ६९१ (पराभूत)

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

१) हिरामण सातकर (पुणे विभाग सहकारी संघ)
२) प्रतापराव पाटील (कोल्हापूर विभाग सहकारी संघ)
३) भिकाजी पारले ( मुंबई विभाग सहकारी संघ)
४) रामकृष्ण बांगर (लातूर विभाग सहकारी संघ)
५) सुहासराव तिडके (अमरावती विभाग सहकारी संघ)
६) माधवराव सोनवणे (राज्यस्तरीय संघीय संस्था)
७) सुभाष आकरे (नागपूर विभाग सहकारी संघ)


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.