Thursday, 8 March 2018

भाजपचे उमेदवार म्हणून नारायण राणे राज्यसभेवर बिनविरोध

भाजप-शिवसेना युती झाल्यास मी भाजपमध्ये नसेन : राणे

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर मी भाजपमध्ये नसेन, असं धक्कादायक विधान राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. 'माझा कट्टा' या कार्यक्रमात राणे बोलत होते.महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात माझ्या येण्याला शिवसेनेचा आक्षेप होता. माझा मंत्रिमंडळात समावेश झाला तर ते सत्तेतून बाहेर पडणार होते. त्यामुळे शिवसेना-भाजप युती होणार असेल तर माझ्या भाजपमध्ये राहण्याला अर्थ नाही, असं नारायण राणे म्हणाले."2019 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना हाच शत्रू पक्ष असेल. पण भाजप-शिवसेना युती झाल्यास माझी भूमिका स्पष्ट आहे, मी भाजप सोडणार. मी भाजपच्या मंत्रिमंडळात सहभागी झालो तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार होते. त्यामुळे युती झाल्यावर मी भाजपमध्ये नसेन," असं नारायण राणे म्हणाले.


राज्यसभा निवडणूक: भाजपच्या विजया रहाटकरांचा अर्ज मागे, महाराष्ट्रातील सहाही खासदार बिनविरोध


राज्यसभेसाठी भाजपच्या चौथ्या उमेदवार असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दुपारी माघारी घेतला. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणारे सहाही खासदार बिनविरोध निवडून गेले आहेत. भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे व व्ही. मुरलीधरन यांच्यासह शिवसेनेचे अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण आणि काँग्रेस उमेदवार कुमार केतकर हे यंदा राज्यसभेवर गेले आहेत.राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत रंगत निर्माण होणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, भाजपच्या चौथ्या उमेदवार असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.राज्यसभेच्या निवडणुकीसाठी विधानसभेचे सदस्य मतदान करतात. यंदा सहा जागांसाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 42 मतांची गरज होती. मात्र, प्रत्येक पक्षाने आपापल्या विधानसभेतील संख्याबळानुसार उमेदवार दिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. हे खासदार पुढील महिन्यात राज्यसभेत प्रवेश करतील.


राणे अखेर भाजपचे उमेदवार म्हणून बिनविरोध








काँग्रेसला रामराम ठोकल्यावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार होते. पण शिवसेनेचा विरोध लक्षात घेता भाजपने त्यांना स्वतंत्र पक्ष काढण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राणे यांनी वेगळ्या पक्षाची स्थापना केली होती. राज्यसभेसाठी राणे यांनी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या संस्थापकानेच पक्षाचा राजीनामा देण्याची ही बहुधा पहिली वेळ असेल.



नारायण राणे यांनी ऑफर का स्वीकारली ? 





नारायण राणे यांचा भाजपला काय उपयोग?

नारायण राणे आक्रमक चेहरा व मराठा नेतृत्व म्हणून ओळख असल्याने निर्माण होणार्या राजकीय सद्यस्थितीत त्यांचा उपयोग करता येईल.
* काँग्रेस व शिवसेना बंडखोराना त्यांच्या पक्षाची उमेदवारी देऊन मतविभाजनाचा लाभ भाजपला कसा मिळेल याचा विचार व नियोजन
*  विरोधकांना प्रत्युत्तरादाखल राणे यांचा उपयोग भाजपला लाभकारक ठरेल.
* आरक्षण मुद्यावरून सामाजिक संघटनांशी असलेली जवळकीचा लाभ मिळेल असा आशावाद
* कोकणात भाजपला अपेक्षितपणे राजकीय फायदा शक्य.

नारायण राणे यांनी ऑफर का स्वीकारली ? 

* नारायण राणे यांना या राजकीय सद्यस्थितीत राज्यसभेवर जाण्याची ऑफर स्वीकारण्याचा शिवाय दुसरा पर्याय नव्हता.
*  राज्यसभेवर जाऊन आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यावर भर
* आगामी निवडणुका पुढील वर्षी एकत्रितपणे होणार असल्याने मंत्रिपद मिळाले तरी थोड्या कालावधीत काही उपयोग होणार नाही
* राज्यसभेवर जाण्याची ऑफर दिल्यानंतर नितेश राणे यांच्या ट्विटने (साहेबांनी राज्यसभा नव्हे तर विधानसभेत जावे, अशी आमची इच्छा आहे. राणेसाहेब आमची ही मागणी लक्षात घेतील, अशी आशा करतो. आम्ही त्यांच्या निर्णयाची प्रतिक्षा करत आहोत), असे म्हटले होते. या कृतीवर भाजप श्रेष्ठींची नाराजी होती. ती पुढील राजकीयदृष्ट्या लाभासाठी दूर करणे गरजेचे होते.

मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या नारायण राणे यांना पुन्हा मंत्रिपद का मिळत नाही- 

* शिवसेनेतील बंडखोरी आणि सातत्याने शिवेनेवरील टोकावरील टीका यामुळे शिवसेनेचा मंत्रीमंडळ प्रवेशास विरोध
* नारायण राणे यांना मंत्रीमंडळात घेतल्यास शिवसेना मंत्रीमंडळातून बाहेर पडेल पाठींबा काढून घेतला जाईल अशी भाजपला भीती
* भाजप मध्ये प्रवेशास स्थानिकांसह संघ पदाधिकारी यांचा विरोध; स्वतंत्र पक्ष स्थापन करून सलगीने राजकारण करण्याचा सल्ला.
* नारायण राणे याची भूमिका व त्यांच्या मुलांच्या भूमिकेत तफावत; वेगवेगळ्या प्रतिक्रियेमुळे संभ्रम; भाजप व संघ धोरण विरोधात मतप्रदर्शन त्यामुळे होणारा विरोध
* नारायण राणे यांचे राजकीय मूल्य हे वारंवार तडजोडीने कमी करण्यात भाजपला यश; राज्यसभेच्या प्रस्तावाने राज्य मंत्रीमंडळ प्रवेशाचे मार्ग बंद करण्यात भाजपला यश

--------
२०१९ नंतर दिल्लीत जाण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या नारायण राणे यांनी अखेर भाजपची राज्यसभेवर जाण्याची ऑफर स्वीकारली आहे. ''मी दिल्लीला चाललोय, पाकिस्तानला नाही, असं म्हणत कार्यकर्ते नाराज होणार नाहीत,'' असंही त्यांनी सांगितलं आहे दरम्यान, भाजपच्या चिन्हावर राज्यसभेवर जाणार का, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असंही राणेंनी स्पष्ट केलं.''शिवसेनेच्या दबावामुळे राज्यसभेवर जाण्याचा प्रश्न नाही. मी स्वतःच्या मर्जीने जात आहे,'' असं त्यांनी सांगितलं.उद्या (सोमवारी) ते अर्ज भरणार आहेत.महाराष्ट्रातील ६ जागांसह १६ राज्यांत राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान होणार आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप प्रदेश अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली तेव्हाच त्यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली होती.

11वी पास नारायण राणे राज्यसभेच्या 7 उमेदवारांत सर्वात श्रीमंत


राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सात उमेदवारांमध्ये भाजपचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सर्वात श्रीमंत, तर भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष हे सर्वात ‘गरीब’ उमेदवार ठरले अाहेत. अापल्या नावे ८८ काेटींची मालमत्ता असल्याचे राणेंनी निवडणूक अायाेगाकडे दिलेल्या शपथपत्रात म्हटले अाहे.या निवडणुकीसाठी भाजपचे चार, तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात अाहे. शपथपत्रातील माहितीनुसार, ६५ वर्षीय राणेंचे शिक्षण ११ वीपर्यंत झाले अाहे. त्यांच्या नावावर ९.६८ काेटींची, तर पत्नी नीलिम यांच्या नावाने १८.९८ काेटींची चल संपत्ती अाहे. तसेच ६.५३ काेटींचे हिरे व साेन्याचे दागिन्यांचेही राणे मालक अाहेत. तसेच १८.४४ काेटींचे सहा बंगले, ४.११ काेटींचे तीन फ्लॅट व ४.९३ काेटींचे तीन कमर्शियल काॅम्प्लेक्सही राणे यांच्या नावावर अाहेत.राणे कुटुंबीयांच्या अाठ ठिकाणच्या शेतीची किंमत ५६.७६ काेटी, तर भूखंडांची किंमत ३.६२ काेटींवर अाहे. तसेच ४ लाख १७ हजार १२८ चाैरस फूट बिगर शेती जमिनीची किंमत ८.१९ काेटी अाहे. बँकेतील ठेवी व इतर मिळून १३.२७ काेटींचे ते मालक अाहेत. तसेच राणे कुटुंबावर २८ काेटींचे कर्ज असल्याचेही शपथपत्रात नमूद अाहे.
राणेंना भाजपचे सदस्यत्व दिले काय : शिवसेना
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी नेमक्या काेणत्या पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला? जर भाजपने त्यांना उमेदवारी दिली असेल तर त्यांनी भाजपचे सदस्यत्व कधी स्वीकारले? मग त्यांनी स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला का? अशा प्रश्नांची सरबत्ती शिवसेनेचे अामदार अॅड. अनिल परब यांनी केली अाहे. ‘एका पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा सदस्य होऊ शकत नाही.दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला एखाद्या पक्षाला उमेदवारी द्यायची असेल तर त्याला आधी अधिकृत सदस्य करून घ्यावा लागताे, तरच त्याला संंबंधित पक्षाला बी फॉर्म देता येईल, असे नियम आहेत. त्यामुळे राणेंना भाजपने सदस्यत्व कधी दिले? जर दिले नसेल तर राज्यसभा कशी दिली?’ असा सवाल करत परब यांनी भाजप व नारायण राणे यांना काेंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

राज्यसभेच्या 58 जागांसाठी 23 मार्चला निवडणूक; कोणत्या राज्यातून कोणाला किती जागा मिळणार!



केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, कॉंग्रेस नेते प्रमोद तिवारी, राजीव शुक्‍ला, रेणुका चौधरी यांच्यासह अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत.एप्रिल-मे 2018 मध्ये राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. यामध्ये 16 राज्यांतील राज्यसभेच्या 58 जागा असून महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे.अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 12 मार्च आहे. 23 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार


वंदना हेमंत चव्हाण  - राष्ट्रवादी
डी. पी. त्रिपाठी  - राष्ट्रवादी
रजनी पाटील  - काँग्रेस
अनिल देसाई  - शिवसेना
राजीव शुक्ला - काँग्रेस
अजयकुमार संचेती - भाजप

केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांचा कार्यकाळ संपणार आहे. कॉंग्रेस नेते प्रमोद तिवारी, राजीव शुक्‍ला, रेणुका चौधरी यांच्यासह अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत.

कोणत्या पक्षाचे किती खासदार?

भाजप -17
कॉंग्रेस - 12
समाजवादी पक्ष - 6
जदयू - 3
तृणमूल कॉंग्रेस - 3
तेलुगू देसम पक्ष - 2
राष्ट्रवादी कॉंग्रेस - 2
बीजद - 2
बसप - 1
शिवसेना - 1
माकप - 1
अपक्ष  - 1
राष्ट्रपती नियुक्‍त - 3

संख्याबळानुसार आता महाराष्ट्रात राज्यसभेवर सहापैकी भाजपचे 3 उमेदवार, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

कोणत्या राज्यातील किती जागा?

आंध्र प्रदेश - 3
बिहार - 6
छत्तीसगड - 1
गुजरात - 4
हरियाणा - 1
हिमाचल प्रदेश - 1
कर्नाटक - 4
मध्य प्रदेश - 5
महाराष्ट्र - 6
तेलंगणा - 3
उत्तर प्रदेश - 10
उत्तराखंड - 1
पश्चिम बंगाल - 5
ओदिशा - 3
राजस्थान - 3
झारखंड - 2

याशिवाय केरळातील खासदार वीरेश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे त्या जागेसाठीही पोटनिवडणूक होईल. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचं राज्यसभेत सर्वाधिक संख्याबळ आहे.

निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी


.क्रसदस्यांचे नाव,            पक्ष,       सदस्यत्वाची मुदतसंपण्याचा दिनांक

(1) श्रीमती वंदना हेमंत चव्हाण      नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी    एप्रिल, 2018
(2) श्री.डी.पी.त्रिपाठी               नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी    2 एप्रिल, 2018
(3) श्रीमती रजनी अशोकराव पाटील   इंडियन नॅशनल काँग्रेस    2 एप्रिल, 2018
(4) श्रीअनिल यशवंत देसाई        शिवसेना                2 एप्रिल, 2018
(5) श्री.राजीव रामकुमार शुक्ला       इंडियन नॅशनल काँग्रेस    2 एप्रिल, 2018
(6) श्री.अजयकुमार शक्तीकुमार संचेती  भारतीय जनता पार्टी      2 एप्रिल, 2018

सन 2018 मध्ये निवृत्त होणार्या महाराष्ट्रातील सदस्यांची पक्षनिहाय संख्या


क्रमांक            पक्षाचे नाव           सदस्य संख्या
1.             नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी :       2
2.             इंडियन नॅशनल काँग्रेस :        2
3.             भारतीय जनता पार्टी :         1
4.             शिवसेना :                   1

               एकूण :                     6
===================================================== 
राज्यसभेचे वंदना चव्हाण आणि डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी), रजनी पाटील आणि राजीव शुक्ला (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना), अजयकुमार संचेती (भाजप) हे सहा सदस्य निवृत्त होत आहेत. राज्यसभेवर निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. सदस्यसंख्येनुसार भाजपचे तीन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य निवडून येऊ शकतो. शिवसेनेकडे २१ मते अतिरिक्त असली तरी शिवसेना दुसरा उमेदवार उभा करण्याचे धाडस करेल का, यावर बरेच अवलंबून असेल.
===================================================== 

मतदान कशा प्रकारे होते ?

मतदान हे खुल्या पद्धतीने होते. यानुसार राजकीय पक्षांच्या आमदारांना पक्षाने नियुक्त केलेल्या प्रतिनिधींना आपली मतपत्रिका दाखवावी लागते. अपक्षांना मतपत्रिका दाखविण्याचे बंधन नसते. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींऐवजी अन्य कोणाला मतपत्रिका दाखविल्यास मत बाद होते. अलीकडेच गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत दोन आमदारांनी मतपत्रिका अधिकृत प्रतिनिधींेऐवजी अन्य प्रतिनिधींना दाखविल्याने त्या दोन मतपत्रिका निवडणूक आयोगाने बाद ठरविल्या होत्या. खुल्या पद्धतीने मतदान होत असल्याने मते फुटण्यास वाव नसतो. कारण राजकीय पक्षांनी जारी केलेल्या पक्षादेशाच्या विरोधात मतदान केल्यास संबंधित आमदाराचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.

मतांचा कोटा कसा ठरतो?

विधानसभेच्या सर्व २८८ सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. नामनियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. मतांचा कोटा खालीलप्रमाणे निश्चित केला जातो.
एकूण मतदार : २८८
* एकूण जागा : ६
* २८८ भागिले एकूण जागा सहा अधिक एक = २८८ भागिले सात = ४१.१४
*  यानुसार पहिल्या फेरीतील विजयाकरिता ४११४ मते आवश्यक ठरतात.

===================================================== 

शिवसेनेचे अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने अनिल देसाई तर राष्ट्रवादीने अ‍ॅड. वंदना चव्हाण या विद्यमान खासदारांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्ही पक्षांकडे पहिल्या पसंतीची पुरेशी मते असल्याने दोघांचाही विजय निश्चित मानला जातो.विद्यमान खासदार वंदना चव्हाण यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. शिवसेनेने अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्याबद्दल खासदार देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. वंदना चव्हाण आणि डी. पी. त्रिपाठी या राष्ट्रवादीच्या दोन खासदारांची मुदत संपुष्टात येत आहे. पक्षाचे ४१ आमदार असल्याने एकच उमेदवार निवडून येणार आहे. पक्षाने पुण्याच्या माजी महापौर व गेले सहा वर्षे राज्यसभेत चांगली कामगिरी केलेल्या वंदना चव्हाण यांनाच पुन्हा संधी दिली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला. अनिल देसाई हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. केंद्रात राज्यमंत्रिपदासाठीही त्यांचे नाव निश्चित झाले होते. शपथविधीसाठी ते दिल्लीत पोहचलेही होते, पण पक्षाने त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत संख्याबळानुसार भाजपचे तीन, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. भाजपचे १२२ आमदार असून, तिसरा उमेदवार निवडून येण्यात दहा मतांची आवश्यकता आहे. छोटे पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा असल्याने भाजपचे तीन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. शिवसेनेकडे २१ मते अतिरिक्तअसली तरी आणखी २१ मते मिळविणे शिवसेनेला शक्य नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जेमतेम मते असल्याने या दोन्ही पक्षांकडे दुसऱ्या पसंतीची मते देण्यासाठी वाव नाही. परिणामी शिवसेनेकडे अतिरिक्त मते असली तरी या मतांचा फायदा होणार नाही.
काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक-राज्यातून ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि विचारवंत कुमार केतकर यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.काँग्रेसने सात राज्यातील दहा उमेदवारांची यादी जाहीर केली. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. 

भाजप-  
भाजपने राज्यसभेसाठी 18 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसनेही एकूण 10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यसभेसाठी भाजपने एकूण 18 उमेदवारांची यादी जाहीर केली. यापैकी महाराष्ट्रातून तीन नावं आहेत. नारायण राणे आणि केरळमधील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कोट्यातून यावेळी प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन राज्यसभेवर जातील.

भाजपकडून राज्यसभेसाठी चौथा उमेदवार: विजया रहाटकरही मैदानात; निवडणुकीत रंगत

भाजपकडून राज्यसभेसाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर नारायण राणे यांनी भाजपकडून राज्यसभेसाठी अर्ज भरला असून राज्यसभेत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातून पुढील महिन्यात रिक्त होत असलेल्या राज्यसभेसाठी सहा जागांसाठी भाजपने आपला चौथा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या रूपाने भाजपने सातवा उमेदवार दिला आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. जर त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तर राज्यसभेची बिनविरोध निवडणूक ढळणार आहे. दरम्यान, आपल्या पक्षाच्या एखाद्या उमेदवाराचा अर्ज रद्दबादल ठरू नये म्हणून खबरदारीचा उपाय रहाटकर यांचा अर्ज दाखल केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, पुढील तीन तासात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. भाजपने यापूर्वीच नारायण राणे, प्रकाश जावडेकर, केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभेतील सदस्य संख्याबळानुसार भाजपचे तीनच उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, भाजपने आता चौथा उमेदवार दिला आहे. तर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी 1-1 उमेदवार निवडून येऊ शकतो. यासाठी काँग्रेसने ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत कुमार केतकर यांना संधी दिली आहे तर, शिवसेना व राष्ट्रवादीने आपापले विद्यमान खासदार अनिल देसाई आणि वंदना चव्हाण यांना रिंगणात उतरवले आहे.

भाजपने संचेती यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारली

नागपुरातील भाजपचे ज्येष्ठ नेते व विद्यमान राज्यसभा सदस्य अजय संचेती यांना पक्षाने पुन्हा राज्यसभेवर न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने आज महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात संचेती यांच्या नावाचा समावेश नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न संचेती यांना महागात पडला आहे. गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर संचेती यांचे पक्षात महत्त्व वाढले होते. गडकरी यांच्या प्रयत्नामुळेच संचेती यांना २०१२ मध्ये राज्यसभेची उमेदवारी मिळाली होती. राज्यात सत्ताबदल होऊन मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर संचेती यांचा कल फडणवीस यांच्याकडे दिसून आला. ते फडणवीस यांच्या प्रत्येक कार्यक्रमांत दिसू लागले होते. त्यामुळे गडकरी गटात नाराजी होती. त्याचा फटका संचेती यांना बसला आणि त्यांचे दुसऱ्यांदा राज्यभेत जाण्याचे स्वप्न भंगले आहे. महाराष्ट्रातून भाजपने चक्क केरळचे व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळ आपटे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अजय संचेती यांना २०१२ मध्ये उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्रातून भाजनपे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्यभेची उमेदवारी दिली आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. दुपारी तीन वाजता अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे. त्याआधी दुपारी बाराच्या सुमारास काँग्रेसच्या तिकीटावर ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी अर्ज भरला. त्याचप्रमाणे भाजपच्या तिकीटावर नारायण राणे आणि केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही मुरलीधर यांनीही आपले उमेदवारी अर्ज भरले. तर महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही अर्ज भरल्याने या निवडणुकीला वेगळं वळण मिळालं आहे. विजया रहाटकर यांनी डमी उमेदवार म्हणून अर्ज भरला असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्रातून एकूण सहा खासदारांची निवड होणार आहे. येत्या २३ तारखेला निवडणूक होत आहे. पण सर्वच उमेदवारांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. 






महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागेसाठी भाजपने चौथा उमेदवार दिला आहे. भाजपतर्फे विजया रहाटकर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे.विजया रहाटकर या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या प्रमुखही आहेत. यापूर्वी त्यांनी औरंगाबादचं महापौरपदही भूषवलं आहे. भाजपने महाराष्ट्राच्या कोट्यातून प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन यांची नावं जाहीर केली होती. त्यातच सोमवारी विजया रहाटकरांना भाजपने राज्यसभेच्या मैदानात उतरवलं. त्यामुळे अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक अटळ आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेकडून अनिल देसाई, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर काँग्रेसकडून कुमार केतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 13 मार्च रोजी निवडणूक अर्जाची छाननी होणार असून 15 मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 16 राज्यातील राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान झाल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 10, तर महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. विधानसभेचे संख्याबळ पाहता, राज्यातील तीन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जातो.प्रकाश जावडेकर हे विद्यमान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असून ते सध्या मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेले आहेत. त्यामुळे आता ते होम ग्राऊंडवरुन म्हणजे महाराष्ट्रातून राज्यसभेत जातील. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करुन एनडीएत सहभाग घेतला. मात्र राज्यातील मंत्रिपदाच्या आशेवर असणारे राणे आता राज्यसभेच्या दिशेने कूच करत आहेत. एकनाथ खडसे आरोपांच्या जंजाळात अडकल्यापासून मंत्रिमंडळापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांना दिल्लीत नेण्याच्या पक्षाच्या हालचाली होत्या, मात्र खडसे त्यासाठी अनुत्सुक होते.सचिन तेंडुलकर, रेखा, अनु आगा या तिघांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती नियुक्त तीन नवे खासदार कोण असणार याचीही उत्सुकता आहे.


===================================================== 
सचिन तेंडुलकर--27 एप्रिल 2012 रोजी खासदार म्हणून नियुक्त. संसदेत काहीही बोलू शकला नाही. गेल्या हिवाळी अधिवेशनात बोलण्यासाठी 7 मिनिटे उभा राहिला पण गोंधळामुळे बोलू शकला नाही.22 लेखी प्रश्न विचारले. त्यापैकी 8 प्रश्न रेल्वेशी संबंधित होते. सरकारने सचिनला दोनच आश्वासने दिली.
रेखा --27 एप्रिल 2012 ला राज्यसभेत पाऊल ठेवले. एखही प्रश्न विचारला नाही. काहीही स्पेशल मेन्शन नाही. एकही प्रायव्हेट बिल सादर केले नाही. उपस्थितीत्या 78 टक्के राष्ट्रीय सरासरीशी तुलना करता त्या फक्त 5% काळ उपस्थित राहिल्या.
जया बच्चन--सपा खासदार म्हणून राज्यसभेवर 3 एप्रिल 2012 ला निवड. चर्चांमध्ये सहभाग, प्रश्न विचारल्यावर आणि स्पेशल मेन्शनअंतर्गत मुद्दे उचलण्याचा चांगला रेकॉर्ड. त्यांची संसदेमध्ये 77% टक्के उपस्थिती राहिली. 143 चर्चांमध्ये सहभाग घेतला, 143 प्रश्न विचाराले.
===================================================== 

कोणत्या पक्षाचे किती जण होणार निवृत्त

भाजप17
काँग्रेस11
सपा06
राष्ट्रपतींद्वारे नियुक्ती03
तृणमूल काँग्रेस03
बीजेडी02
जदयू02
राष्ट्रवादी काँग्रेस02
माकप01
बसप01
अपक्ष01
शिवसेना01
टीडीपी02


कोणत्या राज्यातून कोणाला किती जागा मिळणार

* महाराष्ट्र- राज्यातील राज्यसभेचे सहा सदस्य एप्रिलमध्ये निवृत्त होणार आहेत. रिक्त जागेपैकी दोन भाजपला तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळू शकते. सहाव्या जागेसाठी मोठी चुरस होण्याची शक्यता आहे. 
* उत्तर प्रदेश- सध्याच्या विधानसभेच्या स्थितीनुसार या राज्यातील राज्यसभेच्या 9 पैकी 7 जागा भाजपला तर काँग्रेसला चार जागा मिळतील. तर सपाला दोन जागा मिळतील.  
* मध्य प्रदेश- येथील राज्यसभेच्या पाच पैकी चार जागा भाजपला तर काँग्रेसला एक जागा मिळू शकते. 
* आंध्र प्रदेश- तीन पैकी दोन जागा तेलगु देशम पक्षाला तर एक जागा अन्य पक्षाला मिळू शकते. 
* कर्नाटक- येथील चार पैकी तीन जागा काँग्रेसला तर एक जागा भाजपला मिळू शकते. 
* पश्चिम बंगाल- राज्यातील चार पैकी तीन जागा तृणमूल काँग्रेसला तर एक जागा माकपला मिळण्याची शक्यता आहे. 
* गुजरात- राजसभेच्या चार पैकी दोन जागा भाजपला तर दोन काँग्रेसला मिळतील.  
* बिहार- येथील पाच पैकी 3 जागा जदयू-भाजपला तर 2 जागा राजद-काँग्रेस यांना मिळू शकते
* तेलंगणा- दोन पैकी एक टीआरएसला तर एक काँग्रेसला मिळू शकते.  
* राजस्थान- येथील तिन्ही जागा भाजपलाच मिळतील.
* ओडिसा- 3 पैकी दोन जागा बिजू जनता दल आणि एक जागा अन्य पक्षाकडे जाऊ शकते. 
* हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एक जागा रिक्त होणार आहे. या सर्व भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. 

उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा...

पुढील महिन्यात राज्यसभेच्या ज्या जागांसाठी निवडूक होणार आहे, त्यात उत्तर प्रदेशच्या सर्वाधिक 10 जागांचा समावेश आहे.अरुण जेटली हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. टीम मोदीमधील ते महत्त्वाचे सदस्य आणि केंद्रीय अर्थमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार हे नक्की आहे.राज्यसभेच्या जागांचा विचार केला तर सर्वाधिक जागा या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी 10 जणांची निवड होणार आहे. उत्तर प्रदेशात भाजप पूर्ण बहुमतात आहे. विधानसभेच्या 403 जागांपैकी 312 जागा भाजपकडे आहेत. त्यामुळे येथून जेटली सहज विजयी होऊ शकतात. यानंतर महाराष्ट्र आणि बिहारमधील 6-6 जागी आणि पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात 5-5 जागी, गुजरात आणि कर्नाटकात 4-4 जागांसाठी, तर आंध्रप्रदेश, तेलंगाना, ओडिसा, राजस्थानच्या 3-3 जागी निवडणूक होणार आहे. त्याचप्रमाणे झारखंडमध्ये 2 जागी तर छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या प्रत्येकी 1 जागेवर राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे.उत्तर प्रदेशातील 10 पैकी 9 जागांवरील खासदार 2 एप्रिलला निवृत्त होणार आहे. यात जया बच्चन (सपा) आणि प्रमोद तिवारी (काँग्रेस) यांचा देखील समावेश आहे. एक जागा मायावती यांनी राजीनामा दिल्यामुळे रिकामी झाली आहे.गुजरातमध्ये राज्यसभेसाठी ऑगस्ट 2017 मध्ये निवडणूक झाल्यानंतर 58 जागांसह भाजप राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष बनला होता. सध्या राज्यसभेत काँग्रेसच्या 57 जागा आहेत.

जया बच्चन यांच्याकडे १ हजार कोटींची संपत्ती

बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन या राज्यसभेतील सर्वात श्रीमंत सदस्या ठरू शकतात. त्यांनी राज्यसभेसाठी नामांकन अर्ज दाखल केला असून त्यात त्यांची संपत्ती १ हजार कोटी इतकी दाखवली आहे. त्यामुळे राज्यसभेवर निवडून आल्यास त्या सर्वात श्रीमंत राज्यसभा सदस्य ठरणार आहेत. जया बच्चन यांनी आज चौथ्यांदा राज्यसभेसाठी नामांकन अर्ज दाखल केला आहे. भाजचे राज्यसभा सदस्य रवींद्र किशोर सिन्हा यांनी २०१४ मध्ये त्यांची संपत्ती ८०० कोटी दाखविली होती. तर जया बच्चन यांनी आज सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एकूण १ हजार कोटींची मालमत्ता दाखविली आहे. त्यामुळे राज्यसभेवर निवडून आल्या तर त्या सिन्हा यांना मागे टाकून सर्वात श्रीमंत खासदार बनणार आहेत. २०१२ मध्ये समाजवादी पार्टीकडून राज्यसभेसाठी नामांकन अर्ज भरताना जया बच्चन यांनी त्यांची एकूण संपत्ती ४९३ कोटी रुपये दाखविली होती. २०१२ मध्ये त्यांच्याकडे केवळ १५२ कोटी रुपये स्थावर आणि २४३ कोटी रुपये जंगम मालमत्ता होती. आज सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची आणि पती अमिताभ बच्चन यांची एकूण स्थावर मालमत्ता ४६० कोटी रुपये दाखविली आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे ५४० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. प्रतिज्ञापत्रानुसार बच्चन दाम्पत्यांकडे एकूण ६२ कोटींचं सोनं आणि इतर दागिने आहेत. त्यात अमिताभ यांच्याकडे ३६ कोटींचे तर जया बच्चन यांच्याकडे २६ कोटींचे दागिने आहेत. या दोघांकडे १२ कार असून त्यांची किंमत १३ कोटी रुपये एवढी आहे. त्यात रोल्स रॉयस, तीन मर्सिडीज, एक पोर्श आणि एका रेंज रोव्हरचा समावेश आहे. अमिताभ यांच्याकडे एक टाटा नॅनो कार आणि एक ट्रॅक्टर सुद्धा आहे. शिवाय अमिताभ यांच्याकडे ३.४ कोटींच्या घड्याळ असून जया बच्चन यांच्याकडे असलेल्या घड्याळांची किंमत ५१ लाख रुपये एवढी आहे.

नऊ लाखाचा पेन 

अमिताभ यांच्याकडील एका पेनची किंमत ९ लाख रुपये इतकी आहे. बच्चन दाम्पत्यांकडे फ्रान्सच्या ब्रिगनॉगन प्लेज येथे ३,१७५ स्क्वेअर मीटर एवढे आलिशान घर आहे. त्याचप्रमाणे नोएडा, भोपाळ, पुणे, अहमदाबाद आणि गांधीनगरमध्येही त्यांची प्रॉपर्टी आहे. जया बच्चन यांच्या नावे लखनऊ येथील काकोरीमध्ये १.२२ हेक्टरची शेती आहे. त्याची किंमत २.२ कोटी इतकी आहे. तर अमिताभ यांच्या नावे बाराबंकी जिल्ह्यातील दौलतपूर येथे ३ एकरचा प्लॉट असून त्याची किंमत ५.७ कोटी इतकी आहे. 

दरम्यान, भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरणारे नारायण राणे हे ८४ कोटी रुपयांचे धनी आहेत. विशेष म्हणजे राणेंपेक्षा त्यांची पत्नी जास्त श्रीमंत आहेत. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची संपत्ती अडीच कोटींच्या घरात आहेत. भाजपाचे केरळचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार व्ही. मुरलीधरन यांची मालमत्ता सर्वात कमी आहे. त्यांच्या ३३ हजार रुपयांची जंगम मालमत्ता असून पत्नीकडे एका गाडीसह सात लाखांची मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीकडे २० लाखांची जमीन देखील आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पुण्यात दीड कोटींच्या राहत्या घरासह २६ लाखांचे दागिने व पत्नीकडे अडीच कोटींची जंगम मालमत्ता आहे.


केरळच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक...

केरळच्या एका राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. येथील खासदार विरेंद्र कुमार यांनी डिसेंबरमध्ये राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजिनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ एप्रिल 2022 पर्यंत होता


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)


============================

'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' म्हणून राज्य निवडणूक आयोगाची मान्यता


घटस्थापनेच्या दिवशी काँग्रेसमधून सीमोल्लंघन करणारे नारायण राणे यांनी 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा'ची घोषणा केली होती. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी झाल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडे पक्षाची अधिकृतपणे नोंद केली नव्हती, सदर प्रक्रिया राबवून राज्य निवडणूक आयोगाकडे दि ६ मार्च २०१८ रोजी नोंदणीस मान्यता देण्यात आली आहे. त्यांनी १ ऑक्टोबर २०१७ रोजी सर्व पक्षांमधून बाहेर पडून 'महाराष्ट्र स्वाभिमान' या पक्षाची घोषणा केली होती. अधिसूचनेनुसार राज्य निवडणूक आयोगाने नोंदणीकृत राजकीय पक्षांची यादी प्रसिद्ध केली असून नारायण राणे यांच्या पक्षाची भर पडून आता आयोगाकडील नोंदणीकृत राजकीय पक्षांची एकूण संख्या २४८ इतकी झाली आहे.
पक्षाचा नोंदणीकृत पत्ता - २०२ संत निवास, १४ वा लिंक रोड, राजकुमार ज्वेलर्सच्यावर, खार (प), ४०००५२ असा आहे. या पत्यावर यापूर्वी प्रवीण प्रताप राणे यांच्या नावे अनेक कंपन्या रजिस्टर आहेत. अनेक कंपन्यामध्ये संचालक म्हणून कार्यरत असलेले प्रवीण प्रताप राणे हे PURE FOODS & BEVARAGES PRIVATE LIMITED या कंपनीत नारायण राणे भागीदार संचालक आहेत.


नारायण राणे यांचा राजकीय प्रवास 

नारायण राणे यांनी शिवसेनेपासून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणे यांचा राजकीय प्रवास



1968 - वयाच्या सोळाव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश
1968 - शिवसेनेच्या चेंबूर येथील शाखेत शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी
1985 ते 1990- या काळात शिवसेनेचे नगरसेवक त्यानंतर बेस्टचे अध्यक्षपद भूषवले
1990-95 - नारायण राणे पहिल्यांदा विधानसभेवर
1991 - छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षातील महत्त्व वाढले
1990-95 - याच काळात विधानपरिषदेचे विरोधपक्ष नेतेपद
1996-99 - युतीची सत्ता आल्यानंतर राज्याच्या महसूल मंत्रीपदी विराजमान
1999 - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड
2005 - शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद. मतभेदानंतर 3 जुलै 2005 रोजी शिवसेना सोडली
2005 - शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश
2005 - शिवसेना सोडल्यावर काँग्रेसतर्फे मालवणमधून विक्रमी मतांनी विजयी
2005 - आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्रीपदी निवड
2007 - काँग्रेसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात बंड
2008 - पक्षविरोधी टिप्पणीमुळे काँग्रेसमधून निलंबन
2009 - विधानसभेनंतर उद्योग मंत्रीपदावर घसरण
2014 - लोकसभेला पुत्र निलेश राणे यांच्या पराभावनंतर मंत्रीपदाचा राजीनामा
2014 - मुख्यमंत्री पदासाठी झुलवल्याच्या नाराजीतून पुन्हा मंत्रीपदाचा राजीनामा
2014 - विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघातून शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून राणेंचा पराभव
2015 - वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतही राणेंचा पराभव झाला. शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी राणेंना पराभूत केलं.

महाराष्ट्रातील घडामोडींवर एक नजर टाकली असता संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून माजी मुख्यमंत्री नारायण राणे या एकाच नावाभोवती राजकारण केंद्रित झाले आहे. राणे काँग्रेस कधी सोडणार? ते आमदारकीचा राजीनामा देणार का? ते भाजपमध्ये जाणार की वेगळा पक्ष स्थापन करणार? काँग्रेसमुक्त झाल्यानंतर ते काय करणार? महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा देणार का? एनडीएला पाठिंबा दिल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश कधी होणार? राणे विधान परिषदेची निवडणूक लढविणार का? अशा अनेकविध प्रश्नांनी गेले काही महिने राणे हेच राज्यातील संपूर्ण राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहेत. एनडीएला पाठिंबा दिल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेशा वरून तर्कवितर्कांना उधान आले होते, आता राज्यसभेसाठी भाजपने ऑफर दिली आहे परंतु महाराष्ट्रातील राजकारणात रस असल्याची इच्छा मुलांनी व्यक्त करून संभाव्य उमेदवारीवर अटकळ निर्माण केली आहे. राणे यांचा नवा प्रादेशिक पक्ष महत्त्वाची कामगिरी पार पाडू शकेल काय? त्यात आज किती आमदार आहेत किंवा कुठल्या पक्षातून कोण नेते राणेंकडे येतील? त्यांना कितपत यश येईल  हे प्रश्न आहेतच. खरेतर त्यांनी २००५ सालात शिवसेना सोडतानाच अशी काही आपली व्यवस्था वेगळी उभी केली असती, तर त्यांना परिस्थितीचा अधिक राजकीय लाभ उठवता आला असता. काँग्रेसमध्ये दहा वर्षे घालवल्यानंतर त्यांना अनुभवाने काही शिकवले असल्याने बहुधा त्यांनी तो पर्याय आता स्वीकारला आहे असे वाटते.

नितेश नारायण राणे - 

नितेश नारायण राणे यांनी २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कणकवली मतदारसंघामधून निवडणूक लढवली व २५,००० हून अधिकच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. इ.स. २०१० मध्ये चिंटू शेख याने नितेश राणेंनी त्याच्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला होता, याप्रकरणी पोलीस चौकशी होऊन नंतर राणेंना क्लीन चीट देण्यात आली होती. इ.स. २०१३ मध्ये चिंटू शेखने नितेश राणेंविरोधात विक्रोळी मेट्रोपॉलिटन कोर्टात दाखल केलेली याचिका बिनशर्त मागे घेतली. इ.स. २०१३-१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या गुजरात विकासाच्या मॉडेलवर टीका करत नितेश राणेंनी गुजराती लोकांबद्दल ट्विटरवर प्रतिक्रिया नोंदवल्यामुळे वाद निर्माण झाला होता. मांसाहारी असल्याच्या कारणावरून मराठी माणसाला फ्लॅट न विकणार्‍या गुजराती बांधकाम व्यावसायिकांविरोधात त्यांनी भूमिका घेतली. नितेश राणे यांचा विवाह ऋतुजा शिंदे यांच्याशी २८ नोवेंबर इ.स. २०१० रोजी मुंबई येथे झाला. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेल्या नितेश राणेंना व्यंगचित्रांची आवड असून ते स्वतः व्यंगचित्रकार आहेत. नितेश राणे यांचे भाऊ निलेश नारायण राणे हे माजी लोकसभा सदस्य आहेत.नितेश राणे यांचा जन्म २३ जानेवारी इ.स. १९८२ रोजी जन्म झाला. त्यांचे एमबीए पर्यंतचे शिक्षण लंडन मध्ये झाले असून २००५ साली नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वडिलांना राजकारणात साथ देण्याच्या उद्देशाने नितेश राणे भारतात आले होते.

डॉ. निलेश नारायण राणे - 

निलेश राणे यांचा जन्म: १७ मार्च १९८१ रोजीचा आहे. सध्या काँग्रेस पक्षामधील नेते व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते पंधराव्या लोकसभेमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये राणे शिवसेनेच्या विनायक राउत यांच्याकडून पराभूत झाले होते. निलेश राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत. निलेश राणे यांचेच भाऊ नितेश नारायण राणे विद्यमान महाराष्ट्र विधानसभा सदस्य आहेत.


 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' म्हणून राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली आहे   'महाराष्ट्र स्वाभिमान या पक्षाचा नोंदणीकृत पत्ता - २०२ संत निवास, १४ वा लिंक रोड, राजकुमार ज्वेलर्सच्यावर, खार (प), ४०००५२ असा आहे. या पत्यावर यापूर्वी प्रवीण प्रताप राणे यांच्या नावे अनेक कंपन्या रजिस्टर आहेत. अनेक कंपन्यामध्ये संचालक म्हणून कार्यरत असलेले प्रवीण प्रताप राणे हे PURE FOODS & BEVARAGES PRIVATE LIMITED या कंपनीत नारायण राणे यांचे भागीदार संचालक आहेत.  तर एकूण ५८ कंपन्यामध्ये राणे कुटुंबीय  एकमेकांना भागीदार आहेत. 


प्रवीण प्रताप राणे हे संचालक असलेल्या रजिस्टर कंपन्या खालीलप्रमाणे


DIN 07073295
Name RANE PRAVIN PRATAP
List of Companies
CIN/FCRN Company Name Begin Date
U45201MH2007PTC169535 BUDDING REALTY PRIVATE LIMITED 05/03/2015
U45400MH2007PTC169425 ASPIRANT REALTY PRIVATE LIMITED 20/05/2015
U15400MH2007PTC170319 PURE FOODS & BEVARAGES PRIVATE LIMITED 20/05/2015
U45201MH2007PTC175879 SUTEJ INFRASTRUCTURE PRIVATE LIMITED 20/05/2015
U52100MH2007PTC173255 RAVIKIRAN MULTITRADE PRIVATE LIMITED 20/05/2015
List of LLP
LLPIN/FLLPIN LLP Name Begin Date
AAD-5239 GENX TOYS LLP 11/03/2015
AAG-4791 URBAN BANDRA PROJECTS LLP 27/05/2016

नारायण राणे हे संचालक असलेल्या रजिस्टर कंपन्या खालीलप्रमाणे



DIN 00285961
Name NARAYAN TATU RANE
List of Companies
CIN/FCRN Company Name Begin Date
U45200MH1995PTC092854 SUBURBAN BUILDERS PRIVATE LIMITED 12/06/2002
U01120MH1996PTC096308 MOULIK HARVEST PRIVATE LIMITED 24/12/2003
U70100MH1996PTC101361 YATIN REAL ESTATES PRIVATE LIMITED 22/03/2015
U70100MH1998PTC117138 NIPUN REAL ESTATE PRIVATE LIMITED 27/09/2004
U70100MH1999PTC122237 SUKH SAGAR REAL ESTATE PRIVATE LIMITED 22/03/2015
U27109MH2007PTC166739 NNR STEEL PRIVATE LIMITED 22/03/2015
U45201MH2007PTC166742 NNR BUILDERS PRIVATE LIMITED 22/03/2015
U45200MH2007PTC166743 LIONS DEN CONSTRUCTIONS PRIVATE LIMITED 22/03/2015
U15400MH2007PTC170319 PURE FOODS & BEVARAGES PRIVATE LIMITED 22/03/2015
U15122MH2012PTC231106 RANE VENTURES PRIVATE LIMITED 15/05/2012
U51909MH2005PTC152983 REALSTONE MULTITRADE PRIVATE LIMITED 22/03/2015
U70100MH2005PTC156752 LAKSH PROPERTIES PRIVATE LIMITED 22/03/2015
U70200GA2006PTC004973 EXCEL REALTY HOLDINGS PRIVATE LIMITED 22/03/2015
List of LLP
LLPIN/FLLPIN LLP Name Begin Date
AAG-3925 MOULIK HARVEST LLP 18/05/2016
AAG-4736 LIONS DEN CONSTRUCTIONS LLP 26/05/2016
AAG-6948 YATIN REAL ESTATES LLP 17/06/2016
AAG-7757 REALSTONE MULTITRADE LLP 27/06/2016
AAM-0496 ABHINISH FINCOM SERVICES LLP 19/02/2018

निलेश राणे हे संचालक असलेल्या रजिस्टर कंपन्या खालीलप्रमाणे



DIN 01497290
Name NILESH NARAYAN RANE
List of Companies
CIN/FCRN Company Name Begin Date
U70100MH1999PTC122237 SUKH SAGAR REAL ESTATE PRIVATE LIMITED 09/12/1999
U70100MH1996PTC103099 NEELESH PROPERTIES PRIVATE LIMITED 23/06/2000
U22210MH2008PTC179443 RANE PRAKASHAN PRIVATE LIMITED 25/02/2008
U70100MH1996PTC102648 PURU CONSTRUCTIONS PRIVATE LIMITED 25/06/2013
U15122MH2012PTC231106 RANE VENTURES PRIVATE LIMITED 15/05/2012
U45102MH2000PTC130227 ASHWAMEGH PROPERTIES PRIVATE LIMITED 05/08/2002
U51410MH2003PTC142308 NICE AUTO DEALER PRIVATE LIMITED 22/09/2003
U50100MH2003PTC142348 FUTURISTICS MOTOR DEALERS PRIVATE LIMITED 04/11/2003
U70100MH2004PTC144355 ARTLINE PROPERTIES PRIVATE LIMITED 12/03/2004
U55101MH1996PTC100605 NEELAM HOTELS PRIVATE LIMITED 13/07/2002
U45200MH1995PTC092854 SUBURBAN BUILDERS PRIVATE LIMITED 12/06/2002
U70200GA2006PTC004973 EXCEL REALTY HOLDINGS PRIVATE LIMITED 21/12/2013
List of LLP
LLPIN/FLLPIN LLP Name Begin Date
AAG-7757 REALSTONE MULTITRADE LLP 20/05/2017

नितेश राणे हे संचालक असलेल्या रजिस्टर कंपन्या खालीलप्रमाणे



DIN 00285965
Name NITESH NARAYAN RANE
List of Companies
CIN/FCRN Company Name Begin Date
U70200GA2006PTC004973 EXCEL REALTY HOLDINGS PRIVATE LIMITED 21/12/2013
U70100MH2005PTC156752 LAKSH PROPERTIES PRIVATE LIMITED 18/12/2008
U70100MH2005PTC153184 SDB ESTATE PRIVATE LIMITED 09/01/2007
U51909MH2005PTC152983 REALSTONE MULTITRADE PRIVATE LIMITED 11/05/2005
U72100MH2005PTC150931 AUTOMATIC AUTO & I. T.SERVICES PRIVATE LIMITED 05/10/2012
U05005PN1990PLC139300 AMISON FISHERIES LTD 30/09/2009
U51410MH2003PTC142308 NICE AUTO DEALER PRIVATE LIMITED 08/07/2010
U45200MH2003PTC140098 NEXGEN DEVELOPERS PRIVATE LIMITED 18/12/2008
U15130MH1993PTC073658 NILESH SPICES AND MASALA MILLS PRIVATE LIMITED 02/09/2000
U45200MH1995PTC092839 SKYWALK BUILDERS PRIVATE LIMITED 12/06/2002
U15122MH2012PTC231106 RANE VENTURES PRIVATE LIMITED 15/05/2012
U55101MH1996PTC100605 NEELAM HOTELS PRIVATE LIMITED 27/06/1996
U15400MH2008PTC188355 KONKAN FOOD PROCESSORS PRIVATE LIMITED 20/11/2008
U22210MH2008PTC179443 RANE PRAKASHAN PRIVATE LIMITED 25/02/2008
U74999MH2008PLC188189 NNR BIOFUELS LIMITED 15/07/2014
U70100MH1996PTC100568 NITESH REALTIES PRIVATE LIMITED 20/02/2003
U27109MH2007PTC166739 NNR STEEL PRIVATE LIMITED 04/01/2007
U70100MH1996PTC102663 ANEKA BUILDERS AND DEVELOPERS PRIVATE LIMITED 19/08/2002
U15122PN2004PTC018737 SINDHUDURG FOOD PRODUCTS PRIVATE LIMITED 30/09/2009
U70100MH2000PTC124806 SNS COMMERCIAL PREMISES PRIVATE LIMITED 09/01/2007
List of LLP
LLPIN/FLLPIN LLP Name Begin Date
AAG-6992 NITESH REALTIES LLP 17/06/2016
AAG-7757 REALSTONE MULTITRADE LLP 27/06/2016

प्रियांका राणे हे संचालक असलेल्या रजिस्टर कंपन्या खालीलप्रमाणे



DIN 02079818
Name PRIYANKA NILESH RANE
List of Companies
CIN/FCRN Company Name Begin Date
U05005PN1990PLC139300 AMISON FISHERIES LTD 10/08/2017
U70101MH1997PTC107891 DEVAANGI PROPERTIES PRIVATE LIMITED 17/02/2008
U15400MH2008PTC188355 KONKAN FOOD PROCESSORS PRIVATE LIMITED 19/02/2009
U01403MH2009PTC191789 KOKAN MAHILA VIKAS COMPANY PRIVATE LIMITED 17/04/2009
U45102MH2000PTC130227 ASHWAMEGH PROPERTIES PRIVATE LIMITED 18/12/2008

निलम नारायण राणे यांच्या नावावर असलेल्या रजिस्टर कंपन्या खालीलप्रमाणे



DIN 00285968
Name NEELAM NARAYAN RANE
List of Companies
CIN/FCRN Company Name Begin Date
U05005PN1990PLC139300 AMISON FISHERIES LTD 30/09/2011
U15130MH1993PTC073658 NILESH SPICES AND MASALA MILLS PRIVATE LIMITED 02/09/2000
U70100MH2005PTC153184 SDB ESTATE PRIVATE LIMITED 09/01/2007
U45200MH1995PTC092839 SKYWALK BUILDERS PRIVATE LIMITED 12/06/2002
U45200MH2004PTC145233 BESTLINE CONSTRUCTIONS PRIVATE LIMITED 03/03/2005
U70100MH2004PTC144355 ARTLINE PROPERTIES PRIVATE LIMITED 12/03/2004
U50100MH2003PTC142348 FUTURISTICS MOTOR DEALERS PRIVATE LIMITED 04/11/2003
U51410MH2003PTC142308 NICE AUTO DEALER PRIVATE LIMITED 22/09/2003
U55101MH1996PTC100605 NEELAM HOTELS PRIVATE LIMITED 27/06/1996
U45102MH2001PTC130444 CHANDRA DARSHAN PROPERTIES PRIVATE LIMITED 20/01/2004
U70100MH1996PTC100568 NITESH REALTIES PRIVATE LIMITED 20/02/2003
U15122MH2012PTC231106 RANE VENTURES PRIVATE LIMITED 15/05/2012
U01403MH2009PTC191789 KOKAN MAHILA VIKAS COMPANY PRIVATE LIMITED 17/04/2009
U15400MH2008PTC188355 KONKAN FOOD PROCESSORS PRIVATE LIMITED 19/02/2009
U70100MH1996PTC102648 PURU CONSTRUCTIONS PRIVATE LIMITED 01/11/2002
U70100MH1996PTC102663 ANEKA BUILDERS AND DEVELOPERS PRIVATE LIMITED 19/08/2002
U70100MH1996PTC103099 NEELESH PROPERTIES PRIVATE LIMITED 18/12/2008
U70100MH1998PTC117138 NIPUN REAL ESTATE PRIVATE LIMITED 18/12/2008
U15122PN2004PTC018737 SINDHUDURG FOOD PRODUCTS PRIVATE LIMITED 30/09/2011
U70100MH2000PTC124806 SNS COMMERCIAL PREMISES PRIVATE LIMITED 09/01/2007
List of LLP
LLPIN/FLLPIN LLP Name Begin Date
AAG-6918 BESTLINE CONSTRUCTIONS LLP 16/06/2016
AAG-6992 NITESH REALTIES LLP 17/06/2016
AAM-0496 ABHINISH FINCOM SERVICES LLP 19/02/2018



नंदिता नितेश राणे यांच्या नावावर असलेल्या रजिस्टर कंपन्या खालीलप्रमाणे



DIN 07259648
Name NANDITA NITESH RANE
List of Companies
CIN/FCRN Company Name Begin Date
U70100MH1996PTC101361 YATIN REAL ESTATES PRIVATE LIMITED 22/03/2015
U70100MH1996PTC102648 PURU CONSTRUCTIONS PRIVATE LIMITED 22/03/2015
U45203MH1998PTC115373 BLUEPEARL PROPERTIES PRIVATE LIMITED 22/03/2015
U45201MH2007PTC166742 NNR BUILDERS PRIVATE LIMITED 22/03/2015
U45200MH2007PTC166743 LIONS DEN CONSTRUCTIONS PRIVATE LIMITED 22/03/2015
U45200MH2004PTC145233 BESTLINE CONSTRUCTIONS PRIVATE LIMITED 22/03/2015
List of LLP
LLPIN/FLLPIN LLP Name Begin Date
AAG-3327 BLUEPEARL PROPERTIES LLP 11/05/2016
AAG-4736 LIONS DEN CONSTRUCTIONS LLP 26/05/2016
AAG-6918 BESTLINE CONSTRUCTIONS LLP 16/06/2016
AAG-6948 YATIN REAL ESTATES LLP 17/06/2016

सतीश विष्णू राणे यांच्या नावावर असलेल्या रजिस्टर कंपन्या खालीलप्रमाणे



DIN 00219362
Name SATISH VISHNU NARE
List of Companies
CIN/FCRN Company Name Begin Date
U51900MH1996PTC102903 SHAGOON MERCANDISE PRIVATE LIMITED 19/02/2007
U70101MH1997PTC107891 DEVAANGI PROPERTIES PRIVATE LIMITED 17/06/2004
U01120MH1998PTC113865 SUHAS AGRO PRIVATE LIMITED 06/03/1998
U45200MH2006PTC165343 PROGRESSIVE REALITY DEVELOPERS PRIVATE LIMITED 05/05/2009
U74300MH2007PTC174317 RISING SUN ADVERTISING PRIVATE LIMITED 20/09/2007
U95000PN2009PTC133935 VIJAYDURG INFRA PRIVATE LIMITED 23/09/2009
U45102MH2001PTC130444 CHANDRA DARSHAN PROPERTIES PRIVATE LIMITED 20/01/2004
U51909MH2005PTC153024 FINE PLAZA MULTITRADE PRIVATE LIMITED 07/09/2005



Maharashtra Election 2014

copy of scan affidavit's 






























Maharashtra Election 2014
NITESH NARAYAN RANE (Winner) KANKAVLI (SINDHUDURG)
Original copy of scan affidavit's links

S13_ac268_11_NiteshNarayanRane.pdf

http://docs2.myneta.info/affidavits/ews3maharashtra2014/1284/S13_ac268_11_NiteshNarayanRane.pdf








POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.