बृहन्मुंबईसह 7 महानगरपालिकांतील रिक्तपदांसाठी 6 एप्रिलला मतदान
बृहन्मुंबई, नाशिक, सोलापूर, जळगाव, पुणे, अहमदनगर व उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 6 एप्रिलला मतदान; तर 7 एप्रिल 2018 रोजी मतमोजणी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे 13 ते 20 मार्च 2018 या कालावधीत दाखल करता येतील. 18 मार्च 2018 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 21 मार्च 2018 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 23 मार्च 2018 पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 24 मार्च 2018 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 6 एप्रिल 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 7 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
पोटनिवडणुका होणारे महानगरपालिका निहाय प्रभाग:
बृहन्मुंबई- 173,
नाशिक- 13-क,
सोलापूर- 14-क,
जळगाव- 26-ब,
पुणे- 22-क,
अहमदनगर- 32-ब
उल्हासनगर- 17-ब.
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्र २२-क या जागेसाठी ६ एप्रिलला पोटनिवडणूक
पुण्याच्या माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विद्यमान नगरसेविका चंचला संदीप कोद्रे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याने हि जागा रिक्त झाली आहे. सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग क्र २२-क जागा असून कैलासमामा कोद्रे यांच्या कुटुंबातील महिलेला संधी दिली जाईल असा अंदाज राष्ट्रवादी पक्षाकडून वर्तविला जात आहे.
Prabhag No. 22: Mundhwa - Magarpatta City
A Chetan Viththal Tupe (NCP)
B Hemlata Nilesh Magar (NCP)
C Chanchala Sandip Kondre ( NCP)
D Sunil Jaywant Gayakwad (NCP)
निवडणूक कार्यक्रमाचा तपशील
* नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 13 ते 20 मार्च 2018
* नामनिर्देशनपत्रांची छाननी- 21 मार्च 2018
* उमेदवारी मागे घेणे- 23 मार्च 2018
* मतदानाचा दिनांक- 06 एप्रिल 2018
* मतमोजणीचा दिनांक- 07 एप्रिल 2018
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.