महापालिकेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा कोद्रे विजयी
माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या मुंढवा मगरपट्टा सिटी 22 क प्रभागातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा समीर कोद्रे या तब्बल 3251 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना 8991 मते पडलीत. तर 5470 मते मिळवित दुस-या क्रमांकावर शिवसेनेच्या मोनीका तुपे आहेत तर सत्ताधारी भाजपच्या सुकन्या गायकवाड या तिस-या क्रमांकावर आहेत. त्यांना एकूण 4334 मते मिळाली आहेत.
माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी काल (6 एप्रिल) मतदान झाले होते. यामध्ये 35 टक्के मतदान झाले होते. विजयी उमेदवार पूजा समीर कोद्रे या दिवंगत चंचला कोद्रे यांच्या जाऊबाई आहेत. या निवडणुकीसाठी भाजपकडून सुकन्या गायकवाड आणि शिवसेनेने मोनिका तुपे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या धोरणानुसार ही पोटनिवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मुंढवा, मगरपट्टासिटी, माळवाडी, आकाशवाणी, 15 नंबर, लक्ष्मी कॉलनी असा भाग असलेल्या या प्रभागात 29 हजार 278 पुरुष आणि 26 हजार 436 महिला, असे एकूण 55 हजार 714 मतदार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू होते परंतु ते असफल झाले होते.
माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी काल (6 एप्रिल) मतदान झाले होते. यामध्ये 35 टक्के मतदान झाले होते. विजयी उमेदवार पूजा समीर कोद्रे या दिवंगत चंचला कोद्रे यांच्या जाऊबाई आहेत. या निवडणुकीसाठी भाजपकडून सुकन्या गायकवाड आणि शिवसेनेने मोनिका तुपे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या धोरणानुसार ही पोटनिवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मुंढवा, मगरपट्टासिटी, माळवाडी, आकाशवाणी, 15 नंबर, लक्ष्मी कॉलनी असा भाग असलेल्या या प्रभागात 29 हजार 278 पुरुष आणि 26 हजार 436 महिला, असे एकूण 55 हजार 714 मतदार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू होते परंतु ते असफल झाले होते.
प्रभाग क्र 22 मुंढवा करिता ५ उमेदवार निवडणूक रिंगणात
पुणे महापालिका पोटनिवडणूक २०१८ प्रभाग क्र 22 मुंढवा करिता ५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अंतिम उमेदवार पुढीलप्रमाणे 1)अपक्ष - बोलभट दिपाली प्रकाश चिन्ह - शिटी 2)भाजप - गायकवाड सुकन्या विनोद - चिन्ह - कमळ 3) राष्ट्रवादी काँग्रेस - कोद्रे पूजा समीर - चिन्ह - घड्याळ 4) अपक्ष - मगर संगीता नितीन -चिन्ह - अंगठी 5)शिवसेना - तुपे मोनिका समीर चिन्ह - धनुष्यबाण असे आहेत.
1)अपक्ष - बोलभट दिपाली प्रकाश चिन्ह - शिटी
महानगरपालिका नामनिर्देशनपत्रासोबत उमेदवाराने द्यावयाचे शपथपत्र दिले आहे यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार दिपाली प्रकाश बोलभट(२६) यांनी स्वत House Wife असून पती प्रकाश बोलभट हे Bussiness आहेत असे दिले असून त्यांचे (९) वार्षिक उत्पन्नाबाबतचा तपशील मध्ये आयकर रिटर्न भरणा केलेले मागील वर्ष २०१६-१७ आयकर रिटर्नमध्ये दर्शविलेले एकूण वार्षिक उत्पन्न 4,50,000.00 असल्याचे म्हंटले आहे. (iii) मी देय असलेल्या सार्वजनिक वित्तीय संस्था यांच्याकडील व शासकीय / निमशासकीय संस्थांकडील दायित्वे/ थकीत रकमा यांचा तपशील दिला आहे त्यामध्ये देखील 4,50,000.00 (ब) १. आयकर (अधिभारासह) थकीत असल्याची चुकीची माहिती दिली असल्याचे दिसून येते. तर मतदारसंघ विकास योजना काय आहेत हा प्रश्न : Do you have Development plan for your ward? असा आहे त्याचे उत्तर : Yes असे नमूद केले आहे. उमेदवाराचे या प्रभागातील मतदार यादीत नाव नसून त्याचे नाव प्रभाग क्र ४ मध्ये आहे असे नमूद केले आहे.2)भाजप - गायकवाड सुकन्या विनोद - चिन्ह - कमळ
महानगरपालिका नामनिर्देशनपत्रासोबत उमेदवाराने द्यावयाचे शपथपत्र दिले आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुकन्या विनोद गायकवाड (२५) यांनी स्वत No Occupation उद्योग नाही, काम काही करीत नसल्याचे म्हंटले आहे तरीही त्यांचे (९) वार्षिक उत्पन्नाबाबतचा तपशील मध्ये आयकर रिटर्न भरणा केलेले मागील वर्ष २०१६-१७ आयकर रिटर्नमध्ये दर्शविलेले एकूण वार्षिक उत्पन्न 2,65,550.00 असल्याचे म्हंटले आहे. (iii) मी देय असलेल्या सार्वजनिक वित्तीय संस्था यांच्याकडील व शासकीय / निमशासकीय संस्थांकडील दायित्वे/ थकीत रकमा यांचा तपशील दिला आहे त्यामध्ये देखील 2,50,000.00 थकीत कर्ज असल्याची चुकीची माहिती दिली असल्याचे दिसून येते. काहीही काम न करणाऱ्या व्यक्तीला कर्ज दिले जात नाही. तर मतदारसंघ विकास योजना काय आहेत हा प्रश्न : Do you have Development plan for your ward? असा आहे त्याचे उत्तर : उत्तर : CLEAN RIVER PROJECT, WASTE MANAGEMENT IN WARD, TRAFIC FREE WARD, FLYOVER BRIDGES IN CHOWKS, WOMEN WELFARE. SENIOR CITIZEN PARK. असे नमूद केले आहे. उमेदवार काहीही काम करीत नसल्या तरी वार्षिक उत्पन्न २ लाख ६५ हजारांवर आहे, त्या कोणावर अवलंबून नाहीत ना त्यांच्यावर कोणी अवलंबून आहे3) राष्ट्रवादी काँग्रेस - कोद्रे पूजा समीर - चिन्ह - घड्याळ
महानगरपालिका नामनिर्देशनपत्रासोबत उमेदवाराने द्यावयाचे शपथपत्र दिले आहे यामध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार पूजा समिर कोद्रे (34) यांनी स्वत House Wife गृहिणी असल्याचे म्हंटले आहे. त्यांचे काहीही वार्षिक उत्पन्न नाही तर पती समिर कोद्रे यांनी Agriculture शेती व्यवसाय करतात असे नमूद केले आहे त्यांचे (९) वार्षिक उत्पन्नाबाबतचा तपशील मध्ये आयकर रिटर्न भरणा केलेले मागील वर्ष २०१६-१७ आयकर रिटर्नमध्ये दर्शविलेले एकूण वार्षिक उत्पन्न 6,02,587.00 असल्याचे म्हंटले आहे. (iii) मी देय असलेल्या सार्वजनिक वित्तीय संस्था यांच्याकडील व शासकीय / निमशासकीय संस्थांकडील दायित्वे/ थकीत रकमा यांचा तपशील दिला आहे त्यामध्ये देखील १. आयकर (अधिभारासह) 3,57,119.00 थकीत आहेत तर ३.महानगरपालिका / मालमत्ता कर 1,08,901.00 थकीत असल्याची माहिती दिली आहे. तर मतदारसंघ विकास योजना काय आहेत हा प्रश्न : Do you have Development plan for your ward? असा आहे त्याचे उत्तर : 1) Road Development 2) Water Management 3) Traffic management 4) Welfare management 5) Waste management, etc. असे नमूद केले आहे. उमेदवार गृहिणी असल्यातरी त्यांच्याकडे 98,500/- रोख रक्कम असल्याचे शपथपत्र मध्ये म्हंटले आहे.4) अपक्ष - मगर संगीता नितीन -चिन्ह - अंगठी
महानगरपालिका नामनिर्देशनपत्रासोबत उमेदवाराने द्यावयाचे शपथपत्र दिले आहे यामध्ये अपक्ष उमेदवार संगिता नितीन मगर (३९) यांनी स्वत House Wife गृहिणी असल्याचे म्हंटले आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न 2,50,000/- आहे तर पती नितीन मगर यांनी Bussiness व्यवसाय करतात असे नमूद केले आहे त्यांचे (९) वार्षिक उत्पन्नाबाबतचा तपशील मध्ये आयकर रिटर्न भरणा केलेले मागील वर्ष २०१६-१७ आयकर रिटर्नमध्ये दर्शविलेले एकूण वार्षिक उत्पन्न 3,20,000.00 असल्याचे म्हंटले आहे. तसेच उमेदवाराने (iii) मी देय असलेल्या सार्वजनिक वित्तीय संस्था यांच्याकडील व शासकीय / निमशासकीय संस्थांकडील दायित्वे/ थकीत रकमा यांचा तपशील दिला आहे त्यामध्ये देखील १. आयकर (अधिभारासह) 2,50,000.00 थकीत आहेत तर ३.महानगरपालिका / मालमत्ता कर 23,100/- थकीत असल्याची माहिती दिली आहे. पती नितीन मगर यांनी १. आयकर (अधिभारासह) 3,20,000/- तर ३.महानगरपालिका / मालमत्ता कर 23,100/- थकीत असून १. बँकाकडून कर्जे 43,00,000 थकीत असल्याचे म्हंटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधी कायद्याप्रमाणे निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवाराच्या नावे संबंधित संस्थेची कोणतीही थकबाकी नसावी तसे थकबाकी नसल्याचे दाखले देऊनही महानगरपालिका / मालमत्ता कर बाकी आहे असे चुकीचे शपथपत्रात नमूद केले आहे. मतदारसंघ विकास योजना काय आहेत हा प्रश्न : Do you have Development plan for your ward? असा आहे त्याचे उत्तर : yes असे नमूद केले आहे. उमेदवाराचे या प्रभागातील मतदार यादीत नाव नसून त्याचे नाव प्रभाग क्र ५६ मध्ये आहे असे नमूद केले आहे.5)शिवसेना - तुपे मोनिका समीर चिन्ह - धनुष्यबाण
महानगरपालिका नामनिर्देशनपत्रासोबत उमेदवाराने द्यावयाचे शपथपत्र दिले आहे यामध्ये शिवसेनेच्या उमेदवार मोनिका समीर तुपे (३१) यांनी स्वत Bussiness व्यवसायिक असल्याचे म्हंटले आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न 2,50,000/- आहे तर पती समीर तुपे यांनी Bussiness व्यवसाय करतात असे नमूद केले आहे त्यांचे (९) वार्षिक उत्पन्नाबाबतचा तपशील मध्ये आयकर रिटर्न भरणा केलेले मागील वर्ष २०१६-१७ आयकर रिटर्नमध्ये दर्शविलेले एकूण वार्षिक उत्पन्न 58,85,550 असल्याचे म्हंटले आहे. तसेच उमेदवाराकडे कोणतीही थकबाकी नसून पती समीर तुपे यांच्याकडे (iii) मी देय असलेल्या सार्वजनिक वित्तीय संस्था यांच्याकडील व शासकीय / निमशासकीय संस्थांकडील दायित्वे/ थकीत रकमा यांचा तपशील दिला आहे त्यामध्ये १. बँकाकडून कर्जे 4,09,00,000/- थकीत असल्याचे म्हंटले आहे. २ लाख व त्यापेक्षा रोख रक्कम जवळ बाळगणे व व्यवहार करणे नवीन कायद्याप्रमाणे अपराध ठरतो तरीही आजच्या काळात उमेदवाराकडे रोख स्वरुपात ३ लाख रुपये असून पती यांच्याकडे २ लाख ५० हजार रुपये असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. मतदारसंघ विकास योजना काय आहेत हा प्रश्न : Do you have Development plan for your ward? असा आहे त्याचे उत्तर : WELFARE STATE असे नमूद केले आहे.पुणे महापालिकेच्या मुंढवा- मगरपट्टासिटी प्रभाग क्रमांक 22 क च्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून सुकन्या गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केल्यानतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोद्रे कुटुंबातील सदस्य पुजा कोद्रे यांना तर शिवसेनेकडून उपशहर प्रमुख समीर तुपे यांच्या पत्नी मोनिका तुपे यांना उमेदवारी दिली आहे, मनसे ही निवडणूक लढविणार नसल्यामुळे पोटनिवडणूकीसाठी या प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व शिवसेना, अशी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुरवातीला निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चेला वेग आला होता. रिक्त जागेवर कोद्रे कुटुंबातील सदस्य म्हणून कैलासराव कोद्रे यांच्या धाकट्या सून पुजा समीर कोद्रे आणि विवाहित मुलगी स्मिता शैलेश लडकत-कोद्रे ही दोन उमेदवारांची नावे चर्चेत होती. स्मिता शैलेश लडकत या भाजपचे पदाधिकारी महेश लडकत यांच्या भावजय असल्याने व लडकत आडनाव मतदारांना अल्पावधीत समजावणे कठीण होऊ शकते तसेच राष्ट्रवादी मध्ये या नावाला प्रचंड विरोध करण्यात येत होता, त्यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता असल्याने त्यांना उमेदवारी डावलण्यात आली. मतदार यादीत दोन नावांचा देखील संभ्रम होता याचा परिणाम उमेदवारी निवडीवर झाला आहे.
मुंढवा -मगरपट्टासिटी प्रभाग 22 क येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका व माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला या प्रभागात अनुकूल वातावरण आहे. याप्रभागातील इतर ३ सदस्य देखील राष्ट्रवादीचे असल्याने माजी महापौर कै. चंचला कोद्रे यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मतदारांमध्ये सहानुभूतीचे वातावरण आहे. महापालिकेच्या गेल्यावर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोद्रे यांच्याविरोधात भाजपने सुकन्या गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा कोद्रे यांच्यासमोर आव्हान उभे करीत गायकवाड 11 हजार 477 मते मिळविली होती. तर, कोद्रे सुमारे 14 हजार 200 मते मिळवून विजयी झाल्या होत्या. मात्र, डिसेंबर महिन्यात त्यांचे आकस्मित निधन झाले. त्यामुळे होत असलेल्या पोट निवडणुकीसाठी या प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व शिवसेना, अशी तिरंगी लढत होणार आहे. गेल्यावर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अ गटातून शिवसेनेकडून उपशहर प्रमुख समीर तुपे देखील निवडणूक लढवली होती त्यांना केवळ ४९७० मते मिळाली होती. तर गटातून शिवसेनेकडून सुवर्णा सतीश जगताप यांनी निवडणूक लढवली होती त्यांना केवळ ५२०६ मते मिळाली होती. या प्रभागात सेनेची ताकद कमी आहे. पोटनिवडणूकीला कमी मतदान होते त्यामध्ये भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन मतदानाच्या दिवशी ६ एप्रिल रोजीच आहे. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपच्या इतर उमेदवारांनी बहुतांशी सक्रियता दर्शवली होती ती या निवडणुकीत नसल्याचे दिसून येते.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.