Saturday, 3 March 2018

मेघालय, नागालँड आणि त्रिपुराचा निकाल

मेघालय, नागालँड आणि त्रिपुराचा निकाल

भाजपकडून डाव्यांच्या गडाला भगदाड; त्रिपुरामध्ये बहुमत

त्रिपुरा

एकूण जागा 60
मतदान झाले 59
निकाल जाहीर 59
भाजपा 43
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट 16
आयपीएफटी 8


मेघालय
एकूण जागा 60
निवडणूक झाली -59
निकाल जाहीर- 59
कॉंग्रेस- 21
एनपीपी – 19
भाजपा – 2
अन्य – 17
(अन्य तपशील)
युडीपी – 6
पीडीएफ- 4
एचएसपीडीपी- 2
केएचएनएएम – 1
राष्ट्रवादी- 1
अपक्ष- 3
एकूण – 59

नागालॅन्ड
एकूण जागा- 60
मतदान झाले – 60
निवडणूक जाहीर- 60
भाजपा – 29
एनपीएफ- 29
अन्य – 2

काँग्रेस चार तर भाजपचे २१ राज्यात सरकार

३४ वर्षापूर्वी अवघे दोन खासदार असलेल्या भाजपने त्रिपुरा आणि नागालँडमध्ये दणदणीत विजय मिळविला आहे. या विजयाबरोबरच भाजप आघाडीची २१ राज्यात सत्ता निर्माण झाली आहे. त्यात १५ राज्यात भाजपने स्वबळावर सरकार स्थापन केले आहे. तर काँग्रेसची अवघ्या चार राज्यांतच सत्ता उरली आहे. सध्या भाजप आघाडीची १९ राज्यांत सत्ता आहे. नागालँडमध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. मात्र नागालँडमध्ये भाजपने मित्रपक्षांना घेऊन सरकार स्थापन केलं तर एनडीएची २० राज्यात सत्ता स्थापन होईल. मेघालयात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी भाजपला गोवा आणि मणिपूरप्रमाणे मेघालयातही सरकार स्थापन करता आलं तर एनडीएची २१ राज्यांत सत्ता होईल. सध्या एनडीएकडे ६७.८५ टक्के मते असून यूपीएकडे अवघे ७.७८ टक्के मते आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर भाजपला दिल्ली, बिहार आणि पंजाब विधानसभा निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला. मात्र त्यानंतर भाजपने जदयूशी हातमिळवणी करून बिहारमध्येही सरकार स्थापन केलं. या वर्षी कर्नाटक, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशात निवडणुका होणार आहेत. कर्नाटक वगळता राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मिझोराम, कर्नाटक, पंजाब आणि पुदुचेरी या चार राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. तर केरळ, ओडिशा, तेलंगणा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि दिल्लीत इतरांचे सरकार आहे. 2014 साली यूपीएचं देशातील जवळपास 35 टक्के लोकसंख्येवर राज्य होतं, तर एनडीएचं केवळ 22 टक्के लोकसंख्येवर.. मात्र एनडीएचं सध्या जवळपास 68 टक्के जनतेवर राज्य आहे, तर यूपीएचं केवळ 8 टक्के जनतेवर राज्य आहे.देशातील सद्यपरिस्थितीत काँग्रेस आणि यूपीएतील मित्रपक्षांचीही हीच परिस्थिती आहे. 2004 साली काँग्रेससोबत असलेल्या डाव्यांचा गड मानला जाणाऱ्या त्रिपुरात भाजपने झेंडा फडकावला आहे. डाव्यांचा पक्ष आता केवळ केरळपर्यंतच मर्यादित राहिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचा जुना मित्रपक्ष तृणमुल काँग्रेसही सध्या वेगळा आहे. मात्र तृणमुलकडेही पश्चिम बंगाल हे एकच राज्य आहे.तामिळनाडूतील डीएमके हा पक्षही काँग्रेससोबत होता, मात्र मोदींच्या रणनितीने जयललितांच्या निधनानंतर तामिळनाडूतील दोन्ही गट भाजपच्या जवळ आले आहेत. आरजेडी आणि समाजवादी पार्टीही काँग्रेसचे मित्रपक्ष होते, मात्र त्यांच्याकडे सध्या एकही राज्य नाही.सतत पराभवाचे धक्के सहन करत असलेला काँग्रेस पक्ष 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकाकी आहे. तर मित्रपक्षांचीही हीच अवस्था आहे.

भाजप आणि आघाडीची सत्ता असलेली राज्ये
महाराष्ट्र, गुजरात ,राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, नागालँड, त्रिपुरा, बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश ,उत्तराखंड, गोवा, मणीपूर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड, सिक्कीम, आंध्र प्रदेश

काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये
मिझोराम, कर्नाटक, पंजाब आणि पुदुचेरी

काँग्रेस-भाजपेत्तर सत्ता असलेलील राज्ये
केरळ, ओडिशा, तेलंगणा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि दिल्ली

विप्लव कुमार देव त्रिपुराचे संभाव्य मुख्यमंत्री?

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर पहिल्यांदाच भाजप त्रिपुरात सरकार स्थापन करणार आहे. त्यामुळे त्रिपुराचे संभाव्य मुख्यमंत्री म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष विप्लव कुमार देव यांचे नाव आघाडीवर असल्याचं सूत्रांनी सांगितलं.बनमालीपूर विधानसभा मतदारसंघातून विप्लव कुमार देव यांनी निवडणूक लढवली आहे. ते अत्यंत लो-प्रोफाइल आहेत. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची रॅली यशस्वी करण्यासाठी त्यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका साकारली होती. कमी बोलणारे विप्लव कुमार देव त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दलही प्रसिद्ध आहेत. स्वच्छ प्रतिमा असलेले विप्लव कुमार देव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. त्यांनी संघाचे ज्येष्ठ नेते के. एन. गोविंदाचार्य यांच्या सोबत काम केले आहे. ४८ वर्षीय विप्लव कुमार देव यांनी २०१८ मध्ये निवडणूक लढविली होती. त्यांची पत्नी बँकेत कामाला असून निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या पत्नीचं एकूण उत्पन्न ९ लाख १ हजार ९१० रुपये एवढं दाखविण्यात आलं आहे.

 भाजपने २०१३मध्ये विधानसभा निवडणुकीत त्रिपुरात ५० उमेदवार दिले. ४९ जणांची अनामत जप्त झाली होती. ५% मते मिळाली होती. या वेळी ४३ जिंकले. 50.50% मते पडली.
* २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपला येथे ६% पडली होती.
* गेल्या ५ विधानसभांत त्रिपुरामध्ये भाजपच्या ९९% उमेदवारांची अनामत जप्त झाली. एकही जागा नव्हती.
* ईशान्येतील तीन राज्यांत भाजपला गेल्या वेळेपेक्षा ६१% मते अधिक पडली.
* मोदी यांच्या पीएमपदाच्या कारकीर्दीत ४ वर्षांत २१ निवडणुका झाल्या. यात १४ राज्यांत भाजपचा विजय.
* इंदिरा गांधी यांच्या पीएमपदाच्या काळात ४ वर्षांत १९ पैकी १३ राज्यांत काँग्रेसने विजय संपादन केला होता.

भाजप त्रिपुरात 2 टक्के मतावरून सत्तेपर्यंत प्रवास

प्रचारामध्ये त्रिपुरावर भाजपने चांगलेच लक्ष केंद्रीत केले होते. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याठिकाणी चार प्रचार सभा घेतल्या होत्या. अमित शहांनी देखिल त्रिपुरावर विशेष लक्ष दिले होते. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनीही येथे सभा घेतल्या. 2014 मध्ये केंद्रात सत्ता आल्यानंतर मोदी सरकराने ईशान्येकडील राज्यांवर विशेष लक्ष दिले. त्याचा फायदा प्रचारात घेतला. भाजपने माणिक सरकार विरुद्ध मोदी सरकार असाच प्रचार केल्याचे पाहायला मिळाले.

त्रिपुरातील भाजपच्या यशाची इतर कारणे..

* आदिवासी मतदार हे या भागातील निर्णायक मतदार आहेत असे म्हटले जातात. हे लक्षात गेऊन भाजपने त्यांच्यावर लक्ष केंद्रीत केले होते. या भागात 30 टक्के मतदार आदिवासी आहेत. त्यांचा फायदा भाजपला झाल्याचे दिसून येते.
* येथे गेल्या 25 वर्षांपासून डाव्यांची सत्ता आहे. गेल्या 20 वर्षांपासून माणिक सरकार त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत. भाजपच्या यशामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे सत्ताविरोधी लाट.
* पक्षफुटीचा मोठा फटका काँग्रेसला बसल्याचे पाहायला मिळाले. याठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडे निवडणुकीसाठी मोठा नेताही शिल्लक राहिला नाही. त्यामुळे गेल्यावेळी एक तृतीयांश मते मिळवलेल्या काँग्रेसचा यावेळी धुव्वा उडाला.
* भाजप याठिकाणी तळागाळातील मतदारापर्यंत पोहोचले. डाव्यांचे मतदार असलेले हे मतदार भाजपच्या बाजुने वळले असल्याची शक्यता आहे. कारण गेल्यावेळी भाजपला याठिकाणी फक्त 2 टक्के मते मिळाली होती. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातच भाजपने मोठे यश मिळवले होते.

त्रिपुरा


Tripura Result

Party Won
Bharatiya Janata Party 35
Communist Party of India (Marxist) 16
Indigenousn People's Front Of Tripura 8
Total 59



एकूण जागा 60
बहुमत 31
2013 मध्ये डावे विजयी 
यंदा डावे विरुद्ध भाजप अशी लढत

त्रिपुरा : गेल्या निवडणुकीत कोणाच्या किती जागा?
पक्ष2013 मधील जागा2013 मधील वोट 
सीपीएम4948.1%
काँग्रेस1036.5%
भाजप001.5%
इतर0113.9%



Constituency Const. No. Leading Candidate Leading Party Margin
Simna 1 BRISHAKETU DEBBARMA Indigenousn People's Front Of Tripura 1963
Mohanpur 2 RATAN LAL NATH Bharatiya Janata Party 5176
Bamutia 3 KRISHNADHAN DAS Bharatiya Janata Party 972
Barjala 4 DILIP KUMAR DAS Bharatiya Janata Party 6227
Khayerpur 5 RATAN CHAKRABORTY Bharatiya Janata Party 7039
Agartala 6 SUDIP ROY BARMAN Bharatiya Janata Party 7382
Town Bordowali 8 ASISH KUMAR SAHA Bharatiya Janata Party 11178
Banamalipur 9 BIPLAB KUMAR DEB Bharatiya Janata Party 9549
Majlishpur 10 SUSHANTA CHOWDHURY Bharatiya Janata Party 3890
Mandaibazar 11 DHIRENDRA DEBBARMA Indigenousn People's Front Of Tripura 5864
Takarjala 12 NARENDRA CHANDRA DEBBARMA Indigenousn People's Front Of Tripura 12652
Pratapgarh 13 REBATI MOHAN DAS Bharatiya Janata Party 3148
Badharghat 14 DILIP SARKAR Bharatiya Janata Party 5448
Kamalasagar 15 NARAYAN CHANDRA CHOWDHURI Communist Party of India (Marxist) 1879
Bishalgarh 16 BHANULAL SAHA Communist Party of India (Marxist) 766
Golaghati 17 BIRENDRA KISHORE DEBBARMA Bharatiya Janata Party 3498
Suryamaninagar 18 RAM PRASAD PAUL Bharatiya Janata Party 4567
Boxanagar 20 SAHID CHOUDHURI Communist Party of India (Marxist) 8015
Nalchar 21 SUBHASH CHANDRA DAS Bharatiya Janata Party 451
Ramchandraghat 24 PRASANTA DEBBARMA Indigenousn People's Front Of Tripura 4235
Khowai 25 NIRMAL BISWAS Communist Party of India (Marxist) 2736
Asharambari 26 MEVAR KR JAMATIA Indigenousn People's Front Of Tripura 6987
Kalyanpur-Pramodenagar 27 PINAKI DAS CHOWDHURY Bharatiya Janata Party 3141
Teliamura 28 KALYANI ROY Bharatiya Janata Party 7179
Krishnapur 29 ATUL DEBBARMA Bharatiya Janata Party 1995
Bagma 30 RAM PADA JAMATIA Bharatiya Janata Party 2833
Radhakishorepur 31 PRANAJIT SINGHA ROY Bharatiya Janata Party 4846
Matarbari 32 BIPLAB KUMAR GHOSH Bharatiya Janata Party 1569
Kakraban-Salgarah 33 RATAN KUMAR BHOWMIK Communist Party of India (Marxist) 3767
Rajnagar 34 SUDHAN DAS Communist Party of India (Marxist) 5713
Belonia 35 ARUN CHANDRA BHAUMIK Bharatiya Janata Party 753
Santirbazar 36 PRAMOD REANG Bharatiya Janata Party 2349
Hrishyamukh 37 BADAL CHOUDHURY Communist Party of India (Marxist) 6330
Jolaibari 38 JASHABIR TRIPURA Communist Party of India (Marxist) 1568
Manu 39 PRAVAT CHOWDHURY Communist Party of India (Marxist) 193
Sabroom 40 SANKAR ROY Bharatiya Janata Party 2182
Ampinagar 41 SINDHU CHANDRA JAMATIA Indigenousn People's Front Of Tripura 4947
Karbook 43 BURBA MOHAN TRIPURA Bharatiya Janata Party 797
Raima Valley 44 DHANANJOY TRIPURA Indigenousn People's Front Of Tripura 1922
Kamalpur 45 MANOJ KANTI DEB Bharatiya Janata Party 2959
Surma 46 ASHIS DAS Bharatiya Janata Party 2710
Ambassa 47 PARIMAL DEBBARMA Bharatiya Janata Party 3585
Karmachara 48 DIBA CHANDRA HRANGKHAWL Bharatiya Janata Party 7336
Chawamanu 49 SAMBHU LAL CHAKMA Bharatiya Janata Party 3755
Pabiachhara 50 BHAGABAN DAS Bharatiya Janata Party 5827
Fatikroy 51 SUDHANGSHU DAS Bharatiya Janata Party 2829
Chandipur 52 TAPAN CHAKRABORTI Communist Party of India (Marxist) 402
Kailashahar 53 MOBOSHAR ALI Communist Party of India (Marxist) 4834
Kadamtala-Kurti 54 ISLAM UDDIN Communist Party of India (Marxist) 6882
Bagbassa 55 BIJITA NATH Communist Party of India (Marxist) 270
Dharmanagar 56 BISWABANDHU SEN Bharatiya Janata Party 7287
Panisagar 58 BINAY BHUSHAN DAS Bharatiya Janata Party 561
Pencharthal 59 SANTANA CHAKMA Bharatiya Janata Party 1373
Kanchanpur 60 PREM KUMAR REANG Indigenousn People's Front Of Tripura 4131



मेघालय

Meghalaya Result

Party Won
Bharatiya Janata Party 2
Indian National Congress 21
Nationalist Congress Party 1
Hill State People’s Democratic Party 2
National People's Party 19
United Democratic Party 6
Khun Hynniewtrep National Awakening Movement 1
People's Democratic Front 4
Independent 3
Total 59



एकूण जागा 59 
बहुमत 31 
2013 मध्ये काँग्रेस विजयी 
यंदा काँग्रेस विरुद्ध एनपीपी आणि भाजप अशी लढत

मेघालय : गेल्या निवडणुकीत कोणाच्या किती जागा?
पक्ष2013 मधील जागा2013 मधील वोट 
काँग्रेस2934.8%
एनपीपी028.8%
भाजप001.3%
इतर2955.11%

 मेघालय: भाजपचे बीफ व चर्चच्या मुद्द्यावरून नुकसान
* काँग्रेसने रणनीतिकार अहमद पटेल, मुकुल वासनिक यांना मेघालयास पाठवले होते. छोट्या पक्षांची मोट बांधण्याची त्यांची योजना होती.
* मेघालयात भाजप २०१३ मध्ये १३ मतदारसंघातून लढले होते. सर्वच्या सर्व जागी भाजपची अनामत रक्कम जप्त झाली होती. राज्यात भाजपला यंदा २० वर्षांनंतर २ जागी विजय मिळाला.
* राज्यात सुमारे ७५ टक्के ख्रिश्चन मतदार आहेत. त्यामुळे काँग्रेसने भाजपला बीफ व चर्चच्या मुद्द्यावर सातत्याने घेरले. त्यामुळे भाजपचे नुकसान झाले.

मेघालय: काँग्रेसचा सरकार स्थापनेचा दावा

 गोवा आणि मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मेघालय विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने सरकार स्थापनेसाठी दावा केला आहे. शनिवारी रात्री उशिरा काँग्रेसचे मेघालय प्रदेशाध्यक्ष विन्सेंट पाला आणि महासचिव सी. पी. जोशी यांनी राज्यपाल गंगा प्रसाद यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठीचं पत्र दिलं आहे. 'राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे संविधानिक नियमानुसार काँग्रेसला लवकरात लवकर सरकार बनविण्यासाठी निमंत्रण द्यायला हवे. निश्चित तारखेला विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करू,' असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. एकीकडे पाला आणि जोशी यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेसाठी दावा केला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कमलनाथ आणि मुकुल वासनिक यांनी इतर पक्ष आणि अपक्षांशी चर्चा करून पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यपालांना पत्र देऊन काँग्रेसला सरकार बनविण्यासाठी पत्र देण्याची मागणी केल्याचं कमलनाथ यांनीही स्पष्ट केलं. तसेच सरकार बनविण्यासाठी पुरेसं संख्याबळ मिळविण्यासाठी इतर पक्षांशी संपर्क साधल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ६० सदस्य संख्या असलेल्या मेघालय विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २१ जागा मिळाल्या आहेत. बहुमतांसाठी ३१ जागांची आवश्यकता असल्याने दहा आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी काँग्रेसने जोर बैठका सुरू केल्या आहेत. तर नॅशनल पीपल्स पार्टीला १९ जागा मिळाल्या असून भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. मेघालयमध्ये भाजपला 2 जागांवर विजय मिळाला असला तरीदेखील भाजपकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.मेघालयमध्ये विधानसभेच्या 60 जागांपैकी काँग्रेसने 21 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, या राज्यात भाजपला फक्त 2 जागांवर विजय मिळाला आहे. तरीदेखील येथे भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. एनपीपी, यूडीपी आणि इतर पक्षांच्या पाठिंब्यावर बहुमताचा आकडा पार केला जाण्याची शक्यता आहे. हा आकडा 34 वर जाण्याची शक्यता आहे. या राज्यात सरकार स्थापनेसाठी 31 आमदारांची गरज आहे. दरम्यान, नवनिर्वाचित आमदार ए. एल. हेक यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.सरकार स्थापन करण्यासाठी 30 आमदार पाहिजे. राज्यातील एनपीपी (19), भाजप (2), यूनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (6), पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (4), हिल्स स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (2), अपक्ष (1) असे सर्व मिळून 34 आमदार होतात.भाजपने पूर्वोत्तरमध्ये नॉर्थइस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स (NEDA) तयार केला आहे. यामध्ये आसाम गण परिषण, नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी), नागा पीपल्स फ्रंट, बोडो लँड पीपल्स फ्रंट, सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट, मिझो नॅशनल फ्रंट, मणिपुर पीपल्स पार्टी, इंडिजिनियस नॅशनलिस्ट पार्टी ऑफ त्रिपुरा, मणिपुर डेमोक्रॅटिक पीपल्स फ्रंट आमि गणशक्ती पार्टी यांचा यात समावेश आहे.

Constituency Const. No. Leading Candidate Leading Party Margin
Nartiang 1 SNIAWBHALANG DHAR National People's Party 2098
Jowai 2 WAILADMIKI SHYLLA National People's Party 1303
Raliang 3 COMINGONE YMBON National People's Party 3250
Mowkaiaw 4 NUJORKI SUNGOH United Democratic Party 260
Sutnga Saipung 5 SHITLANG PALE Indian National Congress 1584
Khliehriat 6 KYRMEN SHYLLA United Democratic Party 8181
Amlarem 7 LAHKMEN RYMBUI United Democratic Party 2631
Mawhati 8 DASAKHIATBHA LAMARE National People's Party 204
Nongpoh 9 MAYRALBORN SYIEM Indian National Congress 3324
Jirang 10 SOSTHENES SOHTUN National People's Party 220
Umsning 11 JASON SAWKMIE MAWLONG People's Democratic Front 70
Umroi 12 GEORGE BANKYNTIEWLANG LYNGDOH Indian National Congress 1018
Mawryngkneng 13 DAVID A NONGRUM Indian National Congress 3763
Pynthorumkhrah 14 ALEXANDER LALOO HEK Bharatiya Janata Party 1418
Mawlai 15 PROCESS T. SAWKMIE Indian National Congress 1574
East Shillong 16 MAZEL AMPAREEN LYNGDOH Indian National Congress 6074
North Shillong 17 ADELBERT NONGRUM Khun Hynniewtrep National Awakening Movement 406
West Shillong 18 MOHENDRO RAPSANG Indian National Congress 1984
South Shillong 19 SANBOR SHULLAI Bharatiya Janata Party 5097
Mylliem 20 HAMLETSON DOHLING People's Democratic Front 465
Nongthymmai 21 CHARLES PYNGROPE Indian National Congress 957
Nongkrem 22 LAMBOR MALNGIANG Independent 76
Sohiong 23 SAMLIN MALNGIANG Hill State People’s Democratic Party 622
Mawphlang 24 SYNTAR KLAS SUNN Independent 718
Mawsynram 25 HIMALAYA MUKTAN SHANGPLIANG Indian National Congress 794
Shella 26 DONKUPAR ROY United Democratic Party 370
Pynursla 27 PRESTONE TYNSONG National People's Party 2574
Sohra 28 GAVIN MIGUEL MYLLIEM People's Democratic Front 2024
Mawkynrew 29 BANTEIDOR LYNGDOH People's Democratic Front 509
Mairang 30 METBAH LYNGDOH United Democratic Party 2914
Mawthadraishan 31 BROLDING NONGSIEJ United Democratic Party 1829
Nongstoin 32 MACMILLAN BYRSAT National People's Party 60
Rambrai Jyrngam 33 KIMFA SIDNEY MARBANIANG Indian National Congress 3803
Mawshynrut 34 GIGUR MYRTHONG National People's Party 3424
Ranikor 35 MARTIN M. DANGGO Indian National Congress 2002
Mawkyrwat 36 RENIKTON LYNGDOH TONGKHAR Hill State People’s Democratic Party 458
Kharkutta 37 RUPERT MOMIN National People's Party 809
Mendipathar 38 MARTHON SANGMA Indian National Congress 2677
Resubelpara 39 TIMOTHY SHIRA National People's Party 1763
Bajengdoba 40 PONGSENG MARAK National People's Party 1964
Songsak 41 DR. MUKUL SANGMA Indian National Congress 1830
Rongjeng 42 JIM M SANGMA National People's Party 550
Raksamgre 44 BENEDIC R. MARAK National People's Party 624
Tikrikilla 45 JIMMY D. SANGMA Indian National Congress 1407
Phulbari 46 S. G. ESMATUR MOMININ National People's Party 1134
Rajabala 47 DR. AZAD ZAMAN Indian National Congress 938
Selsella 48 CLEMENT MARAK Indian National Congress 3597
Dadenggre 49 JAMES PANGSANG KONGKAL SANGMA National People's Party 2785
North Tura 50 THOMAS A. SANGMA National People's Party 2096
South Tura 51 AGATHA K. SANGMA National People's Party 1603
Rangsakona 52 ZENITH M. SANGMA Indian National Congress 1962
Ampati 53 DR. MUKUL SANGMA Indian National Congress 8104
Mahendraganj 54 DIKKANCHI D. SHIRA Indian National Congress 7861
Salmanpara 55 WINNERSON D. SANGMA Indian National Congress 1915
Gambegre 56 SALENG A. SANGMA Nationalist Congress Party 136
Dalu 57 BRENING A. SANGMA National People's Party 784
Rongara Siju 58 RAKKAM A. SANGMA National People's Party 1108
Chokpot 59 LAZARUS SANGMA Indian National Congress 2051
Baghmara 60 SAMUEL M. SANGMA Independent 2242


नागालँड


Nagaland Result

Party Won
Bharatiya Janata Party 12
Naga Peoples Front 27
Janata Dal (United) 1
National People's Party 2
Nationalist Democratic Progressive Party 16
Independent 1
Total 59



एकूण जागा 60 
बहुमताचा आकडा 31 
एनपीएफ विरुद्ध भाजप+एनडीपीपी

नागालँड : गेल्या निवडणुकीत कोणाच्या किती जागा?
पक्ष2013 मधील जागा2013 मधील वोट 
एनपीएफ3847.2%
काँग्रेस0825%
भाजप011.8%
इतर1326%

नागालँड: काँग्रेसच्या मतांच्या तुलनेत २२ टक्क्यांनी घट
* भाजपने २० जागांवर निवडणूक लढवली. ११ वर विजय मिळवला. सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.
* राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले एनडीपीपीचे प्रमुख नेफ्यू रियो उत्तर अंगामी-२ मधून बिनविरोध निवडून आले. ते भावी मुख्यमंत्री असतील.
* नागालँडमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. काँग्रेसने १८ जागी निवडणूक लढवली.
* काँग्रेसला राज्यात केवळ २.१ टक्के मत पडली. गेल्यावेळी ८ जागी व २४.८९ टक्के मते मिळाली.  - काँग्रेसचे स्थानिक नेते पराभवासाठी राज्याचे प्रभारी सी.पी. जोशी यांना जबाबदार ठरवू लागले आहेत.

नागालँडमध्ये भाजपला एनपीएफचा पाठिंबा

त्रिशंकू अवस्थेत असलेल्या नागालँड विधानसभेत भाजप आघाडीचं सरकार बनण्याची शक्यता आहे. नागालँडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी एनपीएफने पाठिंबा दिल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे त्रिपुरापाठोपाठ नागालँडमध्येही भाजपचे सरकार स्थापन होण्याची शक्यता बळावली आहे. त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शनिवारी संध्याकाळी भाजपच्या संसदीय दलाची बैठक झाली. त्यात मेघालय आणि नागालँडमध्येही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार भाजपने या दोन्ही राज्यातील इतर पक्ष आणि अपक्षांशी बोलणी सुरू केली आहे. त्यातच एनपीएफने पाठिंबा दिल्याचा दावाही भाजपने केला आहे. दरम्यान, त्रिपुरात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि ज्वेल ओराम यांना निरीक्षक म्हणून पाठविले आहे. तर जे.पी. नड्डा आणि अरुण सिंह यांना नागालँडमध्ये निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले आहे. त्याशिवाय किरेन रिजीजू आणि के. जे. अल्फान्सो यांना मेघालयात निरीक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे. नागालँडमध्ये एनपीएफला २७ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपने ११ जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री टी. आर. झेलियांग यांच्या नेतृत्वाखालील एनपीएफने भाजपसोबत आघाडी करण्याचा यापूर्वीच प्रस्ताव पक्षाच्या बैठकीत मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे नागालँडमध्ये भाजपचं सरकार बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

================================================

पूर्वाचलच्या भाजप विजयात संघाच्या मराठी प्रचारकांचा निर्णायक वाटा

पूर्वाचल भागात त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्रिपुरामध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले आहे. नागालँड आणि मेघालयमध्ये भाजपने यश मिळाले आहे. या घवघवीत यशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्रातील प्रचारकांची भूमिका निर्णायक ठरली आहे. प्रथम केंद्रात आणि त्यानंतर राज्यात झालेल्या सत्तापालटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोलाचा वाटा होता. त्रिपुरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून डाव्या आघाडीचे साम्राज्य असताना भाजप त्या ठिकाणी नावाला नव्हती. मात्र, ६० जागांसाठी झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजप ४३ जागा मिळून पूर्ण बहुमत मिळाले आणि या यशामध्ये संघाचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रचारक राहिलेले आणि गेल्या काही वर्षांत भाजपचे संघटनमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणारे सुनील देवधर हे आहेत. शिलाँगमध्ये संघाचे प्रचारक म्हणून काम करताना त्यांनी ‘माय होम इन इंडिया’ संघटना स्थापन केली आणि पूर्वाचलमध्ये संघाच्या माध्यमातून आदिवासी आणि वनवासी क्षेत्रात मोठे काम उभे केले. त्यावेळी त्यांच्यासोबत नागपूरचे प्रसाद बर्वे, रमेश शिलेदार, नंदकुमार जोशी, सुनील किटकरू हे मराठी चेहरे होते. नुकत्याच झालेल्या हिमाचल आणि गुजरातच्या निवडणुकीत भाजपला अतिशय काठावर यश मिळाले असताना त्यात संघाच्या सक्रियतेची चर्चा झाली नाही. मात्र, त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या पूर्वाचलच्या निवडणुकीत भाजपला मिळालेले यश सर्वाचे लक्ष वेधणारे ठरल्याने त्यामागील कारणांचा शोध घेताना या भागात अनेक वर्षांपासून संघाच्या माध्यमातून सुरू असलेली कामे ठळकपणे पुढे आली.आसाम निवडणुकीतील भाजप विजयाचे श्रेय संघ व तेथे काम करणारे महाराष्ट्रातील बहुसंख्येने असलेले प्रचारक यांच्याकडे जाते. त्रिपुरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून विविध सामाजिक क्षेत्रात कामे सुरू आहेत. त्याची सूत्रे नागपुरातील प्रचारकांकडे आहे. संघाचे अखिल भारतीय पदाधिकारी सुनील कुळकर्णी पूर्वाचलमध्ये प्रचारक म्हणून काम करीत आहे.भाजपचे काम सांभाळणारे नागपूरकर रमेश शिलेदार पूर्वी संघाचे प्रचारकच होते. प्रचारक म्हणूनच त्यांनी तेथे कामाला सुरुवात केली. नंदू जोशी, सुरेंद्र कालखेडकर, शशी चौथाईवाले, प्रसाद बर्वे, सुनील किटकरू, अशोक वर्णेकर, विनय तारे, विराग पाचपोर, राम सहस्त्रभोजनी या सर्व नागपूरकर संघ प्रचारकांनी अनेक वर्षे पूर्वाचलमध्ये कामे केली आहे. या राज्यात खेडोपाडी जाऊन भाजपचा पाया मजबूत केला होता. सध्या अकोल्याचे संदीप कविश्वर, दीपक बोरडे हे वनवासी कल्याण आश्रमचे काम पहात आहे. सुरेंद्र नारखेडकर, उल्हास कुळकर्णी हे सुद्धा पूर्वाचलमध्ये संघाचे काम करीत आहे. याशिवाय विवेकानंद केंद्राचे काम पाहणारे विश्वास लपालीकर, पार्वतीपूर (अरुणाचल) मध्ये कार्यरत असणारे व आसामच्या जनतेशी दांडगा संपर्क असणारे अशोक वर्णेकर, राजेश देशकर ही आणखी काही नावे आहेत. पूर्वाचलमध्ये अनेक राज्यात राष्ट्र सेविका समितीने मोठय़ा प्रमाणात काम उभे केले आहे. त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये समितीचे काम सुरू आहे. समितीच्या सुनीता हळदेकर या गेल्या अनेक वर्षांपासून याच भागात काम करीत आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.