Wednesday, 7 March 2018

विविध जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 6 एप्रिलला मतदान

विविध जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 6 एप्रिलला मतदान


धुळे, वर्धा व उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध बारा पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता 6 एप्रिलला मतदान; तर 7 एप्रिल 2018 रोजी मतमोजणी होणार आहे.या सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 17 ते 22 मार्च 2018 या कालावधीत स्वीकारली जातील. 18 मार्च 2018 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.
       जिल्हा परिषद- पोटनिवडणूक होणारे निवडणूक विभाग: 22-चिमठाणे (ता. शिंदखेडा, जि. धुळे), 19-हमदापूर (ता. सेलू, जि. वर्धा) आणि 30-आनाळा (ता. परंडा, जि. उस्मानाबाद).
       पंचायत समिती- पोटनिवडणूक होणारे निर्वाचक गण: 61- पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग), 87-नगाव (ता. जि. धुळे), 71-साक्री (ता. साक्री, जि. धुळे), 77-तुर्काबाद (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), 60-संवदगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद), 66-सगरोळी(ता. बिलोली, जि. नांदेड), 83-मारतळा (ता. लोहा, जि. नांदेड), 77-काटी (ता, तुळजापूर, जि. उस्मानाबाद), 78-सौंदड (ता. सडक-अर्जुनी, जि. गोंदिया), 92-आजंती (ता. हिंगणघाट, जि. वर्धा), 64-घुग्घुस-2 (ता. जि. चंद्रपूर) आणि 22-मानापूर (ता. आरमोरी, जि. गडचिरोली).





निवडणूक कार्यक्रमाचा तपशील


·      नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 17 ते 22 मार्च 2018


·        नामनिर्देशनपत्रांची छाननी- 23 मार्च 2018


·   अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 28 मार्च 2018


· अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 02 एप्रिल 2018


·    मतदानाचा दिनांक- 06 एप्रिल 2018



·        मतमोजणीचा दिनांक- 07 एप्रिल 2018





POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.