Thursday, 14 December 2017

राज्यातील 7 नगर परिषदा व नगरपंचायतींपैकी फुलंब्रीसह 5 पालिका भाजपकडे; काँग्रेसला एक; पांढरकवडा प्रहार संघटनेकडे एक

नगर परिषदांत भाजपची लाट; 10 पैकी 7 नगर परिषद व नगरपंचायतींत भाजपचे नगराध्यक्ष


राज्यात दहापैकी सात नगर परिषद व नगरपंचायतींत भाजपला यश मिळाले असून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला दणका बसला आहे. दहा नगर परिषदांचे निकाल जाहीर झाले. यात हुपरी, नंदूरबार, नवापूर, किनवट, शिंदखेडा, फुलंब्री व सालकेसा या नगर परिषदात भाजने घवघवीत यश मिळवले आहे.  पांढरकवडा या नगर परिषदेत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला यश मिळाले असून, भाजप व काँग्रेसला जनतेने नाकारले. नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये राष्ट्रवादीला धक्‍का देत भाजपचे कमळ फुलले आहे. तर कोल्हापूरमधील हुपरी नगर परिषदेतही भाजपला यश मिळाल्याने, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रातही भाजपची लाट कायम असल्याचे मानले जाते. आतापर्यंत काँग्रेसचा गड असलेल्या नंदूरबार, नवापूर या आदिवासी भागांत लोकसभेपासून सुरू झालेली भाजपची लाट कायम राहिली आहे. या दोन्ही नगर परिषदांमध्ये भाजपचे नगराध्यक्षासह पॅनेलदेखील विजयी झाले आहे.

* किनवट ( नांदेड )- नगराध्यक्षपद निवडणुकीत भाजपचे आनंद मच्छेवार (६३५८ मते) विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार शेख चाँदसाब (४५४७ मते) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या ताब्यातून ही पालिका भाजपने खेचून अाणली. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रवीण राठाेड (२७४८ मते) व बंडखाेर हबीबोद्दीन चव्हाण (२९८१ मते) यांच्यातील मतविभाजनाचा भाजपला फायदा झाला. शिवसेनेचे सुनील पाटील यांना केवळ १३०२ मते पडली. एकूण १७ जागांपैकी भाजपला ९, राष्ट्रवादीला पाच, तर काँग्रेसला दाेन जागा मिळाल्या. एका जागी अपक्षाला यश मिळाले. किनवट नगरपालिकेत गेल्यावेळी एकही जागा नसलेल्या भाजपने यंदा मात्र थेट सत्ता हस्तगत केली आहे.

* शिंदखेडा (जि. धुळे) - नगराध्यक्षपदी भाजपच्या रजनी वानखेडे ३३३३ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या मालती देशमुख यांचा पराभव केला. या नगरपंचायतीत १७ जागांपैकी भाजपला ९, काँग्रेसला ६, तर समाजवादी पार्टीला २ जागा मिळाल्या. शहाद्यातील पाेटनिवडणुकीत एमअायएमचे वसीम सलीम तेली विजयी झाले.

* हुपरी (जि. काेल्हापूर) - नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या जयश्री गाट १६०० मतांनी विजयी झाल्या. तसेच एकूण १८ जागांपैकी भाजपचे ७, ताराराणी विकास आघाडीचे ५, मनसेप्रणीत अंबाबाई विकास आघाडीचे २, शिवसेनेचे २, तर अपक्ष शिवप्रतिष्ठान संघटनेचे २ नगरसेवक निवडून अाले.

* सालेकसा (जि. गाेंदिया) - नगराध्यक्षपदी भाजपचे बंडखाेर वीरेंद्र उईके विजयी झाले. एकूण १७ जागांपैकी भाजपला पाच, काँग्रेसला चार, शिवसेनेला दाेन, तर उइके यांच्या अाघाडीला ६ जागी यश मिळाले. उइके हे भाजपचेच असल्यामुळे ही पालिका अामच्याच ताब्यात अाली असल्याचा दावा भाजपकडून केला जात अाहे.

* चिखलदरा (जि. अमरावती) - नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या विजया राजेंद्र सोमवंशी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या दुर्गा उर्फ पूजा चाैबे यांचा पराभव केला. एकूण १७ पैकी १२ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला, तर भाजपला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले.

* पांढरकवडा (जि.यवतमाळ) - आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार युवा शक्ती संघटनेने भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेला जोरदार धक्का दिला. एकूण १९ पैकी १४ जागांवर ‘प्रहार’चे उमेदवार विजयी झाले. तर भाजपला तीन, काँग्रेस, शिवसेनेला प्रत्येकी एकच जागा मिळाली. नगराध्यक्षपदी ‘प्रहार’च्या वैशाली नहाते १२७० मतांनी विजयी झाल्या.

निकाल-  २०१७ 
किनवट पालिका 
पक्ष======जागा (18)
भाजप======9
राष्ट्रवादी======6
काँग्रेस======2
अन्य======1

शिंदखेडा नगरपंचायत 
पक्ष......................जागा (17)
भाजप....................9
काँग्रेस.....................6
समाजवादी पक्ष...............2

फुलंब्री नगरपंचायत 
पक्ष======एकूण जागा (17)
भाजप======11
आघाडी======.5
एमआयएम======1

हुपरी नगरपालिका. 
पक्ष........................एकूण जागा (18)
नगराध्यक्ष पद - भाजपच्या जयश्री गाट विजयी
भाजप - 7
ताराराणी जिल्हा विकास आघाडी - 5
मनसे प्रणित अंबाबाई विकास आघाडी - 2
शिवसेना - 2
अपक्ष - 2


निवडणूक झालेल्या नगरपरिषदा/ नगरपंचायतींसंदर्भातील तपशील
नगरपरिषद/ नगरपंचायत
प्रभाग
जागा
उमेदवार
एकूण मतदार
मतदान केंद्रे
सदस्यपदासाठी
अध्यक्षपदासाठी
हुपरी
9
18
95
5
21,770
27
नंदुरबार
19
39
111
6
1,00,263
126
नवापूर
10
20
95
6
28,791
38
किनवट
9
18
108
6
23,593
36
चिखलदरा
8
17
42
6
3,906
8
पांढरकवडा
9
19
82
6
23,463
31
वाडा
17
17
79
5
10,918
17
शिंदखेडा
17
17
69
4
20,289
27
फुलंब्री
17
17
45
2
14,124
17
सालेकसा
17
17
59
5
2,715
17
एकूण
132
199
1,222
84
2,49,832
344



नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय सार्वत्रिक निवडणुकीसाठी  झालेल्या मतदानाची टक्केवारी :

हुपरी (जि. कोल्हापूर) 85.18 टक्के

नंदुरबार- 70.93 टक्के

नवापूर (जि. नंदुरबार)- 66.34 टक्के

किनवट (जि. नांदेड)- 77 टक्के

चिखलदरा (जि. अमरावती)- 80.85 टक्के

पांढरकवडा (जि. यवतमाळ)- 68.56 टक्के

वाडा (जि. पालघर)- 72.79 टक्के

शिंदखेडा (जि. धुळे)- 72.59 टक्के

फुलंब्री (जि. औरंगाबाद)- 75.14 टक्के

सालेकसा (जि. गोंदिया)- 89.65 टक्के

सरासरी मतदान- 72.81 टक्के

नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी :


मैंदर्गी (जि. सोलापूर)- 71.83 टक्के

शहादा (जि. नंदुरबार)- 63.50 टक्के

अंबाजोगाई (जि. बीड)- 78.61 टक्के

जिंतूर (जि. परभणी)- 64.42 टक्के

मंगरूळपीर (जि. वाशिम)- 58.62 टक्के

एटापल्ली (जि. गडचिरोली)- 74.37 टक्के


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.