Tuesday, 26 December 2017

जिग्नेश मेवाणींचा 31 डिसेंबरला पुण्यात ; प्रस्थापितांना आव्हान

जिग्नेश मेवाणींचा 31 डिसेंबरला पुण्यात शनिवारवाड्यावर 'एल्गार'


गुजरातचा दलित युवक अशी ओळख असलेले जिग्नेश मेवाणी हे नव्या वर्षात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. 31 डिसेंबरला पुण्यात शनिवारवाड्यावर 'एल्गार परिषद'चे आयोजन करण्यात आले असून या परिषदेस जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद उपस्थित राहणार आहे. आमदार जिग्नेश मेवाणी यांचा हा दौरा राज्यातील प्रस्थापित दलित नेत्यांना आव्हान देणारा ठरणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. देशांतल्या सर्वाधिक राजकीय ताकदीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरात येथे आव्हान देणारा तरूण आमदार झालेला जिग्नेश मेवानी राज्यात येणार असल्याने तरुणांमध्ये उत्सुकता आहे. प्रस्थापित दलित नेते मात्र त्यास फारसे महत्त्व देत नसल्याचे सांगत आहेत. जिग्नेश आला तर त्याचे स्वागत आहे, पण तेढ निर्माण होऊ नये ही खबरदारी घ्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. राज्यात रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, आनंद आंबेडकर, जोगेंद्र कवाडे असे अनेक नेते सध्या दलितांचे नेतृत्त्व करतात. या सर्वांनाच जिग्नेशचे हे  प्रस्थापितांना मोठे नवे आव्हान असणार आहे.


गुजरात : दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले रुपाणी

सोहळ्यात मुख्यमंत्री रूपाणी (61) आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांच्यासह 20 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात एक महिला मंत्री आहेत. रुपाणींशिवाय 19 मंत्र्यांपैकी 9 कॅबिनेट रँकचे आणि 10 राज्यमंत्री रँकचे आहेत. दक्षिण गुजरातमधून 5 आणि कच्छ-सौराष्ट्रमधील 7 मंत्री आहेत. पाच पटेल समाजाचे मंत्री आहेत. आनंदीबेन पटेलांना हटवल्यानंतर 2016 मध्ये रुपाणी सर्वात आदी मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात 25 मंत्री होते. त्यावेळी 9 मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. या शपथविधी सोहळ्यात भाजपच्या मार्गदर्शक मंडळातील लालकृष्ण अडवाणींचीही उपस्थिती होती. तसेच नीतिश कुमारही उपस्थित होते. ते 15 वर्षांनंतर गुजरातमध्ये आले. 2013 मध्ये मोदींबरोबर मतभेद झाल्यानेच नितीशकुमार एनडीएमधून बाहेर पडले होते. पण याचवर्षी ते पुन्हा एनडीएमध्ये आले आहेत. 18 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असे म्हटले जात आहे की, प्रथमच एखाद्या राज्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी 18 राज्यांचील मुख्यमंत्री उपस्थित होते. हे सर्व मुख्यमंत्री भाजप आणि एनडीएची सत्ता असलेल्या राज्यातील होते. सोहळ्यात केशुभाई पटेल आणि शंकरसिंह वाघेलाही उपस्थित होते. पण काँग्रेस आणि शिवसेनेचा एकही मोठा नेता उपस्थित नव्हता.

नव्या मंत्रिमंडळातील जातीय समीकरण 

1) पटेल-पाटीदार समाजाचे 8 मंत्री - रूपाणींच्या नव्या टीममध्ये पटेल-पाटीदार समाजाच्या 8 आमदारांना मंत्री बनवण्यात आले आहे. नितिन पटेल, आरसी फलदू, सौरभ पटेल, कौशिक पटेल, जयेश रादडिया, परबतभाई पटेल, ईश्वर सिंह पटेल आणि किशोर कनाणी हे 8 मंत्री आहेत. गुजरातमध्ये पटेल-पाटीदार मतदारांची संख्या 20% आहे. फलदू लेवा पटेल आणि सौरभ कडवा पटेल समाजाचे आहेत. तर पाटीदार नेते रादडिया जेतपूर आणि दलित नेते ईश्वरभाई परमार बारडोलीतून निवडून आले आहेत. ईश्वर सिंह पटेल अंकलेश्वर आणि कनाणी सूरतच्या वराछामधून विजयी झाले आहेत.
2) ओबीसीतील 5 मंत्री - ओबीसी समाजातून विजयी झालेल्या पाच आमदारांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. दिलीप ठाकोर, बचुभाई खाबड, जयद्रथसिंह परमार, वासनभाई अहीर आणि पुरुषोत्तमभाई सोलंकी अशी नावे आहेत.
3) राजपूत समाजाचे 2 मंत्री - भूपेंद्र सिंह चुडास्मा आणि प्रदीप जाडेजा राजपूत समाजातील नेते आहेत. त्यांना मंत्री बनवले आहे.
4) दलित-आदिवासी समाजाचे 3 मंत्री - आदिवासी समाजातील असलेले गणपत भाई वासवा आणि रमणलाल पाटकर यांवा रूपाणींच्या टीममध्ये स्थान मिळाले आहे. तर दलित समाजातून मंत्री बनणारे एकमेव नेते आहेत, ईश्वरभाई परमार.
5) सवर्ण समाजातील एकमेव महिला मंत्री - विभावरी दवे यांनाही रुपाणींच्या टीममध्ये स्थान मिळाले आहे. रूपाणी स्वतः जैन समाजाचे आहेत. रूपाणींच्या टीममध्ये त्यांच्याशिवाय अल्पसंख्याक समाजातील इतर कोणीही मंत्री नाही.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.