भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात फेब्रुवारीत पोट निवडणूक
भंडारा-गोंदियासह ८ जागांसाठी पोट निवडणूक
भंडारा-गोंदियासह गोरखपूर, फुलपूर (उत्तर प्रदेश), अजमेर व अलवर (राजस्थान), अनंतनाग (काश्मीर), अरारिया (बिहार) व उलुबेरिया (प. बंगाल) या जागांवर होणार फेब्रुवारी २०१८ मध्ये पोट निवडणूक होणार आहे. 2014 नंतर लोकसभेसाठी होणारी ही पहिलीच पोटनिवडणूक असेल. नियमांनुसार कोणतीही जागा रिक्त झाल्यावर सहा महिन्यांच्या आत तेथे पोटनिवडणुका घ्याव्याच लागतात. काश्मीरमधील दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर अनंतनागची निवडणूक टाळली तरी आठपैकी सात जागांवर फेब्रुवारी 2018 पर्यंत आयोगास निवडणुका घ्याव्याच लागतील. साहजिकच नोटाबंदी व जीएसटीनंतर मोदी सरकारला जनतेचा कौल किवा 2019ची छोटी उपांत्य फेरी या दृष्टीनेही या निवडणुकांकडे पाहिले जात आहे. भाजपमधून बाहेर पडून मूळ काँग्रेस पक्षाकडे वळलेले नाना पटोले यांच्या भंडारा-गोंदिया जागेचाही यात समावेश आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ व के. पी. मौर्य यांना भाजप नेतृत्वाने राज्यात पाठविल्याने गोरखपूर व फुलपूर या जागा रिक्त झाल्या आहेत. यातील गोरखपूरची जागा भाजप परत मिळवेल. मात्र फुलपूरमध्ये बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींचे कडवे आव्हान भाजपला पेलावे लागेल. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांत फुलपूरमध्ये भाजपचा जबरदस्त पराभव झाला होता. अजमेरमधून काँग्रेसतर्फे सचिन पायलट उभे राहण्याची चिन्हे असल्याने त्यांच्यासमोर दिवंगत मंत्री सावरलाल जाट यांचे पुत्र रामस्वरूप लांबा यांचा तरुण चेहरा भाजप पुढे करू शकते, तर वसुंधराराजे यांचे निकटवर्तीय व राजस्थानातील मंत्री डॉ. जसवंत यादव यांना अलवरमधून संधी मिळू शकते.5 पैकी 3 ठिकाणी भाजपला विजय
अरुणाचल प्रदेशच्या पक्के-केसांग जागेवर भाजपचे बीआर वानखेडे यांनी काँग्रेस उमेदवार आणि उपमुख्यमंत्री राहिलेले कमेंग दोलो यांचा पराभव केला. तर लिकाबली जागेवर भाजपचे उमेदवार करदो नीग्योर यांनी पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलच्या गुमके रिबा यांचा पराभव केला. त्याशिवाय उत्तर प्रदेशच्या सिकंदरा मतदारसंघावरही भाजपने ताबा मिळवला. येथे भाजपचे अजित पाल सिंह यांनी समाजवादी पक्षाच्या सीमा सचान यांना 7 हजारहून अधिक मतांनी पराभूत केले.तमिळनाडूच्या के आरके नगर पोटनिवडणउकीत अपक्ष उमेदवार टीटीव्वी दिनाकरण यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. पश्चिम बंगालच्या सबंग विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या गीता राणी भुनिया यांनी माकपच्या रीता मोंडल यांचा पराभव केला.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पुन्हा नाना पाटोले?
मतदारसंघातील भाजपचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला मात्र कोणत्याही पक्षात प्रवेश अद्याप केला नाही. गेल्या लोकसभा निवडणूकीत कोंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी मुळे राष्ट्रवादीला जागा देण्यात आली होती. राष्ट्रवादीचे प्रफ्फुल पटेल यांनी निवडणूक लढवली होती. आघाडी केली तर या जागेवर राष्ट्रवादीचा दावा असेल यामुळेच नाना पटोले यांनी कॉंग्रेसमधील प्रवेश करणे तूर्तास टाळले असावे. गेल्या लोकसभा निवडणूकीत २६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पोट निवडणुकीसाठी देखील इच्छुक उमेदवाराबाबत खलबते सुरु झाली आहेत. शेतक-यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारसह राज्यातील फडणवीस सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसत पक्षविरोधी भूमिका घेणारे भंडारा- गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. विदर्भातील ओबीसींचे नेते अशी ओळख असलेले पटोले २००८ पर्यंत काँग्रेसमध्ये होते. तिथेही त्यांचे पक्षनेत्यांशी मतभेद होते. विलासराव देशमुख यांच्याशी मतभेद झाल्यानंतर पटोले भाजपत गेले. विदर्भात ओबीसी चेहरा हवा असल्याने भाजपनेही त्यांना तात्काळ प्रवेश दिला. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी भाजपला एकहाती विजय मिळवून दिला. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले. मात्र केंद्रात मंत्रिपदही न मिळाल्याने पटोले यांच्या पदरी निराशा पडली. यात भर म्हणजे दोन वर्षांपूर्वीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव झाला व पक्षात पटोलेंचे वजन कमी होत गेले. ही खदखद त्यांच्या मनात होती आणि यामुळेच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेस प्रवेशानंतरही पटोलेंपुढे अनेक आव्हाने
खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसवासी झालेले नाना पटोले यांच्यासमोर जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांचे आव्हाने उभे राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस-भाजप आणि पुन्हा काँग्रेस असा प्रवास करणारे पटोले यांचे पक्षश्रेष्ठींनी स्वागत केले असले तरी स्थानिक नेत्यांना ते फारसे पचनी पडले नाही. पेटोल यांनी थेट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी संपर्कात राहून पक्षात प्रवेश केला. परंतु भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ातील काँग्रेसचे प्रस्थापित नेते त्यांना कितीपत साथ देतात. यावर त्यांची पुढची वाटचाल सुकर होणार आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांचा थेट संबंध तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी होता. परंतु भंडारा जिल्ह्य़ातील साकोली विधानसभा मतदार संघातील उमेदवारीवरून मतभेद झाले होते. जिल्ह्य़ात शाळा-महाविद्यालयाच्या माध्यमातून तगडे ‘नेटवर्क’ असलेले काँग्रेस नेते व माजी आमदार सेवक वाघाये यांना साकोलीची उमेदवारी निश्चित होणार हे स्पष्ट झाल्यानंतर पटोले यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला होता. जिल्हा राजकारणात वाघाये हे पटोले यांना ‘सिनिअर’ आहेत. ते दोनदा पराभूत झाले आहेत. परंतु त्यांनी काँग्रेस सोडली नाही. पटोले यांचा प्रवास काँग्रेस, भाजप आणि पुन्हा काँग्रेस असा आहे. तेव्हा पक्ष त्यांना जिल्ह्य़ात किती पाठबळ देईल यावरच त्यांचे स्थानिक राजकारणाचे भवितव्य ठरणार आहे.माजी आमदार सेवक वाघाये यांची साकोली मतदार संघावर दावेदारी आहे तर पटोले यांचाही कल विधानसभा निवडणूक लढण्याकडे आहे. जातीच्या समीकरणाचा विचार केल्यास हे दोघेही एकाच समाजाचे (ओबीसी)आहेत. या दोन्ही नेत्यांचा मतदारसंघ एकच असल्याने पेटोले यांना स्वपक्षीय नेत्यांची जिल्ह्य़ातील आव्हाने पेलावी लागणार आहे. पटोले आणि वाघाये यांच्यात जिल्ह्य़ातील वर्चस्वावरून याआधीही संघर्ष झाला आहे. जिल्ह्य़ात आणखी एक प्रस्थापित नेते आहेत. माजी मंत्री बंडू सावरबांधे. त्यांचीही जिल्ह्य़ावर चांगली पकड आहे. त्यांचा मतदार संघ आरक्षित झाला आहे.भंडारा जिल्ह्य़ांचा विचार करता पक्ष प्रस्थापित नेत्यांना प्राधान्य देतात की, नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांना महत्व देतात. यावर सारेकाही अवलंबून आहे. हे दोन्ही नेते जिल्हा परिषदेच्या जागावाटपासून तर पक्षीय राजकारणात वजन ठेवून आहेत. भंडारा-गोदिंया लोकसभा मतदार संघाचा विचार करता वरिष्ठ आमदार गोपालदास अग्रवाल हे पक्षाचे दुसरे नेते आहेत. त्यांना जिल्ह्य़ातील राजकारणात कुणाचा हस्तक्षेप नको आहे.विदर्भात मुकुल वासनिक, विलास मुत्तेमवार, विजय वडेट्टीवार, नरेश पुगलिया आदी नेते पेटोले यांना पटोलेंच्या पक्ष प्रवेशाने आनंद झाल्याचे दिसत नाहीत. पक्षात वरचे स्थान मिळाले नसल्यास पटोले यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला मर्यादा येतील. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची दिसत आहे. अशावेळी जागा वाटपात पटोले यांना पक्षाने महत्व न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ होण्याची शक्यता आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ातील काँग्रेसचे प्रस्थापित नेते पटोले यांना सहकार्य करण्याची शक्यता कमी आहे. शिवाय प्रफुल पटेल सारखे स्थान पटोले यांना काँग्रेस देण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे स्थानिक राजकारणात पटोले यांच्यासमोर भविष्यात अडचणींचा डोंगर उभा राहणार आहे.दरम्यान पटोले यांच्यासाठी साकोलीची जागा मोकळी करण्यासाठी सेवक वाघाये यांना लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्यास सांगण्यात येत आहेत. परंतु वाघाये यासाठी फारसे इच्छुक नाहीत. त्यांना आपला मतदार संघ सोडायचे नाही. मात्र पक्षश्रेष्ठीकडून आदेश आल्यास ते निवडणूक लढतील. पण पटोले यांना मतदारसंघात संघर्षांची स्थिती कायम राहणार आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.