लोकशाहीतील महत्त्वाची जडणघडण
१९३५ भारत सरकार कायदा संमत१९३७ प्रांतिक स्वायत्तता, कॉंग्रेसचे मंत्रिमंडळ
१९४६ ब्रिटिश कॅबिनेट मिशनची भारताला भेट, केंद्रात हंगामी सरकार स्थापन
१९४७ भारताची फाळणी, भारत आणि पाकिस्तान अशा दोन देशांची निर्मिती
१९४ आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले परंतु लोकशाही प्रक्रिया त्या पुर्वीच सुरु
१९४९ काश्मीरमध्ये युद्धबंदी, भारतीय संविधानावर स्वाक्षरी आणि स्वीकृत (नोव्हे, २६)
१९५० भारत सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनले (जाने २६), भारतीय संविधान अंमलात
१९५२ लोकसभेच्या पहिल्या निवडणुका
१९५३ च्या अखेरीस आंध्र प्रदेशच्या निर्मितीस मान्यता
१९५६ मध्ये राज्यपुनर्रचना करण्यात आली. हैदराबाद संस्थानचे आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटक या तीन भाषिक राज्यांत विभाजन झाले. राज्यांची वर्गवारी (अ, ब आणि क) रद्द करण्यात आली.मुंबई राज्याचे विशाल द्वैभाषिक रूपांतर करण्यात आले.
१९५७ दुस-या निवडणुका, दशमान चलनी पद्धतीची सुरुवात, गोवा स्वतंत्र
१९६० संयुक्त महाराष्ट्र व महागुजरात या आंदोलनामुळे भारत सरकारने १९६० मध्ये महाराष्ट्र व गुजरात ही भाषिक राज्ये निर्माण केली.
१९६० 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली
१९६२ तिस-या निवडणुका, चीनचा भारतावर हल्ला (डिसे. २०)
१८६२ साली करण्यात आलेल्या चौदाव्या घटनादुरूस्तीन्वये लोकसभेची सदस्यसंख्या ५२५ करण्यात आली
१९६३ नागालँड भारताचे १६ वे राज्य बनले.
१९६६ साली पंजाबची फाळणी करण्यात येऊन पंजाबी भाषिकांची पंजाब व हिंदी भाषिकांची हरयाणा अशी दोन राज्ये करण्यात आली.
१९६७ चौथ्या निवडणुका, डॉ. झाकिर हुसैन यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड
१९७० मेघालयाला स्वायत्त राज्याचा दर्जा
१९७१ हिमाचल प्रदेश नवे राज्य, भारत-पाक युद्ध, बांगलादेशचा जन्म
१९७३ सालच्या ३१ व्या घटनादुरुस्तीने संसदसदस्यत्त्व ५४५ पर्यंत वाढवले
१९७५ भारताद्वारा ’आर्यभट्ट’ उपग्रह प्रक्षेपित, सिक्किम भारताचे २२ वे राज्य, भारतात आणीबाणी घोषित
१९७७ सहाव्या निवडणुका, जनता पक्षाला लोकसभेत बहुमत, निलम संजीव रेड्डी भारताचे सहावे राष्ट्रपती
१९७९ मोरारजी देसाई यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, चरण सिंग नवे पंतप्रधान, चरणसिंगांचा राजीनामा (२० ऑगस्ट), सहावी लोकसभा बरखास्त
१९८० सातव्या लोकसभा निवडणुका, कॉंग्रेस आय सत्तेत, इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, संजय गांधीचा विमान अपघातात मृत्यू, भारताने रोहिणी उपग्रह असणारे एसएलव्ही-३ ए यान अवकाशात सोडले.
१९८९ अयोध्येमध्ये राम शिलान्यास पूजा, भारताचे पहिले आयआरबीएम अग्नी याचे ओरिसामधून यशस्वी प्रक्षेपण (२२ मे), त्रिशूल क्षेपणास्त्राची चाचणी (५ जून), पृथ्वीचे दुस-यांदा यशस्वी प्रक्षेपण (२७ सप्टें), राजीव गांधींची निवडणुकीत हार आणि राजीनामा (२९ नोव्हें), जवाहर रोजगार योजना सुरु (२९ नोव्हें), राष्ट्रीय आघाडीचे नेते व्ही. पी. सिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी (२ डिसें), ९ लोकसभा अस्तित्वात
१९९१ आखाती युद्ध सुरु (१७ जाने), राजीव गांधींची हत्या (२१ मे), १० वी लोकसभा अस्तित्वात (२० जून), पी व्ही नरसिंहराव नवे पंतप्रधान
१९९२ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी यासाठी 1992 साली 73 आणि 74 वी घटना दुरुस्ती
१९९४ राज्य घटनेच्या अनुच्छेद के आणि 243 झेड ए अन्वये 26 एप्रिल 1994 साली महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाची स्थापना
१९९५ मायावती उत्तर प्रदेशच्या पहिल्या दलित मुख्यमंत्री, महाराष्ट्रात आणि गुजरातेत भाजपचे सरकार, कर्नाटकमध्ये जनता दल आणि ओरिसामध्ये कॉंग्रेस, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (टी) ची स्थापना, मायावती सरकार पडल्यानंतर उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू, इनसॅट २सी आणि आयआरएसआय सीचे प्रक्षेपण
१९९६ हवाला प्रकरणामध्ये अनेक केंद्रीय मंत्री आणि विरोधी नेते अडकले, पीएसएलव्ही डी ३ चे आयआरएसआय सीसह २१ मार्च रोजी प्रक्षेपण, एप्रिलमध्ये ११ व्या लोकसभा निवडणुका, भाजपा १२७ जागा मिळवून भारतातील सर्वात मोठा पक्ष.
२००० तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची मार्च २००० मध्ये भारतभेट. छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड या तीन राज्यांची निर्मिती. भारताच्या लोकसंख्येने १ अब्जाचा आकडा ओलांडला.
२००२ ७१ वर्षीय ज्येष्ठ शास्त्रज्ञ अवुल पाकिर जैनुलबदीन अब्दुल कलाम यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड,
२००४ निवडणुकांमध्ये कॉंग्रेस व सहका-यांकडून भाजपाचा पराभव, परिस्थिती अनुकूल असतानाही कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचा पंतप्रधान बनण्यास नकार, कॉंग्रेस आणि सहक-यांचे केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन.
========================================================
इतिहासातील महत्त्वाची जडणघडण
इसपू ३०००-१५०० सिंधू खोरे संस्कृती
५७६ गौतम बुद्धाचा जन्म
५२७ महावीरांचा जन्म
३२७-३२६ अलेक्झांडरचे भारतावर आक्रमण, त्यामुळे भारत आणि युरोपदरम्यानचा खुष्कीचा मार्ग खुला झाला.
३१३ जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याचे राज्यारोहण
३०५ चंद्रगुप्त मौर्याकडुन सेल्युकसचा पराभव
२७३-२३२ अशोकाचे साम्राज्य
२६१ कलिंगची लढाई
१४५-१०१ श्रीलंकेचा चौल राजा एलाराचे राज्य, विक्रम संवत्सराची सुरुवात
इस ७८ शक संवत्सराची सुरुवात
१२० कनिष्काचे राज्यारोहण
३२० गुप्त काळाची सुरुवात. भारतातील हिंदु सुवर्णयुगाची सुरुवात
३८० विक्रमादित्याचे राज्यारोहण
४०५-११ चिनी प्रवासी फा-हियानची भारतभेट
४१५ कुमार गुप्त १ ला चे राज्यारोहण
४५५ स्कंदगुप्ताचे राज्यारोहण
६०६-६४७ हर्षवर्धनाचे साम्राज्य
७१२ सिंधमध्ये पहिल्यांदा अरबांचे आक्रमण
८३६ कनौजच्या राजा भोजचे राज्यारोहण
९८५ चौल राजा राजराजाचे राज्यारोहण
९९८ सुलतान महमुदचे राज्यारोहण
१०००-१४९९
१००१ मौहम्मद गझनीचे भारतावर पहिल्यांदा आक्रमण, पंजाबचा राजा जयपालचा पराभव१०२५ मौहम्मद गझनीद्वारा सोमनाथ मंदिराची तोडफोड
११९१ तराईचे पहिले युद्ध
११९२ तराईचे दुसरे युद्ध
१२०६ कुतुबुद्दिन ऐबकाचे दिल्लीच्या तख्तावर राज्यारोहण
१२१० कुतुबुद्दिन ऐबकाचा मृत्यू
१२२१ चेंगीझ खानाचे भारतावर आक्रमण (मंगोल आक्रमण)
१२३६ रझिया सुलतानचे दिल्लीच्या तख्तावर राज्यारोहण
१२४० रझिया सुलतानचा मृत्यू
१२९६ अल्लाउद्दिन खिलजीचे राज्यारोहण
१३१६ अल्लाउद्दिन खिलजीचा मृत्यू
१३२५ महम्मद बिन तुघलकाचे राज्यारोहण
१३२७ तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहुन दौलताबदेला आणि तेथून दख्खनला नेली.
१३३६ दक्षिणेत विजयनगर साम्राज्याची स्थापना
१३५१ फिरोजशाहाचे राज्यारोहण
१३९८ भारतावर तैमूरलंगचे आक्रमण
१४६९ गुरुनानक यांचा जन्म
१४९४ फरघणामध्ये बाबरचे राज्यारोहण
१४९७-९८ वास्को द गामाची पहिली भारतसफर (युरोपातुन केप ऑफ गुड होपमार्गे भारतात येण्याच्या सागरी मार्गाचा शोध)
१५००-१७९९
१५२६ पानिपतची पहिली लढाई, बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला, भारतात बाबराने मुघल साम्राज्याची स्थापना केली.१५२७ खान्याची लढाई, बाबरने राणा संगाचा पराभव केला.
१५३० बाबरचा मृत्यू आणि हुमायुनचे राज्यारोहण
१५३९ शेरशहा सुरीने हुमायुनचा पराभव केला आणि भारताचा सम्राट बनला.
१५४० कनौजची लढाई
१५५५ हुमायुनने पुन्हा दिल्लीचे तख्त काबीज केले.
१५५६ पानिपतची दुसरी लढाई
१५६५ तालिकोटची लढाई
१५७६ हल्दीघाटीची लढाई, राणा प्रतापचा अकबराद्वारा पराभव
१५८२ अकबरने दिन-ए-इलाही पंथाची स्थापना केली.
१५९७ राणा प्रतापचा मृत्यू
१६०० ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना
१६०५ अकबरचा मृत्यू आणि जहांगीरचे राज्यारोहण
१६०६ गुरु अर्जुन देवांना देहदंड
१६११ जहांगीर आणि नूर जहाँचा विवाह
१६१६ सर थॉमस रोई आणि जहांगीरची भेट
१६२७ शिवाजी महाराजांचा जन्म आणि जहांगिराचा मृत्यू
१६२८ शाहजहान भारताचा सम्राट
१६३१ मुमताज महलचा मृत्यू
१६३४ ब्रिटिशांना भारतात बंगालमध्ये व्यापार करण्याची परवानगी
१६५९ औरंगजेबाचे राज्यारोहण, शाहजहान कैदेत.
१६६५ शिवाजी महाराज औरंगजेबाद्वारा कैद
१६६६ शाहजहानचा मृत्यू
१६७५ शिखांचे नववे गुरू तेग बहादूर यांना देहदंड
१६८० शिवाजीराजांचा मृत्यू
१७०७ औरंगजेबाचा मृत्यू
१७०८ गुरु गोबिंदसिंगांचा मृत्यू
१७३९ नादिरशाहाचे भारतावर आक्रमण
१७५७ प्लासीची लढाई, लॉर्ड क्लाईव्हद्वारा भारतात ब्रिटिशांच्या राजकीय वर्चस्वाची स्थापना
१७६१ पानिपतची ३ री लढाई, दुसरा शाह आलम भारताचा सम्राट
१७६४ बक्सरची लढाई
१७६५ क्लाईव्हची भारतातील कंपनीचा गव्हर्नर म्हणून नेमणुक
१७६७-६९ पहिले म्हैसूर युद्ध
१७७० बंगालचा दुष्काळ
१७८० महाराजा रणजित सिंगांचा जन्म
१७८०-८४ दुसरे म्हैसूर युद्ध
१७८४ पिट्स इंडिया ऍक्ट
१७९०-९२ तिसरे म्हैसूर युद्ध
१७९३ बंगालचा कायमस्वरुपी तोडगा
१७९९ चौथे म्हैसूर युद्ध, टिपू सुलतानचा मृत्यू
१८००-१९००
१८०२ भसिनचा तह१८०९ अमृतसरचा तह
१८२९ सतीच्या प्रथेवर बंदी
१८३० ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांची इंग्लंडला भेट
१८३३ राजा राम मोहन रॉय यांचे निधन
१८३९ महाराज रणजित सिंग यांचे निधन
१८३९-४२ पहिले अफगाण युद्ध
१८४५-४६ पहिले शीख-इंग्रज युद्ध
१८५२ दुसरे इंग्रज-बर्मी युद्ध
१८५३ ठाणे-मुंबई दरम्यान पहिली रेल्वेगाडी धावली आणि कलकत्त्यामध्ये पहिली तारसेवा सुरु
१८५७ १८५७ चा उठाव
१८६१ रविंद्रनाथ टागोरांचा जन्म
१८६९ महात्मा गांधींचा जन्म
१८८५ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना
१८८९ जवाहरलाल नेहरुंचा जन्म
१८९७ सुभाषचंद्र बोस यांचा जन्म
१९००-१९७०
१९०४ तिबेट मोहीम१९०५ लॉर्ड कर्झनद्वारा बंगालची पहिली फाळणी
१९०६ मुस्लिम लीगची स्थापना
१९११ दिल्ली दरबार, ब्रिटनच्या राजा आणि राणीची भारतभेट, दिल्ली भारताची राजधानी
१९१६ पहिले महायुद्ध सुरू
१९१६ मुस्लिम लीग आणि कॉंग्रेसमध्ये लखनौ करार
१९१८ पहिले महायुद्ध समाप्त
१९१९ मॉंटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा, अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड
१९२० खिलाफत चळवळीची सुरुवात
१९२७ सायमन कमिशनवर बहिष्कार, भारतात प्रक्षेपणाची सुरुवात
१९२८ लालालजपत राय यांचे निधन
१९२९ लॉर्ड ओरवाओम करार, लाहोर कॉंग्रेसमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर
१९३० सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू, गांधींजींच्या दांडी यात्रेला प्रारंभ (६ एप्रिल, १९७०)
१९३१ गांधी-आयर्विन करार
१९३५ भारत सरकार कायदा संमत
१९३७ प्रांतिक स्वायत्तता, कॉंग्रेसचे मंत्रिमंडळ
१९३९ दुसरे महायुद्ध सुरु (सप्टे, १)
१९४१ रविंद्रनाथ टागोरांचे निधन, सुभाषचंद्र बोस यांचे भारतातून पलायन
१९४२ क्रिप्स मिशनचे भारतात आगमन, भारत छोडो आंदोलन सुरू (८ ऑगस्ट)
१९४३-४४ सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद हुकुमत आणि भारतीय राष्ट्रीय सेना स्थापन केली, बंगालचा दुष्काळ
१९४५ लाल किल्ल्यावर भारतीय राष्ट्रीय सेनेवर खटला, सिमला परिषद, दुसरे महायुद्ध समाप्त
१९४६ ब्रिटिश कॅबिनेट मिशनची भारताला भेट, केंद्रात हंगामी सरकार स्थापन
१९४७ भारताची फाळणी, भारत आणि पाकिस्तान अशा दोन देशांची निर्मिती
१९४८ महात्मा गांधींजीची हत्या (३० जाने), संस्थानांचे विलिनीकरण
१९४९ काश्मीरमध्ये युद्धबंदी, भारतीय संविधानावर स्वाक्षरी आणि स्वीकृत (नोव्हे, २६)
१९५० भारत सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनले (जाने २६), भारतीय संविधान अंमलात
१९५० भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950
१९५१ पहिली पंचवार्षिक योजना. दिल्लीमध्ये पहिल्या आशियाई खेळांचे आयोजन
१९५२ लोकसभेच्या पहिल्या निवडणुका
१९५३ तेनझिंग नॉर्गे आणि सर एडमंड हिलरी यांनी एव्हरेस्ट सर केले.
१९५६ दुसरी पंचवार्षिक योजना सुरु
१९५७ दुस-या निवडणुका, दशमान चलनी पद्धतीची सुरुवात, गोवा स्वतंत्र
१९६२ तिस-या निवडणुका, चीनचा भारतावर हल्ला (डिसे. २०)
१९६३ नागालँड भारताचे १६ वे राज्य बनले.
१९६४ पं. जवाहरलाल नेहरुंचे निधन
१९६५ पाकिस्तानचा भारतावर हल्ला
१९६६ ताश्कंद करार, लाल बहादूर शास्त्रींचा मृत्यू, इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी
१९६७ चौथ्या निवडणुका, डॉ. झाकिर हुसैन यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड
१९६९ व्ही. व्ही. गिरी यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड, वटहुकुमाद्वारे देशातील आघाडीच्या बँकांचे राष्ट्रीयीकरण
१९७० मेघालयाला स्वायत्त राज्याचा दर्जा
१९७१-२००४
१९७१ हिमाचल प्रदेश नवे राज्य, भारत-पाक युद्ध, बांगलादेशचा जन्म१९७२ सिमला करार, सी राजगोपालाचारी यांचे निधन
१९७३ म्हैसूर राज्याचे कर्नाटक असे नामकरण
१९७४ भारताद्वारा अणुचाचणी, फकरुद्दीन अली अहमद भारताचे पाचवे राष्ट्रपती, सिक्किम भारताचे सहकारी राज्य बनले.
१९७५ भारताद्वारा ’आर्यभट्ट’ उपग्रह प्रक्षेपित, सिक्किम भारताचे २२ वे राज्य, भारतात आणीबाणी घोषित
१९७६ भारत आणि चीनमध्ये राजकीय संबंध प्रस्थापित
१९७७ सहाव्या निवडणुका, जनता पक्षाला लोकसभेत बहुमत, निलम संजीव रेड्डी भारताचे सहावे राष्ट्रपती
१९७९ मोरारजी देसाई यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, चरण सिंग नवे पंतप्रधान, चरणसिंगांचा राजीनामा (२० ऑगस्ट), सहावी लोकसभा बरखास्त
१९८० सातव्या लोकसभा निवडणुका, कॉंग्रेस आय सत्तेत, इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, संजय गांधीचा विमान अपघातात मृत्यू, भारताने रोहिणी उपग्रह असणारे एसएलव्ही-३ ए यान अवकाशात सोडले.
१९८२ आशियातील सर्वात लांब पूल वाहतुकीसाठी खुला (२ मार्च), आचार्ज जे बी कृपलानींचे निधन (१९ मार्च), इनसॅट १अ अवकाशात, ग्यानी झैल सिंग भारताचे राष्ट्रपती (१५ जुलै), गुजरातच्या चक्रीवादळात सुमारे ५०० लोक मृत्यूमुखी (५ नोव्हें), आचार्य विनोबा भावे यांचे निधन (१५ नोव्हें), ९व्या आशियाई खेळांचे उद्घाटन (१९ नोव्हें)
१९८३ दिल्लीमध्ये चोगमची बैठक
१९८४ पंजाबमध्ये ऑपरेशन ब्ल्यूस्टार, राकेश शर्मा अंतराळात, इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधी पंतप्रधान
१९८५ राजीव-लोंगोवाल करारावर स्वाक्ष-या, संत लोंगोवाल यांची पंजाबमध्ये हत्या, आसाम करार, ७वी पंचवार्षिक योजना सुरू
१९८६ मिझोराम करार
१९८७ आर. वेंकटरमन नवे राष्ट्रपती, शंकर दयाळ शर्मा नवे उपराष्ट्रपती, बोफोर्स तोफा आणि फेयरफॅक्स घोटाळे
१९८९ अयोध्येमध्ये राम शिलान्यास पूजा, भारताचे पहिले आयआरबीएम अग्नी याचे ओरिसामधून यशस्वी प्रक्षेपण (२२ मे), त्रिशूल क्षेपणास्त्राची चाचणी (५ जून), पृथ्वीचे दुस-यांदा यशस्वी प्रक्षेपण (२७ सप्टें), राजीव गांधींची निवडणुकीत हार आणि राजीनामा (२९ नोव्हें), जवाहर रोजगार योजना सुरु (२९ नोव्हें), राष्ट्रीय आघाडीचे नेते व्ही. पी. सिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी (२ डिसें), ९ लोकसभा अस्तित्वात
१९९० शेवटचे आयपीकेएफ मायदेशी परत (२५ मार्च), इंडियन एअरलाईन्सच्या ए-३२० विमानाला अपघात (१४ फेब्रु.) जनता दलामध्ये फूट, भाजपने सरकारचा पाठिंबा काढून घेतला, अडवाणींची रथयात्रा सुरु आणि अटक, मंडल आयोग लागू करण्याची व्ही पी सिंगांची घोषणा, अयोध्येत राम जन्मभूमी-बाबरी मशीदीच्या वादावरुन हिंसा
१९९१ आखाती युद्ध सुरु (१७ जाने), राजीव गांधींची हत्या (२१ मे), १० वी लोकसभा अस्तित्वात (२० जून), पी व्ही नरसिंहराव नवे पंतप्रधान
१९९२ भारताचे इस्त्रायलशी राजकीय संबंध प्रस्थापित (२९ जाने), भारत रत्न आणि ऑस्करविजेते सत्यजित रे यांचे निधन (२३ एप्रिल), एस डी शर्मा नवे राष्ट्रपती (२५ जुलै), पहिली स्वदेशी बांधलेली पाणबुडी आयएनएस शक्तीचे जलावतरण (७ फेब्रु)
१९९३ वटहुकुमाद्वारे अयोध्येची ६७.३३ एकर जमीन ताब्यात (७ जाने), भाजप रॅलीमध्ये सुरक्षिततेचा प्रचंड अभाव, मुंबईत बॉम्बस्फोटात ३०० जण ठार, इन्सॅट २बी पूर्णपणे कार्यान्वित, महाराष्ट्रात भूकंप
१९९४ सरकारची नागरी विमानवाहतूक क्षेत्रातील मक्तेदारी संपुष्टात, गॅट करारावर वादंग, प्लेगची साथ, सुस्मिता सेन मिस युनिव्हर्स, ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड
१९९५ मायावती उत्तर प्रदेशच्या पहिल्या दलित मुख्यमंत्री, महाराष्ट्रात आणि गुजरातेत भाजपचे सरकार, कर्नाटकमध्ये जनता दल आणि ओरिसामध्ये कॉंग्रेस, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (टी) ची स्थापना, मायावती सरकार पडल्यानंतर उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू, इनसॅट २सी आणि आयआरएसआय सीचे प्रक्षेपण
१९९६ हवाला प्रकरणामध्ये अनेक केंद्रीय मंत्री आणि विरोधी नेते अडकले, पीएसएलव्ही डी ३ चे आयआरएसआय सीसह २१ मार्च रोजी प्रक्षेपण, एप्रिलमध्ये ११ व्या लोकसभा निवडणुका, भाजपा १२७ जागा मिळवून भारतातील सर्वात मोठा पक्ष.
१९९७ १५ ऑगस्ट, भारताचा ५० वा स्वातंत्र्यदिन
१९९८ मदर टेरेसा यांचा मृत्यू, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान, भारताची दुसरी अणुचाचणी (पोखरण २)
१९९९ २४ डिसे, १९९९ रोजी इंडियन एअरलाईन्सच्या आयसी ८१४ विमानाचे दहशतवाद्यांकडुन अपहरण, विमान कंदहार, अफगणिस्तानला नेले. प्रवाशांच्या सुटकेसाठी भारत सरकारने तीन दहशतवाद्यांना सोडले, जून १९९९ मध्ये पाकिस्तानने भारतीय वैमानिक फ्लाईट लेफ्टनंट के. नचिकेत यांना आठ दिवसांच्या अटकेनंतर सोडले, जम्मू काश्मीरमधील कारगिलमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी घुसखोरांचा मुकाबला करण्यासाठी ऑपरेशन विजयची सुरुवात, भारताचा विजय.
२००० तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची मार्च २००० मध्ये भारतभेट. छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड या तीन राज्यांची निर्मिती. भारताच्या लोकसंख्येने १ अब्जाचा आकडा ओलांडला.
२००१ जुलै २००१ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये आग्रा शिखर परिषद, जाने २००१ मध्ये गुजरातमध्ये भीषण भूकंप, मार्च २००१ मध्ये तहलका डॉट कॉमने प्रसिद्ध केलेल्या व्हिडियो टेप्समधून सैन्यदलातील शस्त्रास्त्रांच्या व्यवहारातील भ्रष्टाचार आणि लष्करी अधिकारी, नेते, मंत्री यांचा भेसूर चेहरा उघड, स्वातंत्र्यानंतरची भारताची ६वी जनगणना मार्च २००१ मध्ये समाप्त, भारतीय उर्जा क्षेत्रातून एनरॉनची माघार, जीएसएलव्हीचे एप्रिल २००१ मध्ये आणि पीएसएलसी सी३ चे ऑक्टोबर २००१ मध्ये यशस्वी प्रक्षेपण.
२००२ ७१ वर्षीय ज्येष्ठ शास्त्रज्ञ अवुल पाकिर जैनुलबदीन अब्दुल कलाम यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड, २७ फेब्रुवारी, २००७ रोजी भारतातील भयानक अशी गोध्राची दंगल, एप्रिलमध्ये राष्ट्रीय जल धोरणाची घोषणा. मुख्य हेतू: जास्तीत जास्त आणि पर्यावरणस्नेही वापराकरता पाणीस्त्रोतांचे एकात्मिकीकरण आणि विकास करणे.
२००३ भारतात स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडची आणि न्यूक्लिअर कमांड ऑथोरिटीची स्थापना, एअर मार्शल तेजा मोहन अस्थाना एसएफसीचे पहिले कमांडर–इन-चीफ, बहुपयोगी इन्सॅट ३अ फ्रेंच गयानाच्या कुओरौमधून यशस्वीरित्या प्रक्षेपित, प्रतिष्ठित गुन्हेगारी शोधण्यासाठी जूनमध्ये सीबीआयच्या आर्थिक गुप्तहेर शाखेची स्थापना, भारताच्या इन्सॅट ३ई उपग्रहाचे फ्रेंच गयानाच्या कुओरौमधून युरोपिअन यानाद्वारे प्रक्षेपण (डिसें)
२००४ निवडणुकांमध्ये कॉंग्रेस व सहका-यांकडून भाजपाचा पराभव, परिस्थिती अनुकूल असतानाही कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचा पंतप्रधान बनण्यास नकार, कॉंग्रेस आणि सहक-यांचे केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.