गुजरातेत 182 आमदारांत 47 जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
२०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत नवनिर्वाचित १८२ पैकी ४७ आमदारांची (२६%)पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. २०१२ मध्ये गुन्हेगारी इतिहास असलेले ५७ (३१%)आमदार होते. आता ३३ अामदारांवर (१८%) हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार यासारखे गंभीर आरोपाचे गुन्हे दाखल आहेत. २०१२ च्या तुलनेत गंभीर गुन्हे असलेल्या आमदारांची संख्या घटली आहे.
नवनिर्वाचित १८२ अामदारांच्या शपथपत्रांचे असोसिएशन फाॅर डेमॉक्रेटिक रिफॉर्म तसेच पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) सह अन्य संस्थांनी याचे विश्लेषण केले आहे.. गुजरात इलेक्शन वॉचचे समन्वयक पंकित जोग यांनी सांगितले, भारतीय ट्रायबल पार्टीचे महेश वसावा आणि काँग्रेसच्या भावेश कटारा या नवनिर्वाचित अामदारांवर हत्येचे गुन्हे दाखल आहेत. ६ आमदारांवर हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. भाजपचे शहेरा येथील आमदार जेठा भरवाड (अहिर)यांच्याविराेधात बलात्काराचा आरोप आहे. पक्षनिहाय स्थिती जाणून घेतली असता, भाजपच्या ९९ पैकी १८(१८%), काँग्रेसच्या ७७ पैकी २५ (३२%)बीटीपी दोनपैकी एक (५०%) एनसीपीचे एक आणि ३ अपक्षांंपैकी दोघांवर (६७%)गंभीर आरोप आहेत. नवनिर्वाचित १४१(७७%)कोट्यधीश आहेत. २०१२ मध्ये १३४ पैकी (७४%) आमदार कोट्यधीश होते. भाजप ९९ पैकी ८४(८५%) काँग्रेसचे ७७ पैकी ५४(७०%), बीटीपीचे २ (१००%), एनसीपी १ (१००%) यांच्याकडे १ कोटींहून अधिक संपत्ती आहे.
१८२ पैकी १३(७%)नी उत्पन्नांचा स्रोत सांगितलेला नाही, २० (११%)नी आयकराचे विवरण दिले नाही, २०१२ मध्ये निवडून आलेल्या आमदारांची संपत्ती ७.४१ कोटी होती. २०१७ मध्ये ती १०.७१ कोटी झाली. २०१२ च्या तुलनेत २०१७ मध्ये ३.३० कोटी(४५%)संपत्ती वाढली. ९६ (५३%)आमदारांचे शिक्षण ५ वी ते १२वीपर्यंत, ६७(३८%)अामदारांचे शिक्षण पदवी किंवा त्याहून अधिक, ७ आमदार साक्षर आणि १ निरक्षर, २१ (१२%)आमदारांचे वय २५ ते ४० वर्षे. १२१ आमदारांचे(६६%)वय ४१ ते ६० आणि ४० (२२%)चे वय ६१ ते ८० आहे. १८२ अामदारापैकी १३(७%) महिला आमदार आहेत. २०१२ मध्ये १६(९%) महिला होत्या. यात भाजपच्या ९ व काँग्रेस ४ आहेत.
7 उमेदवारांची संपत्ती 100 कोटींपेक्षा जास्त
गुजरातमध्ये भाजपची सत्ता कायम राहिली. विजय रूपाणी यांच्या सरकारमध्ये ऊर्जा मंत्री राहिलेले सौरभ पटेल बोतड मतदारसंघातून निवडणूक जिंकले आहेत. या वेळी निवडणुकीत 7 उमेदवार असे आहेत ज्यांची संपत्ती 100 कोटींपेक्षा जास्त होती. दासक्रोईमधून काँग्रेस उमेदवार पंकज पटेल 231 कोटींचे मालक आहेत, दुसरीकडे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना टक्कर देणारे राजकोट वेस्टमधून उभे राहिलेले इंद्रनील राजगुरू 141 कोटींचे मालक आहेत. तथापि, या 7 पैकी फक्त तिघांनाच विजय मिळवता आला.बोतडमधून विजय मिळवणारे भाजप उमेदवार सौरभ यशवंतभाई पटेल गुजरातच्या नव्या विधानसभेतील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. ते 124 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. अमेरिकेच्या फिलाडेल्फिया कॉलेजवरून टेक्सटाइल मार्केटिंगमध्ये एमबीएची पदवी मिळवणारे सौरभ बिझनेसमन आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न 1.1 कोटी आहे, दुसरीकडे वाय. इला वार्षिक दीड कोटींच्या जवळपास कमवतात. ईला 5 कोटींची ज्वेलरी घालतात. त्यांच्याकडे 40 कोटींचे बाँड्स आणि शेअर्स आहेत. सौरभ यांचे गुजरातमध्ये तीन बंगले आहेत, यांची एकत्रित किंमत 19.12 कोटी आहे. एवढी संपत्ती असूनही त्यांच्याकडे एकही कार नाही. अंबानींचे जावई- सौरभ यांची पत्नी ईला मुकेश आणि अनिल अंबानींची फर्स्ट कझन आहे. त्यांचे वडील रमणिकभाई अंबानी धीरूभाई अंबानींचे मोठे भाऊ होते.या नात्यामुळे सौरभ पटेल अंबानी कुटुंबाचे जावई आहेत.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.