अपक्ष आमदाराचा भाजपला बिनशर्त पाठिंबा; गुजरातमध्ये भाजपचं 'शतक' पूर्ण!
गुजरात विधानसभेच्या निवडणुक निकालानंतर चार दिवसांतच भाजपचं 'शतक' पूर्ण झाले आहे. गुजरातमधील एका अपक्ष आमदारानं गुरुवारी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आता त्यांच्या सरकारला १०० आमदारांचं बळ मिळाले आहे. काँग्रेसनं तिकीट न दिल्यानं रतनसिंह राठोड यांनी लुनावाडा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करत ते विजयी झाले होते. त्यांना ५५,०९८ मतं मिळाली होती. गुजरातमध्ये जे तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले, त्यांच्यापैकी रतनसिंह राठोड हे एक. परंतु, आता ते सत्ताधारी भाजपचाच भाग झालेत. राज्यपालांना पत्र पाठवून त्यांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. गुजरातमध्ये गेल्या २२ वर्षांत भाजपला कधीच शंभरपेक्षा कमी जागा मिळाल्या नव्हत्या. १९९५ (१२१ जागा), १९९८ (११७ जागा), २००२ (१२७ जागा), २००७ (११७ जागा) आणि २०१२ (११५ जागा) या पाचही निवडणुकांमध्ये त्यांनी शंभरचाच नव्हे, तर ११५ चा आकडा ओलांडला होता. परतु, यंदाच्या निवडणुकीत त्यांना ९९ जागांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे विजयाचा म्हणावा तसा आनंद त्यांना मिळाला नव्हता. आता राठोड यांच्या पाठिंब्यामुळे गुजरात विधानसभेत भाजपचं शतक पूर्ण झाले आहे.
Gujarat - 122 Lunawada | ||
Candidate | Party | Votes |
---|---|---|
RATHOD RATANSINH MAGANSINH | Independent | 55098 |
PATEL MANOJKUMAR RAYAJIBHAI | Bharatiya Janata Party | 51898 |
PARMAR PARANJAYADITYASINHJI KRISHNAKUMARSINHJI | Indian National Congress | 47093 |
SOLANKI BHUPENDRASINH PRABHATSINH | Independent | 8660 |
HIRENKUMAR GIRISHBHAI PATEL | Rashtriya Samaj Paksha | 4654 |
VISHALSINH MAHENDRASINH SOLANKI | Independent | 1553 |
PATEL HARIDAS REVABHAI | Bahujan Samaj Party | 1053 |
SHEIKH MOHAMMADANVER MOHAMMADISHAK | Independent | 992 |
SHEKH JAKIRHUSEN HUSENMIYA | Independent | 626 |
None of the Above | None of the Above | 3419 |
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.